Jump to content

पान:अकबर.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
अकबर बादशहा.

शत्रूंबरोबर तहाचें बोलर्णे सुरू केलें. शत्रूंच्या गोटांत फूट व मत्सर नसता तर या खटपटीचा कांहीं उपयोग झाला नसता. परंतु त्या 'फुटाफुटीमुळे त्यास फरघणाचे राज्यांपैकीं जें उरलें होतें तें मिळवून आप- लेंसें करून घेतां आलें. पण खोजंड, मारधिनन आणि युरेटिप हीं मह- त्वाचीं शहरें त्याच्या ताब्यांतून गेली.
 शत्रु निघून गेल्यानंतर लहान बाबर दोन वर्षेपर्यंत स्वस्थ बसला. ह्या कालांत आपल्या राज्याची सुव्यवस्था लावून फौज फांटा व दाणा गोटा जमवून तो शत्रूवर स्वारी करण्याची संधि पहात होता.तेवेळी समरकंद हे शहर मध्य एशियांत फार महत्वाचें होतें. तेथें बखेडा उत्पन्न झाल्याचे पाहून त्याने त्यावर एकदम स्वारी केली व तें शहर काबीज केलें. परंतु त्यानें आपल्या सैन्यास लूट करण्याची मनाई केल्यामुळे हजारों लढाऊ लोक त्याला नाराज होऊन सोडून गेले; तरी तो तसाच टिकाव धरून राहिला. अखेरीस स्वतःचे फरघण्यावरच हल्ला झाल्याची बातमी आल्यामुळे त्याला तेथील तळ सोडणें भाग पडले. ऐन निवण्याचे वेळीं त्याला कठीण दुखणे आले व त्या योगानें तो अगदीं निःशक्त झाला. सरतेशेवटीं तो फरघण्यास जाऊन पोहोंचला, तेव्हां आपली राजधानी शत्रूच्या स्वाधीन झाल्याची बातमी त्याचे कानी आली. वस्तुतः यावेळीं तो राज्याशिवाय राजा होता; कारण त्याचे अंमला- खाली कोणाचाच प्रांत नव्हता. त्याने स्वतःच लिहिलें आहे कीं “ अंडीजन बचाविण्यास मीं समरकंदाची आशा सोडिली पण पाहतों तों अंडीजनचा बचाव तर झाला नाहीच; पण समरकंदही हातचें गेलें. " यावेळीं त्याची स्थिति पंचतंत्रांतील 'मत्स्यमांस परिभ्रष्टे किं निरीक्षसि नग्निके ' याच्यासारखी झाली.
 तथापि त्यानें आपला यत्न तसाच चालू ठेविला व फेरघणा - पूर्वीचा सगळा नव्हें तरी बराच - काबीज करून समरकंदावर पुनः एकदम स्वारी केली; परंतु युझबेक लोकांनी त्यास वेढा उठविण्यास लाविलें. इत-