Jump to content

पान:आदयशास्त्रकथन.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९२) ला आणवून पुसिलें अहो दानीयेल जे लोक यहुदी दे- शांतून माझ्या बापाने आणिले होते त्यांतलाच तूं नव्हस काय तुजमध्ये ईश्वरी आत्मा आहे व चांगली बुद्धि व ज्ञा- न आहे असें मी ऐकिलें आहे तर एथें सर्व विद्वान लो- क येऊन गेले पण हें लिहिणें त्यांच्याने वाचवलें नाहीं त्या- स तूं जर हैं मला वाचून समजाविसील तर तुला तांब- डा पोषाक सोन्याची कंठी व राज्यांत तिसरा अधिकार देईन तेव्हां दानीयेल सणाला तुझी देणगी तुजकडे रा- हूं दे आणि तुझ्या बक्षीसाची मला गरज नाहीं हें लि- हिणें मी बाचून तुला अर्थ समजावितों राजा परात्पर जो ईश्वर त्याने तुझ्या बापाला राज्य व वैभव व सन्मा न दिला ह्यामुळे त्याच्या पराक्रमाचें भय सर्व देशावर व लोकांवर पसरलें असा जो तुझा बाप आपल्या इच्छे- स वाटेल तसा वर्त्तला त्याचें अंतःकरण गर्विष्ठ व त्या- चें मन कांहीं कठीण होतांच तो राजासनावरून टाक ला गेला तो असा किं त्याला माणसाचें वारें देखील ना- हीं असें होऊन रानांत गाढवांबरोबर रहावें लागलें आ णि दैवर आंगावर घ्यावें लागलें तेव्हां तो समजला किं परात्पर ईश्वरच मनुष्याच्या हातून राज्यकार्य चालवि तो आणि आपल्या इच्छेप्रमाणें राजे स्थापितो तर त्या बेल शाजाराचा पुत्र तूं तुला हे सर्व ठाऊक असतां त्वां आपले हृदय नम्र केलें नाहीं व देवाच्या दयेनिराळें त्वां काम