________________
अनुक्रमणिका. भाग १ पेंच. इंग्लंडला पडलेला भयंकर पेंच - सोन्याची विलक्षण पैदास किमती वाढवीत आहे, ठराविक रोजमुरा मिळविणारांवर भारी संकरें आणीत आहे, आणि मजूर लोकांचा असंतोष व संप यांना उत्तेजन देत आहे - त्याचबरोबर हिंदुस्थानांतून सोन्याची मोठी मागणी होत असल्याने लंडनमध्यें पैसा अधिक महाग होण्याचें भय पडून फडनिसीखातें व व्यापार हीं अडचणीत येऊ पहात आहेत – इतकें असूनही सोनें पुष्कळ बाहेर न गेलें तर किंमती अशाच वाढत राहणार आणि • लोकांची अस्वस्थता व संप यांना उत्तेजन मिळून परिणामी सर्व लोकांचें फार नुकसान होणार आहे —अशा स्थितींत काय करावयास पाहिजे. मजूर भाग २ अडचणींतून निघण्याचा चुकीचा उपाय. पेंचाचा आणखी जास्त खुलासा - धातूचा पैसा फार झाल्यामुळे पूर्वी सतराव्या शतकांत व एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळीही किंमती वाढल्या होत्या- अडचण काढून टाकण्याच्या तजविजी – सोन्याचा वाढता खप आणि मागणी- सोन्याच्या राजकीय व व्यापारी ठेवी – सोन्याचा खप करणारा हिंदुस्थान - हिंदु- स्थानानें सन १८५०-६० सालीं अडचणीपासून बचाव केला – जगांतील फाजील सोन्याचा उपयोग करून हिंदुस्थान फिरून बचाव करूं शकेल - परंतु लंडनांतून सोनें फार जाऊं लागलें तर कटमितीच्या व्याजाचे दर वाढून व्यापाराला धोका येईल, या भीतीमुळे लंडनची पैशाची पेठ हिंदुस्थानानें फार सोनें घेऊं नये म्हणून हरकत करते - दुर्दैवानें हिंदुस्थाननें आपल्या हक्काचें सोनें घेऊं नये ह्या चुकीच्या धोरणाचें इंडिया ऑफिसानें अवलंबन केलें आहे आणि आपल्या गरजांपेक्षा फार जास्त नगद हिंदुस्थानांतून काढून घेतली आहे ही भयंकर लाजिरवाणी गोष्ट झाली आहे.