________________
१९० अकबर बादशहा. त्यांच्या तोडीचा अधाशी व दांभिक असा वर्ग दुसरा कोणता ही इतिहा- सांत सांपडावयाचा नाहीं. या मंडळीचा अकबरास मनापासून तिट- कारा असे. तेव्हां त्यांच्या हक्कासंबंधीं त्याने अगदी कसून व बारीक चौकशी केली. त्यांत जेथें दोष सांपडला, अथवा जेथें जहागीर अथवा इनाम लबाडीने मिळविलें आहे असें त्याचे नजरेस आले, तेथें त्यानें त्या देणग्या एकदम खालसा केल्या व त्यांचा उपभोग करणारांस सिंधप्रांतांतील बक्कर येथें किंवा बंगाल्यांत हद्दपार केलें; कारण या दोन्ही ठिकाणचे हवापाणी फारच वाईट आहे, असा त्यावेळीं बोभाट होता. शिवाय, अकबराने याबाबतीत सुधारणा चालली असतां सदरचे अधिकार अतिशय कमी केले व ते बहुतेक आपणाकडेसच घेतले. राज्यांतील मुलकी खात्यांत अकबराने ज्या सुधारणा केल्या त्यांचा . साधारण झोंक व परिणाम कोणत्या प्रकारचे होते याविषयीं प्रख्यात इति- हासकार आनरेबल माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी आपले मत दिले आहे कीं 46 त्याच्या जमाबंदीच्या पद्धतींत सुरू केलेल्या सुधारणांच्या योगानें तत्कालीन प्रजाजनांच्या सुखांत भर पडली हें खरें. तथापि त्या सुधारणा दिवसेंदिवस वाढत जातील असें कांहीं तत्व त्यांच्यांत नव्हतें. दुसरें, खेड्यापाड्यांतील लोक इतर रोजगार धंद्यास लागतील, किंवा व्यक्ति पराक्रमार्ने उदयास येतील असे कांहीं मार्ग काढून त्यांना उमेद देतील अशा त्या नव्हत्या." या ग्रंथकारांविषयीं आमची मोठी पूज्यबुद्धि आहे व ह्मणून संकोच धरूनच हे त्याचें मत आह्मांस ग्राह्य नाहीं असें ह्मणण्याचे आह्मी धाडस करितों. अकबराने आपल्या पिढीच्या लोकांत सुखाची भर घातली, ही गोष्ट तर निर्विवादच आहे. परंतु, एल्फि- न्स्टन साहेबांनी सुचविलेल्या मार्गानें अकबर वागला असता, तर त्या योगाने त्यावेळच्या हिंदु-समाज-स्थितीचे अस्तित्वास अत्यवश्यक अस- केल्या तत्वांचा नाश झाला असता. गांवचा अधिकारी पाटील याच्या