पान:अग्निमांद्य.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

৩৪২ रोज स्वच्छ हवेंत जाऊन व्यायाम करावा. सर्वांना सुलभ व आरोग्यशास्त्रदृष्ट्या उत्तम असा व्यायाम म्हटला म्हणजे नमस्कार वालणें हा होय. नमस्कार घातल्यापासून सर्वांगाला व्यायाम होतो. तसेंच धार्मिकदृष्ट्या नमस्कार घालण्याचा नियम केला म्हणजे तसाच सुरू ठेवावा लागत असल्यामुळे व्यायामांत नियमितपणा येतो. शिवाय या व्यायामाला डंबेल्स वगैरे साधनांची जरूरी लागत नाहीं. कोणत्याही स्थितींत हा करण्यास हरकत पडत नाही. एकंदरींत नमस्कार घातल्यापासून स्वार्थ व परमार्थ असे दोन्हीही मार्ग साधतात. व्यायामासुंबंधानें वैद्यशास्त्रांत म्हटलें आहे:- लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोऽग्निर्मेदसः क्षयः । विभक्तघनगात्रत्वं व्यायामादुपजायते ॥ (वा.सू.अ. २ रा.) अर्थ:-व्यायामापासून अंग हलकें होतें, काम करण्याचें सामथ्र्य येतें, भूक वाढते, वात झडतो, शरीर पिळदार व घट्ट होतें. ज्यांना व्यायाम करितां येत् नाही, अशा माणसांनी शुद्ध हर्वेत तरी जाऊन बसावें. यामुळे देखील पुष्कळ फायदा होतो. ज्यांना साध्य असेल त्यांनीं हवाफर करावा. पुष्कळदा जलपर्यटण किंवा । स्थलांतर केल्यानें देखील अग्रिमांद्याचे बाबतीत बराच फायदा होती. वृद्ध माणसांनीं आपल्या वयमानाप्रमाणें आहार कमी करीत जावें. जड पदार्थ न खातां हलके व पातळ पेजेसारखे पदार्थ खावेत. जॉर्ज चेन हे आपल्या 'पथ्यापथ्य विचार' नांवाच्या पुस्तकांत म्हणतात कीं, *पन्नाशी उलटल्यावर शहाण्या माणसानें आपला आहार हळुहळु Fಳ್ತಭ್ದ೦ತ್ಥht to ti.. lessen at least the quantity of his 4liment, an if he would continue free of great and dangerous Distempers and preserve his Senses and Facultis clear to the last, he ought every seven years go on abating gradually and sensibly, and at last descend out of Life as he ascended into it, even into the Child's Diet.'