Jump to content

पान:अकबर.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४६ अकबर बादशहा. बाप आरब असून शेख होता. त्याचें नांव शेख मुबारक हें होतें. त्याचे पूर्वज राजपुतान्यांत नागोर शहरीं घरदार करून सुखवस्तू राहिले होते. शेखमुवारक यार्ने आपल्या पूर्वजांच्या धर्मशास्त्राचें अध्ययन इतकें आस्था- पूर्वक केलें कीं, धर्मशास्त्रांतील प्रत्येक छाया व उपछाया त्याला पूर्णपणे अवगत झाली. तो बुद्धीचा विचक्षण असून त्याची कल्पनाशक्ति व्यापक होती ; व ज्ञानाचा जसजसा संस्कार होत गेला, तसतसे त्याचे विचार उन्नत व प्रगल्भ झाले. अशा थोर पुरुषानें आपल्या मुलांना जें शिक्षण दिलें, त्याचा संस्कार त्यांचे मनावर, त्यांची धारणाशक्ति व ग्रहण- शक्ती विशेष असल्यामुळे, इतका उत्तम झाला कीं ते कोणत्याही समाजांत तेज पडण्यासारखेच झाले. वडील मुलगा शेख फैझी हा, शेख मुबारक आम्याच्या जवळ जाऊन राहिला होता, तेथें इ० स० १५४७ या वर्षी जन्मला. यावरून तो अकबरापेक्षां पांच वर्षानें लहान होता, असें दिसून येते. अकबर बादशहानें वायव्येकडील प्रांत पुनः जिंकिल्यानंतर लवकरच, शेखफैझी याने वैद्यकीच्या व ग्रंथरचनेच्या साध्या व शांतप णाच्या व्यवसायास आरंभ केला. तेव्हां त्याचें वय सुमारें पंचवीस वर्षांचें होतें. थोड्याच वेळानें तो कवि ह्मणून प्रख्यातीस चढला. तो जात्या उदारशील होता व वैद्यकीच्या धंद्यांत त्यास मिळकतही खूप असे. यामुळे त्याला परोपकारांचीं कृत्ये करावीसें वाटर्ले, व त्यानें गोरगरिबांस औषध- पाणी फुकट देण्याची वहिवाट घातली. ह्मणजे धर्माच्या बाबतींत त्याने आपल्या बापाचाच कित्ता गिरविला ; त्याची प्रवृत्ति त्यावेळीं आपल्या जनांस मान्य अशा शिया पंथाकडे होती. असें सांगतात कीं, एके प्रसंग शेख फैझी यानें थोडीशी जमीन मिळण्या- करितां एका काजीकडे अर्ज केला असतां, अर्जदार शिया आहे ह्मणून त्या सुन्नी कामगारानें तो नामंजूर केला; इतकेंच नाहीं, तर भर कचेरींतून त्याची अवहेलना व मानहानि करून त्यास हांकून लाविलें. काजी ह्मणजे निःपक्षपाती असा त्या वेळचा समज असे हे लक्षांत ठेवावें. पुढें