पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शुक्र. - शुक्राची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा हीं एका पातळींत एका रेषेंत-नाहींत. एकमेकांशीं जरा कललेली असून त्यांच्यामध्यें लहानसा कोन झाला आहे. त्यामुळे, सूर्य, शुक्र आणि पृथ्वी हीं जरी वरचेवर समोरासमोर येतात, तरी अशा समयीं बहुधा शुक्र पृथ्वीचे कक्षेच्या पातळीच्या किंचित् वर किंवा किंचित् खालीं असतो. ह्मणून, हीं तिन्ही वरचेवर एका रेषेंत येत नाहींत व ह्मणून वरचेवर संक्रमण होत नाहीं. सूर्य, शुक्र आणि पृथ्वी हीं तिन्ही एका रेषेंत येण्याचा योग सुमारें १०५३ किंवा १२१३ वर्षांनीं एकवेळ येतो. या शुक्राच्या संक्रमणासंबंधानें एक गोष्ट चमत्कारिक आहे, ती हीः दोन संक्रमणांची जोडी असते. ह्मणजे, एक संक्रमण झाल्या- वर दुसरें संक्रमण आठ वर्षांनीं व्हावयाचेंच. आणि, तिसरें संक्रमण पुढे १०९३ किंवा १२१३ वर्षांनीं होऊन, चवर्थे संक्रमण तिसऱ्या संक्रमणानंतर पुनः आठ वर्षांनीं व्हावयाचेंच. याप्रमाणें आठ वर्षांत होणाऱ्या दोन संक्रमणांची जोडी असते. आणि, संक्रमणांची एक जोडी येऊन गेल्यानंतर दुसरी जोडी सुमारे १०९३ किंवा १२१३ वर्षांनीं येते. सन १७६१ सालीं शुक्रसंक्रमण झालें होतें. नंतर सन १७६९ सालीं झालें. पुढे १८७४ पर्यंत एकहि संक्रमण झाले नाहीं. या शतकांत सन १८७४ आणि १८८२ या दोन साल शुक्रसंक्रमण झालें होतें. आतां सन २००४ सालापर्यंत शुक्र- संक्रमण होणार नाहीं. आणि, या जोडीपैकीं दुसरें संक्रमण