पान:अग्निमांद्य.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

بھا9 vina दोन अडीच तास आधीं ठरविलेली असावी. म्हणजे निदान वर सांगितल्याप्रमाणें शरीरांत रक्त खेळण्याला योग्यप्रकारें संधि मिळून अग्रिमांद्याचें एक मुख्य कारण तरी चुकेल. कोणतेही शारीरिक किंवा मानसिक श्रम करून आल्यावर लगेच जेवृं नये. कारण शारीरिक श्रमानें रक्त शरीराच्या पृष्ठभागीं विशेष आलेलें असतें; किंवा मानसिक श्रमानें मेंदूकडे जास्त गेलेलें असतें. या दोन्ही कारणांमुळे रसग्रंथींना पुरेसें रक्त न मिळाल्यामुळे पाचकरस बरोबर तयार होत नाहींत. अर्थातू अशा वेळीं अन्न खाल्यानें तें न जिरतां अग्रिमांद्य होतें; म्हणून थोडा वेळ थांबून नंतर जेवावें. मिताहारी माणसानें उपोषण करू नये. कारण त्यामुळे त्याची 'पचनक्रिया बिघडली जाते. परंतु ज्यांच्या आमाशयाला मधुनमधुन वारंवार खात राहिल्यानें किंवा वाजवीपेक्षां फाजील खाल्यानें विश्रांतीच मिळत नाहीं त्यांनीं *उपवास करणें बरें. प्रकृतिमानाप्रमाणें थंड किंवा ऊन पाण्याचें स्नान करावें. होतां होई तों थंडपाण्यानें स्नान करणें बरें. कारण निसर्गतः मिळणा-या पदार्थाची संवय ठेवल्यानें हवेच्या फेरफारानें वगैरे होणारे विकार तितके बाधत नाहींत. उदाहरणार्थ, ज्यांनां थंड पाण्याचें स्नान करण्याची संवय आहे असे लोक थंड हवेंत फिरल्यानें त्यांस फारसा त्रास होत नाहीं पण जे गरम पाण्यानें खान करितात असे लोक थड हवेंत फिरल्यास त्यांस लगेच सर्दी होते. खान करितांना सर्व अंग चांगलें चोळून धुवावें; केंसांत मळ राहूं देऊं नये; स्नान झाल्यानंतर अंग स्वच्छ” वखानें किंवा टॉवेलनें साफ पुसून काढावें; नंतर गंधानुलेपन वगैरे करून स्वच्छ वस्त्रे धारण करावीत. ऋतुमानाप्रमाणें कपडे लोंकरीचे किंवा सुताचे असावेत. .

  • येथें उपवास याचा अर्थ अलीकडे ज्याप्रमाणें उपवासाचे दिवशी दुप्पट -खाण्यांत येतें त्याप्रमाणें नसून निराहार असा समजावा.