ह्मणजे काय ? याचा खुलासा करीत असतां त्याचे दोन प्रकार सांगीतले आहेत. एक असा कीं :---
पाचकाग्नीचे अल्पत्वामुळे अपाचित व त्यामुळे दूषित झालेला जो आद्य रसधातु त्याला आम असे म्हणतात.
ही व्याख्या सामान्यत्वें आमाची सांगीतली आहे. आणि सदर श्लोकाचा भावार्थ 'अपक्व रसाला आम म्हणतात ' इतका आहे. परंतु सर्व श्लोकाचा सूक्ष्म विचार करूं लागतांच त्यांत बरेच घोटाळे दिसतात. लोकामध्ये आद्य धातु आणि रस असे शब्द आहेत. आद्य हा रस धातु दूषित झाला असतां त्याला आम म्हणतात हैं ठीक आहे. पण मग रस धातु आमाशयगत कसा ? अष्टांगहृदयाचे टीकाकारांनी ( सर्वांगसुंदरा) रसधातूविषयी केलेल्या विशेष खुलाशांत यावि षयी उल्लेख नाहीं.
( रसग्रहणं पवनस्य निरासार्थं । अन्यथा आद्या धातुर्वाताख्यः इति आशंक्येत । वातादीनामपिहि धारणाद्धातुज्ञास्त्येव । ) आणि केलेला खुलासा विशेष महत्वाचा नाहीं. आद्य आणि रसधातु या दोन शब्दांत विशेष स्वारस्य काय ? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. रसधातु येवढेच म्हणण्याने वातादि दोष नव्हे हे उघड आहे. मग 'आद्य ' कशाला ? आय है रसधातूला विशेषण योजण्याचा विशेष उद्देश सर्व धातूंना आद्य असा ' रस' म्हणजे रसधातूच्याहि पूर्वांचा अन्नरस असावा असा असेल ? आणि जर अन्नरस दूषित होईल तर तसल्या अपक्व रसाने सर्व दोष दूष्य व मळ हे साम होतील हे अगदी उघड आहे. रसधातु हाहि दूष्य सदरांत येत आहे आणि त्यांत मलांचाहि समावेश होतो.
या वाक्यांतील ' अपि ' या अव्ययाने मूत्र शकृत् व स्वेद हे मल आणि दूष्याहि असल्याचे सुचविलें आहे, अन्नरस अपाचित राहिल्यास तो सर्व धातूंना दूषित करूं शकेल हे उघड आहे. तरीहि या अन्नरसाचें जें आमाशयगत असे विशेषण आहे त्याचा अर्थ काय ? अन्नरस हा आमाशयगत कसा ? आमाशय या शब्दानें बहुधा आमाचा अन्नाचा- आशय सांगण्यांत येतो. व शब्दांतील व्यापक धात्वर्थावरून पच्यमानाशय म्हणजे लघ्वंत्राचाहि बऱ्याच ठिकाणी उल्लेख असतो. पण या दोनहि ठिकाणी रसाचा संभव नाहीं व यावरून रसपचनाचे