पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३१


 आपणांस उदास वाटतें, कांहीं उद्योग नाहीं, असें बोलतांना आपण लोकांना कधीं कधीं ऐकतों. पण त्या उदाहरणांत तो उदासपणा त्या माणसाच्या ठायींच असतो. “सुशिक्षित माणसाला आरोग्य, हात पाय, डोळे, फुरसुतीचा वेळ इत्यादि असतांना जर उद्योग नाहीं, तर मग ज्याला इतक्या देणग्या मिळण्याची योग्यता नाहीं अशा माणसाला ह्या देणग्या ईश्वरानें दिल्या असें ह्मणावें लागतें."
 मोठी पदवी किंवा संपत्ति ह्यानें सुख मिळेलच असें ह्मणतां येत नाहीं. मनांत प्रीति नाहीं, उदार बुद्धि नाहीं, किंवा स्वास्थ्य नाहीं, मग तुझी, श्रीमंत, मोठे, किंवा सत्ताधीश असलांत तरी तुह्मांला सुखी होतां येणार नाहीं.
 अशी एक गोष्ट सांगतात कीं, इराणच्या राजाधिराजाला उदास वाटू लागलें; हृाणून त्यानें जोश्याला विचारलें व त्यानें अगदीं सुखी माणसाची बंडी घातली कीं सुख मिळेल असें सांगितलें. दरबारी लोक व श्रीमंत लोक ह्यांत बराच शोध केला, पण व्यर्थ; असा कोणीच माणूस सांपडेना. शेवटीं कामावरून परत येणारा एक मजूर त्या अटीप्रमाणें योग्य ठरला.
 तो पूर्ण सुखी होता. पण अरेरे! त्याच्या जवळही तो उपाय सांपडेना! त्या गरीब माणसाला बंडीच नव्हती.
शाहाण्या लोकांनीं जें एकमतानें कबूल केलें आहे कीं,सुख पैशाला विकत मिळत नाहीं, अथवा सत्तेनें तें पकडतां येत नाहीं, तें मीं अगोदरच दाखवून दिले आहे. राजमुकु- टांना कांटे असतात. हीरो साय मोनाएडीसला ह्मणतो :- “बहुतेक लोक राजभोगाच्या बाहेरच्या भपक्यानें फसतात; व त्यांत मला आश्चर्य वाटत नाहीं, कारण समाज, लोकांना सुखी किंवा दुःखी, मुख्यत्वेंकरून जें बाहेरून दिसतें त्यावरून ठरवितोसें