Jump to content

पंढरीचा वारकरी

विकिस्रोत कडून

________________

PILGRIMAGE TO PANDHARPOOR. पंढरीचा वारकरी. जानन द्वार BOMBAY TRACT AND BOOK SOCIETY. MARATHI Series. 2nd Edition. 2,000 Copies. A. D. 1891. -400- मुंबईमध्यें “निर्णयसागर " छापखान्यांत छापिलें. सन १८९१. Price 1 Anna. किंमत पाव आणा. म. म. द पा. पोतदार पंथ संग्रह ________________

पंढरीचा वारकरी. भाग पहिला. कोणी एक गृहस्थ कार्तिकमासी पंढरपुरास गेला होता. तेथे कित्येक लोक चंद्रभागेच्या वाळवंटावर ज्ञानोबा तुका- राम, ज्ञानदेव तुकाराम, असें ह्मणून टाळ वाजवीत उभे होते, त्यांपाशीं हा गृहस्थ जाऊन ह्मणतो;- गृ० - अहो बाबांनो, हें काय करितां ? लो० - विठोबाचें भजन करितों, महाराज ! . गृ० - हें तर ज्ञानोबाचें भजन चाललें आहे. विठोबाला ह्याचा राग येणार नाहीं काय ? तुकारामानें विठोबाचें भजन केलें आणि तुह्मी तुकारामाचें भजन करितां हें कसें? तुकाराम जर ह्या वेळी एथें असता तर तो तुह्मास झणता ? त्याला हें तुमचें भजन आवडलें नसतें. त्य एक अभंग असा आहे की "भजन चाललें उफराटें । को जाणे खरें खोटें ॥ " त्याप्रमाणें तुह्मी करीत आहां. लो०- तुकोबाचें नांव घेतलें ह्मणजे विठोबास पावतें. ________________

२ तुकाराम जगद्गुरु होता. ( पुनः भजन चालवितात. ) ज्ञानदेव तुकाराम ! ज्ञानोबा तुकाराम ! ज्ञानदेव तुकाराम ! गृ० – दादांनो, इतके उतावळे होऊं नका. क्षणभर माझ्याशी बोला. तुमचें भजन तर सारा दिवस चाललेंच आहे. लो०- बोला, काय ह्मणतां ? गृ० - तुकाराम जगद्गुरु होता असें तुह्मी ह्मणतां, तर त्याच्या आज्ञेप्रमाणें तुह्मी कां चालत नाहीं ? माझ्या नांवाचे भजन करा असें त्यानें कोठें सांगितलें आहे ? लो०- आह्मां अडाण्यांस तुमच्या एवढें शहाणपण नाहीं, आमचा भोळाभाव सिद्धीस जाव. ( भजन ) ज्ञानबा तुकाराम ! ज्ञानोबा तुकाराम ! तुकाराम ! तुकाराम ! गृ० तुकारामाची भक्ति इतकी आवडते तर तुझी पंढरीस कां येतां ! देहूस जा, आणि रात्रंदिवस तेथेंच टाळ न वसा. लो०- ( एक धष्टपुष्ट मनुष्य पुढें होऊन मोठ्यानें पालतो) अहो, आह्मी पंढरीचे वारकरी आहों. आणि तुह्मी सांगतां तसेंच विठोबाचें भजन करितों. ह्मणा लोकहो, पुंडलिक वरदा हरिविट्ठल ! ( सर्व जण एकदम तसें ओरडून ३ . गणतात.) ह्मणा जय जय विठ्ठल ! जय जय विठ्ठल ! पांडुरंग हरि, सांवळ्या पांडुरंग हरि. (असें भजन ते सर्व करूं लागले.) गृ०-ऐका, ऐका. मी तुझास विठोबाचें भजन करायास सांगितले नाही. मी इतकेंच विचारले की, पंढरीस येऊन तुकारामाचें नांव कां घेतां ? आतां वारकरी बावा, तुझी ह्या दिंडीचे पुढारी आहां असें मला वाटते. तर तुह्मी