देशी हुन्नर

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

________________

सन १८८९ सार्वजनिक वाचनालय - खेड, जि. पुणे पुस्तकाचे नांव दशा लेखक गुन पुस्तकाचा प्रकार in

व्यक


THE

INDUSTRIAL ARTS OF INDIA.

COMPILED IN MARATHI


BY
Rao Saheb BALKRISHNA ATMARAM GUPTE

Curator, Government Central Book Depot, Bombay;
Member of the Royal Agricultural Society
of England &c.

AND
PUBLISHED BY
MADHAVRAO BALLAL NAMJOSHI

POONA:

Printed at the “ ARYA BHUSHANA ” Press,

Price 2 Rupees.

( All rights reserved. ).

1889.

देशी हुन्नर.

अथवा

हिंदुस्थान देशांतील कारागिरीचे वर्णन.

हे पुस्तक

रावसाहेब बाळकृष्ण आत्माराम गुप्ते,
क्युरेटर गव्हर्मेन्ट सेंट्रल बुकडेपो, मुंबई,
यांजकडून तयार करवून

माधवराव बल्लाळ नामजोशी
यांनी
छापून प्रसिद्ध केलें.

(या पुस्तकासंबंधी सर्व हक्क रजिष्टर करून प्रसिद्धकर्त्याने आपल्या स्वाधीन ठेविले आहेत.)

पुणे;
"आर्यभूषण " छापखाना.


१८८९
किंमत दोन रुपये.

पुणें येथें
'आर्यभूषण' छापखान्यांत छापिलें.

TO

HIS EXCELLENCY THE RIGHT HONORABLE

SIR DONALD JAMES MACKAY, BARON REAY,

L. L. D., G. C. I. E.,

GOVERNOR AND PRESIDENT IN COUNCIL,

BOMBAY.

This Work is

(BY PERMISSION)

RESPECTFULLY INSCRIBED, IN GRATEFUL ACKNOWLEDGMENT
OF HIS EXCELLENCY'S STRENUOUS EFFORTS IN
SPREADING TECHNICAL EDUCATION AMONG
THE NATIVES OF THIS COUNTRY,
BY HIS EXCELLENCY'S MOST
OBEDIENT AND HUMBLE
SERVANT,


B. A. GUPTE.
 
प्रस्तावना.

 देशी हुन्नरावर इंग्रजी भाषेत बरीच पुस्तके आहेत. पुष्कळ वर्तमानपत्रांतून व मासिक पुस्तकांतूनही या विषयावर नेहमी निबंध छापून येत असतात. तरी एकाच ठिकाणी मिळेल तितकी माहिती गोळा करून स्वतंत्र ग्रंथ छापण्याची अवश्यकता होती. ती बाबू त्रैलोक्यनाथ मुकरजी इंडियासरकारच्या हपिसांतील प्रदर्शन शाखेचे माजी मुख्य कामदार यानी पुरी केली व "आर्टम्यानुफॅकचर्स ऑफ इंडिया" या नांवाचा गुदस्त साली माझ्या व इतर कामदाराच्या मदतीने इंग्रजीत एक ग्रंथ छापिला आहे. या इंग्रजी पुस्तकाच्या धरतीवर मराठीभाषेत एक स्वतंत्र ग्रंथ प्रसिद्ध करण्याची इच्छा प्रथम माझे मित्र माधवराव बल्लाळ नामजोशी यांस झाली. त्यांच्या सुचनेवरून, मीं हें पुस्तक स्वभाषेत लिहिलें. त्यांत, आज सुमारे चौदा वर्षे सर्व संग्रहालयांची व प्रदर्शनांची कामें करीत असताना कलकत्त्यापासून लंडन शहरापर्यंत फिरून जी काही माहिती मला मिळाली तिचा उपयोग केलेला आहे. व स्वतःच्या अनुभवास आलेल्या बऱ्याच गोष्टी येथे दाखल केल्या आहेत. हा ग्रंथ महाराष्ट्रभाषाभिज्ञ वाचकांस पसंत पडला तर तो रचविण्याचें, छापविण्याचें, व प्रसिद्ध करण्याचें सर्व यश रावसाहेब नामजोशी यांचे आहे. व कोणाही नवीन उद्योग करणारांस या पुस्तकाचा उपयोग झाल्यास त्यांनी त्यांचेच आभार मानावें,हें रास्त आहे.

ग्रंथकार.
देशी हुन्नर.

प्रकरण १.

चित्ररेखन.

 भरतखंडांत चित्ररेखनविद्या प्राचीनकाळी लोकांस माहीत होती इतकेच नाही, तर चित्रे काढण्याच्या कामांत ते इतर राष्ट्रांच्या पुढे बरेच सरसावले होते, असे मानण्यास हरकत नाही. यक्ष व नाग हे चिताऱ्याचे काम करीत असत, व उखेची सखी चित्ररेखा इनें त्रैलोक्यांतील मुख्यपुरुषांचे चेहरे काढून दाखविले होते. ह्या गोष्टी पुराणांतील असल्यामुळे त्या इतिहासांतील गोष्टीप्रमाणे केवळ खऱ्या मानतां येत नाहीत असे म्हणणाऱ्या लोकांकरितां कालिदासाच्या वेळी राजेलोक चित्रेंं काढीत असत, ह्या गोष्टीचा पुरावा येथे दिला पाहिजे असे नाहीं; कारण तो सर्व प्रसिद्ध आहे. तशांत अभिज्ञानशाकुंतलनाटकांतील शकुंतलेची तसबीर थोड्याच दिवसांपूर्वी आण्णासाहेब किर्लोसकरानी आमच्या डोळ्यांपुढे उभी केली होती, त्यामुळेंं ती तर आबालवृद्धांस माहीत आहे. ह्याही गोष्टी एकीकडे ठेविल्या आणि “ चक्षुर्वैसत्यं " असे म्हणून वागणाऱ्या मंडळीची संपूर्ण खात्री करावयाची, असा जरी आह्मी निश्चय केला, तरी दोन हजार वर्षापूर्वी आमच्या देशांत चित्ररेखन फार चांगल्या प्रकारचे होत असे, असें आज सिद्ध करून देतां येत आहे. या गोष्टीचे प्रमाण निजामशाईमध्ये अजंटा या नांवाची लेणी आहेत तेथें आजलाही प्रत्यक्ष प्रष्टीस पडत आहे. स्वदेशी व पाश्चिमात्य विद्वानांच्या मताने अजंटा येथील लेणींं रंगविण्यास ख्रिस्तिशकाच्या पूर्वी सुमारेंं दोनशेंं वर्षांपासून सुरवात होऊन ख्रिस्तिशकाच्या आठशेंं वर्षांच्या सुमारास तेंं काम पुरेंं झालेंं असावेंं असेंं ठरले आहे. या लेण्यांतील चित्रं बौद्धधर्माची आहेत, व ह्या धर्माचा आपल्या देशांत दोन हजार वर्षापूर्वी प्रसार झाला होता, त्यावरून वरील ह्मणणेंं सप्रमाण आहे, असेंं सिद्ध होते. आतां ही लेणींं इतकींं जुनींं असतील तर आजपर्यंत शिल्लक राहिली कशी ? गिजनीच्या महंमदाने सोरटी सोमनाथाचा फडशा उडविला व औरंगजेबासारख्या धर्मवेड्या सत्ताधिशांनी आमच्या देशांतील देवस्थाने निर्दाळून टाकिली ; व त्यांतून राहिलीसाहिली ती पोर्तुगालदेशांतील ख्रिश्चन् इनक्विझिशनच्या सपाट्यांत सांपडून समूळ नाहीशी झाली. असे असतां ही अजंटा येथील लेणी शिल्लक राहिली याचे कारण आहे. ज्या डोंगरांत ती कोरली आहेत त्याच्या आसपास माजलेलें दाट जंगल व त्या जंगलांत सहजी पोसली गेलेली हिंस्र जनावरे ही ह्या धर्मवेड्या लोकांस प्रतिबंध करीत असें ह्मणा, किंवा डोंगरावरील उंच खोऱ्यांत अशी काही लेणी आहेत किंवा नाहीत याचा तपास करण्याकरितां उंच उंच व बिकट रस्ते चढून जाण्याचे श्रम करण्याचे यवनांस सुचलें नाहीं असें म्हणा. कारण काही असो आज ती शिल्लक आहेत हे खरे आहे. मेजर जेल नांवाच्या साहेबाने ही लेणी इंग्रजसरकारच्या नजरेपुढे आणून दिली. त्याने ती साफ करविली त्या वेळीं आंतील चिखल व गाळ काढतांना त्यास मनुष्याची हाडेंं सांपडली. व लेण्यांच्या आसपास वाघाचे पंजे चिखलांत उठलेले आढळलेंं यावरून तेथेंं कोणच्या प्रकारची वस्ती होती हे स्पष्ट दिसत आहे. जेल साहेबानेही या ठिकाणी आपण स्वतः वाघ व तरस मारले असा ' रपोट' केला आहे. असो.

 ही लेणींं चित्ररेखकाच्या दृष्टीने फारच सुरेख आहेत. यांची वाखाणणी आह्मीं करूंच करूं. पण चित्ररेखनविद्येत निपुण असे परराष्ट्रीय लोक सुद्धा ही लेणी पाहून मान डोलवितात असें मे. ग्रिफिथस साहेब, मुंबईतील चित्रशाळेवरील मुख्याधिकारी यांचे या लेण्याबद्दलचे मत खाली दिलेंं आहे त्यावरुन स्पष्ट होईल.

 ग्रिफिथस साहेब म्हणतात:-" या चित्रकारांची कर्तबगारी मोठी जबरदस्त असली पाहिजे. कुंच्याच्या एका झटक्याने कांहीकांही ठिकाणी त्यांनी इतकी चमत्कारिक कर्तबगारी दाखविली आहे कीं, ती पाहून मी अगदीं थक्क झालो. तें तर असोच; परंतु लेण्याच्या छतावर जेथें काम करणे फार कठीण अशा ठिकाणी काढलेले काही वेल इतके सुबक आणि इतके शास्त्रशुद्ध आहेत, की त्यांजकडे पाहून हे पूर्वीचे चित्रकार मानवी नसावेत असे मला वाटू लागले. हिंदुस्थानांतील चित्रशाळेतील मुलांस शिकविण्याकरितां कित्त्या दाखल जे नमुने ठेवावयाचे ते यांतीलच असावे. यापेक्षा चांगले नमुने इतर कोठेही शोधून मिळतील असे मला वाटत नाही. अहाहा! यांची कौशल्यदेवता मजपुढे प्रत्यक्ष उभी आहे कीं काय असा भास होतो? या चित्रांतील कांहींं चेहेरे प्रश्न करिताहेत, कांहींं जबाब देत आहेत, काहींं हंसताहेंत, व कांहींं रडताहेत ; कांहीं एकमेकांकडे ममतेने पाहताहेत व काही तोंडपुजेपणा करिताहेत ! ! ! त्यांचे हात मोठ्या खुबीने व गौरवाने हलताहेत; या चित्रातील फुलें आतांच उमललेली आहेत, पक्षी भरारी मारिताहेत, जनावरें कोठे उड्या मारीत आहेत, कोठे टकरा देत आहेत, व कोठें शांत मुद्रेनेंं आपल्या पाठीवरील ओझेंं वाहात आहेत !! " अशा रीतीने आनंदाच्या भरांत निमग्न असतांना मेहेरबान ग्रिफिथ्स साहेबांनी केलेले आमच्या लेण्याचे वर्णन पुराव्यांत दाखल करण्यास काही हरकत आहे असे कोणाच्याने तरी ह्मणवेल काय ? ही चित्रे उत्तम आहेत तथापि त्यांत कांहीं दोषही आहेत. इटली देशांतील चौथ्या शतकांतील चित्रकारांनी त्या देशांत जी चित्रे काढली आहेत त्यांच्या मनाचा त्या वेळचा कल आणि या अजंटा येथील चित्रकारांचा कल जुळता जुळतां बराच जुळला आहे. म्हणजे चित्ररेखन म्हणून जेंं “ शास्त्र" आहे त्याच्याकडे दुर्लक्ष, पुष्कळचित्रांची एका ठिकाणी गर्दी करण्याची तऱ्हा, आंतरिक्षयथादर्शन शास्त्राचा ( एरियल पर्स्पेक्टिव्हचा ) अभाव व कोणत्याही गोष्टीचे सुंदर चित्र काढण्याकडे लक्ष न देतां " खरोखर " चित्र काढण्याकडे विशेष लक्ष या सर्व तऱ्हा दोन्ही राष्ट्रांत सारख्याच आहेत.

 आपल्या देशांतील चित्रकला किंवा चित्ररेखनविद्या इतर कलांप्रमाणे व विद्येप्रमाणेच हल्ली अस्तास जाण्याच्या बेतांत आहे. ती यापूर्वीच अगदी नाहीशी झाली असती, परंतु मुसलमान सत्ताधीशांस ऐहिक सुखाचा उत्तम प्रकारे उपभोग घेण्याची संवय असल्यामुळे त्यांच्या धर्मात चित्रे काढू नये असा हुकूम असतांनाही त्यांनी ह्या कलेस पुष्कळ उत्तेजन दिले होतेंं असें प्रांजलपणें कबूल केले पाहिजे. अकबर बादशहाचे तर या कामांत आमच्या देशावर पुष्कळच उपकार आहेत. या बादशहाच्या दरबारी भोजराजाच्या नवरत्नांप्रमाणे सोळा उत्तम चित्रकार होते. त्यांनी महाभारताच्या फारशीभाषेत केलेल्या भाषांतरांत आमची पुराणाची चित्रे काढली आहेत. या भाषांतरास 'रजमनामा असे म्हणतात. हा 'रजमनामा' किंवा निदान त्याची नक्कल जयपुरच्या दरबारी हल्लींं आहे. तिच्यांत १६९ पाने चित्राने भरलेली आहेत. या ग्रंथाची किंमत चार लाख रुपये आहे असें ह्मणतात. या चित्रांबद्दल जयपूर येथील दरबारी 'सर्जन' डाक्तर हेन्डले असे म्हणतात की " ती फार उत्तम रीतीने काढलेली आहेत. ती पाहिली असतां फारशी देशांत चित्रकला किती पूर्णत्वास आली होती याचे चांगले अनुमान करता येते.  मुसलमान चित्रकारांनी काढलेल्या इतिहासप्रसिद्ध पुरुषांच्या तसबिरी हल्ली कोठे कोठे विकत मिळतात. मुंबईतील चित्रशाळेत अशी दहा चित्रे आहेत. त्यांत फिरोकशीयर बादशाहा, दुसरा शहाआलम बादशाहा, व मोहोबतखान जहांगिर यांच्या तसबिरी आहेत. या मुसलमानी राज्यांतील चित्रकारांचे वंशज हल्ली दिल्लीत आहेत. "दिल्ली पेन्टींग्ज" या नांवाने इंग्रजलोकांत प्रसिद्ध असलेल्या हस्तीदंतावरील तसबिरी हेच लोक काढतात. त्यांच्यांत झुलफिकिरखान या नांवाचा एक मनुष्य विशेष प्रसिद्ध आहे.

 अजंटा येथील लेण्यांतील चित्रेंं तयार झाल्यापासून व मुसलमानी सत्ताधीशांनी चित्ररेखनविद्या कांहीअंशी ऊर्जितदशेस आणल्यापासून पुढेंं तिचा ऱ्हासच होत चालला होता. परंतु गेल्या वीस बावीस वर्षांत इंग्रजसरकारानी ठिकठिकाणी चित्रशाळा स्थापन केल्या आहेत, त्यामुळे आतां पुनरुज्जीवन होईल अशी आशा आहे. तथापि अशा शाळांतून जाणारे बहुतेकविद्यार्थी होतकरूच असतात असेंं नाही. याचे कारण असेंं आहे की जी मुले इतर कोणत्याही शाळेत शिकून तयार होण्यासारखी नाहीत तीच अशा शाळांतून पाठविण्याची चाल आहे. ही चाल बंद पडून हुशार मुले किंवा ज्या मुलांस चित्ररेखनाची स्वाभाविक आवड आहे ती मुले ज्यावेळी या चित्रशाळांतून अभ्यास करू लागतील, त्यावेळी या विद्येच्या भरभराटीस सुरुवात होईल. चित्रशाळेत मुलगा जाऊ लागला ह्मणजे त्याने आपल्या इतर अभ्यासावर पाणी ओतलें पाहिजे असे नाही. विलायतेंत कालेजांतील काही मुलें चित्ररेखनविद्या शोकाखातर शिकत असतात. उदाहरणार्थ इंडियाआफिसांत हल्ली कौन्सिलर, काम करीत असणारे व आपले पुण्यांतील प्रसिद्ध डायरेक्टर आफ पब्लिक इन्स्ट्रकशन सर जेम्स पील, आपले माजी गव्हरनर सर रिचर्ड टेंम्पल, माजी आक्टिग डायरेक्टर आफ पब्लिक इन्स्ट्रकशन जनरल वाडिंग्टन, व माजी डायरेक्टर आफ इन्डियन रेलवेज कर्नल हाँनकाँक हे होत.

भिंतींवरील चित्रें.

 प्रस्तुतकालींं भिंतींंवर चित्रे काढण्याची पुणेंं, विजापूर, दिल्ली, अजमीर व इतर मोठमोठ्या शहरींं चाल आहे. परंतु वेलबुट्टी खेरीज करून त्यांतील बाकीचेंं काम अगदीच ओबडधोबड असते. वाघ, हत्ती, शिपाई प्यादे, वगैरे काडलेले असतात खरे, तत्रापि त्यांचे हात कोठे, पाय कोठे, चेहेरा कोणीकडे याचा कांहींच मेळ नसतो. उत्तरहिंदुस्थानांतील सरळ रेखाकृतीची मुसलमानी तऱ्हेवर काढलेलीं चित्रें दिसण्यांत बरीच सुंदर दिसतात. मुंबई, मद्रास, व बंगाल ह्या तीन प्रांतांत देवळांत चित्रेंं काढण्याची रीत आहे. पूर्वी ही चित्रेंं काढण्यास लागणारे रंग, गेरू, पेवडी इत्यादि देशी जिनसांचे केलेले असत. परंतु हल्लींं विलायती रंग येऊ लागल्यामुळे आमच्या देशांतील रंगांचा उपयोग फारच क्वचित् होतो. ज्याप्रमाणें विलायतेहून रंगाच्या पुड्या तयार होऊन येतात त्याप्रमाणे आपल्या देशांत तयार करून विकण्याची कोणी व्यापाऱ्यानें सुरवात केल्यास त्यांत त्यास पैसा मिळेल असें आह्मांस वाटतें.

रोगणीं चित्रें.

रोगणीं ह्मणजे तेलांत कालवून तयार केलेल्या रंगाने रंगविलेलीं चित्रेंं. ही विद्या आपल्या देशांत नव्हती, ती इंग्रज सरकारानें सुरू केली. या कामांत लागणारे रंग तयार करण्यास लागणारे आळशीचें तेल आमच्याच देशांतून विलायतेस जातें, किंवा आळशी येथूनच जाऊन तिकडे तिचें तेल निघून पुनः आमच्या देशांत परत येतें. ही गोष्ट आमच्या व्यापाऱ्यांनी लक्षांत ठेवण्याजोगी आहे. सरकारीचित्रशाळेंतून शिकून तयार झालेली कांही मुलें “ऑइल पेन्टिंग" तयार करतात. त्यांस उत्तेजन देण्याकरितां व आपल्या देशांत या विद्येची वृद्धि व्हावी ह्या हेतूनें आमचे राजेरजवाडे व श्रीमंत लोक आपल्या वाडवडिलांच्या तसबिरी काढवून ठेवण्याची चाल सुरू करतील तर फार बरें होईल. युरोप व अमेरिकाखंडांत ही चाल सर्वठिकाणीं आहे.

साधीं व लाखेच्या रंगाचीं चित्रें.

