Jump to content

पान:अकबर.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० अकबर बादशहा. व सरदार लोक त्याच्या भावास जाऊन मिळाले होते, कारण हुमायुनाचा अंतकाळ आतां अगदीं समीप आला आहे अशी त्यांची खात्री झाली होती. आपल्या सासऱ्याने पाठविलेले सैन्य मदतीस घेऊन कामरानानें पुनः काबूल हस्तगत केलें होतें व अकवरही पुनः त्याचे हात आला होता. लागलींच अटकाखानाची उचलबांगडी झाली व त्याच्या जागीं कामरान यानें आपल्या नौकरांपैकी एकाची योजना करून त्याजकडेस अकबराची जोपासना सोपविली. दुखण्यांतून उठून अंगांत ताकत येते न येते तोंच आपली राजधानी पुनः काबीज करण्याकरितां हुमायुनानें स्वारी केली. कालच्या बाहेरील पुण्यांत कामरानाच्या सैन्यांतील अति प्रतापी शिपायांचे टोळीचा त्यानें विध्वंस केला; व आपली छावणी " कोआकाबेन” येथें स्थापिली. या ठिकाणाहून काबूलचा किल्ला व शहर अगदीं माऱ्यांत होतें झणून हुमायुनानें तेथून तोफांचा भडिमार सुरू केला. थोड्याच दिवसांत या भडिमारानें इतका कहर उडवून दिला व इतकी नासाडी केली कीं तो थांबविण्याकरितां " तोफा बंद करा नाहींतर मी अकब- रास भिंतीवर गोळ्यांचा ऐन मारा आहे तेथें आणून उभा करितों" असा निरोप कामरानार्ने हुमायुनाकडे पाठविला. हुमायुनानें तोफा बंद केल्या तथापि वेढा तसाच राहूं दिला. व तारीख २८ एप्रील १९४७ रोजी विजयी होत्साता त्यानें शहरांत प्रवेश केला. कामरान अधळे दिवश रात्रीच पळून गेला होता. अकबरनाम्यांत अबूफझल ह्मणतो कीं कामरानार्ने ह्मणण्याप्रमाणे अकबर यास खरोखरच तोफांच्या मान्यांत आणून उभे केलें होतें. हैदर मिरझा, बदौनी व फेरिस्ता आणि इतर इतिहासकार ही असेंच वर्णन करतात. परंतु त्या प्रसंग हजर असलेला वयदि ह्याने त्या वेळच्या सर्व क्रूर कृतींचें साम वर्णन केलें आहे तथापि या गोष्टीचा त्यानें उल्लेख केला नाहीं.. आणि जोहर यानें हुमायुनचें जें खासगी रीतीनें