आपले टाळ घटकाभर बंद करून खाली बसा, व ह्या सर्व लोकां- सहि बसवा. मग आपण निवांतपणीं कांहीं बोलूं. (ते सर्व खाली बसतात.) वा०-तुझी कोठून आलां? गृ०-मी पुण्याहून आलों, पण मी तुझासारखा वारकरी नाही. वा०-वारी सर्वांच्याच दैवी कोठून असणार ? हा पूर्व- संचितांचा ठेवा. गृ०-तें कसेंही असो; पाहिजे तर त्याविषयी पुढे बोलूं. पण आता मला सांगा की, तुझी एथें कशाला आलां? वा०-देवाचे दर्शन व्यायाला. ०४ - - - गृ०-देवाचे ह्मणूं नका, विठोबाचे ह्मणा. विठोबाने तुह्माला बोलावणे पाठविले होते काय ? वा०-होय, बोलावणे अक्षयीचे आहे. विठोबा महाराज भक्तांकरितां एथे येऊन तिष्ठत उभे राहिले आहेत; आणखी दुसरें कसले बोलावणे पाहिजे ? गृ०-विठोबा भक्तांकरितां एथें आला नाही, "पुंडलिका भेटी पांडुरंग आलेगा" असें वाक्य आहे. वा०-बरें, मग पुंडलिक भक्त नव्हता काय ? गृ०-नाहीं; तो विठोबाचा भक्त नव्हता. तो आपल्या आईबापांचा भक्त होता. त्याला विठोबा माहीत होता असेंही वाटत नाही. जेव्हां त्याच्या दारापुढें विठोबा येऊन उभा राहिला तेव्हां त्याने त्याचा आदर सत्कारही केला नाही. तो त्यास भेटायासही बाहेर आला नाही. आंतूनच त्याने त्याला एक विट फेकून दिल्ही. अशी कथा तुमच्या पोथींत आहे की नाही? वा०-होय आहे. आणि पुंडलिकाने त्याला नाही सांगि- तले की, विटेवर उभा राहून जे दर्शनास येतील त्यांस उद्ध- रीत जा? ह्मणूनच आह्मी एथें आलों. गृ०-बरें तर तुझी घरी राहून पुंडलिकाप्रमाणे आपल्या . 9 मातापित्यांची सेवा कां कराना ? मग तुमच्याही भेटीस विठोबा येईल. तुह्मी घरी आपल्या आईबापांचा अपमान करितां, त्यांस शिव्या गाळी देतां, त्यांस निष्ठूर शब्दांनी बोलतां, त्यांस धड अन्नवस्त्र देत नाही, त्यांच्याशी खटला करून, जिनगीची वाटणी मागतां, त्यांजवर सरकारांत फिर्या- दीस जातां आणि एथें विठोबापाशी उद्धार मागायास येतां, तर तो तुह्मास कसा उद्धरील? आणि विठोबाला उद्धरा- याची शक्ति कोठे आहे ? तुमच्याच ग्रंथांत लिहिले आहे की, कृष्ण रुक्मिणीच्या शोधार्थ फिरत फिरत या दिंडीरव- नांत आला व थकून दमून कमरेवर हात ठेवून उभा राहिला. दुसरा वा०-होय, राधेच्या नादी आपले पति लागले ह्मणून रखुमाबाई रुसून गेल्या होत्या त्यांस पाहावयास कृष्ण देव एथें आले खरे, ही गोष्ट पुराणांत आहे. गृ०-कृष्णाला देव ह्मणूं नये. जो आपली लग्नाची बायको टाकून परस्त्रीच्या नादी लागतो, त्याला मनुष्यही मयूं नये; तो पशु. आणि कृष्णासारख्या व्यभिचारी माण- साला देव कसें ह्मणतां ? व्यभिचारी माणसाच्याने तुमचा उद्धार कसा करवेल ? मुळी तोच पापी. तो तुमचें पाप कसें हरण करील? . Quy वा०-सगळे जग एथें लोटले