पान:अकबर.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा १५३ ळच्या समयीं एकांत ठिकाणीं त्याचा एक बसण्याचा दगड होता त्यावर चसून विचार करून त्याने शेवटीं आपल्या राष्ट्रांतील सर्व प्रजाजनांचा एक कटाने व समदृष्टीनें प्रतिपाळ करण्याचा निश्चय केला. परंतु दरबारांतील मौलवी व पंडितजन यांच्या समजुती विलक्षण पराकाष्टेच्या असल्याकारणानें ते लोक सामोपचाराऐवजीं छळ करण्यासच त्याचें मन वळवीत. तेव्हां न जाणो कदाचित् आपलाच समज चुकीचा असेल, अ वाटून राजा या नात्याने प्रत्येक गोष्टीची विचक्षणा करणें हें आपळे कर्तव्य आहे याबुद्धीने त्याने वादविवाद करण्याची संस्था सुरू केली.” वादविवाद प्रत्येक गुरुवारी इबादतखान्यांत नियमाने होत असत. ही इबादतखान्याची इमारत याच कामाकरितां फत्तेपूर शिक्री येथें मुद्दाम तयार करविली होती हैं मार्गे सांगण्यांत आलेंच आहे. या वादविवादांत कित्येक दिवसपर्यंत अबुलफझकर्ते फारसा भाग घेतला नाहीं. निरनिराळ्या पंथांच्या महमुदीय पंडित व मौलवी लोकांस एकमेकांचा कोटिक्रम उत्तरे देऊन मोडून काढण्यास मात्र तो प्रोत्साहन देई. या निरनिराळ्या पंथांतील नायकांचें हिंदु ज्ञातींचा व इतर पाखांडी जनांचा छळत्राद करण्यापुरतें जरी एकमत असे, तथापि एक- मेकांवरही नास्तिकपणाचा आरोप करण्यास मार्गे पुढे पाहत नसत. ह्या त्यांच्या हटवादीपणाचा व अनुदारपणाचा अकबरास तिटकारा आला. पेगमत्रराच्या धर्मात ऐक्य असावें त्याऐवजीं त्यांत द्वैतभावाचेंच बाहुल्य आहे, असे त्यास आढळून आलें. शिवाय, त्यांपैकीं कित्येक स्वपंथा- भिमानी तर दरबारांतील हुद्देदार असूनही ऐकमेकांशी उर्मटपणाचे वर्तन करीत, यामुळे तर अकबरास त्यांचा जास्तच वीट आला व एकेप्रसंगीं तर त्याने या लोकांना ताकीत दिली कीं, यापुढे जर कोणी कोणाची अशी आगळीक करील तर त्यास दरबारांतून चालतें व्हावें लागेल. अखेरीस, नेहमीं स्मरणांत ठेवावा अशा एका गुरुवारी संध्याकळाच्या वेळेस अबु- •लफझल यानें या विषयाचा कांहींतरी सोक्षमोक्ष एकदांचा व्हावा असा 20