पान:अग्निमांद्य.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Qo पचनाला व गिळण्यास कठीण, तिखट, आंबट, उत्तेजक, तेलकट वगैरे पदार्थ नसावेत. हें पथ्य विशेषतः मुखपाक व घशाचा दाह यांत चांगलें उपयोगी पडतें. अरुचि उत्पन्न करणा-या कारणांचा आमाशयादि इंद्रियांशीं संबंध पोहोंचतो; यासाठीं कारणांकडे लक्ष्य ठेवून तीं दूर होतील व रुचि येईल असें अन्न घ्यावें. अरुचि नाहींशी होण्याकरितां निरनिराळ्या प्रकारचे रुचकर पदार्थ, त-हेत-हेचीं रायतीं, चटण्या, कोर्शिविरी, लोणचीं, मुरांबे वगैरे आम्ल, तित व कटुयुक्त पदार्थ, जेणेंकरून रसनेंद्रियाचे सुप्त ज्ञानतंतू जागृत होतील व लालोत्पादक पिंड तरतरित होऊन लाळ सुटेल अशा पदार्थीची योजना करावी. हे जे पदार्थ सांगितले त्यांच्या वर्णनावरून जर तोंडाला पाणी सुटतें तर मग त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कानें काय होईल हें निराळे सांगावयास नकोच. तसेंच निरनिराळ्या प्रकारची फळफळावळ, शाकभाज्या यांचा उपयोग करावा. म्हणजे अरुचि नाहींशी होऊन भूकही लागेल. अन्न खाण्यापूर्वी पहिल्यानें तोंडाच्या लक्षणांसंबंधी वर लिहितांना सांगितलेले निरनिराळे जंतुनाशक व मुख शुद्ध करणारे काढे, ग्लाय्को थायूमोलीन, पोश्याश होरस्वगैरे औषधांनीं तोंड साफ करून नंतर अन्न घ्यावें. असें केल्यानें तोंडांतील मल, उत्सर्ग व निरनिराळे रोगोत्पादक सूक्ष्मजंतू अन्नांत मिसळल्यानें होणारे रोग होत नाहींत. ५ंप्ट ढेकर येणें:-आमाशयाच्या अपचनांत करपट टँकर - | / येणें हें एक लक्षा”^' हैं लक्षण अन्न बरोबर पच्चन न झाल्या ’’’’ हे होतच्छेंॉकरितां आपल्या प्रकृतीला मानवेल अशाच प्रकारचें अन्न खावें. कधीं कधीं आमाशय इतका दुर्बळ झालेला असतो कों, कितीही हलकें अन्न घेतलें तरी देखील तें पचन होत नाहीं व कुजून त्यापासून करपट ढेकर येऊं लागतात. अशा वेळf आमाशयाची शक्ति वाढेल, खाछेलें अन्न जिरण्यास कृत्रिम रीतीनें मदत होईल व पचनास लागणारा जाठररस चांगल्या रीतीनें तयार