Jump to content

पान:अकबर.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १९३ ही मुकदम्यांत बादशहाकडून त्यांतील कागदपत्रांचें अवलोकन होऊन · केलेला ठराव मंजूर होईपर्यंत देहान्त शिक्षा देऊं नये. विंध्याद्रीच्या दक्षिणेस दक्षिण अथवा महाराष्ट्र या नांवानें प्रसिद्ध अस- लेल्या प्रदेशांतील बादशाही इलाख्याचे तीन सुभे केले होते. पुढे त्यांत नवीन जिंकिलेल्या मुलुखांची व परगण्यांची भर पडल्यामुळे त्याचे सहा सुभे करावे लागले. अकबराच्या मरणानंतर हा सर्व विस्तीर्ण मुलूख एका अंमलदाराच्या स्वाधीन करण्यांत आला; व त्यास सुभेदार असा किताब दिला. दक्षिणेचा सुभेदार हा पुढें प्रसिद्ध झालेल्या निजामाचा पूर्वा- वतार होय. सुभेदाराच्या बरोबरच पण त्याच्या हाताखालीं दिवाणाची नेमणूक केलेली असे. वसुलाचें व कारभाराचे काम त्याकडे सोप- विकेलें होतें. अकबर हा एक महान वैभवशाली व ऐश्वर्यवान् बादशहा होऊन गेला. त्याची वागणूक अगदी साधी होती. तथापि, पूर्वेकडील प्रजेवर अंमल चालविण्यास मोठा थाट व ऐश्वर्य दाखविणें अवश्य आहे, हें तत्व ब्रिटिश राज्यांत सर्वांत मोठा होऊन गेलेल्या व्हाइसराय साहेबांस जसें समजलें होतें तसें तें त्याला ही समजून आलें होतें. प्रजाजनांच्या डोळ्यांत ऐश्वर्याचें तेज भरविणें, ज्या नरश्रेष्ठाची नुसती मान हलली ह्मणजे मोठ्या घडामोडी घडून येतात व जो इहलोकीं ईश्वरी गुणांची एक साक्षात् मूर्तिच मानिली जातो त्याचा डामडौल व थाटमाट त्यांना दृग्गोचर करणे, व याचप्रमाणें त्याचें अधिकारऐश्वर्य त्यांना दिसूं देणें, या सर्व गोष्टी हिंदुस्थानांतील राज्यशकट चालविण्यास फार अगत्याच्या आहेत. ही केवळ कल्पनासृष्टि आहे असें नाहीं. "नीचे आप और उपर खुदा" उद्गार अद्यापपर्यंत निघतात अशा तऱ्हेचे जे हिंदुस्थानांतील लोकांचे त्यावरून 'नाविष्णुः पृथिवी पतिः' ही पुरातन समजूत त्यांच्या कल्पनांत किती भिनून गेली आहे हे समजते. सर्व सत्ताधीश व अधिकार संपन्न पुरुषाला आजमितीस देखील ते ईश्वरस्थानींच मानितात. " राजाकालस्य 25