पान:अशोक अथवा आर्यावर्तांतला पहिला चक्रवर्ती राजा यांचे चरित्र.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
6
[प्रकरण
अशोक.

जे लोक जात्याच बुद्धिमान् आणि पाणीदार असतात,ते दुसऱ्याच्या शास्त्रे आणि कला संगतीपासून काही तरी फायदा करून घेतल्याशिवाय राहत नाहीत.स्त्रि० श० पूर्वी तिसऱ्या चौथ्या शतकांत ग्रीक लोकांच्या इकडे वरचेवर स्वाऱ्या होऊ लागल्यापासून, त्यांचे व हिंदूंचे विशेष संघट्टन होऊ लागले ह्मणून वर सांगितलेच आहे. आणि ग्रीक लोक या काळी सुधारणेत अग्रगण्य होते. अर्थात्च ते हिंदुस्थानांत आले तेव्हां हिंदूंनी त्यांच्यापासून भौतिक शास्त्रे व कला यांविषयींचे जेवढे ज्ञान मिळवितां आले, तेवढे मिळविण्यास कमी केले नाही. याचा अर्थ कित्येकांनी असा केला आहे की हिंदूंना हा कालपावेतों शास्त्रकलाज्ञान बिलकुल नव्हते, आणि त्यांनी ग्रीक लोकांपासूनच प्रथम त्या ज्ञानाचा ओनामा घेतला. खोदीव शिल्पकाम आणि लिहिण्याची कला हीदेखील ग्रीक लोकांनीच प्रथम हिंदुस्थानांत आणिली, असेंही कित्येक इतिहासकांनी ह्मटले आहे. पण त्याला बिलकुल आधार दिसत नाही. हिंदूंना पूर्वी- पासून या विद्या अवगत होत्या; ग्रीक लोकांचे उदाहरण पाहून त्यांनी त्यांत फक्त सुधारणा केली येवढी गोष्ट खरी आहे या काळचे शिल्प- काम पाहून डा. फर्ग्युसन नामक एका शिल्पकलाविचक्षण पंडिताने पुढील उद्गार काढले आहेत-" ख्रि० श० पूर्वीच्या तिसऱ्या शतकांतलें बुद्धगया किंवा भारहट येथील शिल्पकाम अस्सल हिंदूंचे आहे. त्यांत परकीयांच्या पद्धतीची भेसळ दिसत नाही. त्या ठिकाणी हत्ती, हरिण, वानर इत्यादिकांची चित्रे कोरण्यांत जी कुशलता दिसून येत आहे, तशी कुशलता जगांत दुसरीकडे कोठेही आढळून येत नाही. त्याचप्रमाणे झाडे आणि वेलपत्ती वगैरे बारीक नक्षीच्या कामांत दिसून येणारा नाजूकपणाही प्रशंसनीय आहे." ७ यासंबंधाने सविस्तर विवेचन R. C. Dutt's History of Civili- zation in Ancient-India a Dr. Rajendra Lal Mitra's Indo-Aryans या ग्रंथांत आहे, तें जिज्ञासूंनी पहावें. 8 R. C. Dutt's History of Civilization rol. ii P. 64,