पान:आरोग्यशास्त्र.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही



१२८ आरोग्यशास्त्र द्रवांश बाहेर काढण्यासाठीं तें दाबणें व तें टिकावें म्हणून त्यांत मीठ घालणें, अशी चाल युरोपांत आहे. लोण्याची घटना: - स्नेहयुक्त पदार्थ ८३. ५ दही १. ० रक्षा १. ५ दुग्धशर्क दुग्ध शर्करा १० पाणी १३. ० एकूण १०० लोण्यांतील पाण्याचें प्रमाण १६ पेक्षा जास्त नसावें व स्नेही भागाचें ८० पेक्षां कमी नसावें. लोण्यांत पामिटिक, स्टीअरिक व ओले- इक नामक ॲसिडें ग्लिसेरिनशीं संयुक्त स्थितींत असतात. हे संयुक्त पदार्थ जलांत अविद्राव्य असतात. शिवाय द्राव्य व बाष्परूप पावणाऱ्या स्नेही आम्ल पदार्थांचे मुख्यतः ट्युटिरिक आम्लाचे ग्लिसेराइड्स् (ग्लिसे- रीनशीं संयुक्त झालेले पदार्थ) असतात. नकली लोणी: -यास मार्गारिन, ओलिओ मार्गारिन अथवा ल्युटिरिन म्हणतात. हें प्राण्यांची चरबी किंवा कपाशी, तीळ व भुइमूग अशा उद्भिज तेलापासून तयार करितात. आटीव दही (चीस) सुपच्य अन्नांपैकीं हा एक पौष्टिक पदार्थ आहे. योग्य उष्णतामानावर दुधांत रेनेट घालून त्यांतील केसीन व बहुतेक स्नेही पदार्थांचा साखा बनतो. हें दही दाबून त्यांतील व्हे (ताक) किंवा द्रव भाग पिळून काढितात, व दाबलेल्या गोळ्याच्या सुबक वड्या करितात. आटीव दही शिळें होत जातें तसतसें केसीनचा भाग कमी होतो व स्नेही पदार्थांचा