________________
भाग ११ वा. ८७ असेंच वाटावें ह्मणून कोणची व्यवस्था करावी इत्यादि राज्यविषयक प्रश्नांचा अकबरानें खोल विचार केलेला होता, हे निर्विवाद आहे. काम फार आयासाचें व बिकट होतें. मुसलमानी राजांचा अंमल हिंदुस्थानांत सुरू होऊन आज चारशे वर्षे होऊन गेली होती. परंतु, या अवकाशांत भरतखंडांतील अनेक जातींच्या लोकांतील परस्परांचे • संबंध सांधून सर्व प्रजाजनांचे हिताहित एकच करण्याचा प्रयत्न काही राजाने केला नव्हता. प्रत्येक बादशहा गादीवर येई तो "बळी तो कान पिळी " याच तत्वास अनुसरून अधिक बलाढ्य व प्रबळ शत्रु उपस्थित होतांच राज्यकर्त्या घराण्याचा अंत व्हावयाचाच. ह्मणून, ही मुसलमानी राजघराणीं व राज्य करीत असलेले घराणें हीं सर्व क्षण- भंगुर आहेत, असा जनसमुदायांचा ठाम ग्रह होऊन बसला होता. इतकेंच नव्हे, तर या योगानें देशांत चोहोंकडे बंगाल्यापासून तो गुजराथे- पर्यंत तोतया राजांची रांगच रांग लागून गेली होती. राजघराण होऊन गेलीं त्यांचे हे वंशज होते. असें वाटत होते की मोगलांचे सार्वभौमत्व हे शाळू दिवसाप्रमाणें दोन दिवस चालावयाचें. देवाचें पारर्डे फिरलें ह्मणजे हें ही लयास जाणार; व आपल्यापैकीं एकास किंवा दुसरा कोणी स्वारी करणारा येऊन त्यास हें राज्य मिळावयाचें. हुमायुनाचा पाडाव बोलतां बोलतां झाला व त्यास हुसकून देण्यास तिळमात्र आयास पडले नाहींत, या गोष्टीचें स्मरण लोकांस होतेंच. त्यामुळे मोंगलांचे घराणें ही स्वल्पायुच असा- वयाचें, हा ग्रह दृढच झाला होता. कनोज येथें पराभव होतांच हुमायुनाने हिंदुस्थानांतून यःपलाय़ केलें, तेव्हां मोंगलांचें सार्वभौमत्व भरतखंडांत सतत तेरा वर्षे चाललें होतें तरी त्याचा कोठें मागमूस देखील शिल्लक राहिला नव्हता व त्या राजवृक्षाचे एकही मूळ देशांत रुझलें नव्हतें. मार्गे जी अनेक यापैकी प्रत्येकास या सर्व गोष्टी अकबरानें मनांत पूर्णपणे ओळखून ठेविल्या होत्या. संस्थानिकांस व जनसमुदायांस पूर्वीच्या अस्थिरतेचा विसर कसा पाडावा;