पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहाराच घटक-२
-----:०:-----

 आतां शरीराला दररोजच्या हालचालीकरतां शक्ति पुरवणाऱ्या घटकांचा विचार करू. हे घटक म्हणजे कार्बोहायड्रेट, चरबी आणि शरीराची झीज भरून काढल्यावर शिल्लक राहिलेला प्रोटीनचा कांही भाग.

 प्रथम चरबीचा विचार करतां त्यांत लोणी, तूप, मांसांतील चरबी, आणि खाण्यात येणारी सर्व प्रकारची तेले यांचा समावेश होतो. साखर, गूळ, मध आणि कांही फळे खेरीज करून बाकी सर्व खाद्य पदार्थात थोडीबहुत चरबी सांपडते, इतर कोणत्याही अन्नापेक्षा वजनाचे मानाने चरबीच्या ज्वलनापासून जास्त उष्णता उत्पन्न होते, परंतु चरबी इतर अन्नापेक्षां सावकाश जळते. नडीच्यावेळीं शरीरात सांठलेल्या चरबीचा अन्नाकडे उपयोग होतो. परंतु हा सांठा फार वाढल्यास शरीराच्या सवे क्रियांस त्याची अडचण होते. चरबीचा सांठा फारच कमी असल्यास शरीर हाडकुळें दिसते.

 जळण या दृष्टीने प्राणिजन्य चरबी किंवा वनस्पतिजन्य तेले यांची किमत सारखीच, परंतु शरीरपोषणास मात्र प्राणिजन्य चरबीच अधिक चांगली, कारण त्यांत ‘ ए ’ व्हिटॅमीन असते व ते शरीराच्या वाढीला उपयोगी असते इतकेच नव्हे, तर त्याने कांही अंशी रोगजंतूंपासून संरक्षण होते. याकरतां ज्यांना दूध,लोणी, तूप, (लोंण्यापेक्षां तुपात ‘ए’ व्हिटॅमिन बरेच कमी असते) पुरेशी मिळत नसतील त्यांनीही उणीव भरून काढण्याकरतां अंडी,मासे वगैरे पदार्थ खावे, व ज्यांना धर्मांमुळे हे पदार्थ खायचे नसतील, त्यांनी निदान पालेभाज्या, टमाटो, गाजरे व मोड आलेली धान्ये खावी. परंतु इतके करूनही त्यांतून पुरेसे ‘ए’ व्हिटमीन मिळणे मुश्कील असते, तेव्हा शक्य तर दूंधदुभतेच खावे. माशांच्या तेलात ‘ए'व‘डी’ ही व्हिटॅमीने पुष्कळ असतात व त्यांनी द्रुभत्याची उणीव भरून निघते.

 शरीराला चरबीचा केवळ जळण म्हणूनच नव्हे तर इतर अनेक प्रकारांनी उपयोग होतो, मूञपिंडासाररख्या नाजुक इंद्रियांचें व जठर, आतडी वगैरेचेंही चरबीने संरक्षण होते, कारण अन्नात एखादेवेळी हानिकारक पदार्थ असणे शक्य

२२