पान:आरोग्यविज्ञान.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आरोग्यविज्ञान. भाग १. शरीराकडे पाहिल्याबरोबर स्थूलमानानें शरीराचे तीन विभाग करितां येतातः - (१) डोकें (२) खोर्ड (३) अवयव ( दोन हात व दोन पाय ). ही बाह्य रचना झाली. आंतररचना फार गुंतागुंतीची पण फारच खुबीदार आहे. ती अशी:- ह्या शरीररूपी इमारतीचा पाया ८ व्या पानावरील चित्रांत दाखविलेला हाडांचा सांगाडा हा होय. झाडाभोंवतीं जसें वेलीचें तसें ह्या चित्रांतील प्रत्येक हाडाभोंवतीं स्नायूंचें ह्मणजे मांसाचें वेष्टन असतें. ह्या स्नायूंमध्यें तांबड्या रक्तवाहिन्या व पांढरे ज्ञानतंतु गुरफटलेले दिसतात. त्यांच्या वरच्या अंगास निळ्या रक्तवाहिन्या असतात. ह्या सगळ्याभोंवतीं चरबीचा एक पातळ थर असतो व त्याच्यावर आपल्याला दिसणारी त्वचा अगर कातडी असते. १ ( Trunk ) like the trunk of a tree. आठव्या पानावरील सांगाड्याच्या चित्रांतून डोकें व हातपाय वगळले तर बाकीच्या भागाला झाडाच्या खोडाप्रमाणे खोड म्हणतां येईल.