पान:इंग्लंडचा इतिहास भाग पहिला.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सरदार शमले व राजाला नमले | १०९ ५ सरदारांचा पाडाव -- मध्य युगांत सरदार प्रबळ होते, त्यामुळे राजेलोकांस त्यांच्या तंत्रानें वागावें लागे. परंतु सातवा हेन्री गादीवर आला तेव्हां सरदारांची स्थिति हलाखीची झाली होती. करितां त्यांची सत्ता संपुष्टांत आणून त्यांस आपले अंकित करून टाकण्यास ही संधि उत्तम आहे असे हेन्रीच्या तेव्हांच लक्षांत आलें. सरदारांनीं वाजवीपेक्षां अधिक शिपायी आपल्या तैनातीस बाळगूं नयेत असा कायदा त्यानें प्रथम केला व तो किती कडक रीतीनें अमलांत आणिला हें खालील उदाहरणावरून कळून येईल. ऑक्सफर्डच्या अर्लने हेन्रीस बॉस्वर्थच्या लढाईत पुष्कळ साहाय्य केलें होतें, व हेन्रीचाही त्याच्यावर लोभ होता. एकदां हेन्री स्वारीवर असतां त्याच्या गांवीं गेला. तेव्हां हेन्रीचा सन्मान करण्यासाठी आपले शिपायी दुतर्फा उभे करून त्याने आपल्या ऐश्वर्या चें प्रदर्शन केले. त्या प्रसंगों हेन्री बोलला. " तुम्ही माझा सन्मान केला याबद्दल मी आभारी आहे. परंतु साझे कायदे माझ्यासमोर सोडले जातात हे पाहून मला खेद होतो.. ऑक्सफर्डच्या अर्लला या काय द्याच्या उल्लंघनाबद्दल १०,००० पौंड दंड भरावा लागला. " सरदारां- कडून कायद्याचे उल्लंघन झाल्यास त्यांस शासन करण्यास सामान्य न्यायमंदिरें उपयोगी पडणार नाहीत हे जाणून हेन्रीने 'स्टार चेंबर' नांवाचें एक स्वतंत्र न्यायमंदिर स्थापिलें. या कोर्टापुढें तैनाती शिपायांबद्दलचा कायदा मोडणें, दंगा, मारामारी, बेकायदेशीर मंडळ्या, खोट्या साक्षी, बनावट कागद करणे वगैरे अपराधांची चौकशी चाले. या कोर्टात पंच बोलाविण्याची पद्धति नव्हती व त्याच्या निकालावर अपील ( वरिष्ठांकडे दाद ) ही होत नसे.? या कोर्टास फांशीची शिक्षा देण्याचा अधिकार नव्हता तरी जबर दंड ठोठावण्याची पूर्ण मोकळीक होती. अशा रीतीनें हें कोर्ट अन्यायाचें व जुलुमाचें साधनच झालें. सरदारांच्या वंशपरंपरा चालत आलेल्या जहागिरीच्या वारसदारीचे हक्क ठरविले गेले असून यापूर्वी कोणाही सरदाराला आपली स्थावर मिळकत विकतां येत नसे. हेन्रीनें ती मिळकत विकण्यास परवानगी दिली. त्यामुळे पुष्कळ कर्ज- बाजारी सरदारांच्या जहागिरी श्रीमंत व्यापाऱ्यांनी घेतल्या. या काय