________________
१९८ अकबर बादशहा. ह्या संबंधाने त्यास सरकारानें व खाते- अकबरानें जे अनेक प्रवास केले त्यांत त्याचे नजरेस असें आलें कीं, आपण हिंडलेल्या प्रांतांतील बरीच जमीन नाकीर्द पडलेली आहे. ह्याचें कारण ती जमीन सुपीक नाहीं किंवा तेथील लोक आळशी आहेत असें ह्मणतां येत नव्हते. या गोष्टीची बारीक चौकशी करून पाहतां त्याला असें दिसून आलें कीं हा दोष खरोखर राज्यपद्धतीचा आहे. जमीनीवरीक धारा इतका जवर बसविलेला होता की तिची लागवड करण्यास गरीब लोकांचा मगदूर होईना. असें वाटलें कीं, पहिल्या वर्षाचा शेतकीचा फायदा दारानें वांटून घ्यावा अशी कांहीं तोड काढितां लागवडींत येईल. नंतर या एकंदर विषयाची चौकशी करून त्यानें असें ठरविलें कीं, प्रांतांतील कित्येक परगण्याची पाहणी करावी, व ज्या भागांत सर्व जमीनीची लागवड झाल्यास एक कोटी टांक ह्मणजे ५०,००० ०० रुपये काळीचें उत्पन्न होईल इतकी जमीन आहे अशा भागांचे महाळ करावेत, व त्यांचा कारभार एका कामदाराकडे सोपवून त्यास करोडी हा हुद्दा द्यावा. आल्यास ही जमीन इमानदार व हुशार जामदारखान्यां- तील 'फडनवीस व पोतनीस ह्यांनी या अधिकाऱ्यांशी या संबंधानें ठराव करून त्यांना आपआपल्या महालावर पाठवून द्यावें असें ठरविलें. तेथें त्यांनीं दक्षता दाखवून व लक्ष पुरवून पडीत जमीन तीन व वहितींत आणावी आणि वसूल होईल तो सारा सरकारांत रवाना करावा अशी व्यवस्था झाली. ही पद्धति अंमलांत आणिली गेली व तीपासून होतील असे वाटत होते ते सर्व फायदे झाल्याचे अनुभवास आलें. याप्रमार्णे अकबरबादशहाच्या राजवय्याचे अकरावें वर्ष त्याच्या नूतन बादशाहीस एक शिवाय बाकी सर्व गोष्टींत विभवशाली झालें. या वर्षी वायव्येकडील प्रांत व मध्य व पश्चिम हिंदुस्थान ह्यांस बंगाल बिहार प्रांत जोडला गेला. हुमायुनाच्या पुत्राची सत्ता वस्तुतः विध्या- . चळाच्या उत्तरेस सर्वत्र मान्य झाली होती. या आबादानीस एक गोष्ट