आहे. तें उगेच का? पाप जातें ह्मणूनच की नाही ? ? गृ०-सगळे जग आपलें पाप घालविण्यासाठी एथें आलें आहे हे कशावरून? ह्या यात्रेत कोणी व्यापारी आहेत, ते लोकांस फसवायास व आपली माल विकायास आले आहेत. दुसरे कोणी यात्रेची मौज पाहायास व नाना प्रकारचे पदार्थ विकत घ्यायास आले आहेत. कोणी आपल्या सख्या सोय- यांच्या व इष्टमित्रांच्या सोबतीने आले आहेत, कोणी भीक मागायास मिळाले आहेत, दुसरे सोदे लुच्चे लोक बदक- मांसाठी जमले आहेत, कोणी चोर भामटे व उचले आहेत, आणि कोणी बडव्यांच्या भूलथापीने आले आहेत; बहुतेक तर जन जातें ह्मणून आपण जावे असा विचार करून आंध- ळ्याप्रमाणे. येतात. पण खरोखर पाप घालविण्यासाठी येणारे असे ह्या यात्रेत थोडेच मिळतील. आणि मी तुह्मास दुसरें असें पुसतों की विठोबाच्या दर्शनाने पाप जातें हे कशावरून? वा०-चंद्रभागेचें स्नान घडल्यावर पाप राहील काय? गृ०-आतां तर तुह्मी भिमावळाचे भक्त झाला ? विठोबास सोडलेत काय ? काय हा तुमचा खुंटावरच्या कावळ्यासा- रखा चंचळ भाव अनेक ठिकाणी नाचतो. मी तुमच्याशी ७ बोलू लागलों तेव्हां तुझी तुकारामाचे भजन करून पाप घालविण्याच्या उद्योगांत होतां. मग मी प्रश्न के- ल्यावर विठोबाच्या भजनाचा कडाका चालविलात, आणि आतां ह्मणतां की चंद्रभागेच्या स्नानाने पाप जातें. चंद्रभागेच्याने तुमचा पापमळ तर घालववत नाही, पण तुझीच आपल्या आंगाचा मळ तींत टाकून तिचें स्वच्छ पाणी मलीन करितां. तिच्याने तुमचा पापरोग दूर करवत नाही, पण तिचें पाणी तुमच्या मळानें रोगी होते. आणखी असे पाहा, की चंद्रभागेच्या स्नानाने पाप जातें तर मग तुझी एथेंच कशाला आलां? ही नदी एथून पुष्कळ लांबवर गेली आहे. तर जेथून ती तुमच्या गांवास जवळ असेल, तेथे जाऊन स्नान केले तर चालणार नाही ? अहो लोकहो, तुह्मी सर्व अंधळे आहां, तुह्माला खरा मार्ग ठाऊक नाही. तुझी मला ह्मणालां की पूर्वसंचिताशिवाय पंढरीची वारी घेता येत नाही, पण मी खरोखर तुह्मास सांगतों की, ज्याच्या पदरी अज्ञानाचा व भोळेपणाचा ठेवा आहे तोच वारकरी होतो. वा०-तुझी कांहीं ह्मणा, आह्मास आमचा विठोबा खरा, त्याचें माहात्म्य मोठे ह्मणून आह्मी एथें आलों. . गृ०-विठोबाचें माहात्म्य कोणी वाढविलें ? हे सर्व ढोंग . . - ८ आहे; विठोबा पहिल्याने जैनांचा देव होता. नंतर ब्राह्मणांचें वळ चालू लागल्यावर त्यांनी त्याला त्यांपासून हिसकावून घेऊन आपला देव केला. आणि आतां ह्या बडव्यांनी लोकां- पासून पैसा उपटण्याकरिता त्याचे एवढे स्तोम वाढविलें. विठोबाच्या दर्शनाने लोकांचे कल्याण होतें असें बडव्यांस वाटते, तर तें दर्शन त्यांनी इतकें अवघड करून ठेविलें नसते. परंतु त्यांचा सर्व