Jump to content

पान:आरोग्यविज्ञान.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५५ असते. मादी ह्या पाण्यावर अंडी घालते तीं काजळाच्या कणां- सारखीं दिसतात. त्यांतूनच पुढें डांस उत्पन्न होतो. असल्या पाण्यावर राकेल ओतून त्याचा पातळ थर बनविला तर डांस उत्पन्न होऊं शकत नाहीं. पण उत्तम उपाय झटला ह्मणजे असलें पाणी जमूं न देणें, जमल्यास तें उपसून टाकून त्याची विल्हेवाट लावणे हाच होय. ह्या बाबतींत आपल्या घरासंबंधीं सुद्धां कांहीं गोष्टी ध्यानांत ठेवण्यासारख्या आहेत. आपल्या घराची जमीन आजूबाजूच्या जमिनीपेक्षां निदान दोन फूट उंच असावी खडी, रेती वगैरे टाकून बाहेरील ओल पावसाळ्यांत आंत न येईसं करावें. ह्याच कारणाकरितां पाया दगडचुन्यानें चांगला बांधण्याची खबरदारी घ्यावी. घरांत स्वच्छ हवा व उजेड मुबलक येण्याकरितां खिडक्या दरवाजे जितके ठेवावे तितके चांगले. कोंदटपणा, घाण व ओल हीं रोगजंतूंचीं माहेरघरें होत. गुरांचा गोठा व धान्याचे कोठार घरापासून दूर असावीं. घरांत रोज उत्पन्न होणारी घाण ह्मणजे गुरांचें मलमूत्र, केरकचरा, वापरून घाण झालेले पाणी वगैरे घराजवळ सांचं न देतां, अगर जवळच जमिनींत जिरूं न देतां, लांब नेऊन जमि- नींत पुरून त्याचें खत तरी करावें, नाहींतर शेतावर पसरून उन्हानें बाळू द्यावें अगर जाळून टाकावें. आपलें आवार खच्छ राहून आजूबाजूचीं घरें, आवारें स्वच्छ नसतील तर त्यांच्यापासून रोगोत्पत्ति होणारच, तेव्हां आपण ज्या गांवांत राहातों त्या संबंध गांवाची स्वच्छता रोजच्यारोज ठेविली जाते कीं नाहीं ह्याचीही आपण काळजी वाहिली पाहिजे; कारण ती आपल्या व सर्वोच्या