 कागदावर, कापडावर, कांचेवर किंवा लांकडावर रंगारंगाची चित्रें काढणें, व त्यांजवर लाखेचें पांणी देऊन ह्मणजे तीं ऊन केलेल्या लाखेनें सारवून तयार करण्याची चाल आमच्या देशात पूर्वापार आहे. सांगली, जगन्नाथ व मद्रास येथें तयार होणारे चित्रपट, सांवतवाडीस होणाऱ्या करंड्या, रोवळ्या व सुपल्या आणि सांवतवाडी व सिंध येथें तयार होत असलेले लाखेचें लांकडी सामान हीं या सदराखाली येतात. जगन्नाथास अशी चाल आहे कीं एक कापडाचा लांब तुकडा घेऊन तो शेणमातीनें सारवावा व त्याजवर पुराणप्रसिद्ध पुरुषांचीं चित्रे काढून वर लाखेचें पाणी द्यावें. असे चित्रपट बगलेंत मारून दारोदार भिक्षा मागत फिरणारे लोक जिकडे तिकडे आढळतात. उत्तररामचरित्रांत लक्ष्मणानें रामास व सीतेस दाखविलेला चित्रपट आपल्या डोळ्यांसमोर आहेच. कच्छभूज प्रांतांत तेथील “रावांची" स्वारी अशांं रीतीनेंं एका लांब कागदावर काढलेली विकत मिळते. परंतु तिजवर लाखेचे पाणी दिलेलें नसतें. या भूज येथील देशी चित्रकाराने काढलेला चित्रपट इतका सुरेख असतो की, तोंं मुंबईतील चित्रशाळेतील मुख्य अधिकाऱ्यांस पसंत पडून त्याची एक प्रत ५० रुपयांस खरेदी करून त्यांनी तेथील सर्वसंग्रहालयांत ठेविली आहे. कागदावर काढलेले इतिहासप्रसिद्ध पुरुषांचे चेहेरे पुण्यांत, डाक्क्यास, दिल्लीस, बडोद्यास, व साहारणपुरास आढळतात. रजमनाम्याबद्दल वर आम्ही माहिती दिली आहे. या पुस्तकांतील कांही चित्रें छापून प्रसिद्ध झाली आहेत व त्यांच्या प्रती जयपूर येथील सर्वसंग्रहालयाचे मुख्य अधिकारी यांजकडे विकत मिळतात. पुराणप्रसिद्ध व इतिहासप्रसिद्ध पुरुषांची चित्रे काढणारे लोक जयपूर येथें हल्लीं आहेत. असल्या चित्रांस एक रुपयापासून शंभर रुपये पर्यंत किंमत पडते. असलीं चित्रें मध्यहिंदुस्थानांत अल्लिपूरा येथें होतात. पंजाबांत जलंधर प्रांतांत जंग व नवाशहर या गांवी, तसेंच कांग्रा, कपुरथळा, खाटमांडु व मद्रास इलाख्यांत हम्पा, सागरा, अनंतपूर येथेही होतात. पुणे, मुंबई व इतर काही शहरांत चितारी लोक कांचेवर चित्रे काढीत असतात. कांच पुढे धरून तिजवर उलटी चित्रें काढून त्यांवर रोगणाचा हात देऊन नंतर तीं चौकटीत बसवितात. ब्रह्मदेशांत, रंगून, मोलमीन, बेसीन इत्यादि शहरांत तद्वेशीय चित्रकार आहेत. रंगून येथील इंजिनियर मेहेरबान टिली साहेब याचें असें ह्मणणें आहे की " या चित्रांत 'पर्स्पेक्टीव्ह' जरी कांहीं नसतें तरी ती फार सुंदर दिसतात. हल्लीच्या मानानें पाहिलें असतां असेंही दिसून येतें कीं ब्रह्मदेशांतील लोकांनी काढलेले चेहरे जरी कधीं कधीं मुळच्या चेहऱ्यांशी मिळते असतात तरी त्यात सबिरींत मार्दव नसतें; व चित्राच्या आसपास विलायतीसामानाच्या वेड्या वांकड्या चित्रांची रेलचेल केलेली असते. " कापडावर चित्रे काढण्याची ही चाल ब्रह्मदेशात आहे.

पोथीसारख्या हस्तलिखित ग्रंथांतील चित्रें.

 हींं कागदावर किंवा ताडपत्रावर काढलेलींं असतात, त्यांत खालींं लिहिलेलीं प्रसिद्ध आहेत. (१) जयपूर दरबारीं असलेला रजमनामा. (२) शेकशादी नांवाच्या मनुष्यानें लिहिलेल्या गुलिस्तान नामक ग्रंथाची प्रत महाराजा वणीसिंग अलवार येथील तक्ताधिपती यांनीं पन्नास हजार रुपये देऊन काढविली ती. हा ग्रंथ तयार करविण्यास एकंदर खर्च एक लाख रुपये लागला असें म्हणतात. यांतील प्रत्येक पानाची वेलबुटी निरनिराळी आहे (३) महाराणी व्हिक्टोरिया यांच्या वुइन्डसर येथील राजमाहालांत "शाहा जहाननामा " म्हणून एक ग्रंथ आहे तो अयोध्येस बारा हजार रुपयांस खरेंदी केला. (४) पारीस शहरांत फरमिन डिडाट नांवाच्या साहेबांच्या घरीं असले ग्रंथ पुष्कळ आहेत. या गृहस्थाने १८७८ साली झालेल्या प्रदर्शनांत काही ग्रंथ ठेविले होते. आलबर्ट डी मॉन्डेल सो नांवाच्या एका साहेबानें असे लिहून ठेविले आहे, कीं अकबर बाहशाहाच्या दरबारांत असले चोवीस हजार ग्रंथ होते. यंदा (१८८८साली) कलकत्ता येथील सर्वसंग्रहालय म्युझीयमकरितां पाली भाषेंत लिहिलेला असा एक ग्रंथ बाबू त्रिलोकनाथ मुकरजी यांनी १२० रुपयांस खरेदी केला. लखनौ, रामपूर, आग्रा, ग्वाल्हेर इत्यादि शहरीं म्हणजे जेथें जेथें मुसलमान सरदार लोक आहेत तेथें तेथें अजूनही चित्रयुक्त कुराणाच्या प्रती सुमारें शंभर शंभर रुपयांस विकत मिळतात. सन १८८३ च्या कलकत्ताप्रदर्शनांत खालीं लिहिलेलेंं चित्रयुक्त ग्रंथ आलेंं होते. इराणांतील राहणारा मीर इमदाद याने २५० वर्षांपूर्वी लिहिलेला एक ग्रंथ, (२) सन १६८१ साली औरंगजेब बादशहाने जमा केलेले फारशी चित्रयुक्त अक्षराचे उत्तम उत्तम नमुने ज्यांत आहेत असा "मुरक्का" नांवाचा एक ग्रंथ, ( ३ ) शहाजहान बादशहाच्या वेळीं लिहिलेला व त्याच्या हातची त्यांत कांही अक्षरे असलेला असा सुलतान अल्ली मुत्सुद्दी याच्या हातचा “कतात इबु इमान" या नांवाचा कविताबद्ध ग्रंथ, (४) मुर्शिदाबाद येथील नबाब यांनी उत्तम उत्तम अक्षरांचे नमुने दाखविण्याकरितां तयार केलेला "मुरक्का" या नांवाचा दुसरा ग्रंथ, (५) टोंक दरबारांतून आलेला अबदुल रहिमान जामी यानीं रचलेला व हिजरी ९५५ (सुमारे ५० वर्षांपूर्वी ) महंमद ताहीरखान बहादूर याच्या हुकुमावरून महंमद झेद याने नक्कल केलेला " फत्तुहुइ हरामिन " नांवाचा ग्रंथ. हा ग्रंथ एका गृहस्थाने पांच हजार रुपयांस विकत घेऊन अकराशे रुपयांस विकला व तो टोंक सरकारानें १७०० रुपयांस खरेदी केला.

हस्तिदंतावरील चित्रें.

 हीं मुख्यत्वें करून दिल्लीस होतात. रजमनाम्यासारख्या फारशी ग्रंथांत काढलेल्या चित्रांसारखी ही चित्रे असतात. मोठ मोठे बादशाहा, प्रसिद्ध सरदार, ताजमहाल, व जुम्मा मशीद यासारख्या प्रसिद्ध इमारती ह्या अशा रीतीनें हस्तीदंतावर काढलेल्या असतात. हे चितारी लोक अलीकडे " फोटोग्राफ " पुढें ठेवून त्याजवरून हीं चित्रें काढूं लागले आहेत. यांचा उपयोग हस्तीदंताच्या पेटयांत बसविण्याकडे किंवा मडमांच्या गळ्यांत व हातांत दागिने करण्याकडे होतो. लाहोर येथील चित्रशाळेंतील मुख्याधिकारी मेहेरबान किप्लिंसाहेब असें म्हणतात कीं, “हिंदुस्थानांत फोटोग्राफ काढण्याची सुरुवात झाल्यापासून दिल्लीच्या हस्तीदंतावरील चित्रांत आस्ते आस्ते फरक पडत चालला आहे. कोणतीही तसबीर या चिताऱ्यांपुढें ठेविली तर ते ती पाहून हुबेहुब रंगाची तसबीर काढून देण्यास तयार असतात. व केव्हां केव्हां त्यांच्या रंगांत जरी कांही दोष असतात तरी एकंदरीनें त्यांचें काम आश्चर्य मानण्यासारखें असते. मार्दवपणाचा अभाव हा जो दिल्लीच्या चित्रांतील पूर्वापार दोष तो हल्लीं कमी होत चालला आहे. शास्त्रशुद्ध चित्ररेखन, चांगला रंग व नैसर्गिक देखावा या गोष्टींकडे लक्ष न देतां ते लोक अजून बारीक कलम मारण्याकडे विशेष लक्ष देतात. हें कलम एकाच केसाचें केलेलें असतें "

 दिल्लीचे मुसलमान कारागीर मुळचे इराणी आहेत, त्यांचे भाऊबंद हल्लीं मुंबई व कलकत्ता ह्या शहरीं जाऊन राहिले आहेत. बनारस व त्रिचनापल्ली या गावींही हस्तीदंतावर धर्मसंबंधी चित्रे काढणारे लोक आहेत. त्रिचनापल्लीस गोपाळरामराजे अशीं चित्रें काढतात. व जयपुरास कांही लोकांनीं हा धंदा आलिकडे सुरू केला आहे.

अभ्रकावरील चित्रें.

 हीं मुख्यत्वें करून त्रिचनापल्लीहूनच येतात. वेगवेगळ्या जातींच्या व धंद्याच्या लोकांची चित्रे यांजमध्ये असतात. बारा चित्रांस किंमत चार रुपयें पडते. बनारस येंथें कधी कधी अभ्रकावर काढलेली चित्रें तीनपासून सात रुपयेंं डझन पडतात.

चामड्यावर काढलेलीं चित्रें.

 मद्रास इलाख्यांतील कडपा जिल्ह्यांत नोसम गांवी साहेब लोकांच्या उपयोगाकरितां चामड्यावर रंगविलेली चित्रे अलिकडे काढीत असतात. मद्रासेंतील सर्व संग्रहालयावरील मुख्य अधिकारी डाक्तर बीडि यांचें असें म्हणणें आहे कीं "हीं चित्रं कधीं कधीं चमत्कारिक व कधीं कधीं मोठी विलक्षण असतात. परंतु त्यांत चित्ररेखनकौशल्य कांहींच नसतें. " या धंद्याच्या संबंधाने आमची अशी सूचना आहे कीं, आमच्या जिनगर व चितारी लोकांनी आपलीं मुलें चित्रशाळेंत पाठवून चित्ररेखन विद्या चांगली अवगत होण्यास विलायतेकडील साधनें उपयोगांत आणण्याचा यत्न करावा. तसबिरी रंगविण्याचा ज्यांचा धंदा आहे त्यांनीं फोटोग्राफचा उपयोग करावा, म्हणजे फोटोग्राफ पुढें ठेवून त्यांत नैसर्गिक प्रकाश ( लाइट ) आणि छाया (शेड) कसे उठलेले आहेत हें ध्यानांत आणून त्याप्रमाणें आपलें कलम चालवावे. इतकी मात्र गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे की, देशी चित्रें काढीत असतांना परदेशांतील वेलबुट्टीचा, इंग्रजी टेबलें, खुर्च्या, हंड्या, झुंबरे इत्यादिकांचा समावेश कधींही होऊं देऊं नये. असलें धेडगुजरी चित्र इंग्रज लोकांस किंवा कोणासही कधीही पसंत पडत नाहींं. ते त्याची नेहमीं थट्टा उडवीत असतात. चित्रांत रंग भरण्याच्या संबंधाने आमची अशी सूचना आहे की, हे रंग भडभडीत नसावेत. रंगाचे अन्योन्योद्दीपन (हारमनी आफ कलर्स ) म्हणून इंग्रजींत एक निराळे शास्त्रच आहे. त्यांत कोणत्या कोणत्या रंगाचा मेळ कसा कसा होतो व कोणता रंग कोणत्या रंगाच्या शेजारी असतांना सौरस्य भंग होतो हे दाखविलेलें असते. या कामांत आमचे लोक आलीकडे अतिशय गोंधळ करूं लागले आहेत. त्यांच्या रंगांत कधीही मेळ असत नाहींं. व कधीं कधीं त्यांनी काढलेल्या चित्रांकडे पाहूं लागलें तर डोळे दिपून जाऊन उलटा त्रास होतो.

खोदींव काम व शिळाछापाचें काम.
खोदींव काम.

 प्राचीन काळी खोदीव काम आपल्या देशांत होत असे परंतु ते वेगळ्या तऱ्हेचें; शिलालेख, ताम्रपट, शिक्के, मोर्तबें , छिटें, जाजमें, चुनड्या, वगैरे छापण्याकरितां तयार केलेले ठसे, इत्यादि. या शिवायही नकशीचे खोदींव काम पूर्वी होत असे, परंतु ते निराळ्याच प्रकारचें असल्यामुळे या सदराखालीं न देतां दुसरीकडे त्याचा उल्लेख केला आहे. हिंदुस्थानांत जुनाट असे शिलालेख ठिकठिकाणीं आहेत. परंतु त्यांतील अक्षरें वळणशुद्ध किंवा सुबक नाहीत. अलीकडे मोठमोठ्या इमारती, सार्वजनिक हौद, पूल, वगैरे लोकोपयोगी कामांवर जे शिलालेख दृष्टीस पडतात, ते पूर्वीच्या शिलालेखांपेक्षां अ-
   धीक चांगले असतात असे कोणीही कबूल करील. यांत दिवसें दिवस अधिकाधिक सुधारणा होत जाईल असें अनुमान आहे. ताम्रपट पूर्वीचे आहेत तितकेच. आतां त्यांत भर पडण्याची आशाच नको. आमचे आलीकडील ताम्रपट म्हटले म्हणजे तांब्याच्या पत्र्यांवरून छाप घेण्याकरितां खोदून तयार केलेल्या प्रतिमा. हें काम करणारे लोक आपल्या देशांत फार थोडे आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली तर आमच्या देशाचा पुष्कळ फायदा होणार आहे. शिक्के, मोर्तबें वगैरे खोदणारे लोक ठिकठिकाणीं आहेत; त्यांत हिंदुस्थानांतील जुन्या राजधान्यांतून त्यांची वस्ती अधिक आहे. दिल्ली शहरांमध्ये एकदोन घराणीं शिक्के कोरण्याविषयीं फार प्रसिद्ध आहेत. तसेंच अंबाला जिल्ह्यांत शाहाबाद गांवीं हरनामसिंग व प्रतापसिंग या नांवांचे दोन कारागीर आहेत. हे व अलीकडल्या प्रकारचें काम करणारे कारागिर लोक पूर्वी प्रमाणे नुसता नांवाचा शिक्का खोदून स्वस्थ न राहतां अकीक वगैरे दगडांवर साहेब लोकांची चित्रयुक्त मोर्तबें तयार करितात. मुंबईत चित्रशाळेत शिकून तयार झालेले कांहीं विद्यार्थी हल्लीं लांकडावर खोदींव काम तयार करून छापखानेवाल्या लोकांस विकतात. ही कला आमचे लोकांत आल्यास चांगली फायदेशीर होईल. दिवसानुदिवस असल्या कामाची गरज जास्त जास्त लागूं लागली आहे. या कलेचा उपयोग पुष्कळ प्रकारच्या धंद्यांत होण्यासारखा आहे. चवकस मनुव्याच्या सहज लक्षांत येईल की साखरेच्या गाठयांचे ठसे, देशी छिटे छापण्याचे कामी लागणारे नाना तऱ्हेचे ठसे, वगैरे कामांत सुधारणा करण्यास पुष्कळच जागा आहे. ही कला शिकण्यास साधन म्हटले म्हणजे ठिकठिकाणीं ललितकला शिकण्यासाठीं स्थापन झालेल्या शाळा होत. लांकडांवर खोदीव काम करण्यास शिकविण्याकरितां असलेला शिक्षक तांब्यावर व पोलादावर तसलेंच काम करण्यास शिकविण्यासारखा असल्यास विशेष सोय होणारी आहे. छिटें व जाजमें तयार करण्याकरिता लागणारे ठसे आमच्या देशांत जरी शेंकडों वर्षांपासून तयार होत आहेत, तरी हल्लीं विलायतेंत तयार होत असलेले ठसे जास्ती सुरेख व बारीक काम छापण्यास चांगल्या रीतींनें उपयोगी पडण्यासारखे असतात, तसे आमच्या देशांत होत नाहींत. यामुळे आमच्या कामांतील बोजडपणा अजून कायम राहिला आहे.

शिळाछापाचें

 शिळा प्रेसावरील एकरंगीं नकशीचें काम आपल्या देशांत होऊं लागल्यास बरीच वर्षे झालीं. रंगीबेरंगी काम छापून काढण्याची कला आमच्या पश्चिम हिंदुस्थानांत स्वतंत्र रीतीने सुरू करण्याचें यश कैलासवासी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनीं मिळविलें. त्यांनीं सुरू केलेली चित्रशाळा या गोष्टीची साक्ष देत आहे. या चित्रशाळेत छापलेली चित्रं हल्ली जिकडे तिकडे विकत मिळतात. कलकत्ता येथें आर्टस स्टूडियो नांवाच्या छापखान्यांतही रंगीत चित्रें तयार होत असतात. परंतु त्यांच्या पोशागांत फार गडबड असते. बंगाली लोकांचा पेहराव, अगदीं कोता ह्मणून कलकत्ता येथील चित्रकार उत्तरहिंदुस्थानांतील लोकांचा पोशाख देवादिकांच्या आंगावर घातला आहे असें चित्रांत दाखवितात; परंतु तो पडला मुसलमानी, तेव्हां हिंदूंचे देव आणि मुसलमानांचा पेहराव, असा एकच गोंधळ होऊन जातो. पुण्यांतील व कलकत्यांतील छापील चित्रांत रंगाच्या संबंधानें चुका सारख्याच होतात. दोन्हीकडील रंग भळभळीत असून त्यांत नैसर्गिकत्वाचा लेशही नसतो. परंतु ही चूक छापणाराची नसून विकत घेणाराची आहे. गिऱ्हाइकांस आवडेल तसाच माल तयार करणें भाग असल्यामुळें आपल्यास पसंत नसलेले रंग सुद्धां वापरावे लागतात. आमच्या देवांची चित्रें विलायतेहून छापून येऊं लागलीं आहेत. हा व्यापार बंद करणे आपल्या हातीं आहे. आमच्या लोकांनीं आपल्या छापखान्याचें नांव राखण्याकरितां चांगलीं चांगलीं चित्रें नांवांनीं छापावीं व तीं जास्ती दरानेंही विकावी ; परंतु गरीबगुरीब लोकांत स्वस्त दराने विकण्याकरितां वेगळींच चित्रें छापवून विकीत जावीं. त्यांत रंग थोडे परंतु ठळक ठळक घालावेत ह्मणजे झालें. ही कला परकीय लोकांची असून आमचेकडे आल्यास तिला थोडेच दिवस झालें आहेत. यामुळें या कलेचा प्रसार अजून फारशा ठिकाणी झाला नाहीं.

