पान:अकबर १९०८.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
खंड २ रें.

 करून घे. यावेळीं त्यासंबंधानें मी जें कांहीं तुला सांगत आहे, त्याची कुल्लुकगुरूजवळ चर्चा करूं नकोस. कारण, त्याचा परिणाम चांगला होणार नाहीं अशी माझी समजूत आहे. हा पितापुत्रांचा विरोध कोणी उपस्थित केला आहे हें तुझ्या ध्यानांत आलें असेलच. एक वेळ उघड- पण तंटा सुरू झाला आणि देशांतल्या देशांत एकमेकांविरुद्ध दोन तीन • सैन्ये उभी राहिलीं झणजे बादशहास आमच्या देशांवर आक्रमण करून येण्यास तेवढें मिष बस्स होईल आणि तो त्याचक्षणीं आपलें प्रचंड सैन्य घेऊन चढाई करील. भेदी लोकांना पर्वतांतील सर्व गुप्त मार्ग माहीतच • झाले आहेत ! अखेर आपला स्वतंत्र देशही बादशहाच्या राज्यांत सामील - होऊन जाईल. बादशहानें अन्य देशावर कितीही जय मिळविले तरी त्याचें सुखदु:ख आम्हांस विशेषसें होणार नाहीं. परंतु, तीच त्याची राजतृष्णा आमच्या स्वतंत्रतेचा नाश करणारी होईल कीं काय याची मोठी भौति वाटत आहे.
 उसिद्धरामानें कांहीं वेळ विचार करून झटलें, ' असेंच जर असेल तर मग आपण त्याची सेवा कशी पतकरली ? ज्यानें आमच्या देशाची • स्वतंत्रता नष्ट करण्याचें योजिलें आहे त्याच्या सेवेंत आपल्यासारख्यांनी सदा तत्पर असणें हें कसें संभवतें ?,
 सल्हाणानें आश्चर्यानें उत्तर दिलें, ' कां बरें ? यांत काय हानी आहे ? आपल्यापैकीं एखादा पुरुष नेहमीं बादशहाच्या समीप असणें आपणांस हितकारक नाहीं काय ? त्यानें बादशहाच्या समीप राहून आपल्या शरी- रास कोणत्याही प्रकारें धक्का न लागू देतां बादशहास सहायता देऊन त्याच्या सर्वप्रकारच्या हालचालीवर दृष्टी ठेवावी. त्यांतही तुझ्यासारख्या पुरुषाची बादशहाच्या निकटवर्ती जनांमध्यें गणना व्हावयाची आहे. याहून आपणांस आणखी चांगली गोष्ट ती कोणती पाहिजे ? माझ्या- पेक्षां तुझ्यासंबंधानें लोकांस कांहीं कमी संशय येईल, किंबहुना मुळींच नाहीं झटलें तरी चालेल. अशारीतीनें तुझ्या द्वारें आमचीं अनेक कार्ये. साधतील.
सिद्धरामानें कांहीवेळ विचार करून विचारलें, परंतु, असें करणें धर्म- संमत होईल काय ?