Jump to content

पान:अकबर.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. Z १८५ असलेलीं निरनिराळीं व एकमेकांस न जुळणारीं वजन व मापें मोडून टाकून त्यांच्या ऐवजीं त्यानें एका प्रमाणाचीं वजर्ने व मापें सुरू केलीं. आईन ए अकबरींत असें लिहिलें आहे कीं, "या स्तुत्य निर्बंधामुळे ( १ ) " तहसीलदारांच्या मनावरील अनिश्चितपणाचा जंग निघून गेला ; ( २ ) प्रजाजन अनेक प्रकारच्या जुलुमांतून मुक्त झाले ; ( ३ ) वसुलाची आमदानी वाढली; व सरकारचीही आबादानी झाली ;" याच- प्रमाणे, जमीनीची मोजदाद करण्याकरितां अकबरार्ने सुधारलेलीं यंत्रें उपयोगांत आणविलीं व त्यांनीं राज्यांत असलेल्या लागवडीमाफक जमी- नीची नवीन जमाबंदी केली. आईन ए अकबारींत असें ही लिहिलें आहे कीं, दरएक बिष्यामागें दहा शेर धान्य सरकारचा हिस्सा ह्मणून वसूल करण्याची अकबराने वहिवाट घातली. ही धान्य घेण्याची पद्धति आपल्या राजवटयाच्या उत्तरार्धात महकूब करून त्याबद्दल नगदी रकम घेण्याचें त्यानें ठरविलें. सरकारी जनावरांना दाणाचारा मिळण्याकरितां, शेतकऱ्यांना पेरणी करण्याका वेळेनुसार बीं मिळावें ह्मणून, दुष्काळ निवारणार्थ आपल्याजवळ धान्याचा संग्रह असावा या हेतूनें, व गोरगरिबांस पोशितां यावें, अशा इराद्यानें या दूरदर्शी प्रजाजन- हितैषी बादशहानें जिल्हेनिहाय कोठारें बांधिली व त्यांवर निवडक इमानदार व भरंवशाच्या कामगारांची नेमणूक केली. अकबरानें आपल्या राजवट्याच्या पूर्वार्धीत सुपीकपणाच्या मानानें नमीनीचे तीन वर्ग केले होते. या प्रत्येक वर्गातून एक एक बिघा नमीन घेऊन व त्यांचें सरासरी उत्पन्न काढून त्या उत्पनाप्रमाणे जमीनी- वरील धारा कायम केलेला होता. हें सरासरीने काढलेलें उत्पन्न एखाद्या खातेदारास नापसंत झाल्यास, आपल्या एकंदर पिकाची मोजदाद करवून त्यांची रास्त किंमत ठरवून घेण्याचा त्यास हक्क असे. त्याप्रमाणेच उत्पन्नाचे मानार्ने सर्वांवर सारखाच धारा बसवितां यावा ह्मणून जमीनीचा मगदूर ' व पूर वगैरे अपघातांपासून भीति किंवा निर्धास्ती हीं लक्षांत आणून. 24