या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
६३ क्षयरोग झाला असें समजल्याबरोबर उपाय झाला पाहिजे, नाहींतर रोग दुःसाध्य होतो. ठिकाण राहण्यास चांगलें. क्षयी माणसाला कोरड्या हवेचें क्षय हा फुप्फुसांचा रोग असल्यामुळे फुप्फुसें खच्छ हवेनें पूर्ण भरूं देणें, होईल तितका वेळ स्वच्छ मोकळ्या हवेंत काढणें, हा त्याला मुख्य उपाय आहे. ह्याच दृष्टीनें क्षयाच्या प्रथमावस्थेत, म्हणजे प्राणायाम करणें शक्य असतें तेव्हां प्राणायामाचा उपयोग होणें शक्य आहे.