Jump to content

पान:आरोग्यविज्ञान.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५३ करून त्यांना बेफिकीर बनवितां कामा नये. नाहींतर पहिल्या- नेंच विडी ओढली तिनें डोकें फिरून गेलें, नाक बंड करूं लागलें, ओकावयास येऊं लागलें, तरी पुन्हा विड्या ओढून संवय लावून घेतली, व नंतर डोळे, फुप्फुसें वगैरेंवर त्याचा वाईट परिणाम झाला, तर त्याला नाकावरचा पहारेकरी काय करणार ? किल्ल्याचा तट पाडावयाचा असला तर तोफांच्या गोळ्यांचा त्यावर मारा करितात. एका गोळ्यानें तट पडत नाहीं; पण प्रत्येक गोळ्याचा त्याच्यावर परिणाम होत असतो. आपलें शरीर हा एक असा तट आहे, व रोग हे तोफेचे गोळे होत. रोग बरा झालेला दिसला तरी गोळ्याप्रमाणें त्याचाही शरीरावर परिणाम होतोच. तेव्हां शरीराला रोगच होऊ न देण्याची आपण खबरदारी घेतली पाहिजे; आणि हें कांहीं वाटतें तितकें अशक्य नाहीं. ह्याला फक्त आरोग्याच्या नियमांचें ज्ञान व ते नियम अमलांत आणण्याचा मनोनिग्रह एवढेच पाहिजे. इच्छा असेल तर त्या गोष्टी प्राप्त करून घेतां येतात. हें सर्व ध्यानांत ठेवून वागलें तर आयुष्य कितीतरी सुखकर होईल व आपल्याला शरीर आहेसे वाटणार देखील नाहीं. आपल्याकडे पुष्कळ माणसें ज्या रोगांना बळी पडतात असे रोग मटले ह्मणजे हिंवताप, प्लेग पटकी व क्षय हे होत. हे सर्व अतिसूक्ष्म जंतूंमुळे होणारे रोग होत. हे जंतु इतके सूक्ष्म असतात कीं एक चौरस इंच जागेत तसले २००० राहतील. तथापि त्यांचा प्रभाव असा असतो, व कमकुवत रक्तामध्ये त्यांची