फोटोग्राफ.
प्रकाशलेखन कला

 हीही कला आमचे लोकांनीं उसनीच घेतलेली असल्यामुळे या कलेंत निपुण झालेल्या लोकांची संख्या आपले लोकांत फारच लहान आहे. तरी ज्या थोड्या गृहस्थांनी या कामांत पुढे पाऊल टाकलें आहे, त्यांनी बराच लौकिक संपादन केला आहे. या सर्वांत उत्तम प्रसिद्धीस आलेले म्हणजे इंदूर येथील लाला दिनदयाळ हे होत. मुंबईचे हरिश्चंद्र चिंतामणजी व शिवशंकर नारायण यांचींही नांवें या संबंधानें घेण्यासारखीं आहेत.

दगडावरील नकशीचें खोदींव काम.
 या कामाची आमच्या देशांत जिकडे तिकडे रेलचेल आहे, अशी आमचीं पांडवांची लेणींं व देवळें साक्ष देतात. या देशांत हातांनी रंगविलेल्या चित्रांत जसे नैसर्गिकपणा व मार्दव हे गुण नसतांत, तशीच स्थिति आमच्या दगडावरील कोरींव मूर्तीच्या कामाची आहे. या कामांत वेलबुट्टीचे काम बरें असते, परंतु मनुष्यांची, पाखरांची व जनावरांची चित्रें आलीं, कीं कशास कांहीं मेळ नाहीसा होतो. ही कला मुसलमानी अम्मल होण्यापूर्वी चांगल्याच प्रगल्भ दशेस आलेली असावी असें ओडिसा, छोटानागपूर वगैरे प्रांतांत ज्या जुन्या मूर्ती सांपडतात त्यांवरून स्पष्ट होते. मुसलमानी अमलांत धर्मवेडानें जो मूर्तीवर सपाटा उडाला त्या कालापासून या कलेस उत्तेजनच मिळाले नाही. बंगाल प्रांतांतील लोकांत हें कसब मुसलमानी अमलापूर्वी चांगलेच वागत होतें. परंतु हिंदुधर्मास या कालानंतर अद्यापपर्यंत कधीच सुदीन न आल्यामुळे 'भासकार ' लोकांची जातच नाहींशी झाली. परंतु अद्याप देखील गया, जयपूर, भावनगर, ग्वाल्हेरजवळ मंडलेश्वर, धार, व बडोदा इत्यादि ठिकाणीं दगडाच्या कोरीव मूर्ती होत असतात. सुधारलेल्या देशांतील रीतीप्रमाणे केलेलें, उत्तम प्रकारचे कोरीव कामही आपल्या देशांत आलीकडे होऊ लागले आहे. या संबंधाने लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट आहे व ती हींं कीं, हा सर्व प्रसाद मेहेरबान किपलिंग साहेब यांचा. या जातीचे नांव घेण्यासारखे सर्व कारागीर या गृहस्थांचे शीक असून तेही मुंबईचेच आहेत. मिस्तर गोम्स मुंबईतील चित्रशाळेंतील असिस्टंट मास्तर यांचा ह्या कामांत पहिला नंबर आहे. या शिनोराच्या नजरेखालीं झालेलें काम मुंबईतील विक्टोरिया टर्मिनस या स्टेशनांत पुष्कळ आहे. दुसरे विद्यार्थी मिस्त्री वाला हिरा हे भावनगर येथें आहेत. यांनी सर जेम्स पील, मिस्तर परसीव्हल व दिवाण शामळलाल परमानंददास यांचे (बस्ट) कंबरेपर्यंत चेहरे काढून कलकत्ता येथील प्रदर्शनांत पाठविले होते. तिसरे विद्यार्थी मिस्तर पिंटो हे हल्लीं लाहोर येथें आहेत.
ताबूत वगैरे काम.

 देशांतील हवापाणी, लोकांचे आचारविचार व त्यांजमधील चालीरीति यांचा त्या देशांतील कारागिरी कसबावर केवढा जबरदस्त अम्मल असतो, हें स्पष्टपणें समजण्यासाठीं एखादें ठळक उदाहरण पाहिजे असल्यास ब्रह्मी लोकांत किंवा आपलेंकडील मुसलमान लोकांत मेलेल्यांचे स्मरण राखण्यासाठी ताबूत करण्याची जी चाल आहे तिचें होय. ज्यानीं ज्यानीं पुणें येथील कित्येक ताबुतांचे किंवा ब्रह्मदेशांतील तिरड्यांचे काम पाहिलें आहे ते खचित असें ह्मणतील कीं, काड्यामोत्यासारख्या भिकार जिनसांस सुद्धां ताबूत व तिरड्या बांधणारे लोक इतकी शोभा आणतात त्यापेक्षां त्यांचे कसब अजब म्हटलें पाहिजे. ही औटघटकेच्या मनोरम इमारती बांधण्याची कला कसबामुळे इतक्या श्रेष्ठत्वास जाऊन पोंचली आहे कीं तिची गणना आलीकडे ललितकलांत होऊं लागली आहे. ब्रह्मदेशांतील तिरड्यांसाठीं जीं मखरें बांधितात त्याचें टिलीसाहेबांनी वर्णन केलें आहे, त्यावरून असें समजते कीं हीं मखरें कधीं कधीं ७० पासून ८० फूट उंच असतात व त्यांजवर सात मजले केलेले असतात. लांकडाच्या खांबावर बांबूच्या ताट्याचें छत करून त्याच्यावर कागद चिकटवून त्या कागदांवर तऱ्हेतऱ्हेचीं चित्रें कातरतात. असें बारीक व रंगाचें काम करण्याकरितां शेंकडो रुपये खर्च करून अखेरीस तें सर्व प्रेताबरोबर जाळून टाकतात.

मुखवटे.

 वरील तऱ्हेंचे, कसबाच्या दृष्टीनें कांहीसें महत्वाचें दुसरे काम म्हटलें म्हणजे मुखवट्याचे होय. चित्रविचित्र रंगविलेले व वेडेवांकडे आकाराचे मुखवटे घालून हिंडणारीं अडाणी जातांचीं पाेरें शिमग्याचे सणांत या प्रांती दृष्टीस पडतात. तसेंच तागडधोम नाटकांत गणपतीच्या सोंडेचा मुखवटा वगैरे ज्याप्रमाणें मासले आपलेकडे दृष्टीस पडतात त्याप्रमाणें ब्रह्मदेशांत राक्षसांचे वगैरे वेडेवांकडे चेहेरे दाखविण्याकरितां तोंडाला लावण्याचे कागदाचे मुखवटे केलेले असतात. लांकडाचा सांचा कोरुन त्याजवर खर्ची कागदाचे सात किंवा आठ थर देऊन ते सुकले ह्मणजे काढून घेऊन त्यांस रंग देतात. कधी कधी बांबूच्या चिंभांचे तोंड करून त्याजवर शेणमातीचे कान, नाक, ओंठ चिकटवून त्याजवर कागद मारून नंतर ते रंगवितात. असले चित्रविचित्र मुखवटे करण्याच्या कामांत ब्रह्मदेशांतील लोक फार कुशल आहेत, असें कित्येक साहेबलोक सुद्धां कबूल करितात. जयपूर येथें असले कागदाचे मुखवटे करून वराह, नृसिंह अवतारांची सोंगे आणण्याची चाल आहे. बांबूच्या ताटीवर कापड किंवा कातडी लावून हत्ती व उंट तयार करतात. व त्यांजवर बसल्यासारखे करून ते गांवांत फिरवितात.

 पुणें येथें मोहरमचे समारंभांत गर्दीचे ठिकाणाहून अशा प्रकारचा घोडा फिरतांना पाहिल्याचे स्मरण पुष्कळांस असेल. मुखवटे, फटवे घोडे, हत्ती वगैरे चित्रांखेरीज कातड्याचे तुकडे व रंगी बेरंगी छिटे वगैरेची पाखरें, साप इत्यादी जिनसा जयपूर येथें मोठ्या टुमदार करतात. काहीं दिवसांपूर्वी या शहरांत चिंध्यांचे राघू, हत्ती वगैरे होऊ लागले होते, परंतु आलीकडे ते कोठे फारसे आढळत नाहींत. जयपूरच्या असल्या चित्रांचे देखील रंगित काम चांगलें असतें.


प्रकरण २ रें.
नकसकाम.

 या देशांतील बरेंंच काम या सदराखालीं येईल . “डेकोरेटिव्ह आर्ट " म्हणजे चैनीचे नक्षीदार पदार्थ तयार करण्यास लागणारें कौशल्य. अशा रींतींने तयार केलेल्या पदार्थास आम्ही नकसकाम असे ह्मणतों.
 या प्रकारच्या सर्व कामांबद्दल आमचे लोकांस एक मोठी महत्वाची गोष्ट सांगणे अवश्य आहे. ती ही कींं, अशा प्रकारचें काम तयार करते वेळींं तयार झालेला माल कोणत्या लोकांत खपणारा आहे याचेंं धोरण पक्कें लक्षांत ठेवलें पाहिजे. ज्या लोकांचे हाती पैसा खेळत असेल, त्या लोकांची आवडनावड कारागिरांचे लक्षात येईल, तर त्यांच्या मालाचे पैसे ताबडतोब उभे राहण्यास काडी इतकी अडचण पडत नाहीं. लोकांच्या आवड नावडीचा कल जिकडे असेल तिकडे कारागिराच्या कसबाने ओढ घेतली नाहीं, तर दोन पैसे मिळून कारागीर लोकांची स्थिति सुधारण्याची बिलकुल आशा नाही. लोकांचे मनाचा कल ज्या कारागिरांस चांगला समजेल त्यांस नवा नवा व तऱ्हेतऱ्हेचा माल उत्पन्न करून आपल्या धंद्यास नेहेमी तेजी राखतां येते व आपल्या कर्तबगारीनें तो लोकांस एका तऱ्हेवरून दुसऱ्या तऱ्हेवर, दुसरीवरून तिसरीवर सारखा झुलवीत ठेवितो.

शिल्पकलेसंबंधीं नकसकाम व नमुने.

 शिल्पकलेच्या संबंधाने लागणारें नकशीचे काम आपल्या देशांत कमजास्त मानानें घरोघरीं आहे. परंतु तें करण्याकरितां प्रथमतः नमुने तयार करून ठेवण्याची चाल विलायतेहून आपल्याकडें आली आहे. घर बांधण्याला लागण्यापूर्वी त्याचा नकाशा तयार करविण्याची रीत आम्हांमध्ये पूर्वी नव्हती, ती आलीकडे पडूं लागली आहे. या रीतीस अनुसरून कामावर आम्ही 'मेस्त्री' नेमूं लागलों आहों. आम्हीं ज्या लोकांस हल्ली मेस्त्री ह्मणतो, ते इंग्रजी इंजिनियर लोकांच्या हाताखाली किंवा इंग्रजी रीतीप्रमाणे शिकलेल्या आमच्या लोकांच्या हाताखालीं काम केलेले असतात, त्यामुळेंं त्यांस इंग्रजी तऱ्हेची नक्षी करण्याचें वळण सहजी लागलेलें असते. हेच लोक किंवा यांच्या संसर्गानें दूषित झालेले लोक आमची घरें बांधीत असतात, त्यामुळें आमच्या घरावर इंग्रजी नक्षी व देशी नक्षी या दोहींचें कडबोळें झालेलें दृष्टीस पडतें. ही सळ भेसळ करण्याची खोड कोठपर्यंत पोंचली आहे हे खालींल मजदार चुटक्यावरून सहज समजेल.

 दोन वर्षांपूर्वीं सरकारी कामानिमित्त आह्मीं अमदाबाद शहरी गेलो होतो त्या वेळेला तेथील एका नवीन घराचा कारखाना पाहण्याकरितां गेलो. त्या घरास लागणाऱ्या तुळयांस नक्षीचे खोदीव काम कांहीं सुतार करीत होते. ही नक्षी एका ब्रान्डीच्या बाटलीवरचा छाप पुढें ठेवून त्याप्रमाणे हुबेहुब काढलेली होती. ती पाहून पोटांत खवळून आलेंं. व तेथींल मेस्त्र्यास आह्मीं सहज प्रश्न केला कीं, "आपली जुन्या तऱ्हेची नक्षी टाकून असली तुम्ही कां बरें घेतां ?" तेव्हां तो मोठ्या डौलानें ह्मणाला " मग आमची अक्कल ती काय ? आम्हीं ही नवीन नक्षी काढली आहे." हें ऐकल्यावर आम्हीं शांतपणे त्याला सांगितले, "शेटजी, ही नवीन नक्षी कांहीं नवी नाहीं, ती बरान्डीच्या बाटलीवरून येथें आली आहे.” हे ऐकतांच मेस्त्रीबोवाचें तोंड खरकन उतरलें. व पुढें ते बोलेनासे झालेंं. असल्या प्रकारचा नवीनपणा दाखवून आमच्या घरांचा खराबा न करतां आमचे मेस्त्रीलोक पूर्वीच्याच नमुन्यांकडे विशेष लक्ष देतील तर फार बरें होईल. मेहेरबान ग्रोस साहेब असें ह्मणतात कीं, "हिंदुस्थानांतील शिल्पकला लयास जाण्यास याच देशांतील श्रीमंत लोक कारण आहेत. ज्या लोकांचें साहेबलोकांशी दळणवळण आहे ते जुन्या तऱ्हेच्या घरांत राहण्यास कंटाळून नवी घरे बांधण्याकरितां हजारों रुपये खर्च करितात. आणि तें काम इंजिनियर कालेजमध्ये शिकलेल्या लोकांकडेस सोंपवितात इतकेंच नाही तर एखादें सरकारी हपीस किंवा आसपासची एखादी लष्करांतील "बराख" त्यांस दाखवून एकसाहा हुकूम बजावितात की, आम्हांस बांधविणे आहे तो राजमहाल असाच उठला पाहिजे." मेजर म्यांट म्हणून मुंबईत एक मोठे कामदार होते. त्यांनी बडोदें येथील नवीन सरकारवाडा व हायस्कूल वगैरे इमारतीचे 'प्ल्यान' काढले. हे साहेब हिंदुस्थानांतील जुन्या नक्षीकडे फारच लक्ष देत. आपल्या हाताखालील मेस्त्री लोकांस देशी नक्षीच काढतां येण्याकरितां त्यांनी पुष्कळ ठिकाणी फिरून जुन्या इमारतीवरील नक्षीचे नमुने काढून ठेविले आहेत. त्यांतील कांहीं मुंबईतील चित्रशाळेत पाहण्यांत येतात. मुंबईतील मेजर म्यॉन्ट प्रमाणें मद्रासेस मेहेरबान चिझोल्म साहेब आमच्या शिल्पकलेचे पूर्ण भोक्ते आहेत. हल्लीं बडोदें येथील दरबारी कामावर ते मुख्य आहेत. भावनगरास मेहेरबान प्रॉक्टर सिम या नांवाचे इंजिनियर आहेत. तेही आमच्या शिल्प कलेस असाच मान देतात. मुंबईतील चित्र शाळेवरील मुख्याधिकारी मेहेरबान ग्रिफिथूस साहेब यांच्या हातून 'प्ल्यान' तयार करून घेऊन सिम साहेबाने भावनगरच्या ठाकूर साहेबांकरितां छत्री या नांवाची इमारत बांधविली आहे. या इमारती करितां तयार करविलेंले संगमरवरी दगडांवरील कांहीं खोदीव काम कलकत्ता येथील प्रदर्शनांत सन १८८३ सालीं पाठविलें होतें. या कामाबद्दल सदरील प्रदर्शन कमेटीकडून चांदीचा बिल्ला देण्यात आला होता. परदेशस्थ लोक अशा रीतीने आमच्या देशांतींल शिल्पकलेविषयी काळजी घेत असतां, आमी बराकी सारख्या भिकार इमारतींचे अनुकरण करावें व आमच्या देशांतील एका उत्तम प्रकारच्या कौशल्याची आपल्याच हातानें नासाडी करावी या परता मूर्खपणा दुसरा कोठेंं असेल काय ? घरे बांधण्यास लागणाऱ्या दगडावरील खोदीव काम राजपुतान्यांत फार चांगलें होतें. जयपूर येथील डाक्तर हेन्ले असें ह्मणतात कीं "दगडावरील कोरींव काम राजपुतान्यांतच चांगले होते. व त्यांत जयपूर येथील इन्जिनियर कर्नल जेकब यांच्या नजरेखालीं तें तर फार सुरेख होतें. या शहरीं आलबर्ट हाल या नांवाच्या एका मोठ्या इमारतीचें काम आतां संपत आलेंआहे. या इमारतीस लागणारें नकस काम काढण्याकरितां जेकब साहेबांनी कांहीं कारागीर लोक दिल्ली, फत्तेपूर, शिक्री व इतर प्रसिद्ध शहरीं पाठवून तेथील नकस कामाचे नमुने आणविले, व तें पुढें ठेऊन त्यांजवरून मूळच्या नक्षीची नकल न करितां, तशाच धरतीचे नवीन नमुने तयार करविलें. ही नवीन नक्षी फारच सुबक झाली आहे. अशा रीतीने युरोपियन कामगारांच्या नजरेखालीं शिकून तयार झाल्यामुळें राजपुतान्यांतील कारागीर आपल्या धंद्यांत इतके निपूण झाले आहेत की, त्यांचा हात धरण्याची पृथ्वीवरील कोणत्याही देशांतील पहिल्या प्रतीच्या कारागिरांची सुद्धां छाती होणार नाही. मात्र त्यांस मनुष्यें, पांखरें, व जनावरें यांची चित्रें काढण्यास सांगतां कामानये" राजपुतान्यांत करवली गांवीं जुन्या नक्षीचे नमने दोन रुपयांपासून पुढें विकत मिळतात. नेपाळांतही चित्रकारलोक असलें काम करतात. आग्ऱ्यास काही लोक ताजमहालाचे व इतर जुन्या इमारतीचे लहान लहान नमुने करून विकतात. लखनौ आणि मिरझापर येथेंही असल्या प्रकारचे दगडाचे नमुने विकत मिळतात. बंगाल्यासारख्या शुष्क प्रांतांत सुद्धां, म्हणजे जेथें दगडी काम आफ्रिकेंतील साहारा येथील मैदानांत सांपडणाऱ्या झऱ्या सारखे दुर्मिळ आहे, तेथें सुद्धां सासेरम या गांवीं असलेल्या शीरशाहाच्या मशीदीचे नमुने विकत मिळतात. पंजाबांत नभा संस्थानांत व इतर पुष्कळ ठिकाणीं असले नमुने तयार करून साहेबलोकांस विकून त्यांजवर पैसा मिळविणारे पुष्कळ लोक आहेत. आमच्या मुंबई इलाख्यांत हें काम फारसें कोणीं करीत नाही. ठाणे जिल्ह्यांत कल्याण तालुक्यांत असलेलें अंबरनाथ येथील देऊळ, कानेरी, वेरूळ, व घारापुरी येथील लेणीं, पुण्यांतील काही देवळें, नाशीक येथील देवळेंं व वाडे, अमदाबादेंंतील मशीदी व मनोरे, यांचे दगडी किंवा लांकडी नमुने करून विकण्याचा कोणीं धंदा काढील तर त्यास पैसा मिळेल यांत काही शंका नाही. जयपूर येथे कोणताही वाडा बांधणेंं झालेंं तर त्याचा मातीचा नमुना अगोदर करीत असत. तोच आलीकडे प्ल्यास्टर आफ प्यारीसचा करूं लागले आहेत. चांगल्या चांगल्या इमारतींचे पितळेचे लहान लहान नमुने करून विकतात. हा धंदा पुण्यास कोणी काढील तर बरें होईल.

शिल्प कलेसंबंधीं चित्ररेखन.

