पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आरसा : आदिवासी जीवन शैलीचा ! हा प्राचार्य भा. व्य. गिरधारी यांचा ग्रंथ, जव्हार कालखंडातील त्यांच्या वास्तव्यातून साकार होत आहे. याचा विशेष आनंद होत आहे.

 संस्थेने सोपविलेली जबाबदारी ओळखून डॉ. भा. व्यं. गिरधारी यांनी तत्परतेने जव्हारसारख्या आदिवासी, अतिग्रामीण महाविद्यालयाचे पहिले प्राचार्यपद स्वीकारले. आदिवासी परिसराचे सतत निरीक्षण, अभ्यास आणि चिंतन केले. त्याला ग्रंथरूप लाभत आहे, ही विशेष गौरवाची बाब आहे. आदिवासी समाजाची सेवा त्यांनी अत्यंत निष्ठेने केली, उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आदिवासींच्या लोकजीवनाचा त्यांनी मनःपूर्वक अभ्यास केला, त्याचे हे सुफलित आहे. महाराष्ट्रभर त्यांच्या या आदिवासी क्षेत्रातील कार्याची या ग्रंथामुळे नोंद घेतली जाईल याची खात्री वाटते.

डॉ. मो. स. गोसावी
सेक्रेटरी: गोखले एज्युकेशन सोसायटी
नाशिक - ४२२००५