पान:आरोग्यविज्ञान.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ भागात जातें. नवीन सकस रक्ताचा पुरवठा पचनेंद्रियांकडून होतो. अशा तऱ्हेनें रक्त हें रक्ताशयांतून निघून शरीरभर पसरतें, तेथून परत येऊन फुप्फुसांत जातें, तेथून रक्ताशयांत व पुन्हा शरीरभर असें सारखें फिरत असतें. मुंबईसारख्या शहरांत स्वच्छ पाणी पुरविण्याकरितां फिल्टर केलेल्या पाण्याचा सांठा शहरापेक्षा उंच अशा जागीं केलेला असतो. तेथून मोठ्या नळानें पाणी आणतात. ह्या नळाला फांटे फोडून निरनिराळ्या रस्त्यांना पाणी वांटतात. ह्या फांट्यांना आणखी बारीक फांटे फोडले ह्मणजे प्रत्येक घरांत नळाची सोय होते. नळाचे पाणी वापरून खराब झालें कीं मोरींत जातें. मोरीला नळ जोडलेला असतो. हा खच्छ पाण्याच्या नळीपेक्षां चराच मोठा असतो. घाण पाणी ह्या नळांतून रस्त्याखालीं घात - लेल्या मोठ्या नळांत जातें. तेथून त्यापेक्षां मोठ्या गटारांत जाऊन शेवटी समुद्रास मिळतें. शरीरांत अशुद्ध झालेलें रक्त असें फुकट जात नाहीं, तर तेंच फुप्फुसांत शुद्ध होऊन पुन्हा कामास येतें; बाकी दोन्ही सारखींच. साधारण माणसाच्या शरीरांत सुमारें दहा बारा शेर रक्त असतें. ह्यावरून शुद्ध व सकस रक्ताचा चांगला पुरवठा शरीराला होत आहे कीं नाहीं हें पहाणें किती अगत्याचें आहे हें ध्यानांत येईल. हा पुरवठा चांगलें अन्न, मोकळी हवा व पुरेसा व्यायाम यांनीच होणें शक्य आहे. चांगल्या अन्नानें रक्त सकस होतें, मोकळ्या हवेंतून मुबलक ऑक्सिजन मिळतो, व व्यायामानें रक्तप्रसार जलद होतो. 11+0:0:0