 या संबंधाची कांहीं माहिती मागें आलीच आहे. घरावर चित्रें काढण्याचें
   काम गवंडीलोक व चितारीलोक करितात. ह्या नक्षींत वेलबुट्टी असून कधीं कधीं प्राण्यांची चित्रें असतात. उत्तर व पश्चिम हिंदुस्थानांत अशा तऱ्हेनें रंगविलेले दिवाणखाने पुष्कळ दृष्टीस पडतात. बंगाल्यांत असलें काम फारच क्वचित आढळतें. दिल्ली, अमृतसर, लाहारे, विजापूर, इत्यादि ठिकाणीं भिंतीवर काढिलेली मुसलमानी तऱ्हेची चित्रें पुष्कळ आढळतात. उत्तर हिंदुस्थानांतील झाडांचें लांकडी कामही रंगविलेले असते. लांकडावर कापड किंवा तागाचे धागे पसरून त्याजवर सरस व सफेता चढवितात, व त्याजवर कथिलाचें पातळ पान म्हणजे बेगड चिकटवितात. या बेगडीवर पाण्यात मिसळलेल्या रंगांनी चित्रें काढून त्यांजवर रोगणाचा हात चढवितात. रोगणाचा रंग पिवळा आहे, त्यामुळें तेंं सुकलें म्हणजे पांढऱ्या बेगडीवर सोन्यासारखें चमकतें, व त्याच्या जवळील पारदर्शक निळे व इतर रंग धातूच्या आंगच्या किरणपरावर्तनशक्तीमुळे लखलखतात. अशा रीतीनें रंगविलेले दरवाजे व छतें फारच सुरेख दिसतात. अलीकडे विलायतेहन येऊं लागणाऱ्या रंगांतील मुख्य घटकावयव अळशीचें तेल हेंं आपल्या देशांत उत्पन्न होते असूनही त्याचा उपयोग आपल्यास माहित नव्हता.

 " जयपूर येथे सांदल्याचे काम फारच चांगले होते. ठिकठिकाणी पांढऱ्या किंवा तांबड्या सांदल्याची चित्रें काढून रंगविलेल्या जमिनी दृष्टीस पडतात. दिवाणखान्यांतील भिंतीचा दोन तीन फूट उंचीचा खालचा भाग अशाच तऱ्हेनें सुशोभित केलेला असतो, व त्याजवर अनेक तऱ्हेची वेलबुट्टी असते उष्णकटिबंधांत बांधलेल्या घरांस शोभा आणून तीं थंडही ठेवण्याचें काम अन्य रीतीने होण्याचे कठीण. या भिंतीवरील नक्षीची चित्रं कधी कधी फारच सुरेख असतात. आपल्या रहात्या घराच्या भिंती आंतून व बाहन रंगवून त्यांजवर हत्ती, उंट, घोडे, पायदळ वगैरे लष्करी चित्रें किंवा पुराण-प्रसिद्ध पुरुषांची चित्रें काढून त्यांस सुशोभित करण्याची जयपूर या राजधानींत व राजपुताना प्रांतांतील इतर गांवीं सर्वसाधारण चाल आहे. या देशांतील चित्रकारांस शिकवून तयार करण्याच्या ह्या अशा प्रकारच्या शाळाच घरोघरीं घातल्या आहेत असें म्हटलें तरी चालेल.” [ डाक्टर हेंडले. ]

 अलवार प्रांती घरांच्या भिंतीवर रंगारंगाची चित्रें काढून त्यांजवर रंगीबेरंगी कांचेचे तुकडे चिकटवून व सोनरी वर्ख चढवून त्यांस फारच शोभा आणलेली असते. येवलें येथें मामलेदार कचेरीजवळ एक मशीद आहे; या मशिदीच्या भिंतींवर कांचेचे तुकडे चिकटवून मजेदार नक्षी केलेली आहे. म्हैसूर प्रांतावर मुसलमान लोकांची सत्ता होती त्या वेळी तेथील घरांवर "सांदल्याची" नक्षी करून तिजमध्यें अनेक तऱ्हेचे रंग भरण्याची व सोनेरी वर्ख चिकटविण्याची चाल असे. म्हैसूर येथील राजवाड्यांत असल्या तऱ्हेंचे काम अजून दृष्टीस पडते. पुणें, येवलें, बडोदें, व इतर कांहीं गांवीं भिंतीवर चित्रें काढून त्यांजवर रोगण चढविण्याची चाल अझून आहे. काहीं काहीं ठिकाणी चुना, अभ्रकाची पूड आणि अळशीचें तेल एकत्र घोटून त्यानें भिंती रंगविलेल्या दृष्टीस पडतात. हा रंग संगजिऱ्यासारखा दिसतो. परंतु तो आपल्या देशांत पूर्वीपासून लोक तयार करीत आले, किंवा अलीकडेसच तयार होऊं लागला याची खात्रीलायक माहिती नाहीं.

 लांकडावरील खोदीव कामाची नक्षी हिरव्या, तांबड्या, पिवळ्या किंवा निळ्या रंगांनी चित्रून टाकून आपल्या घरांस शोभा आणण्याची गुजराथी व मारवाडी लोकांत चाल आहे; परंतु अळशीच्या तेलाचा रंग पूर्वी आपल्या देशांत होत नसे, यामुळे ती चाल अर्वाचीन काळींच प्रचारांत आली असावी असें वाटतें. नेपाळदेशांत घरें रंगविण्याची चाल आहे; परंतु तिकडेसुद्धा विलायती रंगांची रेलचेल होऊन असलें सर्व काम बेताल होऊन गेलें आहे.

शिल्पकलेत लागणारें लांकडावरील खोदींव काम.

 बंगाल प्रांत खेरीज करून इतर सर्व प्रांतांत लांकडावरील खोदींव काम जिकडे तिकडे दृष्टीस पडतें. सुरतेस, अमदाबादेस, व अजमिरास असली खोदींव कामें केलेलीं घरें इतकी आहेत कीं, त्या शहरांतून चालतांना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनीं खोदींव कामाशिवाय कांहींंच दिसत नाहीं. साहारणपूर, अल्लीगड, बडोदें, फिरक्काबाद, मैनपुंरी, लखनौ, कानपूर, मथुरा, आग्रा, भावनगर, सुरत, जुनागड, व कच्छ ह्या सर्व ठिकाणांहून लांकडाचे खोदींव नमुने लंदन येथील प्रदर्शनास सन १८८६ सालींं पाठविले होते. सुरत, बरेली, अजमगड व बुलनशहर या गांवीं घरें बांधण्यास उपयोगी पडणारें लांकडावरील खोदींव काम पुष्कळ तयार होतें. पंजाबांत, शहापूर जिल्ह्यांतील भेरा, गुरुदासपूर, बुलढाणा, अमृतसर, जंगजिल्ह्यांत चिनिअट, झेलम, रावळपिंडी, हिस्सार, लाहोर व सियालकोट ह्या सर्व गांवीं लांकडावरील खोदींव काम तयार होतें इतकेंच नाहीं, तर खोदींंव काम करणारे सुतार ज्यांत नाहीत असा गांव सुद्धा मिळणें कठीण. लंडनांतील सन १८८६ साली झालेल्या प्रदर्शनांत "हिंदुस्थानांतील राजवाडा" म्हणून एक लहानसें घर बांधलें होतें. तें काम करणारे सुतार भेरा या गांवचे होते, व हल्लींही त्याच गांवचे दोन असामी ग्लासगो येथील प्रदर्शनांत काम करीत आहेत. हे पंजाबी लोक देवदाराच्या लांकडावर काम करितात, व त्यांनी केलेली नक्षी एका चौकटींत आडव्या उभ्या चिपा बसवून केलेली जाळीदार अशी असते, त्यामुळें त्यांचें काम थोड्या किंमतींत मिळतें. मेहेरबान किपलिंग साहेब यांचे असें ह्मणणे आहे की, सिमला येथे असणाऱ्या युरोपियन लोकांसाठी काम करणाऱ्या कांहीं सुतारांखेरीज पंजाबांतील बहुतेक सर्व सुतार जाळीचंच काम जास्त करितात. घराच्या दरवाजांवर व खिडक्यांवर कधी कधी खोदीव काम दृष्टीस पडते; परंतु तें बहुतकरून परक्या गांवांहून तयार करून आणलेलें असतें. पंजाबांतील नक्षी मुसलमानी धरतीची आहे. तींत जाळ्या व पिंजरे हेच पुष्कळ असतात. दिल्ली, लाहोर, अमृतसर व बयला, या गांवांतील नव्या घरांपेक्षा जुन्या घरांच्या दरवाजावरील नक्षी चांगली आहे. तथापि त्या गांवीं हल्लींही खोदीव काम तयार होत असतेंं. पंजांबांतील सुतारांची मुलें लहानपणापासून हेंच काम करण्यास शिकतात. त्यामुळें कारागीर मिळण्याची हांकाहांक न पडतां कामही थोड्या पैशांत होतें. अलीकडे असल्या कामांस गिऱ्हाइकी जास्ती चालल्यामुळें भाव काही अंशी चढला आहे.”

 मुंबई इलाख्यांतील खोदीव कामाचा उत्तम नमुना बडोदे येथून लंडनप्रदर्शनांत गेला होता. तीन पुरुषांच्या वेंगेंत मावेल येवढा सुमारे ४० फूट उंचीचा जाड खांब खोदून त्याजवर देवळाप्रमाणें, देव्हाऱ्याप्रमाणें, किंवा मखराप्रमाणें खोदींव कामाचे लहान लहान मनोरे करून त्यांत खबुतरांस बसण्यास जागा केली होती. या खबुतरखान्याच्या चार बाजूंनी सुमारे १५ फूट उंचीचे तसेच नक्षीदार चार लहान खबुतर खाने लाविले होते. या प्रदर्शनांत काम करीत असतांना लंडन शहरीं छापून निघत असलेल्या "जर्नल आफ् इंडियन आर्ट " नांवाच्या चित्रयुक्त त्रैमासिक पुस्तकांत आम्ही कांहीं मजकूर छापविला होता, त्यांत असें म्हटलें होते कीं,-शिल्पकलेसंबंधीं लांकडावरील खोदींव कामाचा विचार करीत असतां निदान पश्चिमहिंदुस्थानाच्यासंबंधाने तरी हा धंदा गुजराथी लोकांचाच आहे अशी आमची खातरी होते. या जैन किंवा वैष्णव धर्माच्या गुजराथ्यांचे पूर्वज बौद्ध धर्मानुयायी होते, त्यावरून त्या धर्माच्या लेण्यांत दृष्टीस पडत असलेलें दगडावरील खोदींव काम करणाऱ्या प्राचीन कारागिरांचे हे वंशज होत; तेव्हां या प्राचीन काळच्या काम करणारांनी उपयोगांत आणलेल्या, फोडण्यास कठीण अशा दगडांच्या बदला अर्वाचीन काळीं सहज खोदतां येणाऱ्या लांकडाचा उपयोग होऊं लागण्यास मुसलमान सत्ताधीश कारण झाले असावेत. सोन्याच्या तारेच्या बदला कलाबतूचें काम करणें, सोन्याच्या वर्षाच्या ठिकाणीं बेगडीचें काम करणें व स्फटिकाच्या ठिकाणीं कांचेचा उपयोग करून थोड्या किंमतींत विशेष भपका दाखविणे, ही तऱ्हा मुसलमानी आहे; त्यांतलाच हा एक प्रकार असावा. कलकत्ता येथील प्रदर्शनांत ठेवण्याकरितां सन १८८३ साली सर रिचर्ड टेंपल यांचे चिरंजीव क्यापटन् टेंपल यांनीं गायकवाडी राज्यांतील दभोई या गांवांत असलेल्या एका अतिप्राचीन मानलेल्या घराचा सज्जासुद्धां दरवाजा पाठविला होता. या सज्जावर मुसलमानी तऱ्हेचीं सुरूची झाडें खोदलेलीं होतीं. दभोई या गांवीं अजूनही खोदींव काम करणारे कुशल सुतार पुष्कळ आहेत, व गायकवाडीत वासु, सोजित्रा, पेटलाद, पट्टण, सिधपूर, बडनगर, आणि बडोदा, ह्या सर्व शहरीं लांकडावरील नकस काम जिकडे तिकडे दृष्टीस पडतें. अमदाबाद व सूरत हीं दोनही शहरें असल्या कामाबद्दल प्रसिद्ध असून गुजराथेंतच आहेत. पाश्विमात्य देशांशीं आमचें दळणवळण होऊं लागल्यापासून मुंबईत तयार होत असलेलें नक्षीदार ‘फरनिचर' खोदणारे लोक सुद्धां गुजराथीच आहेत. हल्लीं बडोदें येथे नवीन तयार होत असलेल्या राजवाड्यांत या गुजराथी सुतारांच्या हस्तकौशल्याची व कर्तबगारीची कमाल होऊन गेली आहे. मद्रास इलाख्यांतही घरें बांधण्याचे कामीं लांकडावर केलेल्या खोदींव कामाचा उपयोग करितात. सन १८८६ साली विलायतेस प्रदर्शन झाले, त्यांत मद्रासेहून एका घराच्या सज्जाचें काम तयार होऊन गेलें होतें. निंबाऱ्याच्या लांकडाचा एक कोरींव दरवाजाही मद्रास सरकारानें पाठविला होता.

 याचप्रमाणे नागपुरासही काम होतें. नागपूर शहरीं मराठे सरदारांची मोठेमोठालीं घरें आहेत, त्यांजवरील लांकडाचे कोरीव काम पाहण्यासारखें आहे. मध्यप्रांतांत कौशल्याचीं कामें फारच थोडीं होतात, तथापि तेथें नक्षीदार लांकडी कामाची शहरोशहरीं व गांवोगांवी मोठी रेलचेल आहे. सिकार, फत्तेपूर, लखमनगड, झुंझून, चिरावा, नवलगड, व सिंघाणा इत्यादि जयपूर संस्थानांतील गांवी लांकडाचें ठळक ठळक कोरींव काम पुष्कळ ठिकाणीं होते, "कलोनियल व इंडिअन" नांवाच्या लंडन शहरांतील मोठ्या प्रदर्शनांत जयपूरच्या महाराजांनी कोरींव लांकडी सामान पुष्कळ पाठविलें होते. या संस्थानांतील जैन लोक आपल्या देवळांवर लांकडाचे कोरींव काम पुष्कळ करवितात.

 बिकानेरसंस्थानांत लांकडाचे कोरींव दरवाजे व कोरींव चौकटी ८ पासून ११० रुपये किमतीपर्यंत विकत मिळतात.

 इंदूरशहरीं लांकडावरील नक्षी करणाऱ्या सुतारास सुमारें दीड रुपया रोज मिळतो.

 म्हैसूरप्रांती असलें काम करणारास बारा आणे रोजमुरा मिळतो.

 काश्मीर देशांत देवदाराच्या लांकडाचे जाळीचें काम विकत मिळतें; त्याची किंमत दर चौरस वारास एक रुपयाप्रमाणें आहे.

 नेपाळदेशांत घरांवर नक्षी कोरून खांब, दरवाजे, मेहेरपी, खिडक्या वगैरे सुशोभित करण्याची चाल सर्वत्र आहे. देवांचीं, राक्षसांचीं, चित्रविचित्र कल्पित जनावरांचीं, सर्पाची व इतर प्राण्यांची चित्रें कोरण्याची तिकडे वहिवाट आहे. असल्या कामास खर्च फार लागतो, त्यामुळें अलीकडे त्यास उतरती कळा लागली आहे.

 ब्रह्मदेश तर लांकडावरील कोरींव कामाचें माहेरघरच आहे असें ह्मटलें तरी चालेल. त्या देशांतील बौद्ध धर्माच्या मंदिरांत कोरीव कामाची भरपूर नक्षी असते. मेहेरबान टिलीसाहेब ह्मणतात कीं, ब्रह्मदेशांतील लांकडावरील कोरींव कामाचे नकाशे काढण्याचें देखील फार कठीण आहे. मग त्याचें पुस्तकांतून नुस्तें वर्णन करणें किती दुर्घट आहे हें सांगावयासच नको. साहेब लोकांकरितां नक्षीचे ‘फरनिचर' करून विकावें या हेतूनें रंगूनशहरीं 'इन्स्टिटयूट आफ् इंडस्ट्रियल आर्ट' या नांवाची एक मंडळी स्थापित झाली आहे. ब्रह्मदेशांत लांकडावरील कोरींव कामाच्या एका चौरस फुटीस बारा आण्यांपासून वीस रुपयांपर्यंत किंमत पडते, तथापि पांच रुपयांस साधारण चांगल्यापैकी काम मिळते. तेथें सुतारास रोजमुरा दीडपासून दोन रुपयेपर्यंत पडतो.

शिल्पकामांत लागणारें दगडावरील कोरींव काम.

 उत्तरहिंदुस्थान व राजपुताना या दोन प्रांतांत दगडाचें कोरींव काम पुष्कळ आढळतें. त्यांतही राजपुतान्यांत इमारती लांकूड दुर्मिळ असून दगड पुष्कळ असल्यामुळें जिकडे तिकडे असल्याच कामाचा फैलावा जास्ती आहे. हा सर्व प्रदेश कोंरीव दगडांनीं बांधलेल्या अशा सुंदर व सुशोभित इमारतींनीं व्याप्त झाला आहे. चितूर शहरांतील मोडकळीस आलेलीं घरें, अजमीर शहरांतील रूपांतर पावून पैगंबराच्या स्तवनाकरितां मशीदवत् झालेलीं सुशोभित देवालयें, व दिल्ली शहरांतील कुतुब मिनार नांवाचा सर्वप्रसिद्ध मनोरा, या इमारती राजपुताना प्रांतांतील पाथरवटांच्या कौशल्याची प्रत्यक्ष साक्ष देत आहेत. मेहेरबान होपसाहेबांनी एका ठिकाणीं असें लिहून ठेविलें आहे कीं, "मुसलमानलोक हिंदुस्थानांत पहिल्या प्रथम आले त्या वेळीं त्यांच्या आढळण्यांत असें आलें असावें कीं, कौशल्याच्या संबंधानें एतद्वेशीय लोक आपली अक्कल लढविण्याच्या कामांत त्यांच्या बरोबरीनें हुषार असून हस्तकौशल्यांत त्यांच्यापेक्षांही हुषार होते इतकेंच नाहीं; सुधारणेंत त्यांचें पाऊल तर शेंकडों वर्षे बरेच पुढे असल्यामुळें त्यांच्या अंगीं उत्तम प्रकारचें मार्मिकत्वही आलेलें आहे." या यवनांच्या कारकीर्दीतील मनोऱ्यांसारख्या ठळक ठळळ कामाची व टोंकदार मेहरापींची नक्षी या देशांत प्रथम सुरू झाली, व एतद्देशीय लोकांचे अनुकरण करून दिवाणखान्यांत दुतर्फा खांब लावण्याची, बारीक जाळीदार काम करण्याची व सुंदर नक्षी करण्याची त्यांनीं सुरवात केली. प्राचीनकाळच्या मुसलमान तक्ताधिपतींनीं आपापल्या राजधानीच्या शहरांतील सुंदर इमारतींवर नक्षी खोदविण्यास राजपुतानाप्रांतांतील हिंदू कारागीर कामास ठेविले होते. हे हिंदूलोक मुसलमानांच्या हाताखाली काम करूं लागल्यामुळें त्यांच्या नक्षींत मुसलमानी वेलबुट्टीची प्रवृत्ति झाली, व आपल्या प्रांतीं परत गेल्यावर तेथील कामांत या हिंदू कारागीर लोकांनीं मुसलमानी नक्षीचा फैलाव केला. आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल, मशिदी, छत्र्या, व राजमहाल या इमारतीकडे पाहिले ह्मणजे उत्तरहिंदुस्थानांत दगडावरील कोरींव काम परिपूर्ण दशेस येऊन पोहोंचलें होतें असे ह्मटल्यावांचून राहवतच नाहीं. ताजमहालास लागलेला पांढराशुभ्र संगमरवरी दगड जोधपूरच्या राज्यांत सांबर नांवाच्या क्षारसरोवराजवळ असलेल्या खाणींतून काढलेला होता. फत्तेपुरशिकी येथील अकबरबादशहाच्या राजमहालास लागलेला तांबडा दगड भरतपूर येथील खाणींतून काढलेला होता. तसेंच ह्या इमारतींस लागलेला रंगीबेरंगी संगमरवरी दगड जयपूर व अजमीर येथें सांपडला. चुनखडीच्या जातीचे इतर रंगीत दगड दसलमीर येथें सांपडले. मुंबई-इलाख्यांत कल्याण गांवाजवळ असलेलें अंबरनाथाचे देऊळ फार जुनें आहे. इतरं ठिकाणी कोरींव दगडांची देवळें नाहीत असें नाहीं. परंतु ती नाशीक येथील नारोशंकरच्या देवळाप्रमाणें अर्वाचीन काळचींच आहेत असे म्हटलें तरी चालेल. हेमाडपंती देवळें या नांवाने प्रसिद्ध असलेल्या कांहीं जुनाट इमारती ठिकठिकाणीं दृष्टीस पडतात. परंतु त्यांजवर नक्षी फारच थोडकी असते. लंडन शहरांत सन १८८६ सालीं झालेल्या प्रदर्शनांत रेवाकांठासंस्थानांतून 'दगडीच्या दगडाची' एक कोरींव जाळीदार खिडकी पाठविण्यांत आली होती. तशीच भावनगर येथून संगमरवरी दगडाची एक फारच नामी जाळीदार मोठी थोरली दरवाजायेवढी खिडकी पाठविली होती. वायव्येकडील प्रांतांत आग्रा व मिर्जापूर येंथें दगडावरील नक्षीचें काम होतें. अडीच फूट चौरस दगड कोरून केलेल्या जाळीदार कामास आग्रयास १५।१६ रुपये पडतात. ताजमहाल येथील संगमरवरी दगडावरीलं जाळीकामासारखे त्याच दगडाचे जाळीदार नमुने तीस तीसपासून चाळीस चाळीस रुपयांपर्यंत मिळतात.

