पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १० ) स्त्रियांसहवर्तमान सरस्वतीवर स्नानाला आले. राजा, माझे पिते आपली तंबोरी खांद्यावर टाकून, जवळच एका झाडाखालीं निवांत बसले होते. परंतु गंधर्वपत्न्यांची ती जलक्रीडा व अंगाला चिकटून बसलेली ओलीं वस्त्रे, वगैरे पाहून माझे पिते कामदेवाच्या आधीन झाले. त्याचा परि- णाम म्हणजे माझा जन्म एका कुंभांत झाला. आणि म्हणूनच माझें नांव कुंभक अर्से पडलें. मी नेहमीं तिन्ही लोकीं हिंडतों. माझ्या पित्यामुळे मला देवादिक अत्यंत मान देतात. " 26 मुनिवरा, या दासाला समाधान नाहीं. राज्य व स्त्री यांचा त्याग करून मी येथे आलों. परंतु त्यामुळे माझ्या मनाला शांति न वाटतां तळमळच वाटते. तरी महाराज, या दासाला आपल्या सत्संगाचा लाभ घढवाल काय ? " " होय. राजा, जशी आमच्या संगतीची तुला उत्कंठा आहे तशीच मुमुक्षूच्या संगतीवांचून आह्मांला तरी शांतता कोठें वाटते ? राजा !. तुझ्यासाठी मी येथे राहतों. नाहीं, मला राहावेंच लागेल. " रामा, नंतर कुंभक त्या ठिकाणी राहिला. तो त्या राजाला नित्य बोध करी. एक दिवस तो राजाला ह्मणालाः- ८८ राजा मी तुला थोडा इतिहास सांगतों. एका महाबलाढ्य अशा हत्तीला पकडण्याचे एकानें योजिलें. एक भला मोठा खड्डा खणून नंतर त्यावर अगदीं पातळ फळ्या टाकल्या, त्यावर थोडी माती पसरली. पुढे पावसा- ळ्यांत तेथें गवत उगवलें. साहजिकच तें कोवळें लुसलुशीत गवत खाण्यास तो हत्ती तेथें आला. तो तेथे जातो न जातो तोंच तो त्या खड्डयांत पडला.. नंतर पारध्यानें त्याला बांधून अंकुशाच्या योगानें त्याला बराच वठणीवर आणला. परंतु पुढे केवळ दैवयोगा हत्ती सुटला. महाताला तें समज- तांच तो त्याच्या मार्गे येवून एका झाडावर बसला. आतां उडी टाकून.