पान:अर्धचंद्र.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्धचंद्र एक कल्पना - चित्र तुझें मी रंगविण्याचा प्रयत्न करितों कधीं तोंच मानवाकृती रहाते माझ्या नयनांपुढे ! आणि असा जर प्रयत्न केला पशुनीं कधिं काळीं— तर मग त्यांचे पुढें कुणाचें राहिल चित्र उभे ? २९-१०-२९ क-हाड. देवांचें विमानावलोकन ‘ धाडित होतों विमान आम्ही पृथ्वीवर खालीं पुण्यवान जे असती त्यांना आणाया स्वर्गी! अशी संपदा कितीक आम्हीं लुटली आजवरी ! किती हिरे नी लाल आणुनी झालों श्रीमन्त ! [अशा पचविल्या कितीक चोच्या आपण आजवरी ! कृतकर्माची फळे भोगणें ये आतां नशिबीं ! ] -विमान मागें धाडित होतों पृथ्वीवर खालीं ! खालुनी येतें विमान आतां--कुणा परी न्याया ? " १२-१२-२९ पुणें.