पान:अग्निमांद्य.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

جو स्कव्ह, रिकेट्स वगैरे रोग होतात. ह्मणून खाण्यांत निरनिराळ्या प्रकारच्या ताज्या भाज्या व फळफळावळ असावी. ज्यांना चांगल्या चांगल्या भाज्या व फळे घेण्याची शक्ति नसेल त्यांनीं निदान आंबट लिंबू, मुळा, दुधीभोपळा वगैरे वस्तूंचा उपयोग करावा. तसेंच रोजच्या जेवणांत ताक असावें. ताकांत रोगजंतुनाशक गुण फार असल्याचें सिद्ध झाल्यावरून पाश्चात्य वैद्य ताकापासून *आयुष्य वाढतें असें मान् लागले आहेत. ताक करण्यासाठीं *लॅक्टोबॅसिलीन्' किंवा ‘फमॅन्लॅक्टिलू' नांवाच्या चाक्या करून विकण्यांत येतात. या चाक्यांत असलेलीं द्रव्यें नीट रीतीनें तयार केलेल्या ताकांत विपुल असतात. मात्र कोणी ताक करण्याची खटपट वांचविण्यासाठीं आयतें बाजारी ताक आणून काम करूं ह्मटल्यास त्यांत त्यांचा तिळमात्र फायदा न होतां उलट तोटा होईल. कारण बाजारी ताक हणिजे एक तर तें ॐ हा शोध पहिल्यानें प्रो० ड्युक्लॉ व मेशनिकॉफू ह्या प्रसिद्ध जंतुशास्त्रवेत्यांनीं लाविला. हे प्रोफेसरद्वय यूरोपखंडांतील बल्गेरिआ व त्याच्या आजूबाजूच्या देशांत फिरत असतां तिकडील लोक मोठे दीर्घायु असतात असें त्यांच्या नजरेस आल्यावरून त्यांनीं त्यासंबंधानें विशेष काळजीपूर्वक चवकशी केली व अनेक प्रयोग करून शेवटीं असें सिद्ध केलें कीं, तिकडील लोकांच्या अन्नांत ताकाचा फार उपयोग करण्यांत येत असतो. ताकांत शरीराला फार उपयोगी असे एक प्रकारचे जंतु असतात त्यांनां लैंक्टिक जंतू, असें ह्याणतात. हे जंतु, दुस-या प्रकारच्या शरीराला अपायकारक अशा जंतूंचा ( ह्मणजे’ आतड्यात अन्न कुजविण्याची क्रिया ज्या जंतूंमुळे होऊन त्यापासून उत्पन् झालेलीं विषारी द्रव्यें रक्तांत शोषिलीं जातात व त्यामुळे पुढें देहाचें आरोग्ञ्~ नष्ट होतें व नानाप्रकारचे रोग उद्भवतात त्या जंतूंचा ) नाश करितात. यावरून वाचकांस समजलेंच असेल कीं, जंतूंमध्यें दोन जाती आहेत. एक उपकारी व दुसरी अपकारी. ताकाचा उपयोग केल्यानें उपकारी जंतूंचा शरीरांत संचय होतो व त्यामुळे कोणत्याहीवाटे का होईना, अन्नमार्गात जाऊन राहिलेल्या किंवा वृद्धि पावत असलेल्या जंतूंचा नाश होतो अर्थात आरोग्य प्राप्त होतें.