पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अर्पणपत्रिका

आपल्याकडे अशी एक म्हण आहे की, "कामापुरता मामा व ताकापुरती
आजी". म्हणजे जरुरी संपली की त्या व्यक्तीला विसरून जावयाचे, हा
नित्यनियम. पण यालाही अपवाद असतातच.

हीच कथा माझ्या अनुभवाची आहे. गेल्या २०-२१ वर्षांत अक्षरश: शेकडो
नव्हे हजारो रुग्ण सल्ल्यासाठी आले व बरे झाले. परंतु ही निरपेक्ष सेवा
स्मरून माझ्याशी घरोव्याचे नाते जोडणारे मात्र बोटावर मोजण्याजोगे
आहेत. असे माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे एक दांपत्य आहे.


अशा

श्री. प्रकाश बाफना


सौ. अरुणा बाफना

यांना

हा ग्रंथ सप्रेम आशीर्वादपूर्वक अर्पण !