 या जाळीकामाबद्दल 'जर्नल आफ इंडियन आर्ट' नांवाच्या चित्रयक्त त्रैमासिक पुस्तकांत खालीं लिहिलेला मजकूर प्रसिद्ध झालेला आहे.

 "मोंगल बादशाहीच्या प्रतापशाली संवत्सरापासून ज्याचा उगम अशा संगमरवरी दगडावर व तांबड्या दगडावर केलेल्या जाळीकामाचें वर्णन येथें देणें अवश्य आहे. जाळीकाम झणजे भूमितिशास्त्राच्या आधाराप्रमाणे काढिलेल्या चित्रविचित्र आकाराची दगडाच्या पातळ शिळेवर आरपार कोरलेली नक्षी. या अप्रतिम जाळीकामाच्या खिडक्या व झरोके यांच्या योगानें उत्तराहिंदुस्थानांतील बाधक हवेपासून लोकांचें रक्षण होऊन त्यांस कांचेच्या तावदानांतून घरांत आलेल्या उजेडाप्रमाणें उजेडही प्राप्त होत आहे; इतकेंच नाही, तर प्राणिमात्रास अवश्य असलेली स्वच्छ हवाही त्यांस पुरेशी मिळते. ज्या दगडाच्या जाळ्या करितात, तो रत्नागिरी जिल्ह्यांतील “ दगडीचा दगड " या नावांने प्रसिद्ध असलेल्या पदार्थासारखा आहे. मात्र त्याचा रंग तांबूस असून तो काहींसा जास्ती टणक असतो. या दगडाविषयी अशी म्हण आहे की, 'तो कापण्यास लोण्यासारखा मऊ, व टिकण्यास चामड्यासारखा चिवट आहे.'

 राजपुतान्यांत या दगडावर जी नक्षी काढतात ती झोंकदार व सुरेख असते, व साहेब लोकांच्या दिवाणखान्यांत मांडण्याकरितां त्याच्या कोरींव थाळ्या, डबे इत्यादि सामान करितात. त्यांची इंग्रज लोकांस फार आवड आहे. मेहेरबान कॉनसाहेब यांचें असे म्हणणें आहे कीं, हा दगडांचा दगड घरावर नक्षीचें काम करण्याचे कामीं प्रचारांत येईल तर फार चांगलें होईल, व विलायतेस दिवाणखान्याच्या भिंतींस कागद चिकटविण्याकडे जितका पैसा खर्च होतो, त्यापेक्षां थोड्या खर्चात दगडीच्या दगडावरील नक्षींचे सुरेख काम सहज होऊं शकेल. बाबू त्रिलोकनाथ मूकरजींस हा दगड पसंत नाही. त्यांचें म्हणणें आहे कीं, तो दगड फारच भुसभुशीत आहे, त्यामुळें त्याची नक्षी फुटून जाऊन लवकरच विद्रूप दिसूं लागेल; परंतु कानडा जिल्ह्यांतील शिरसी गांवातील अनंत पी. नादिग नांवाच्या गृहस्थाने या दगडाच्या एका कोरींव फुलाच्या परडीस कांहीं मालमसाला लावून ती पुष्कळ टणक करून कलकत्त्यांतील प्रदर्शनांत पाठविली होती; व तेथें तिजवरून त्यांची वाहवा होऊन त्यांस हुशारीचा दाखला मिळाला होता. ही गोष्ट आमच्या बाबूसाहेबांच्या नजरेस आली नाहीं असें वाटतें. मेहेरबान कर्नल जेकब साहेब यांच्या नजरेखाली जयपूर मुक्कामीं दगडावरील जाळीचें काम पुष्कळ तयार होत आहे, या गोष्टीचा उल्लेख मागें आलाच आहे.

 भरतपूरसंस्थानांत रूपकत गांवीं असलेल्या 'जांभ्या ' दगडाच्या खाणींतून काढलेल्या एका प्रकारच्या दगडावर जाळीचें काम खोंदण्याची वहिवाट आहे.

 बिकानेर प्रांतीं एका चौरस फुटीस वीस रुपये या भावानें संगमरवरी दगडावर खोदलेलें जाळीकाम विकत मिळतें. हेच काम 'जांभ्या ' दगडावर तयार केलेलें असलें तर त्यास दहाच रुपये पडतात. चुरू, सरदार शहर, व बिकानेर या गांवीं दगडाचे कोरींव झरोके आयते तयार करून दोनशेंपासून हजार रुपयांपर्यंत विकण्याची चाल आहे.

 अलवार संस्थानांत पांढऱ्या रंगाच्या संगमरवरी दगडावर जाळीदार काम कसून तें काळ्या संगमरवरी दगडाच्या किंवा सागाच्या लांकडाच्या चौकटीत बसवितात. अलवार येथील राजवाड्यावरील कांहीं नक्षीचे नमुने लंडन येथील प्रदर्शनांत सन १८८६ सालीं गेले होते. ह्या अलवारसंस्थानांत एका जातीचा दुधासारखा पांढरा संगमरवरी दगड पुष्कळ सांपडतो.

 करवलीसंस्थानांतही 'जांभा ' दगड पुष्कळ सांपडत असून त्याजवर केलेलें जाळीकाम दोन पासून चार रुपये चौरस फूट या भावानें विकत मिळत.धोलपूर, बारी आणि श्री मथुरा या गांवींही असलें काम तयार होतें.
    ग्वाल्हेरीस दगडावरील खोदींव कामाचे सुरेख नमुने मिळत असतात. सन १८८३ सालीं कलकत्त्यास झालेल्या सर्वराष्ट्रीय प्रदर्शनांत ग्वाल्हेरीहून एक मोठा जंगी दरवाजा पाठविण्यांत आला होता. हाच दरवाजा कलकत्त्याहून पुढें लंडनशहरीं गेला. तो तयार करण्याच्या कामावर मेजर कीथ साहेबाची योजना झाली होती. साहेब महशूर ह्मणतात:--"हें दगडावरील काम आस्ट्रेलिया देशांत पुष्कळ खपेल अशी आमची समजूत आहे. ग्वाल्हेरीस चार आणे रोजावर पाथरवट मिळतो व तेंच काम करण्यास आस्ट्रेलिया देशांत रोज साडेचार रुपये द्यावे लागतात. किरिस्तावांच्या देवळांतून लागणारें 'व्यासपिठादि' कोरींव काम ग्वाल्हेरीस सहज करितां येईल. त्या देशांतील नवीन तयार जहालेल्या 'लॉ-कोर्टात' असलेली नक्षी व या ग्वाल्हेरच्या दरवाजाची नक्षी या दोहींची कोणी तुलना करील तर ग्वाल्हेरींचे काम पुष्कळ सरस आहे, असें त्याचे आढळण्यांत येईल. हा ग्वाल्हेरीचा दगड जसजसा जुना होत जाईल तसतसा हवेंमुळे जास्ती जास्ती कठिण व टिकाऊ होत जातो. शिंदेसरकारच्या या राजधानींत असलें दगडावरील काम करणारे सुमारें एक हजार लोक आहेत व त्यांस सुमारें पंधरापासून साठ रुपयांपर्यंत दरमहा मिळतो. धोलपूर व ग्वाल्हेर या दोन शहरांचे दरम्यान असल्या दगडाच्या चार खाणी आहेत; व हल्लींचे महाराज नुकतेच मरण पावले आहेत, तेव्हां हा मुलुख बिटिश सरकारच्या ताब्यांतच राहणार आहे. अशा वेळीं व्यापारास उत्तेजन आणण्याकरितां कोणत्याही साहलती मिळवून घेण्यास अडचण पडणार नाहीं. या खाणींत कधीं कधीं चाळीस चाळीस फूट लांबीचे चिरे सांपडतात. या संस्थानांत दगड कोरण्याची विद्या प्राचीन काळापासून माहित आहे. परंतु प्राचीन काळाच्या इतर सर्व हुन्नरांप्रमाणे हाही हुन्नर अस्तास जाण्याची भीति आहे."

जयपूर येथील गिलाव्याचें काम.

 जयपूर येथें व इतर कांहीं ठिकाणीं भिंतींवर गिलाव्याचेंकाम करितात तेंही शिल्पशास्त्राच्या संबंधाचें आहे. त्या कामाचे संबंधाने मागील प्रकरणांत कांहीं वर्णन आहे. कधी कधी भिंतीवर व छतांवर गिलाव्याची नक्षी काढून तिजवर अभ्रकाचा रंग चढवितात, त्यामुळें त्यांस मखमालीसारखी तकतकी येते. मुसलमान लोकांचीं किंवा मुसलमानांचें अनुकरण करणाऱ्या लोकांची घरें, गिलाव्यात वेंल, फुलें, सुरुचीं झाडें व निरनिराळ्या आकाराचे लहान लहान कोनाडे वगैरे काढून सुशोभित केलेलीं असतात; या गिलाव्याच्या नक्षींत कधीं कधीं कांचेचे, आरशांचे, अथवा अभ्रकाचे तुकडे बसवितात. आणि त्यांच्यामागें तांब्याचीं, इतर धातूंची किंवा बेगडेचीं झिल दिलेली तवकटें बसवितात. अशा रीतींने तयार केलेलीं तवकटें अंगठीच्या कोंदणाप्रमाणें चकचकावीं हा त्याचा हेतु असतो. हे कांचेचे तुकडे वर्खानीं काढिलेल्या वेलांतून किंवा रंग भरून काढलेल्या झाडांच्या फांद्यांतून फुलांप्रमाणे बसविलेले असतात. कधीं कधीं कांचेचे तुकडे व लहान लहान तसबिरी एक सोडून एक अशा अंतरावर नुसत्या गिलाव्यांत लाविलेल्या असतात. ते कांचेचे तुकडे आंतून कधीं कधीं वाटीसारखे पोकळ असतात. व्हेनीस शहरामध्ये रंगारंगाच्या काचांचे तुकडे खिडक्यांतून बसवून जशीं चित्रें काढितात त्या धरतीवर जयपुरास धातूच्या पत्र्यावर किंवा “प्लास्टर" थरांवर आरपार भोंकें पाडून त्यांच्या मागें रगारंगाच्या कांचाचे तुकडे लावून मखराकरितां तयार केलेल्या कागदाच्या कातरलेल्या चित्राप्रमाणें चित्रें बनवितात.त्यानंतर पहिल्या पत्र्याप्रमाणें किंवा "प्लास्टर" च्या थराप्रमाणें दुसऱ्या एका पत्र्यास भोंकें पाडून तो त्या कांचेच्या मागें बसवितात, आणि नंतर अशी तयार केलेली खिडकी सिमेटाच्या योगानें चाेहाेंकडून बंद करितात. अशा तऱ्हेच्या खिडक्या तयार करण्याचा प्रकार प्राचीन काळापासून आपल्या देशांत चालू आहे असें म्हणतात.

 लांकडाचे लहान लहान तुकडे खोदून ते रंगवून तक्तपोशीवर बारिकसारिक चुकानी मारून त्यांचीच वेलबट्टी काढण्याचीही चाल आहे. पुणें येथील हिरा बागेतींल टाऊनहालाच्या माडीवरील तक्तपोशीस असली नक्षी आहे.

 अर्वाचीन काळीं मुंबई व लाहोर येथील चित्रशाळांतून अभ्यास केलेले विद्यार्थी “प्लास्टर ऑफ् प्यारिस " नांवाच्या एका पदार्थाचे सांचे तयार करून त्यांजवर नक्षीचे "फर्मे" उतरून ते घरें सुशोभित करण्याच्या कामाकडे वापरतात. या धंद्यावर पन्नासपासून दीडशें रुपयापर्यंत दरमहा कमविणार तीन चार असामी हल्लीं मुंबईत आहेत.

बंगाल प्रांतांतील 'चंदी' [चांदणी.? ] मंडप.

 विटांच्या भिंतींची घरें बांधण्याची सुरवात होण्यापूर्वी बंगाल प्रांतांत हरिकीर्तनाकरितां किंवा इतर कामाकरितां सभामंडपासारखे दिवाणखाने केलेले असत. हें काम ५० वर्षांपूर्वी तेथें पाहण्यांत येत असे. असले सभामंडप करण्याकडें पुष्कळ पैसा खर्च होई. बांबूच्या चिंभा घोटून घोटून इतक्या गुळगुळीत करीत असत कीं, त्या "डोळ्यांत घातल्या तर खुपूं नयेत. " या चिंभांची छतें करीत व खांब ताडाच्या झाडाचे करीत. हे खांबही असेच घोंटून घोटून गुळगुळीत करीत असें ह्मणतात. वर सांगितलेल्या बांबूच्या ताटीवर अभ्रकाचे तुकडे ठेवून त्याजवर 'नीलकंठ' नांवांच्या ( यास आपल्याकडे 'नवरंग' म्हणतात ) पक्षाची पिसें पसरून त्याच्यावर पेंढ टाकीत असत. या अभ्रकाच्या खालून पिसांचा रंग इतका सुंदर दिसे कीं, त्याजकडे लक्ष जाऊन ध्यान भजनाचा भंग होऊं नये ह्मणून खालून कापडाचें छत लावीत असत असें म्हणतात. अलीकडे विटांची घरें लोक बांधू लागले आहेत त्यामुळे बंगाल प्रांतांतील 'चंदी मंडपाचा' ऱ्हास होऊं लागला आहे.

नक्षीदार विटा व संदल्याचें काम.

 बंगाल्यांत पूर्वी विटांवर नक्षीचें काम करीत असत. असल्या विटांचें दिनापूर शहरीं कांतनगर नावाचें एक देऊळ आहे. याजवरील नक्षी ठळक असून विचित्र आहे. काहीं ठिकाणीं ती सुरेख आहे असें ह्मटलें तरी चालेल. चंद्रनगरासही असेंच एक देऊळ आहे परंतु त्याजवरील नक्षी इतकी चांगली नाहीं.
 संदल्याचें नक्षीदार काम डाका शहरांतील घरांवर जिकडे तिकडे दृष्टीस पडतें. या सुरेख कामाचे नमुने बाबू मोहीमचंद्र बसाक नांवाच्या एका गृहस्थानें मोठया श्रमानें मिळवून विलायतेंतील प्रदर्शनांत सन १८८६ साली पाठविले होते. हल्लीं असल्या कामास कोणी पुसत नाहीं. त्यामुळे हा धंदा बुडत चालला आहे. आपले प्रांतांत असें काम करणारा एक कारागिर विजापूर येथें आहे. त्याचे कामाचे नमुने मे. एबडन साहेब यांनीं येथील प्रदर्शना करितां पाठविले आहेत.
 रंगविलेले पदार्थः-मडकीं, बरण्या, लांकडाच्या पेट्या, देवहरे, वगैरे काहीं सामान पाण्यांत कालविलेल्या रंगाने रंगविण्याची चाल कोठें कोठें आहे.
 रंगविलेली मडकीं:-गौंरी हाराजवळ मांडण्याकरितां किंवा संक्रांतीच्या दिवशीं लागणारीं सुगडें आपल्या देशांत करण्याची चाल कोठें कोठें आहे. परंतु त्याजवर काढिलेल्या नक्षीस नक्षी ह्मणण्याची सुद्धां आह्मांला लाज वाटते. मडक्यावर नक्षी गयेस फार चांगली काढतात. बंगाल्यांत “बीलमाती" नांवाचा एक खनिज पदार्थ मिळतो तो पाण्यांत कालवून त्याची मडक्यांवर नक्षी काढून नंतर ती भट्टीत घालतात. अयोध्या प्रातांत सीतापूर शहरीं मडक्यांवर नक्षी काढतात ती फार सुरेख असते. नक्षीची जागा हिरवीगार असते व त्यावर निरनिराळ्या रंगाची फुलें काढलेलीं असतात तीं फारच सुरेख दिसतात.

 लांकडावर पाण्यांत कालविलेल्या रंगाने चित्रें काढून त्याजवर रोगण चढवितात त्या कामास पंजाबांत 'कमानगारी' नक्षी म्हणतात. कमान ह्मणजे धनुष्य, आणि प्राचीनकाळी असली नक्षी धनुष्यांवर काढण्याची प्रथम सुरुवात झाली म्हणून तिचें नांव 'कमानगारी' नक्षी असें पडलें असावें.या कामांत सोनेरीवर्खाचे वेल असतात. कधीं कधीं बेगडेची आणि केव्हां केव्हां घांसून चकचकीत केलेल्या कथिलाची नक्षी काढून त्याजवर रोगण चढवितात. त्यामुळें त्यांच्या अंगीं एका प्रकारची सोनेरी झाक मारते. अशा रीतीनें रंगविलेली धनुष्यें मुलतान प्रांती कोठें कोठें आढळतात. या कामाचे नवीन तऱ्हेचे पदार्थ ह्मणजे पलंगाचे खूर, थाळ्या, साहेब लोकांचे कपडे ठेवण्याच्या पेट्या वगैरे पदार्थ दिल्लीस तयार होतात. सुरतेस कांहीं जुन्या घरांच्या दरवाज्यांवर असली नक्षी काढलेली आढळते.

 कागदी काम--कागदाचे जाड डबे, पेट्या, कलमदानें कमळें, डब्या वगैरे पुष्कळ पदार्थ काश्मीरास तयार होतात. याजवर काढिलेली नक्षी इराण देशांतील नक्षीच्या धरतीवर असते. त्यामुळें हा हुन्नर त्याच देशांतून इकडे आला असावा असें म्हणतात. श्रीनगरगांवीं साहेब लोकांस विकण्याकरितां कागदाचे पुष्कळ नक्षीदार पदार्थ तयार करण्यांत येतात. त्याजवरील नक्षी काश्मिरी शाली वरील कैरीदार नक्षीसारखी असते. वायव्य प्रांतांत जानपूर, रामपूर, मंदावर, आणि मुजाफरनगर या गांवीं असलें काम होतें. पण कोणीं काश्मीरच्या मनुष्यानें तें या गांवीं तयार करण्याची सुरुवात केली असावी असें वाटतें. जानपूर गांवच्या कामांत गेल्या पांचचार वर्षांत पुष्कळ सुधारणा होत चालली आहे.

मातीचीं चित्रें.

