पान:अबलोन्नति.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अबलोन्नति. ऋण काढून सण करूं नये. पाप करावें, कर्ज काढावें, ह्यांत मनु- व्यांस सुख वाटतें, पण त्याचा परिणाम फार गहन आहे. तो मोठमो-. ठ्यांचा नाश करितो. p याविषयों डाक्टर जानसन ह्मणतो:-. “ मोठें कर्जानें नुसती गैरसोय होते इतकेंच समजू नका, तर तें एक मो संकट आहे असा तुझाला अनुभव येईल. गरिबाला परोपकार कर- ण्याचे पुष्कळ मार्ग असून नसल्यासारखें होतात. सृष्टिकमाविरुद्ध व नीतिविरुद्ध गोष्टी आचरण्याला बरेच वेळां गरीबी कारण होते. तेव्हां पहिली ही गोष्ट ध्यानांत धरा कीं, कोणाचें ऋणको ह्मणून व्हावयाचें नाहीं. तसेंच गरीबी घालविण्याविषयीं निश्चय करा. दारिद्य हें मनुष्याच्या सुखाचा शत्रु व स्वातंत्र्याचें विघातक आहे. दरिद्री मनुष्याचे सग्गुण निरर्थक असतात. मित व्यय हा सुखशांतिचा पाया आहे. ज्याला स्वतःला मदत पाहिजे आहे तो दुसऱ्याला कसली मदत करणार !! कर्जाच्या योगानें मनुष्य स्वाभिमानशून्य बनतो. धनको व त्यांचे नोकर यांचा तो बंदागुलाम होतो. धनकोच्या दारावरून जातांना त्याला तोंड तोंड झांकून घ्यावें लागतें. कर्जबाजारी मनुष्य वेळ मारून नेण्याकरितां किती वेळां तरी खोटें बोलतो. म्हणून प्रामाणिकपणानें व सचोटीनें वागण्यास काटकसरीनें राहणें किती अगत्याचें आहे बरें?” बेंजामिन फ्रांकीन यानें छा- पलेल्या 'अलमनाकांतील “ संपत्ति मिळविण्याचे उपाय" या वि यासंबंध युनैटेड स्टेटस् मधील लोकांस एक प्रसिद्ध लिलावाच्या ठिकाणीं जो त्यानें सदुपदेश केला आहे त्याचा सारांश:- “खर्चवेंच “ . -