________________
६८ जखमेंत विष भिनलें असेल तर जखम कॅर्बोलिक अॅसिडनें धुवून टाकावी. जखम जनावर चावल्यानें अगर त्यानें नांगी मार- त्यानें झाली असेल तर ऊन पाणी ओतून जखमेंतून थोडा वेळ जास्त रक्त वाहूं देणेंच इष्ट. अमोनियानें जखम धुतली तर नांगीच्या वेदना कमी होतात. बोट वगैरे ठेचल्यानें जखम झाली असली तरी रक्त थांबविण्याचे वरील उपायच करावे. पट्टी बांधणे. पट्टी बांधण्यानें अवयवावर दाब उत्पन्न करितां येतो व जख- मेवर ठेवलेली घडी वगैरे जागच्या जागीं राखतां येते. पट्टी कशी बांधावी ही प्रत्येकानें शिकण्यासारखी गोष्ट आहे. पट्ट्यांची गुंडाळीं विकत मिळतात त्याच धर्तीवर आ- यत्या वेळीं हातरुमालाची पट्टीही बनवितां येते. पट्टी बांधतांना तिचें गुंडाळें क- रून एका हातांत घ्यावें व दुसऱ्या हातानें बांधूं लागावें. बांधतांना प्रत्येक वेढा नीट बसलासें पाहून पुढचा वेढा द्यावा. प्रत्येक वेढ्याचा थोडा थोडा भाग मागल्या वेढ्यावर बसेलसें करावें. अवयव कमजास्त जाड असल्यानें पट्टी सैल पडूं लागली तर त्याच फेयाला दुमडावी. दुमडतांना त्वचेकडील बाजू वर करावी. पट्टी पाहिजे तशी रुंद अरुंद करून घ्यावी. पट्टी बांधून झाल्यावर