पदे

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

कल्याण स्वामी यांनी लिहलेले पद समर्थ रामदास स्वामीँबद्दल त्यांचे पट्टशिष्य योगीराज कल्याण स्वामी यांनी लिहलेले पद.


सुखरूप जालो स्वामी तुमचीया पादसेवे। कल्याण माझे जालें रंगलो सोहंभावे॥ध्रु॥

चित्त हे वृत्ती माझी चैतन्यीँ मुराली। संतोषेँ स्वात्मसुखी अनुभव किल्ली दिली। निर्विकल्प वास जाला अनुभव केवळ बोली। विश्व हे नाहीँ अवघे श्रीराम स्वरूपी पाही॥१॥

पावलो धावलो देवा तुमचिया सेवाबळे। वेदांतश्रुती ज्यासी निर्विकल्प बोलती बोले। ते मी स्वयंभ जालो हे शब्द मावळले। मीपण तूंपण अवघे स्वामी गिळूनी उगले ठेले॥२॥

रामावीण वृत्ती माझी आणिक न जाय कोठें। जिकडे पाहे तिकडे श्रीराम माझा भेटे। 'कल्याण' म्हणे सकळ द्वैतपण जेथे आटे। रामदासस्वामी जई आनंदुघन भेटे॥३॥

साचा:वर्ग