मुंबईतील चित्रशाळेंतील असिस्टंट मास्तर मि. गोम्स, भावनगर येथील मेस्त्री वाला हिरा, व लाहोर येथील शिमोर पिन्टो याजविषयीं माहिती मागें दिलीच आहे. हे लोक मातींचे हुबेहुब पुतळे करितात.त्याचप्रमाणे कृष्णागर येथें जदूनाथ पाळ व त्याच्या घराण्यांतील आणखी एक दोन पुरुष हेंच काम करीत असतात. पुण्यांतील सखाराम सोनार व मारुती गुरव यांच्या हातीं चित्रें मोठी प्रसिद्ध आहेत. जदूनाथ पाळ यास इंडिया सरकारचा आश्रय मिळाल्यामुळे त्यानें कलकत्ता व लंडन प्रदर्शनाकरितां मिळून एकंदर तीनशें साडे तीनशें मोठाले पुतळे तयार केले त्यामुळें त्याचा हात इतका बसून गेला आहे कीं, मनुष्याचा चेहेरा एकदा पाहिल्याबरोबर तो हुबेहुब प्रतिमा उतरतो. कलकत्ता येथील चित्रशाळेवरील माजी मुख्याधिकारी यांचे असें म्हणणें असे की, कृष्णागर येथील चित्रकार आपण केलेल्या पुतळ्यास खरोखरीचे कपडे व केंस लावून त्याच्या पोटांत व हातापायांत पेंढा भरून ते आपल्या कामाचा बिघाड करितात. मुंबई येथील चित्रशाळेवरील मख्याधिकारी मेहेरबान ग्रिफिथ्स साहेब यांचे पुण्यातील चित्रांबद्दल असें म्हणणें आहे कीं, त्यांत नैसर्गिकपणा व एतद्वेशीय लोकांचें हुबेहूब स्वरूप हीं उत्तम प्रकाराने दर्शविलेली असतात. व पुण्याच्या चित्रांत खरोखरी कपडे घालण्याची चाल सर्वत्र प्रसिद्ध आहे. या दोन्हीही मुख्याधिकाऱ्यांची मतें कशीहीं असोत. केवळ मातीच्याच कामावर हस्तकौशल्य दाखवावयाचें असेल तर अंगावर कपडे वगैरे न घालतां नुसती मातीच वापरावी हें बरें. व अमक्या प्रांतांतील लोक कसे असतात, ते कपडे कोणत्या प्रकारचे वापरतात या गोष्टींचें ढळढळीत दिग्दर्शन करावयाचें असेल तर खरोखरीचे कपडे व केंस वापरणे हे चांगले. हे कपडे कातरून शिवण्यांत व डोक्यावरील केंसास वेणीचा किंवा बुचड्याचा आकार देण्यांतही पुष्कळ कौशल्य लागते. तसेंच लहान लहान झोंपडी करणे, कारागीर लोकांच्या हत्यारांचे नमुने करणें, मज़र लोकांच्या हातांत देण्याकरितां लागणाऱ्या टोपल्या वगैरे करणें, यांतही कुशलपणा लागतोच. बंगाल्यांत कृष्णागर शहरचे चित्रकार जातीचे कुंभार आहेत. पुण्यांत हा धंदा मूळ जिनगर लोक करीत असत. हल्लीं त्याचा कांहीं नेम नाहीं.अजूनही गणपतीच्या, गौरीच्या, हरितालिकांच्या, खंडोबाच्या वगैरे मूर्ति बहुतकरून जिनगरलोक करितात. बंगाल्यांत कुंभारलोक चित्रें करितात खरे परंतु तीं रंगविण्यास चिताऱ्याकडे पाठवितात व त्यानंतर बेगड वगैरे चिकटविण्याकरितां तींच चित्रें माळीलोकांकडे पाठवावीं लागतात. तसें पुण्यांत करीत नाहींत. आमचे जिनगर किंवा चितारीलोक 'अथ' पासून ' इति ' पर्यंत सगळें काम स्वतःच करितात. कलकत्यास दुर्गा ह्मणून एक मोठी विद्रूप देवी आहे. तिच्या गळ्यांतील माणसांची मुंडकीं, तिचे अक्राळविक्राळ स्तन पोटावर पडलेले, तिची तोंडाबाहेर आलेली, लांबलचक जीभ, व ती सुरापानामुळें बेफाम होऊन आपल्या प्रत्यक्ष पतीच्या उरावर पाय देऊन नाचत आहे, असल्या कंटाळवाण्या 'चामुंडे 'चें चित्र करून तिच्या पुढे नुसते अंडपंचे नेसलेले उघडेबोडके डोक्यावर केस वाढविलेले बंगाली लोक हातांत मोडके तोडके सुरे घऊन एखाद्या रोडक्या हल्याचे तुकडे तुकडे करीत आहेत, त्यामुळें सर्व जमीन रक्तानें लाल होऊन तिजकडे पाहणारांस किळस उत्पन्न झाल्यावांचून राहूंच नये. असला देखावा कलकत्त्याच्या, लंडनच्या व हल्लीं चालू असलेल्या ग्लास्गोच्या प्रदर्शनांत आमचेच बंगाली कामदार मोठ्या उत्सुकतेने पाठवीत असतात हें त्यांचें त्यांसच शोभो. याच चित्रांपासून थोड्या अंतरावर आमच्या पुण्यातील मारुती गुरवानें केलेल्या "पंक्ती-भोजना "चा देखावा कलकत्त्यास प्रदर्शनांत मांडिलेला होता. त्यांत गळ्यांत गोफ व कंठ्या घालून, जरीकांठी पितांबर नेसून, अंगावर काश्मीरी शाल घेऊन व फुल्यांच्या रंगीत पाटांवर आसनमांडी घालून बसलेले लोक व त्यांच्या पुढें सव्वा हात केळीच्या पानांवर आमच्या महाराष्ट्र प्रांतांतील सर्व पक्वान्नें वाढलेलीं व पानासमोर काढलेल्या सुंदर रांगोळ्या, पलीकडे कोणी भरजरी शालू, कोणी पैठणी, कोणी शेलारी नेसून हिऱ्या माणकांच्या दागिन्यांनीं लवलेल्या सुंदर स्त्रिया अप्सरेप्रमाणे चमकत आपल्या हातांतील रुप्याच्या ताटांतून एखादें सुबक पक्वान्न आग्रहानें वाढीत आहेत, व जेवणारे कोठें गौरवानें 'नको नको' ह्मणत दोन्ही हात पुढें करीत आहेत, कोठें एकच बोट दाखवून आतां आपल्या करितां तेवढेच जेमतेम घेतों असें दाखवीत आहेत, परंतु आपले डोळे त्या सुंदर चेहेऱ्याकडे लाऊन टकमक पाहत आहेत. असला देखावा पाहिला ह्मणजे बंगल्याकडील 'चामुंडा' देवीकडे बोट दाखवून मडम लोक आसपास असलेल्या हिंदुलोकांस विचारीत की ह्या दोनीही गोष्टी एकाच काळी एकाच देशांत कशा बरें संभवत असतील ? याचा जबाब देतांना आमचे देशबांधवांना बंगाली लोकांची थोडीशी निंदा करणे भाग पडे. व बंगाल्यांतील कांहीं लोक अगदींच रानटी आहेत असें म्हणावें लागे.

 कृष्णागर येथील कुंभार लोक पुण्यांतील जिनगरांप्रमाणे पूर्वी देवादिकांचीं चित्रें काढून विकीत असत परंतु डाक्तर आर्चर नांवाच्या साहेबानीं या देशातील लोकांचीं चित्रें करून विकण्याचें त्यांस सुचविलें तेव्हांपासून या लोकांच्या भरभराटीस सुरवात झाली. आमच्या पुण्यामध्यें सुमारें चाळीस वर्षांपूर्वी बापूजी सुपेकर जिनगर, व काळुराम गवंडी या दोघां कारागिरांनीं हीं नवीन तऱ्हेचीं चित्रें करण्याची सुरवात केली. त्या दोघांच्या मागें तात्या व्यवहारी, सिताराम जोशी, व दाजी नारायण हे प्रसिद्धीस आले. हल्लीं सखाराम शेट सोनार व मारुती गुरव हेच नांवालौकीकास चढले आहेत. ज्याप्रमाणें बंगाल्यांत खांमटी, मिश्मी, डफळ, नाग, मीकरि, गारो, कारीन, संताळ, कोळ, भूया, बनवला, लागूली इत्यादि अनेक जातीच्या लोकांचे हुबेहुब पुतळे करून जिकडे तिकडे प्रदर्शनांत पाठवीत असतात. त्याप्रमाणें नीच वर्णाच्या लोकांचे नागवे उघडे पुतळे न पाठवितां आह्मी मुंबईहून कैलासवासी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्या जाग्यावर हल्लीं काम करीत असलेले रावसाहेब गोपाळ मोरेश्वर साठे, तसेंच त्यांचे स्नेही मिस्तर नेने व त्यांची नुक्तीच गतझालेली रूपसंपन्न पत्नी, आणि त्यांचा तात्या नांवाचा सुंदर मुलगा यांचे हुबेहूब पुतळेच करून त्याजवर दागिने घालून पाठविले होते.

 बरद्वान प्रांतांत बोरिया, तसेच दरभंगा, हत्वा, चपरा इत्यादि गांवीही असलीं चित्रें होतात; परंतु तीं इतकीं सुरेख नसतात. लखनौ शहरीं तयार होणारीं मातीचीं चित्रें मात्र फार सुरेख असतात. त्यांच्या अंगावरील कपडेसुद्धां मातीचेच असतात. लखनौस गोकाकच्या लांकडी नमुन्याप्रमाणें मातीचे फळफळावळीसारखे नमुने करून विकतात. फळादिकांचे मातीचे नमुने दिल्ली अंबाला व भावनगर येथें होतात. परंतु गोकाकची बरोबरी कोठेंच होत नाहीं. हिरासिंग या नांवाच्या एका मनुष्यानें व लाहोर येथील शिनारे पिन्टो यानें जातीजातीच्या विषारी सर्पाचे नमुने करून व ते रंगवून विकण्याचे कारखाने काढले आहेत. त्यांस सरकारी आश्रय मिळाल्यामुळें प्रत्येक कलेक्टरानें ते खरेदी करून सर्प मारण्याबद्दल इनाम देतेवेळीं विषारी सर्प कोणता व बिन विषारी कोणता हें समजण्याकरितां ते आपल्या आफिसांत ठेविले आहेत.

 जयपूर येथील हुन्नर शाळेंत मातीचीं व कागदाचीं चित्रें करण्याचा खाना घातला आहे. ह्मैसूर संस्थानांत चंनापुलन गांवीं फळफळावळीचे नमुने करीत असतात. राजपुतान्यांतही असलीं चित्रें होत असतात. जातीजातीच्या लोकांची पुण्यास होतात त्या प्रकारचीं चित्रें ग्वाल्हेरीहन आलीकडे येऊं लागलीं आहेत. हलक्या प्रतीचीं ह्मणजे पोळाचे बैल व दिवाळींंत मांडण्याकरितां हत्ती, घोडे, वाद्य इत्यादि चित्रें गांवोगांव कुंभार लोक करितात.  चित्रशाळेंतून शिकलेले विद्यार्थी प्लास्टर ऑफ पारीसची चित्रें करून अलीकडे विकूं लागले आहेत.

 जयपुरास ज्याप्रमाणें जातीजातीच्या लोकांचे ‘बस्ट' [ कंबरेपर्यत चित्र ] करून विकतात त्याप्रमाणें पुण्यास तयार होण्यास अडचण नाहीं. हे 'बस्ट' जयपूर येथील 'बस्टा ' पेक्षा चांगले होतील यांत संशय नाहीं. राजपुताना प्रांतांतील जातीजातीच्या लोकांची पागोटीं एकमेकांपासून निराळीं दिसतात. त्यामुळें आकार वैचित्र्य त्यांत फारसें नसतें. तसें या इलाख्यांत होणार नाही हें सांगावयास नको.


प्रकरण ३ रें.
वाद्यें.

 प्राचीन काळच्या हिंदु लोकांनीं वाद्यकला अगदीं पूर्ण दशेस आणिली होती असें पुष्कळांचे मत आहे. सरस्वती, नारद, किन्नर इत्यादि पौराणिक स्त्रीपुरुषांचें कौशल्य जगप्रसिद्ध आहे. या पौराणिक काळानंतर इतर कलांप्रमाणें वाद्यकलाही आस्ते आस्ते लयास जाण्याच्या बेतांत होती असें म्हणतात. यानंतर मुसलमान लोक हिंदुस्थानावर प्रथम स्वाऱ्या करूं लागले त्या वेळीं या कलेचा अगदीच ऱ्हास होत गेला. कारण या अविंधाच्या धर्मात वाद्यें वाजविण्याची परवानगी नाहीं. त्यांचीं वाद्यें म्हटलीं ह्मणजे काय तीं ताशा आणि ढोल. परंतु वाद्यकलेच्या सुस्वर नादानें त्यांस लवकरच भुलवून टाकिलें. त्यामुळें सन १२८५ सालीं कैकोबाद बादशहाच्या वेळीं अमीर खुशरू या नांवाच्या एका सरदारानें हिंदु लोकांची वाद्यकला आरबी लोकांच्या वाद्यकलेपेक्षां मोहक आहे असें ठरविलें. त्याच्या धर्मानें हें शास्त्र शिकण्याची त्यास परवानगी दिली नव्हती; तरी अमीर खशरू यानें अतिशय मेहेनत घेऊन मोठ्या काळजीनें त्याचा अभ्यास केला. आणि त्या दिवसापासून आमच्या हिंदु लोकांच्या वाद्य कलेवर आम्हांपेक्षांही यवनांचें प्रेम जास्ती बसलें. अकबर बादशहानें आपल्या दरबारीं हिंदुस्थानांतील उत्तम उत्तम गवय्ये व बजवय्ये आणून ठविले होते. त्यांत मुकुटमणी तानसेन याच नाव माहीत नाहीं असा पुरुषच हिंदुस्थानांत विरळा. या वाद्यांतील सुरांच्या संबंधाने
   मार्मिक लोकांचें असें ह्मणणें आहे की, देशी सुर व विलायती सुर एकमेकांपासून भिन्न जनाहींत. तें कांहीं असो. न्यायदृष्टीनें पाहतां हल्लींच्या विलायती वाद्यांची आमच्या वाद्यांशी बरोबरी करूं लागलें असतां तींच चांगलीं आहेत असें कबुल करणें भाग पडतें. परंतु तीं तयार करण्याच्या कामांत व त्यांजवर हस्तीदंत, सोनें, रुपें, पितळ याच पत्रे व मिन्यांचे काम चढविण्यांत आमचे लोक पुष्कळ कौशल्य प्रगट करितात. मद्रास येथील डाक्तर बिडी हे देशी वाद्यांविषयी असें म्हणतात कीं, " हिंदु लोकांस वाद्यकलेची पूर्वीपासून फारच आवड आहे. त्यांचा आवडता देव जो कृष्ण तो मुरली वाजवीत आहे असाच दाखवितात, हिंदुस्थानांत वाद्यें तयार करण्याच्या कामांत पुष्कळच कौशल्य खर्च होतें त्यामुळें, व गेल्या हजारों वर्षात त्यांच्या आकारांत कांही फरक पडला नाही यामुळें ती लक्ष देऊन पाहण्यासारखीं आहेत. केवळ रानटी लोक वापरीत असलेलीं वाद्यें व सुधारलेले उंच वर्णाचे लोक, हे वापरीत असलेली वाद्यें यांची तुलना करून पाहत असतां आपल्या मनास मोठा आनंद होऊन त्यांच्यांतील वाद्यसंबंधाच्या विशेष गुणाची सहज माहिती होते. या गोष्टीकडे विद्वान लोकांचें जावें तितकें अजून लक्ष गेलें नाहीं. या तत्संबंधी मनुष्यज्ञातीविशिष्टशास्त्रीयज्ञान करून घेण्यास पुष्कळ जागा आहे. हिंदु लोकांच्या गायन व वाद्य या कलांसंबंधी विचार करतांना असें नजरेस येतें कीं, त्यांचे प्राचीन सुर फार गोड आहेत. परंतु ते आम्हां साहेब लोकांस आवडत नाहींत, याचें कारण इतकेंच कीं, त्यांच्या व यांच्या सुरांत अलीकडे देशकाल मानानें पुष्कळ फरक पडला आहे. हिंदुस्थानांतील लोक वाद्यें तयार करण्याच्या कामांत व तीं सुशोभित दिसावीत ह्मणून अनेक तऱ्हेच्या पदार्थाचा उपयोग करितात. त्यांत मुख्यत्वेकरून देवनळ, बांबू, भोपळे, लांकूड, लोखंड, पितळ, शिंप्या, सांबरसिंग, हस्तीदंत, चामडीं, आंतडीं हीं होत. मद्रास इलाख्यांत तंजाेर, मलबार, आणि निलगिरी या गांवी वाद्यें तयार करितात."

 बंगाल इलाख्यांत कलकत्ता,डाका,मुर्शिदाबाद,विष्णुपूर, वायव्य प्रांतांत लखनौ बनारस व रामपूर, पंजाबांत दिल्ली, अमृतसर, लाहोर ; मुंबई इलाख्यांत मुंबई, पुणें, मिरज, व कच्छ भूज या गांवीं वाद्यें तयार होतात. कांही वाद्यांचे वर्णन खाली दिलें आहे.

 कच्छपी विणा:--कच्छ म्हणजे कांसव याच्या पाठीसारखा त्या विण्याच्या तुंब्याचा आकार असतो. डाक्तर बिडीसाहेब यांचे असें ह्मणणें आहे कीं, युरोप खंडांत 'गिटार ' या नांवाचे वाद्य आहे तें या विण्यावरून तयार केलेलें आहे. त्याचें इटली भाषेतील नांव ' चित्तर ' असे आहे. स्पेन देशांत “गिटारा" म्हणतात. व फ्रान्स देशांत " गेटेर " म्हणतात. ही सर्व नांवें एका शब्दापासून उत्पन्न झालीं असावींत यांत कांहीं संशय नाहीं. त्यांच्यात सात तारा असतात त्यापैकीं सहा एका घोडीवरून नेऊन वेगवेगळ्या खुंटयांस गुंडाळलेल्या असतात परंतु सातवी खालच्या घोडीपासुन थोड्या अंतरावर एका धातूच्या खुंटीस गुंडाळलेली असते.
 सतार:--सतारीच्या जाती पंजाबांत पुष्कळ आहेत. तिजवर हस्तीदंताची अगर सोन्याच्या वर्खाची नकशी करितात. मध्यम सतार, चर्गासतार, तरफदार सतार, ह्या तीन जाती विशेष प्रसिद्ध आहेत. सतारीची पक्की तार दिल्ली व बरेली या गांवीं तयार होते.
 किनरी विणा:--याचा तुंबा शहामृगाच्या अंड्याचा किंवा सोन्या रुप्याचा असतो. युरोप खंडांतील ज्यू लोकांचें " किनोर" वाद्य या वाद्यापासून झालें असावें. मद्रास इलाख्यांत किनरी या वाद्याच्या दांडयाच्या दोन्ही टोंकांस राक्षसांची तोंडें कोरलेलीं असतात. व त्याच्या प्रत्येक टोकास दोन भोपळे लाविलेले असतात व तारा दोनच असतात.
 महती विणा:--हा विणा नारद ऋषीने शोधून काढिला. यास “ बिन " असें म्हणतात. त्यांत पांच मुख्य तारा असून दोन बाजूस आणखी दोन तारा असतात. हा विणा वाजविण्यास नखी लागते.
 नादेश्वर विणा:--हा अर्वाचीन आहे. या देशांतील कच्छपी विणा व विलायती ' व्हाओलिन ' या दोन्ही मिळून हा केलेला आहे.
 सोक्तिक विणा:-याचा तुंबा मोत्यांच्या शिंपल्याचा केलेला असतो.
 सूरबहार:--हा कच्छपी विण्याचाच एक प्रकार आहे. सुमारे साठ वर्षापूर्वी गुलाम महंमदखान नांवाच्या एका गवयाने शोधून काढिला. यांत अलाफ फार चांगले उठवितां येतात.
 त्रितंभी विणा-हाही कच्छपी विण्याचाच प्रकार आहे. याच्यांतील तुंबा थबकडा असून कधीं कधीं लांकडाचा केलेला असतो.
 प्रसरणी विणा--हा विणा कच्छपी विण्यापासूनच अर्वाचीन काळी तयार केलेला आहे. यांत बाजूच्या तारा नसतात. व एक घोड़ी ज्यास्ती असते.  सुरशृंगार--हा महती, कच्छपी व रुद्रविणा या तिन्हीपासून प्यारखान नांवाच्या मनुष्याने तयार केला आहे.

