Jump to content

पान:अकबर.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. ११३ राज्यास उतरती कळा लागल्यावर खोरासानी व अफगाण योद्धयांनी ज्या स्वान्या केल्या त्या याच तत्वावर झाल्या. परंतु अकबराचा मार्ग निराळा होता. लढाई त्यास जात्या आवडत नसे. तो युद्ध करी, तें फक्त आपण उभारीत आहों ती इमारत कच्ची व डळमळीत राहू दिल्यास तिला शत्रूंच्या स्वारीरूप पहिल्याच वादळानें ढांसळून जाण्याची पाळी येईल, ह्मणून ती दृढ व पक्की करण्यास अवश्य अर्से वाटे तेव्हांच करी. ह्मणून, आपल्या किंवा आपल्या सैन्याच्या मोहिम - पासून जमीनीच्या मालकांस किंवा वहितदारांस नुकसान किंवा इजा न होऊ देण्याविषयीं तो फारच काळजी घेई. हें तत्व अमलांत आणण्याकरितां त्यानें असा हुकूम फरमाविला होता कीं, सैन्याचा तळ देण्याकरितां जागा मुकरर ठरकी ह्मणजे, आसपासच शेतें वगैरे राख- ण्यासाठी मुद्दाम कांहीं अधिकाऱ्यांची योजना करावी; व सैन्याचा तळ उठला ह्मणजे तळाची जागा तपासून जें कांहीं नुकसान झालें असेल तें अजमासून सरकारी वसूलांत मुजरा करण्यासाठी पंच नेमावे. कतइ अकबरीच्या इतिहासकारानें असें नमूद केलें आहे कीं, ही पद्धति त्याच्या प्रत्येक मोहिमेंत कायद्याप्रमार्णे पाळली जात असे. शिवाय, रयतेर्चे व शेतकऱ्यांचें झालेले नुकसान ताबडतोब आकारून भरून देण्यास भरपाई करतां यावी व जमाबंदी वसूल करणाऱ्या अधिका- यांच्या कामांत बिलकूल व्यत्यय येऊं नये ह्मणून, बादशाहा ह्या पंचांच्या स्वाधीन कर्धीध रोख पैशाचे तोडेही करून ठेवी. ही व्यवस्था मोंगलानंतरच वस्तुतः राजपदारूढ झालेल्या पाश्चिमात्य लोकांच्या व्यवस्थेप्रमाणेच बहुतेक होती. या व्यवस्थेच्या योगानें ज्या प्रदे- शांतून सैन्यास कूच करणें अवश्य होई तेथील लोकांस लढाईची धास्ती व भीति वाटेनाशी झाली. तबा- आपल्या गुरुमहाराजाच्या कबरेचें दर्शन घेण्यास्तव अकबर अ- मीरास बारा दिवस जाऊन राहिला आहे, तितक्या अवकाशांत बंगाल 1 15