Jump to content

पान:अकबर बादशाहा.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३४] [वसंततिलका ]. गर्भार राहिलि तदा प्रिय पट्टराणी, कांती जिची प्रतिदिनीं प्रकटे फिरोनी, पाहोनि हें अधिक हर्ष नृपास होई, देखावया प्रियसखी नृप नित्य जाई. ७१ [ पृथ्वी ]. "प्रभूतमसयीं हिचे बहुत हाल होतील कीं, " ह्मणोनि उपचारिं तो कधिं न होउं देई चुकी, स्वयें सकळ वासना पुरवितां खपे राय तो अशापरि पहा तिला नवम मासही लागतो. ७२ [ इंद्रवजा ]. व्हावा मला आत्मज, कामना ही चित्तीं धरी तो दृढ, अन्य नाहीं, विश्वेश्वरेच्छा परि भिन्न होती, कोठून हो पूर्ण सुवासना ती- ७३ [ भुजंगप्रयात ]. मुसल्मान जोशी तदा प्राप्त झाले, तयांनी यथाशक्तिही यत्न केले, "इला पुत्र होईल का ?" प्रश्न येतां, तयानी अशी लेखिली गोड वार्ता. ७४ [शार्दूलविक्रीडित]. "राजा ! पुत्र न होय याच समयीं, तत्रापि धैर्या घरीं, "हल्ली पोटिं तुझ्या सुदैव तनुजा आली असे सुंदरी,