या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
[ ११ ] जणुं दुजी रति वाटलि पंडिता, जयिं तया निज दर्शवि चारुता. ९ कुसुमकोमल देह जिचा असे, कर जिचा कुसुमां निवडीतसे, पदर सांवरुनी वरचेवरी, सुतनु लज्जित होइ परोपरी. १० धरुनि पुष्प करीं पद टाकिते, निजविलास मनोहर दात्रि ते, रुचिरता वदनावरि भासली, चतुरताहि तिच्यामधिं दीसली. ११ [ इंद्रवज्रा ]. जाग्यावरी राहि उभाच राया, त्याला नुरे भान पुढें चलाया, पाहोनि तीतें मन होइ दंग, झाली तदीया मति फार गुंग. १२ [ शिखरिणी ]. कटाक्षानें त्यातें जणुं मुललना घाव करितां तयाच्या चित्ताला मृदु करुनि दावी चतुरता, स्वसामर्थ्याने की हरण करि त्याचें मन तदा, तयाला त्या स्थानी मिडुनि जणुं टाकी दृढ सदा. १३