 रुद्रविणा-- यास इराण व आफगाणिस्थान या देशांत 'रबाब' ह्मणतात. व अरबस्थानांत ' रुवेब ' ह्मणतात. स्पेन देशांतील 'मांडोलियन ' नावाच्या वाद्यांशी याचे पुष्कळ साम्य आहे.

 सरोद--याला बाजूला सात पासून अकरापर्यंत तारा असतात.
 अलाबू सारंगी--हे वाद्य फार प्राचीन काळचें आहे. याला युरोप खंडांत 'इंडियन व्हाओलिन ' म्हणतात व मुसलमान लोकांनी त्यास 'कमरच्या' असें नांव दिले आहे.

 मीन सारंगी--हें वाद्य तौंंओैसासारखे असतें व याच्या टोंकावर माशाची ( मीन ) आकृती काढलेली असते.

 नाद तरंग--हें वाद्य इसरार किंवा तौंस या वाद्यांसारखेंच परंतु कांहींसें मोठें आहे.

 सारंगी--हिचा अवाज जनानी अवाजाशीं मिळता आहे. व त्याचा उपयोगही नाचांत ज्यास्ती होतो. हें वाद्य लंकेच्या रावणांने शोधून काढिलें असें म्हणतात. बाॅडन पॉवेल साहेबांचे असें म्हणणें आहे कीं, 'सारंगीचा अवाज कर्कश व त्रासदायक आहे.'

 सूरसंग--बंगाल प्रांतांतील वान्कुरा जिल्ह्यांत विष्णुपुर गांवीं प्रगट झालेल्या सेवा रामदास नांवाच्या मनुष्यानें हें वाद्य प्रथम तयार केलें असें ह्मणतात,

 स्वर विणा-- याला सुरबिन म्हणतात. हें वाद्य प्राचीन काळचें आहे. ते विख्यात रुद्र विण्यासारखें आहे.

 सरवथ--हें मद्रास इलाख्यांतील एका वाद्याचें नांव आहे. तें दिसण्यांत पांखरासारखे दिसतें. त्यास सहा खुंटया असतात व त्याची उत्पत्ती ताऊसापासून झाली असावी असें वाटतें.

 ताऊस किंवा मयूरी--या वाद्याचें नांव संस्कृत 'मयूर ' व फारशी ताऊस व मराठी मोर या निरनिराळ्या भाषेंतील एकाच शब्दापासून आलें आहे.

 महा तंबुरा--हा तंबुऱ्याचाच प्रकार असून त्याच्यापेक्षां फार मोठा असतो.
 माचंग अथवा मोरचंग--हें फार जुनें वाद्य आहे. याचा आकार त्रिशूळासारखा आहे. हें युरोप खंडांतील ज्यू लोकांच्या 'हार्प नांवाच्या ' वाद्यासारखें आहे. फ्रान्सदेशांत याला “ट्रोपं" ह्मणतात. स्काटलंडांत 'ट्रम्प' व इंग्लंडांत जाॅयट्रम्प [ ज्यूट्रम्प] असे म्हणतात. हें वाद्य जरी मुलाच्या खेळण्यासारखें अगदी लहान आहे तरी त्याजवर पुष्कळ तऱ्हेचे सुर काढितां येतात.

 तुंबर किंवा तुंबरविणा--स्वर्गीच्या तुंबर नांवाच्या देवापासून ह्या नांवाची उत्पक्ती आहे. हें वाद्य तुंबराने शोधून काढलें असें ह्मणतात. यावाद्यास आपण ' तंबुरा 'असें म्हणतों. तंबुरी अबिसीनिया व इजिप्त देशांत प्राचीन काळापासून आहे असें डाक्तर बिडी साहेबांचे ह्मणणें आहे.

 आनंद लहरी--याला आपण तुणतुणें ह्मणतो, हें वाद्य फार करून भिकारी लोकांच्या हातीं असतें.

 सारिंदि--हें उत्तर हिंदुस्थानांतील हलक्या प्रकारच्या एका सारंगीचें नांव आहे.
 एकतारा--बंगाल्यांतील वैष्णव लोक भिक्षा मागतांना हे वाद्य वापरतात. ही आमची किनरी असावी असें वाटतें.

 गोपीयंत्र–-हेंही किनरीच्याच जातीचें एक वाद्य आहे.

 चारतारा-- या वाद्यांतील तीन तारा पितळेच्या व एक तार पोलादी असते.

 कानून-- या वाद्याला तेवीस तारा असतात.

 तीड किंवा ताड–-हें देवद्वाराच्या लांकडाचें केलेलें एक चारतारी वाद्य आहे. हे पंजाबी वाद्य आहे.

 दोतारा–-हें चार तारासारखें आहे. परंतु त्याचा दांडा त्या वाद्याच्या दांड्यापेक्षां जाड असून आंखूड असतो.

 चिक्कारा–-हें पंजाबी वाद्य आहे. याला घोड्याच्या केसाच्या तारा लावितात.

 कमाणची--हें काश्मीरी वाद्य आहे.


सनईच्या जातीचीं वाद्यें.

 बन्सी--उत्तरहिंदुस्थानांत वेणु या वाद्याला बन्सी ह्मणतात. त्यालाच मद्रासेकडे "पुलंगोलल" ह्मणतात. हें वाद्य कृष्णाने शोधून काढिलें असें ह्मणतात.

 सरलबन्सी–-हें अलगुजासारखें वाद्य आहे.

 लयबन्सी–-हें वाद्य तोंडाच्या एका बाजूनेंच फुंकावयाचें असतें.

 अलगोजा--पंजाबांत अलगुजास हें नांव आहे.

 नायरी--हें लांकडाचे एक वाद्य आहे. त्याच्या योगानें सुराचा भरणा होतो.

 वेणू--ओढिया प्रांतात वेणूला बेणू म्हणतात. परंतु ती चार पासून सहा इंच लांब असते.

 कलम--ह्मणजे लेखणी. हें वाद्य लेखणीसारखें असते.

 अलकूजा–-हें आपल्या अलगूजा सारखें दक्षिणेंतील वाद्य आहे.

 मगविणें--हें नारळाच्या पोग्यापासून तयार केलेलें सनईसारखें एक वाद्य आहे.

 कर्णा-- याला ताडाच्या पानाची व कधीं कधीं हस्तीदंताची पिंपारी असून खालीं पितळेचें असतें.

 नागसरम–-हेंही नारळाच्याच पोग्याचें केलेलें असतें.

 सुरणा--याला पुढें सात व मागें एक भोंक असतें. याचीही पिंपारी ताडाच्या पानाची असते.

 पंचम उत्थू--लांकडाच्या नळीवर चामडें लावून व पितळेच्या कड्या लावून तयार केलेलें हें एक मद्रासे कडील वाद्य आहे. याला एकच भोंक असतें. याचा आपल्या “सूर" नांवाच्या वाद्यासारखाच उपयोग होतो.

 उत्थू--हें वरील वाद्यापेक्षां जरा लहान असतें.

 सनई--चौघड्याबरोबर वाजविण्याचें हें एक वाद्य आहे.

 थिरुचिन्नम--हा कर्णा असावा.

 कोंबू--हा S या आकाराचा एक कर्णा आहे.

 शृंग--हें शंकरापुढें वाजविण्याचें एक वाद्य आहे.

 रणशृंग--हें लढाईच्या वेळीं आपल्या देशांत पूर्वी वाजवीत असत तें वाद्य.  तूरी--चौघड्यांत नगाऱ्याबरोबर वाजवीत असतात त्या एका जातीच्या कर्णाचें हें नांव आहे.

 शरणौ--बकऱ्याच्या कातड्याच्या पिशवींत वारा भरून बगलेंत धरून वाजविण्याचें स्काटलंडांतील बॉगपाइपसारखे हें एक वाद्य आहे.

 थुत्थी--हें एक वरच्याच वाद्यासारख वाद्य आहे. असल्या तऱ्हेचीं कातड्याच्या पिशवीचीं वाद्यें हिब्रू, ग्रीक, रोमन, अरब, इराणी, आणि हिंदु या लोकांत फार प्राचीन काळापासून आहेत. व हल्लींही इटली, फ्रान्स, जर्मनी, रशिया व पोलंद याठिकाणी असली वाद्यें अजून आढळतात. स्काटलंड देशांत तर हें वाद्य सर्व घरोघरीं आढळते.

 शंख--शंकराचा पांचजन्य व विष्णूचा देवदत्त त्यांची हीं धाकटीं भावंडें होत. बौध्य धर्माचेही लोक शंख वाजवितात. जंगमाचें तर हें उदरनिर्वाहाचें साधन आहे.

 गोमुख--हा एका जातीचा गाईच्या तोंडासारखा एक शंख आहे.

 बरतक-- हा कवडीच्या जातीचा एक शंख आहे.

 तुंब्री--ही गारोड्याची पुंगी. इलाच नागसूर असेंही ह्मणतात.


आघातवाद्यें.

 मंदिरा–-हें टाळाचें नांव आहे. याला उत्तरहिंदुस्थानांत झोरा व कैनै अशींहीं नांवें आहेत.

 करताळ-- याला उत्तरहिंदुस्थानांत चिना किंवा झाजी म्हणतात. व बंगाल्यांत खटाली असेंही नांव आहे.

 घंटा--हें सर्व प्रसिद्ध वाद्य आहे.

 घुंगुर-- याला बंगाल्यांत ताली म्हणतात.

 झांज--हें एक प्रसिद्ध वाद्य आहे.

 तास--हें असूरी वाद्य आहे. ब्रह्मदेशांत असलेंच एक वाद्य आहे तें दिसण्यांत मोठ्या परातीसारखें असून त्याच्या मध्यभागीं झांजेच्या गोळ्यासारिखा एक मोठा गोळा असतो. ह्या गोळ्यांवर लांकडाने किंवा लाकडाच्या टोंकांस पेंढा गुंडाळून त्याच्यावर कातडें लावून त्यानें वाजवितात. या कातड्यामुळें अवाज कर्कश निघत नाहीं.

 मृदंग--हें वाद्य ब्रह्मदेवानें शोधून काढलें असें ह्मणतात.

 पखवाज--हा मृदंगापेक्षां फार लांब असतो. त्यामुळें त्याचीं तोंडें फार लहान असतात.

 ढोलकें--मृदंग व पखवाज याचें रानटी भावंड आहे.

 बाह्या व तबला–-हें मृदंगाचेंच दोन्ही बाजूचे आवाज दोन वेगळ्या आवाजानीं काढण्याचें अर्वाचीन साधन आहे. तबल्याला कधीं कधीं दहिना ह्मणतात. बाह्या ह्मणजे डावा आणि दहिना ह्मणजे उजवा हात. यावरूनच हीं नांव पडलीं असावीं.

 धाक-- हें फार मोठें थोरलें ढोल आहे. याची उजवीच बाजू वाजवितात, डावीकडे हात मुळीच लावीत नाहींत.

 ढोल--हें धाक ह्या वाद्याचा धाकटा भाऊ होय.

 दुंदुभि अथवा नौबद--हें प्राचीन काळचे रणवाद्य आहे.

 नगारा-- त्याचेंच धाकटें भावंड.

 धौसे--ही एका प्रकारची नौबद आहे.

 संबळ--हें गोंधळी लोकांचे वाद्य आहे.

 पोंबई--हें संबळासारखे मद्रासेकडे एक वाद्य आहे. त्यांतील उजव्या हाताकडील भाग मृदंगासारखा हातानें वाजवितात व काठीला दोरी गुंडाळून तिच्या टोंकानें दुसरा भाग घांसतात.

 गोंधालम--हें झाडाच्या कुंडीच्या आकाराचें दोन भाग एके ठिकाणी बांधलेलें असें असतें.

 गिडीकट्टी--वरच्याचेंच लहान भावंड होय.

 डमरू--याला मद्रासेकडे उडुकई असें ह्मणतात.

 खोळ--हें मद्रासेकडील एक वाद्य आहे. हें नेहमीं कीर्तनाच्या वेळीं वाजवितात.

 खंजिरी-- या वाद्याला बारीक लहान लहान झांजा लाविलेल्या असतात.

 डिमडिमी--खंजिरीचें लहान भावंड.  ताशा--हें यवनांचे रणवाद्य.

 डैरा–-हें मद्रासेकडे ताशासारखें एक वाद्य आहे असें म्हणतात. परंतु गुजराथेकडे मडक्याच्या तोंडावर कातडें बांधून एका प्रकारचें घागरघुम्यासारखें वाद्य तयार करितात त्याला डेरा ह्मणतात.

 डफ--हें तमासगिरांचे प्रसिद्ध वाद्य आहे.

 डौरा–हें वाद्य मद्रासेकडे कोळी व कुणबी लोक वाजवितात.

 तुंकनारी-काश्मीर देशीं डग्याच्या आकाराचें डाव्या बगलेंत धरून उजव्या हातानें वाजविण्याचें एक वाद्य आहे.

 न्यस्तरंग-हें एक कर्ण्यासारखें वाद्य आहे. त्यास संस्कृतामध्ये उपांग ह्मणतात. हें वाद्य मथुरा व वृंदावन ह्या गांवीं आढळतें. तें फार प्राचीनकाळचें असून हिंदुस्थान खेरीज करून कोठें फारसें आढळत नाहीं असें ह्मणतात.

 जलतरंग-कांचेचे लहान मोठे पेले पाण्यानें भरून त्याच्या कांठावर काठी फिरवून त्यांतून सप्तसूर काढतात.

 चिपळ्या-भजनी बोवाचें हे वाद्य आहे.

 संतूर-हें पोलादाचें त्रिकोणाकात केलेलें युरोपखंडातील बेंडबाजांत वारंवार दृष्टीस पडत असलेल्या वाद्याप्रमाणें एक देशी वाद्य आहे.
प्रकरण ४ थें.
दागदागिने.

 इतर देशांतील स्त्रियांप्रमाणें भरत खंडांतील स्त्रियांसही दागिन्यांची आवड साहजिक आहे. आमच्या खेड्यापाड्यांतून पाटील व कुळकर्ण्यांप्रमाणेंच गांवचा सोनारही पंचांपैकींच मानलेला आहे. या देशांतील स्त्रियांचा पोषाख थंड देशांतील स्त्रियांच्या पोषाखाप्रमाणें त्यांचें सर्व अंग झाकीत नाहीं; त्यामुळें दागिने घालण्यास त्यांच्या शरीराचा बराच भाग उघडा असतो. हे दागिने नेहमी मौल्यवानच असतात असें नाहीं. केवळ फुकट मिळणाऱ्या ताडपत्रांपासून तों लाखों रुपये किंमतीच्या जवाहिरापर्यंत सर्व पदार्थाचा दागिन्यांच्या कामांत उपयोग होतो. लाखेचे, गवताचे, कांचेचे, गंजांचे, रुद्राक्षांचे, कथिलाचे, शि-
   शाचे, पितळेचे, चांदीचे, सोन्याचे व जवाहिराचे-हे सर्व दागिने आमच्या देशांत तयार होऊन वापरण्यांत येतात. या दागिन्यांपैकी कांहीं कांहीं इतके ओबड धोबड व जड असतात कीं ते अंगावर घालून शेतांत काम करणाऱ्या मुली अडचण व दुःख सोसतांना पाहून त्यांची आपल्यास जरी कीव येते तरी त्यांस ते आपल्या शरीरावर असल्याबद्दल भूषणच वाटत असतें. या स्वस्त किंमतीच्या दागिन्यांतही कांहीं कांहीं मोठे सुरेख व कौशल्य प्रदर्शक असतात. आमचे कारागीर कोठेंही असोत, व कोणतेंही काम करोत, त्यांच्या आंगचे नैसर्गिक कौशल्य दृष्टीस पडल्या शिवाय रहात नाही. पंचधातूसारख्या कडक पदार्थावर छिणींने बारीक ताशींव काम करण्यास पुष्कळ वेळ लागत असल्यामुळें दागिन्यांचीं किंमत अतिशय वाढते हें लक्षात आणून लाखेचे वगैरे स्वस्त दागिने करूं लागण्यास आपली कौशल्यशक्ति ते सहजच खर्च करूं लागले. हे लाखेचे चुडे कधीं कधीं फारच सुंदर असतात. ज्या प्रमाणें पितळ इत्यादि धातूंच्या दागिन्यावर नक्षी करण्यास खर्च जास्त लागतो त्याप्रमाणेच सोन्यारुप्याचे दागिने करण्यांसही घडणावळ कमी पडावी ह्मणून ठळक ठळक नग करण्याची चाल आहे. प्रसंगानुसार पैशाची गरज लागल्यास ह्या दागिन्यांचा उपयोग व्हावा व ते मोडतांना विशेष नुकसान होऊं नये हा विचार घरच्या यजमानास दागिने घडवितांना करावा लागतोच. त्यामुळें बारीक तारेचे डाकील दागिने या देशांत फारसे कोणी करीत नाहीं; तसेच आयते दागिने घेण्याचीही चाल या देशांत फारशी नाहीं.

 मास्किलिन नांवाच्या एका साहेबाने पारिस शहरी सन १८७८ सालीं झालेल्या प्रदर्शनांत गेलेल्या आमच्या देशाच्या दागिन्यांचें खालीं लिहिल्याप्रमाणें वर्णन केले आहे:-

 " स्पर्शद्रियांचे नाजुक काम अति उत्तम प्रकारें करण्यांत हिंदु लोकांच्या बोटांच्या अग्राची बरोबरी कोणाच्यानेंही करवणार नाहीं असे जरी आहे तरी सोन्यारुप्याच्या तारेंचे बारीक काम करण्यास ते लोक सुद्धां मुलांच्या कोमल हातांचा उपयोग करून सुतेऱ्याच्या घरांसारखी अतिशय नाजुक कामें तयार करतात. हें बारिक काम हिंदुस्थान देशांत फारच प्राचीन काळापासून होत आहे; व तें पूर्णदशेस येऊन पोचल्यामुळें अर्वाचीनकाळीं त्यांत सुधारणा होण्यासही मार्ग राहिला नाहीं. प्राचीनकाळीं ग्रीसदेशांतही सोन्यारुप्याच्या तारेचें नाजूक काम करणारे कांहीं कारागीर होते. हल्लींचे हिंदुस्थानांतील कारागीर त्या देशांतील जातिभेदामुळें पूर्वीच्या कारागिरांच्याच वंशांतले आहेत; त्यामुळें त्यांचे गुण यांच्याअंगीं जन्मतःच आलेले आहेत. तारकामाशिवाय हिंदुस्थानांतील सोनाराचे इतर कामांतील कौशल्य प्राचीन फारशी व संस्कृत भाषेप्रमाणे त्यांच्या देशांतील कांहीं घराण्यांत वंशपरंपरेनें वसत आलें आहे. हीं घराणीं कालांतरान्वये बुडत चाललीं आहेत; त्यामुळें तद्देशीय कौशल्याचाही दिवसें दिवस ऱ्हास होत चालला आहे. त्यांत या कामास उतरता पाया लागण्यास आणखीं एक कारण झाले आहे. तें कोणतें ह्मणाल तर आपल्या पूर्वजांचा धंदा सोडून देऊन इतर धंदा पत्करण्याची अलीकडील लोकांची आवड हें होय.

