पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/227

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चिंतन केलेले दिसते, समाजव्यवस्थेविषयी काही निष्कर्ष काढलेले दिसतात. काही अपवाद सोडल्यास नवनवीन विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या दार्शनिक निष्कर्षांचा शोध बाजूस पडला आहे. नव्या शास्त्रज्ञांना, कदाचित् असल्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी सवड नसावी; पण विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रगतीसाठी स्वातंत्र्य आणि विज्ञानदृष्टी प्राणपणाने जपणे व त्यासाठी, आवश्यक तर सामाजिक, राजकीय संघटन आणि संघर्ष अपरिहार्य आहे.
 ही सामाजिक जबाबदारी वैज्ञानिकांनी पेलली नाही आणि ते केवळ नवनवे संशोधनच करीत राहिले तर त्यांची स्थिती उत्तमोत्तम बियाणे तयार करून जमिनीच्या मशागतीची काळजी न करणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणे होईल. तंत्रज्ञानाविषयी समाजात दुस्वास आहेच; तो असाच वाढू दिला तर सध्या जैविक बियाण्यांच्या प्रायोगिक शेतीवर हल्ले होतात, उद्या प्रतिभाशून्यांच्या झुंडी साऱ्या विज्ञानशाळांना नष्ट करण्यासाठी घोंघावू लागतील. शेवटी सीतेप्रमाणेच तंत्रज्ञानालाही 'भूमि माते, मला तुझ्या पोटात घे' म्हणण्याची वेळ न येवो!

दि. १६/५/२००१
■ ■

अन्वयार्थ – दोन / २२९