पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहारशास्त्र

कोजेन’ नावाचा एक पदार्थ बनतो आणि जरूर लागेल तसतशी पुनः साखर बनून त्याची नंतर उपयोगात येतो. हे ग्लायकोजेन स्नायूंत व पिताशयांत साठून राहतें.कोणत्याही स्नायूच्या हालचालीचे वेळी थोडीशी साखर जळून उष्णता उत्पन्न होते,तेव्हा स्नायूंना साखरेचा प्रत्यक्ष उपयोग असतो, आणि व्यायामाने उष्णता उप्तन्न होते ती अशा रीतीने साखर जळूनच. साठवलेल्या ग्लायकोजेन पासूनही साखर उत्पन्न होते आणि साठा संपेल तसतसा जरूरीप्रमाणे पित्ताशयांतून पुरवठा होतो.यामुळे निरोगी मनुष्याच्यारक्तातील साखरेचे प्रमाण कायम राहते. शरीर गरम राखण्यास जशी चरबी विशेष उपयोगी असते, त्याचप्रमाणे स्नायूंच्या कामाला साखर पुरवण्यास कार्बोहायड्रेटचा विशेष उपयोग होतो. प्रसंगी कार्बोहायड्रेटची चरबी बनते,पण चरबीची मात्र साखर बनत नाही,तेव्हा चरबीचे प्रमाण वाढवू नये. परंतु चरबी पुरेशी नसल्यास मात्रकार्बोहायड्रेटचे योग्य पचन होत नाही व तेकमी करण्याकडें मनुष्याची आपोआप प्रवृत्ती होते.

 वनस्पतीचा सर्वंच भाग पचवण्याची शक्ती मनुष्याच्या जठराला नसते, परंतु त्यांतील ‘सेल्युलोज‘ नांवाचा जो न पचणारा भाग असतो, त्याचाही मनुष्याला उपयोग असतो,कारण त्याने आंतडयांतील केर, म्हणजे टाकाऊ म्हणून शिलक राहिलेला अन्नाचा भाग, केरसुणींप्रमाणे झाडून निघतो आणि आतड्याच्या मलविसर्जनाच्या क्रियेला मदत होते.

 वाफेच्या यंत्रांत कोळसा वगैरे जाळल्याने जी उष्णता उत्पन्न होते,ती सर्वच कामाला येत नाही,कारण त्यांतील शेकडा ८५ते९० बाजूची हवा गरमकरण्यांत फुंकट जाते,व फक्त शेकडा १०ते१५ पर्येत उपयुक्त काम करते.मनुष्याचे शरीर यापेक्षां अधिक प्रमाणांत उष्णतेचा उपयोग करू शकते, म्हणजे अन्नाने जितक्या कॅलोरी उष्णता उत्पन्न होते,त्यातील शेकडा २५ उपयुक्त काम करते,व बाकीची उष्णता फुकटच जाते.परंतु अन्न योग्य प्रकारचे असेल व मनुष्याला कामाची संवय असेल तर शेकडा ३६ पर्यंत उष्णता कामाला लावतां येते. हें प्रमाण पेट्रोलच्या इंजनापेक्षांही जास्त पडते ,कारण या इंजिनात हे प्रमाण २५ते३३ असते.

३४