योग्य रीतीने केल्यास जसा उत्तम फायदा होतो, तसा अयोग्य रीतीने केल्यास
तोटाही होऊ शकतो, ते अनारोग्याला आमंत्रण ठरते, हे विसरता कामा नये.
"प्राणायामेन युक्तेन सर्व रोगक्षयो भवेत् ।
अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोगो समुद्भवः ॥२-१६॥"
ही पतंजलींनी दिलेली सूचना गांभीर्यानेच घेतली पाहिजे. प्राणायामावर अनेक
लेखकांनी पुस्तके लिहून त्याचे निरनिराळे पैलू दाखवले आहेत. माझा विश्वास व
थोडाफार अभ्यास लोणावळ्याच्या 'कैवल्यधाम' या संस्थेने स्वीकारलेल्या पद्धतीचा
आहे. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी नागपूर येथे असताना जनार्दन स्वामी यांच्याकडूनही
अनेक गोष्टी शिकलो. जनार्दन स्वामी हे संन्यासी व स्वामी विवेकानंदांचे अनुयायी
व त्यांना मिळालेल्या आज्ञेप्रमाणे ते हेच कार्य करत असत. घेरंड संहिता, हठयोग
प्रदीपिका व योगोनिषद यामध्ये दहा प्राणांची माहिती सांगितली आहे. ती फार
महत्त्वाची आहे.
पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२५८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५७
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/47/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7_%28%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7_-_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87%29.pdf/page258-829px-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7_%28%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7_-_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87%29.pdf.jpg)