मतलब लोकांस ठकवायाचा आहे. त्यांस लोककल्याणाची अगदी काळजी नाही. पाहा दर्श- नासं जातांना हजारों लोकांची दाटी होऊन तेथें कित्ये- कांच्या हातापायांचा चुराडा होतो! कित्येक त्या गर्दीत ठार मरतात. ज्यांस दर्शन होतें ते घामाघूम होऊन आपला जीव बचावून मात्र त्या गचडींतून एकदांचे बाहेर पडतात. तरी ह्या निर्दय बडव्यांनी देवळास एकच द्वार ठेवून आपला अर्थ साधला आहे. जे श्रीमंत आहेत त्यांजपासून पुष्कळ द्रव्य मिळविण्याची त्यांनी अशी युक्ति काढली. आहे की, त्यांच्यासाठी ते पुजा बांधतात, ह्मणंजे.जसा कोणी पैका देईल

  • हे पुस्तक लिहिले तेव्हां (सन १८६५) असेंच होते. त्याच्या

मागून सरकाराने एका सुधारलेल्या हिंदु डे० कलेक्टराच्या सूचने- वरून नवीन दारे वगैरे पाडली. ९ तसे विठोबास सजवून त्याच्या आंगावर डागडागिने घालतातं. आणि गरीब बिचारा वारकरी तोव्यांखाली बडविला जातो, पुष्कळ धक्या बुक्या खात जातो, अर्धमेला होतो तरी "घेतां विठ्ठलदर्शन दृष्टीस पडे कोरडा पाषाण," हेच काय तें त्याच्या पदरी पडते. याप्रमाणे विठोबाचें माहात्म्य आहे. अणखी दुसरें एक त्याचें माहात्म्य आहे. जत्रेच्या दिव- सांत जरीमरीच्या योगाने शेकडों मनुष्ये मरतात, लेंकरें उघडी पडतात, वायका विधवा होतात; आणि ही जरीमरी यात्रा फुटली झणजे गांवोगांव पसरून हजारों लोकांचा प्राण घेती. केवढे हे विठोबाचें माहात्म्य ! जे लोक त्याच्या दर्श- नास कष्टाने व भावार्थाने येतात त्यांची तो अशी दशा करितो. अशा यात्रा सरकार बंद करील तर किती बरे होईल! हजारों जणांचे जीव वांचतील. एक वारीकरी (रागावून ह्मणतो.) एकूण तुमच्या बोल- ण्याप्रमाणे आह्मी व हे सगळे जग वेडे, तुझी काय ते शहाणे. तुमच्यापाशी काय ज्ञानाची पुंजी आहे ती आह्मास दाखवा बरें? दुसरा वारकरी (त्यास ह्मणतो.) अरेरे, इतका तापून कां बोलतोस ? ते दादा आपल्यास काही वावगें सांगत . १० . नाहीत. (गृहस्थाकडे वळून) दादा, त्याचे बोलणे जमेस धरूं नका. तुमची गोष्ट मला मानवली. तुझी काही खोटें सांगत नाही. पण आहीं विठोबाला सोडून कोणाला भजावें? आमचे वाडवडील ह्याचीच भक्ति करीत आले. तशीच आह्मीही करितों. गृ०-वाडवडिलांच्या चालीकडे पाहूं नये. धर्माच्या गोष्टींत ज्याचा त्याने विचार करावा, व देवाने लावून दिल्हेला मार्ग शोधून त्या मार्गाने चालावें. तुझी जर मनापासून माझी गोष्ट ऐकत असला, तर मी देवाच्या मार्गाची गोष्ट थोडक्यांत - तुह्मास सांगतों. . वा०-होय, मी तर मनापासून तुमची गोष्ट ऐकायास - कबूल आहे. भाग दुसरा. गृ०-आतां आपण परमेश्वराची प्रार्थना करून एक- चित्ताने त्याच्या मार्गाचा विचार करूं. (मग त्याने ईश्व- राची अशी