पान:आकाशगंगा.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जरूर तेंच- श्री. बाबुलनाथ 'कवि कसे झाले' हैं 'चिमणरावी चन्हाट' प्रासं- गिक प्रस्तावनेच्या पोतडीत न कोंबतां अगर पन्नासपानी अल्प ( ! ) 'परिचया 'च्या पांघरुणाखालीं ऐसपैस हातपाय पसरून 'प्रथमच ' रसि- कांचा कोंडमारा न करतां प्रस्तुत प्रसंगी फक्त 'जरूर तेंच' करण्याचें योजिलें आहे. पुस्तकप्रकाशनाचे काम सुप्रसिद्ध साहित्यसेवक गुरुवर्य प्रो. श्री. नी. चापेकर, प्रो. शं. के. कानेटकर ( गिरीश ), नाटककार स. अ. शुक्ल (कुमुद-बांधव ), प्रो. वि. मा. दी. पटवर्धन, श्री. ग. ह. पाटील, श्री. वा. भा. पाठक, कादंबरीकार श्री. द. र. कवटेकर, श्री. गोपीनाथ तळवलकर व मौजेचे सहसंपादक श्री. अ. सी. केळूसकर यांनी आपुल- कीनें ज्या मार्मिक सूचना केल्या व प्रोत्साहन दिले त्याबद्दल त्या सर्वांचा सदोदित ऋणी राहण्यांतच मला धन्यता वाटते. ह्या कवितासंग्रहांत निवडलेल्या सर्व कविता निरनिराळ्या मासिकांतून व साप्ताहिकांतून वेळोवेळी प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांतल्या त्यांत पुष्कळ कविता 'विविधज्ञानविस्तार', 'विविधवृत्त ' व 'विहार' ह्या नियत- कालिकांत प्रसिद्ध करुन सदरहू मासिक पत्रांच्या संपादकांनी कवीस जें उत्ते- जन दिलें त्याबद्दल त्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. तसेंच इतर प्रमुख मासिकांतून व साप्ताहिकांतून कांहीं कविता प्रसिद्ध केल्याबद्दल त्या त्या संपादकांचाहि मी आभारी आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सजविण्यासाठी सुप्रसिद्ध आर्टिस्ट श्री. गो. म. भांबुरकर यांनी जी मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार मानून हा कवितासंग्रह मी रसिकांना अत्यंत प्रेमादराने सादर करतो. प्रेमळ रसिक व निर्भीड टीकाकार ह्या पुस्तकाचा 'योग्य' तो समाचार घेतील अशी आशा आहे. - राम काळे