पान:आत्मविचार.djvu/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. आत्मविचार. अनुबंधन. विषय, प्रयोजन, अधिकार, संबंध या चार प्रकरणांस अनुबंधचतुष्टय ह्मणतात, ह्मणने ग्रन्थाचा मूळ विषय काय, त्याचे प्रयोजन (फल) काय, त्याचा अधिकारी कोण व प्रतिपाद्यप्रतिपादकसंबंध कसा हैं, पूर्वी यथार्थ समजल्यावांचून वेदांतशास्त्रांत प्रवेश होत नसतो व ही चार प्रकरणे ज्या ग्रन्थांत नाहीत त्या ग्रन्थाने संसारदुःखनिवृत्ति होत नसते ह्मणून ज्यास सर्व दुःख मुक्तत्वे निरतिशयानंदमुखप्राप्तीची खरी इच्छा असेल त्याने ही प्रकरणे अवश्य ध्यानी घेऊन त्याप्रमाणे अंतर्बाह्य वर्तन ठेविले पाहिजे. जीव आणि ब्रह्म यांची ऐक्यता सर्व वेदान्तशास्त्रांत प्रसिद्ध आहे, तीच यांत प्रतिपादन करीत आहे. तस्मात् जीवच ब्रह्म असा या ग्रन्याचा विषय असून याचे श्रवणादिकं ज्ञानद्वारा जन्ममरणादिकसर्वदुःखनिवृत्ति नित्य सुखप्राप्ति असें प्रयोजन आहे व विवेकवैराग्यादिकसाधनचतुष्टय- लक्षणयुक्त ब्राम्हणच याचा अधिकारी असून प्रतिपाद्य जो परब्रम्हरूप विषय तो श्रुतियुक्तिअनुभवाने हा ग्रन्थ प्रतिपादनकर्ता आहे, म्हणून या ग्रन्थाशी व विषयाशी प्रतिपाद्यप्रतिपादकभावरूपसंबंध आहे तो मूळ अज्ञान उपाधियोगें अंतःकरणांत आवरण, विक्षेप असे दोष असतात, १ आच्छादन. २ भ्रम.