Jump to content

पान:अकबर.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टीपा: २१३ बंगारपूर (१६) मेवाड अथवा उदेपूर आणि (१७) सिरोही. मध्य भागांत ( १८ ) किशनगड ( १९ ) शहापूर व ( २० ) टोंक ही संस्थानें असून इंग्रज सरकारचा अजमीर जिल्हा हा मध्यवर्तीच आहे. चंदेरी (पान ३६, ओळ १९ ): - है शहर याच नांवाच्या जिल्ह्याचें अधि- ष्ठान असून शिवाच्या राज्यांत आहे. येथील किल्ला फारच नामांकित होता. त्याच्या सभोंवतीं दगडाचा परिकोट असून त्यांत ठिकठिकाणी संरक्षणार्थ गोल असे बुरुज बांधिलेले होते. हा किल्ला फारच मजबूत व भक्कम होता तो इतका कीं एके प्रसंगी शत्रूंनी यास आठमहिने वेढा घातला असतां तो काडीमात्र देखील ढगमगला नाहीं. येथें १४००० दगढी घरें, ३८४ बाजार, ३६० धर्मशाळा व १२००० मशीदी होत्या असे आईन ए अकवरीत वर्णिले आहे. विहार (पान ३७, ओळ ९ ): - हा प्रदेश बंगाल इलाख्यांत आहे. प्राचीन- काळ यास मगध देश ह्मणत. बौद्ध धर्माची जन्मभूमी ह्मणून या प्रांतास पवि- त्रता आलेली आहे. येथून लंका चीन, तार्तरी व तिबेत या देशांत धर्मोपदेशक जाऊन त्यांनी त्याची प्रसृति केली. बुद्ध लोकांच्या मठास "विहार" असें ह्मण- तात. या प्रांतांत त्यांचे प्राचूर्य असल्याने सर्व देशास हें नांव प्राप्त झालें । आहे. ते वेळीं, दिल्ली, ढोलपूर (पान ३७, ओळ १५० ): - राजपुतान्यांत याच नांवाचें एक संस्थान आहे. त्याची हैं शहर राजधानी आहे. याची स्थापना राजा घोलनदेव याने ११ व्या शतकांत केली असें ह्मणतात. येथें आक्टोबर महिन्याच्या अखेरीस दरसाल यात्रा भरत असते. आग्रा, कानपूर, लखनौ इत्यादि ठिकाणांहून अनेक जिनसा व माल येतो. याशिवाय घोडे व इतर जनावरें ही येतात. याच्याजवळच मुचकुंद नांवाचें एक विस्तीर्ण सरोवर आहे. तेथे दरवर्षी मे महिन्यांत स्नान करून देहपावन करण्याकरितां भक्तिमान लोकांच्या झुंडीच्या झुंडी जमा होतात. जैसलमेर (पान ४६, ओळ ४ . ) : - राजपुतान्यांत जैसलमेर या नांवाचे एक संस्थान असून त्याची हें शहर राजधानी आहे. इ० स० ११५६ साली रावल- जैसल यानें त्याची स्थापना केली. येथील इमारती पिवळ्या दगडाच्या केलेल्या आहेत. हा दगड दुरून मातीसारखा दिसतो परंतु जवळून पाहिला म्हणजे त्याची योग्यता लक्ष्यांत येते. हा दगड मजबूत आहे, इतकेंच नाहीं तर त्यावर नक्षीचें खोदीव काम फारच उत्तम प्रकारचें करितां येतें येथें टेकडीवर एक किल्ला आहे त्याची उंची २५० फूट असून त्याच्या सभोवती २५ फूट उंचीचा