पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बुध. विषयीं विशेष माहिती मिळू शकत नाहीं. आणि जी माहिती मिळाली आहे ती चांगलीशी निश्चयात्मक नाहीं. बुधावर दहा दहा अकरा अकरा मैल उंच पर्वत आहेत असें ह्मणतात. हैं जर खरें असेल, तर आपल्या पृथ्वीवरील सर्वांत अत्यंत उंच जो हिमालय पर्वत तो सुद्धां तेथील लोकांस अर्थात् फारच लहान वाटेल! बुधावर घट्ट वातावरण असावें असें कित्ये- कांचें मत आहे. परंतु याविषयीं खात्रीपूर्वक कांहींच सांगतां • येत नाहीं. बुध आपल्या आंसावर २४ तास आणि १३ मिनिटें इतक्या अवधींत एकवेळ फिरतो. तेव्हां, बुधावरील दिवस- रात्र आणि पृथ्वीवरील दिवसरात्र हीं बहुतेक सारखींच आहेत. पृथ्वीपेक्षां बुध सूर्याच्या फार जवळ असल्यामुळे बुधावर अत्यंत उष्णता असावी, हें उघड आहे. आपणांस जेवढा सूर्य मोठा दिसतो त्यापेक्षां ७ पट मोठा सूर्य बुधावर दिसत असेल आणि त्या मानानें तेथें उष्णताहि ७ पट अधिक असली पाहिजे. ही नेहमींची गोष्ट झाली. आणि ऐन ग्रीष्म ऋतूच्या वेळीं तर तेथें पृथ्वीवरील कडक उन्हाळ्यांतील उष्णतेपेक्षां ९ पट उष्णता अधिक होते ! बुधावर जर आपल्यासारखे लोक असतील, तर, जसा कांहीं आगीचा वर्षाव होत आहे असा त्यांस भास होत असेल! इतक्या उष्ण गोलावर आप- ल्याप्रमाणें प्राण्यांची वसति असेल असे वाटत नाहीं. कदा- चित्, बुधावर चांगलें दाट वातावरण असेल, आणि त्यामुळे अथवा दुसऱ्या कांहीं कारणांमुळे तेथील लोकांस उष्णता