Jump to content

पान:अभिनवकाव्यमाला भाग दुसरा.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उरविण्याची याची तयारी नाहीं; कोणत्याहि भाषेच्या प्राचीनार्वाचीन काव्यो- द्यानांत एकीकडे सारे कल्पवृक्ष आणि एकीकडे सारे एरंड असतात, हें त्याला बरें वाटत नाहीं; ज्यांत आपल्या आवडीचा विषय प्रतिपादला आहे ती मात्र कविता, बाकीची कपिता म्हणणारेच त्याला कपि दिसत आहेत. लेखण्या नव्हे, कुऱ्हाडी किंवा तरवारी घेऊन कोणी आधुनिक कवींच्यामागे लागले, तरी त्यांच्या अधुनातनत्वाचा उच्छेद होईल असें याला वाटत नाहीं. हा काल स्थित्यन्तराचा आहे. पूर्व आणि पश्चिम यांचे संमेलन होत जाणें हें या स्थित्यन्तराचे मुख्य लक्षण असून तें जसें इतरत्र तसें आधुनिक काव्यवाङ्म- यांतही पूर्णपर्णे दिसून येत आहे. हें स्थित्यन्तर आणि हॅ संमेलन होत असतां कांहीं गोष्टी बऱ्या तर कांहीं वाईट घडत असणारच; यांत ज्या वाईट असतील अगर वाईट आहेत अशी आपली कल्पना असेल, त्यांचे डोंगर करून, बरें असेल त्याला राईहून कमी लेखणे असलें प्रतिकूल दर्शित्व हा काव्यसंग्रह करणाराला परम द्वेष्य आहे; अर्थात् आधुनिक मराठी कवितेंतले साधारण दोष याला क्षम्य वाटत असून, तिच्यांतले गुण रमणीय वाटत आहेत. याला प्राचीन मराठी कवि प्राचीन म्हणून प्रिय आहेत, आणि अर्वाचीन अर्वाचीन म्हणून प्रिय आहेत. याचे आणखी एक म्हणणे आहे, तें हें कीं, इतर उद्यानांप्रमाणे काव्योद्यानांतहि गुलाबापासून कोहाटीपावेतों सारी फुलझाडें असतात, आणि या वैचित्र्यानेंच त्याला अधिक शोभा येत असते. आधुनिक मराठी कवींवर याचें अत्यंत प्रेम आहे. त्यांत जो खरा खरा कवि आहे, तो आज कसाहि असला तरी लौकरच जसा असावा तसा होणार, ही याला 'आशा आहे. आधुनिक मराठी कविता प्रगल्भ होत असून योग्यकालीं ती जग- न्मान्य होणार असा याला विश्वास आहे. सारांश, कवि प्राचीन असो वा अर्वाचीन असो, पौरस्त्य असो वा पाश्चात्य असो, त्याच्याविषर्थी निर्मल प्रेम, आपल्या महाराष्ट्रांत आज हयात असलेल्या कवींविषयीं आशा आणि विश्वास 'या तीन गुणांवाचून ज्याच्यामध्ये दुसरी कोणत्याहि प्रकारची योग्यता नाहीं, व ज्याच्या कर्वीविषय व काव्याविषयी समजुती साधारणतः वर सांगितल्याप्रमाणे आहेत, अशा मनुष्यानें तयार केलेला हा काव्यसंग्रह आहे, हे लक्ष्यांत ठेवून वाचकांनी याला व याच्या या प्रयत्नाला वागवून घ्यावें.