प्रार्थना केली की, हे दयाळू देवा, आझा पाप्यां- वर दया कर, आणि आपला खरा मार्ग आह्मास दाखीव.) आतां ऐका. खरा व जीवंत असा एकच परमेश्वर आहे. हे तुह्मी कबूल करितां ? ११ O - . -होय महाराज. एकच परमेश्वर. त्याशिवाय दुसरा कोण आहे? गृ०-बरें तर विठोबा परमेश्वर नाही, व जीवंतही नाही. दगडाचा पुतळा, त्याला जीव कोठून ? आणि जरी तुहीं त्याला परमेश्वर मानिले तरी त्याशी भांडायाला दुसरे पुष्कळ आहेत. वा०-हे कसे? मी नीट समजलों नाही. गृ०-ह्मणजे जसें तुही विठोबास भगवान ह्मणतां तसे गांवोगांव जी दुसरी देवस्थाने आहेत त्यांसहि त्यांचे भक्त सर्वांहून थोर मानितात. परंतु त्यांतून खरोखर कोणीच थोर नाही. आतां दुसरी गोष्ट. जो खरा व जीवंत असा एकच परमे- .श्वर आहे तो परमपवित्र व न्यायी आहे. तुमचे सर्व कल्पित देव अपवित्र व अन्यायी आहेत. ज्याने पाप व अन्याय केला नाही, असा एकही देव तुमच्यांत नाही. सर्व देवांत मुख्य मानलेले जे ब्रह्मा विष्णु व शिव तेच पाप्यांचे शिरो- मणी आहेत, मग इतरांची काय कथा ? वा०-आमचे देव पापी व आह्मी पापी. मग ते आह्मास शिक्षा करणार नाहीत. बरी वाईट बुद्धि देणारा तोच परमेश्वर. गृ०-असें ह्मणूं नका. जरी खोट्या देवांच्याने तुमचे - १२ - बरें व वाईट करवत नाही, तरी जो खरा देव आहे तो तुझास खचीत शासन करील. आणि तो कोणासही पाप- बुद्धि देत नाही. वा०-तर मग आमचा सत्यनाश होईल. गृ०-यांत काय संशय ? परंतु जर तुझी पश्चात्ताप करून त्याकडे फिराल तर तो तुह्मास क्षमा करील. वा०-त्याने आझास तारावें ह्मणून आह्मीं काय केलें पाहिजे? गृ०-तुमाला कांहीं करायास नको. ह्मणजे जसें तुझी आतां दानधर्म, तीर्थयात्रा, उपासतापास, भजनपूजन , करितां तसें तो कांहीं करायास सांगत नाही. हे सर्व व्यर्थ उपाय, तो तुह्मास सांगतो की, मी जे पुण्य देतों तें ध्या , जें व पुण्यवान व्हा. वा०-तें पुण्य आमी कसे घ्यावें ? गृ०-देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला प्रिय पुत्र या जगांत पाठविला. त्याने मनुष्यदेह धरून आमाकरितां पुष्कळ दुःख सोशिलें. आमच्या पापांचा भार उचलला. आणि पापामुळे में शासन, ह्मणजे मरण आझास भोगायाचें तें त्याने स्वतः भोगिलें. आणि मरून उठून पुनः mr . - तो जेथून आला तेथे झणजे आकाशांत गेला. त्या तार- णाराचें नांव येशू ख्रीस्त. त्याचे पुण्य अपार व अखंड आहे. तें जो कोणी विश्वास धरून मागतो त्याला देव देतो. वा०-तें तुह्मासारख्यास मिळेल. आझाला कोठून. मिळणार? गृ०-असें नाहीं. देवासमोर आपण सर्व सारखे पापी आहों. आणि येशूचें बोलावणे सर्वास आहे. तो ह्मणतो, "अहो कष्टकरी व ओझ्याने लादलेले, तुझी सर्व माझ्या जवळ या, झणजे मी तुझाला विसांवा देईन." विठोबा तुझाला क्षणभर तरी विसांवा देतो काय? वा०-कशाचा दादा विसांवा! हे पोट पाठीस लागलें आहे. आजचा दिवस गेला ह्मणजे उद्यांचा कसा जाईल अशी काळजी आहेच. गृ०-मी तुमच्या पोटाची गोष्ट बोलत नाही, कुत्रे देखील पोट भरते. जो मेहनत मजुरी करील तो उपाशी मरणार नाही. परंतु तुमच्या आत्म्यास शांति आहे काय हे मी विचा- रतो. तुह्मी आतां वारकरी झाला ह्मणून तुमचे दुर्गुण व दुष्ट स्वभाव गेले काय ? तुमच्या मनांत लोभ, हेवा, मत्सर, राग, कपट, वैर ही आहेत की नाहीत ? तुमच्या तोंडांतून शिवी . १४ निघती की नाही? तुझी लवाडी सांगतां की नाही ? जोप- र्यंत ही पापें तुमच्यांत आहेत तोपर्यंत तुह्माला शांति कोठून मिळणार? वा०-ती पापें कोठून जाणार ? पाप जाईल तर ही काया सुवर्णाची होणार नाही? ह्या तर सांगायाच्या गोष्टी. आमचे मोठे साधु संत व शास्त्री पुराणिक आहेत त्यांचे पाप गेलें नाहीं; मग आमचे कुठून जाणार! कुत्र्याचे शेपूट

साहा महिने नळकंड्यांत घातले तरी तें वांकडें तें वांकडेंच. गृ०-मला वाटते तुझी आतां धोरणावर नसाल. उपा- साने व भजनाने तुमचे डोके तर फिरले नाही ना? मी तुझाला बोलायाच्या गोष्टी सांगत नाही. त्या गोष्टी ते बुवा तेथें ब्रह्मज्ञान सांगतात त्यांपाशी आहेत. माझ्या गोष्टी खऱ्या अनुभवाच्या आहेत. जो येशू खीस्तावर पूर्ण विश्वास ठेवितो त्याच्या सर्व अन्यायांची क्षमा होते, व देव त्याला आपला पवित्र आत्मा देतो मग त्याचे मन पालटते. तो जरी पहि- ल्याने वाघासारखा क्रूर असला तरी मेंढरासारखा नम्र होतो, व त्याच्या आत्म्याची काया खरोखर बदलती. त्याची कोळ- शासारखी काळी बुद्धि पालटून वर्फासारखी शुभ्र होती. तुह्मी ह्या गोष्टीचा अनुभव घ्या. वारीचे वेड सोडा, दग- . १५ डाचे व सोन्यारुप्याचे देव ह्मणजे निर्जीव मूर्ति टाकून द्या, व येशू खीस्ताच्या नांवानें परमेश्वराला शरण जा, झणजे तुझाला खरी शांति मिळेल, आणि इहलोकीं व परलोकी सुखी व्हाल. आतां मी तुमचा निरोप घेतों. जे आपलें संभाषण झालें ते विसरूं नका, एथून परत जाल तेव्हां मार्गात त्याचा विचार करा. परमेश्वर तुझाला आशीर्वाद देवो व तुमचें . व तुमच्या कुटुंबांचें व देशाचे कल्याण करो. . खीस्त जीवनदाता. (हिंदुस्थानी भजन.) ध्रु० यीशु मसीह । मेरो प्राण बचैया ।। १ जो पापी यीशूक ने आवे । यीशु है वाकी मुक्ति करै या ।। २ यीशु मसीहकी मै बलि बलि जैहूं। यीशु है मेरो त्राण करै या ॥ ३ गहिरि वह नदिया नांव पुराणी । यीशु है मेरो पार करै या ॥ ४ दीन नाथ अनाथ के बन्धू तुमही हो प्रभु पाप हरे या ।। ५ आसीको अपनी शरण मे राखियो । अंत समै मेरी लीजे खबरी या ।। 1.