 आमच्या देशांतील ठाकूर, भिल्ल, कोळी, वारली वगैरे जंगली लोकांत पाहिजे त्या पदार्थाचे दागिने करतात, असें जरी आहे तरी फार पुरातन काळापासून जवाहिराचे सुद्धां दागिने या भरतखंडांत होत असत असें सिद्ध करून देतां येतें. पृथ्वींतील सर्व ग्रंथांत जुना ग्रंथ जो ऋग्वेद त्यांतील "रुद्रदेवता " सुवर्णाच्या चकचकीत दागिन्यांनी सुशोभित केलेली आहे. तसेंच त्याच सनातनग्रंथांत वर्णन केलेले असुर सोन्याचे व रत्नाचे दागिने घालीत असेंही वर्णन आहे. याच ग्रंथांत “कक्षिवत" ऋषीनें सोन्याच्या कुंडलांनी व रत्नजडित कंठीनें सुशोभित असा पुत्र आपल्यास प्राप्त व्हावा हें देवाजवळ मागणें मागितलें.

 पाश्चिमात्य धर्मसंस्थापक येशूख्रिस्त याचा जन्म होण्यापूर्वी हजारों वर्षे ह्या गोष्टी हिंदुस्थानांत माहित होत्या हें येथें लक्षात ठेवण्यासारखें आहे. तत्रापि असें असून सुद्धां या भरतखंडांतील अगदीं मूळचे रानटी स्थितींतील दागिने अजून नाहींसे झाले नाहींत. अगदीं अलीकडेसुद्धां बंगाल्यांत शंखाच्या शिंप्याचें कंकण हातांत घातल्याशिवाय आपण शुद्ध होत नाहीं असें सुवासिनी स्त्रियांस वाटत असे व हा " मौल्यवान ", दागिना हातात घालण्यापूर्वी त्याजबद्दल कांहीं धर्मसंस्कारही होत असे. हीं कंकणें एका तबकांत ठेवून त्यांची शेंदूर, दुर्वा, तांदुळ यांनीं पूजा करीत. व तीं आपल्या घरीं विकावयास आणणाऱ्या मनुष्यांस शिधा देत. शंखाची कंकणें बंगाली लोकांच्या कालिका देवतेस प्रिय आहेत. त्या प्रांतीं एक गाणें अजून गातात. त्यात शंकर दरिद्री असल्यामुळें त्याच्यानें शंखाची नवीन कंकणे पार्वतीला देवविलीं नाहींत त्यामुळें त्या दोघांचा मोठा तंटा झाला त्याचें वर्णन आहे. बंगाल्यांत लोखंडाचें कंकण कपाळाच्या कुंकवाप्रमाणे मानलें आहे. व तें डाव्या हातांत जी बायको घालणार नाहीं तिच्या नवऱ्याचें कधीही कल्याण होणार नाहीं अशी समजूत आहे. नवरा मेला म्हणजे हें लोखंडाचे कंकण काढून टाकितात. अलीकडील श्रीमंत लोक हे लोहकंकण सोन्यानें मढवूं लांगले आहेत.


प्राचीन दागदागिने.

 जुन्या संस्कृत ग्रंथांत खाली लिहिलेल्या दागिन्यांचें वर्णन सांपडते.

डोकीचे दागिने.

 डाक्टर राजेंद्रलाल मित्र या गृहस्थानें “धी इंन्डो आर्यन्स " नांवाचें एक पुस्तक प्रसिद्ध केलें आहे. त्यांल ते ह्मणतात कीं, प्राचीन काळीं स्त्रियांच्या केशकलापाची व स्त्रियांच्या वेणी घालण्याच्या प्रकाराची मोठी प्रतिष्ठा असे. डोक्यांत पक्षांची पिसें घालणें, फुलांच्या माळा घालणें, व सुवर्णादि चकचकीत धातूचे दागिने घालणें हे प्रकार स्त्रियांच्या अंगी असलेल्या स्वाभाविक नीटनेटकेपणाचें साहजिक फळ होय. मोत्यें, सोन्याच्या सांखळ्या, बिजवरें व रत्नजडित मुकुट प्राचीन काळीं घालीत असत. त्यास खाली लिहिल्याप्रमाणें नांवें होतीं.

 माल्य--सोन्याची फुलें.

 गर्भक--या शब्दाच्या अर्थाबद्दल वाद आहे. कांहीं लोकांचें म्हणणें असें आहे कीं, हा एक सुवर्णाचा कांटा होता, कांहीं ह्मणतात ही केंस बांधण्याची सांखळी होती.

 ललामक--हा बिजवऱ्यासारखा एक दागिना होता परंतु त्यास बिजवऱ्याप्रमाणें पेट्या नसून सोन्याची पानें असत.

 अपिर--भांगावर बांधण्याची एक सांखळी.

 बालपास्य--केंसाभोंवती गुंडाळलेली मोत्यांची माळ.

 पारितथ्य--यांस सिंथि असेंही नांव आहे. हा बिजवरा असावा.

 हंसतिलक--पिंपळाच्या पानाच्या आकाराचा हिरेजडित एक दागिना असे. हा बिजवरा जेथें बांधितात तेथेंच बांधीत.

 दण्डक--कंकणाच्या आकाराचा सोन्याचा पोकळ दागिना करून त्याजवर मोत्यें बसवीत. हा हालविला ह्मणजे खुळखुळ्याप्रमाणें वाजे.  चूडामण्डन--कमळाच्या पानाच्या आकाराचा सुवर्णाचा एक दागिना. हा केतकाप्रमाणे दण्डक या दागिन्याच्यावर घालीत असत.

 चूडिका--कमळाच्या फुलासारखें सोन्याचें फूल.

 लम्बन--हें वेणीतींल फुलांच्या माळेचें नांव. तिला बंगाल्यांत झाला ह्मणतात. या फुलांस दोन्ही बाजूस मोत्ये लावीत व मध्यें पाचूचा खडा बसवीत.

 मुकुट--राजांप्रमाणें पूर्वी राण्याही मुकुट घालीत असत. त्याजवर पुष्कळच रत्नें बसवीत. व मयूरादि पक्ष्यांच्या पिसाचा तुरा लावीत. याच्या आकारांत कांहीं फेरफार करून बंगाल्यांतील “ अर्वाचीन “ नामधारी राण्या एक प्रकारचा सोन्याचा मुकुट डोक्यावर घालीत असतात.

कानांतील दागिने.

 मुक्ताकंटक--मोत्याच्या सांखळ्याचें हे प्राचीन नांव असावें.

 द्विराजिक--ह्मणजे भीकबाळी. हिच्यांत दोन मोत्यें असून मधला खडा पाच, माणीक इत्यादि रत्नांचा असे. यांस बंगाल्यांत “बीरबावळी " म्हणतात.

 त्रिराजिक--तीन मोत्यांची भीकबाळी.

 स्वर्णमध्य--दोन मोत्यांमध्यें सोन्याचा लोलक अशी भिकबाळी.

 वज्रगर्भ--मध्यें हिरा, बाजूस दोन मोत्यें व त्या दोन्हीमध्यें इतर रत्नें घातलेली भिकबाळी. बंगाल्यांत तीस “गिमडा" ह्मणतात.

 भूरिमंडल--वरच्याच प्रमाणें परंतु लोलकाच्या व मोत्याच्या मध्यें ही हिरेच बसविलेली भीकबाली.

 कुंडल--सोन्याचीं कुडीं. यांत एका खालोखाल एक व एकावर एक बसविलेलीं तबकटें असून त्यांच्या कोंदणांत हिरे बसविलेले असत. प्राचीन काळी स्त्रियाप्रमाणें पुरुषही असली कुंडलें कानांत घालीत. व उत्तर हिंदुस्थानात अझून सुद्धां तसें करितात.

 कर्णपूर--फुलाच्या आकाराची कुंडलें. यांचे कर्णफुल, चम्पा, झुंंबा, झांपा इत्यादि प्रकार बंगाल्यांत हल्लीं आढळतात, आपल्या प्रांतीही 'लवंगा' दि प्रकार आहेतच.

 कर्णिका--यास 'तालपत्र', 'ताडपत्र ' व 'तालवर ' इत्यादि नांवें होतीं. हें ताडाच्या पानाच्या आकाराचें होते. हल्लीं असला दागिना कोठें वापरण्यांत नाहीं. तत्रापि ताडपत्राच्या दागिन्यांवर लाखेची नक्षी करून कोठें कोठें ते कानांत घालतात.

 शृंखल--सोन्याची सांखळी. उत्तर हिंदुस्थानांतील कांहीं लोक व दक्षिणेंतील गवळी लोक असल्या सांखळ्या कानांत घालतात.

 कर्णेन्दु--ह्मणजे कानांतील चंद्र. हा दागिना कानाच्या मागल्या बाजूस घालीत असत.

 ललाटिका अथवा पत्रपाश्या--सुवर्णाचें लहानसें रत्नजडित तवकट 'पाशा' या नांवानें बंगाल्यांतील लोक थोड्या दिवसांपूर्वी कानांत घालीत असत.

गळ्यांतील दागिने.

 प्रालंबिका.--नाभीपर्यंत लोंबणारी एक माळा.
 उरस्सत्रिका--नाभीपर्यंत पोचणारी मोत्यांची माळा.
 देवच्छंद--शंभर सराचें मोत्याचें पेंडे.
 गुच्छ--बत्तीस पदराचें मोत्याचें पेंडे.
 गुच्छार्ध--चोवीस सराचें मोत्याचें पेंडे.
 गोस्तन--चारपदरी मोत्यांची कंठी.
 अर्धहार--बारा पदरी मोत्यांची कंठी.
 माणवक--वीस पदरी मोत्यांची कंठी.
 एकावली--एक पदरी मोत्यांची कंठी.

 नक्षत्रमाला--ह्मणजे नक्षत्राची माला. हीत एकच पदर असून सत्तावीस मोत्यें असतात.

 भ्रामर--मोठ्या मोत्यांची एकपदरी कंठी.

 नीललवनिका--पांच, सात, व नऊ पदरी मोत्यांची कंठी असून तिला पाचेचे लोलक लाविलेले असतात.  वर्णसर--वरच्या इतकेच पदर असून त्याला हिरे लाविलेले असतात.

 सारिका--नऊ किंवा दहा मोत्यांची गळ्यांत घट्ट बसणारी कंठी.

 वजसंकलिका--नऊ किंवा दहा मोत्यांची कंठी असून तिच्या मागल्या बाजूस पांचेच्या लोलकाचा गोंडा लाविलेला असतो.

 वैकक्षिक--खांद्यावरून ब्राह्मणाच्या यज्ञोपवीतासारखी लोंबणारी एक माळा.

 पदक--निरनिराळ्या आकाराच्या नुसत्या सोन्याच्या किंवा जडावाच्या ताइत्या व पेट्या. त्या जेव्हां सोन्याच्या तारेने गळ्यांत बांधितात तेव्हां त्याला बंधूक असें ह्मणतात. हल्लीं चोहींकडे हिचा उपयोग करितात.

बाहुभूषणें.

 केयूर--हा एक दंडामध्ये घालण्याचा दागिना आहे. हा बाजूबंदाच्या आकाराचा असून त्याच्या दोन्ही तोंडास सिंहाचें किंवा दुसऱ्या जनावराचें तोंड करून बसवितात. हा कधी कधी जडावाचा केलेला असतो. त्याला गोंडा नसला ह्मणजे 'अंगद ' म्हणतात. मुंबईत शेणवी लोक असलीं कडीं नेहमीं दंडामध्यें वापरतात.

 पंचका--हा एक पौंचीच्या आकाराचा दागिना आहे. यांत कधी कधी पुष्कळ ताइत्या व पेट्या असतात.

 कतक--चौकोनी जडावाची सोन्याची पेटी.

कंकणे.

 वलय--सोन्याची सलकडीं अगर बायकांचे गोट.

 चूड--सोन्याच्या तारेचीं कांकणें.

 अर्धचूड--सोन्याच्या तारेचीं बारीक कांकणें.

 कंकण--दात्याचीं कंकणें.

आंगठया.

 पुरातन काळापासून आमच्या देशांत आंगठ्यांचा उपयोग होत आहे. आमचे पूजा करणारे उपाध्याय श्राद्धाच्या वेळीं दर्भाची केलेलीं पवित्रकें घालितात त्यांस सुद्धा बाबू त्रैलोक्यनाथ मुखरजी आंगठ्या म्हणतात. व त्या गवताच्या घालण्याचे कारण आमच्या भटजीबोवाजवळ पैसें नाहींत हें असावें अशी त्यांची समजूत आहे. असो, समजुतीपुढें इलाज नाहीं ! बंगाल्यांतील ब्राह्मण अजूनही तरलिकेंत अष्ट धातूंची आंगठी घालितात. अनामिकेंत ह्मणजे आंगठ्याजवळील बोटांत सोन्याची आंगठी घालावी व तरलिकेंत ह्मणजे करांगळी जवळील बोटांत रुप्याची असावी असें हिंदुधर्मांत लिहिलें आहे. प्राचीन काळच्या पुस्तकांत आंगठ्याचें वर्णन ठिकठिकाणीं सांपडतें. दुष्यंतराजाच्या हातांतील आंगठी माशानें गिळिली होती हें सर्वांस माहीतच आहे. द्रोणाचार्याच्या हातांतील आंगठीची गोष्ट खालीं दिली आहे.

 द्रोण हा पांचाळ देशांत राहणारा एक गरीब ब्राह्मण होता. त्याचा मुलगा अश्वत्थामा लहान असतांना शाळेंत शिकावयास जात असे. या शाळेंत पांचाळ राजाचे पुत्र व इतर श्रीमंत घराण्यांतील मुलें जात असत. अभ्यास झाल्यावर सुटीच्या वेळांत पांचाळ राजपूत्र व श्रीमंतांची मुले आपण घरीं काय काय पक्वानें खाल्लीं याबद्दल एकमेकांजवळ गोष्टी सांगत असत. एके दिवशी दुधाची (क्षीर ) गोष्ट निघाली ती ऐकून द्रोणपुत्राच्या मनांत दूध पिण्याची इच्छा झाली, व तो घरी जाऊन आईजवळ दुधाकरितां रडूं लागला. गरीबीमुळें द्रोणाच्या घरीं गाय नव्हती तेव्हां द्रोणपत्नीने पाण्यांत तांदूळ वांटून ते आपल्या मुलास दूध आहे असें सांगून पिण्यास दिले. दुसऱ्या दिवशीं अश्वत्थाम्यानें शाळेंतील मुलांस आपण दूध प्यालों असें मोठ्या फुशारकीनें सांगितलें. तें ऐंकून पांचाळ राजपुत्रांनी त्यास विचारलें अरे ! तुझ्या घरीं गाय नाही तेव्हां दूध आलें कोठून ? अश्वत्थाम्यांनें दूध कसें तयार करितात तें सांगितले त्या बरोबर सर्व मुलांनी टाळ्या वाजवून त्याची टेर केली. हा अपमान सहन न होऊन द्रोण पुत्र ढळढळा रडूं लागला मुलाचें दुःख पाहवेना ह्मणून द्रोणानें पांचाळ राजाकडे जाऊन गाई मागून घेण्याचा निश्चय केला. हा पांचाळ राजा द्रोणाचा गुरूबंधू असूनही त्यानें त्यास ओळख दिली नाहीं इतकेच नाहीं, तर त्याचा अपमान करून त्यास सभेतून हाकलून दिले. शाळेंत असतांना माझें अर्ध राज्य तुला देईन असें कबूल केलेल्या पांचाळाने राज्यमदामुळें उन्मत्त होऊन आपली निर्भर्त्सना केली या अपराधाबद्दल त्यास शिक्षा करण्याचा निश्चय करून देशत्याग करून द्रोण निघाला. तो हस्तनापुरास येऊन पोहोंचला. आतां पुढें काय करावे हें त्यास सुचेना. हस्तनापूरचा राजा आपल्या पक्षाकडे कसा मिळतो याचा विचार करीत एका विहिरीच्या बांदास टेंकून तो स्तब्ध बसला होता इतक्यांत तेथील राजपुत्र त्याच ठिकाणीं खेळण्या करितां आले. या मुलांचे आपल्याकडे लक्ष जावें ह्मणून द्रोणानें आपल्या हातांतील आंगठी पाण्यांत टाकिली, व ती 'इषिका' नामक विद्येच्या सामर्थ्यानें अलगत काढून घेतली. हा चमत्कार आपल्या घरीं जाऊन सांगण्याविषयीं द्रोणानें राजपुत्रांस सुचविलें. पुढें हस्तनापूरच्या राजाचा व द्रोणाचा परिचय होऊन द्रोणास राजपुत्रांच्या गुरूची जागा मिळाली. व अश्वत्थाम्यास खरोखरीचें दूधही पुष्कळ प्राप्त झाले. हस्तनापूरचे राजपुत्र मोठे झाल्यावर आपल्या गुरूचा अपमान केल्याबद्दल पांचाळ राजास त्यांनीं रणांगणीं योग्य शासन केलें.
 ही गोष्ट महाभारताच्या बंगाली देशांतील पाठांत आहे.
 रामायणांतील मुद्रिका मारुतीनें सीतेकडे नेली ही गोष्ट सर्वांस माहीत आहेच.
 संस्कृत पुस्तकांत खालीं लिहिलेल्या आंगठ्यांचे वर्णन सांपडतेः--
 द्विहिरक-दोन बाजूंस दोन हिरे व मध्यें पाचेचा खडा मिळून तीन खड्यांची आंगठी.
 वज्र--त्रिकोनारुति कोंदण त्यांत हिरा आणि तीन कानांवर तीन रत्नें.
 रविमंडळ--मध्यें इतर रत्नें व त्यांच्या भोवती हिरे, अशा प्रकारची आंगठी.
 नंद्यावर्त--चौकोनी कोंदणांत बसविलेली रत्नजडित आंगठी.
 नवरत्न किंवा नवग्रह--हिरा, माणिक, लस्न्या, मोत्यें, गोमेद, प्रवाळ, पाच, पुष्पराग, आणि इंद्रनील अशी नवरत्नजडित आंगठी.
 वज्रवेष्टक--कोंदणाभोवती हिरे असलेली आंगठी.
 त्रिहिरक--मध्यें मोठा हिरा व बाजूला दोन लहान अशी तीन हिऱ्यांची आंगठी.
 सुक्तिमुद्रिका--नागाच्या फणीच्या आकाराच्या कोंदणाची रत्न जडित आंगठी.
 मुद्रा अथवा अंगुली मुद्रा--कोंदणावर नांव कोरलेली मुद्रा.

कमरेचे दागिने

 कांची--सोन्याची एक पदरी सांखळी.
    मेखला--सोन्याची आठ पदरी सांखळी.
 रसना--षोडश पदरी कटिवेष्टन.
 कलाप--पंचवीस पदरी कटिवेष्टण.
 कांचिदाम--चार बोटे रुंदीचा गोंडे व गुंग्रु असलेला सोन्याचा पट्टा.

पायांची भूषणें

 पादचूड--रत्नजडित सुवर्णाचा वाळा.

 पादकंटक--चौकोनी तीन शिरांचा सोनेरी वाळा. यांत ध्वनि निघावा ह्मणून दाणे असतात.

 पादपद्म--तीन किंवा पांच सोनेरी सांखळ्यांचा जडावाचा दागिना. बंगाल्यांत चर्णचाप किंवा चर्णपद्म या नांवाचा एक चांदीचा दागिना हल्लींही प्रचारांत आहे.

 किंकिणी--सोन्याचें पैंजण.

 मुद्रिका-- हा दागिना सोन्याचा करून त्याजवर तांबडा रंग देत असत. हा ही घुंंगराप्रमाणें वाजत असे.

 नूपुर--ह्मणजे चाळ, परंतु प्राचीन काळचे चाळ सोन्याचे असत व ते सीतेसारख्या पुण्यशील स्त्रियाही वापरीत असत. हल्लींचे नुपुर पितळेचे असतात, व बहूतकरून कलावंतिणी वापरतात.

अर्वाचीन दागिने

 हिंदुस्थानांत परदेशांतून येणारें किंवा येत असलेले बहुतेक सोनें किंवा रुपें दागिन्याच्याच कामांकडे खर्च होते. विलायतेप्रमाणें या देशांत सोन्याचे दागिने करणारे रुप्याचे दागिने करणाऱ्यांपासून वेगळे नसतात. हल्लीं ग्लास्गो येथें सुरू असलेल्या प्रदर्शनांत दोन दागिने घडणार पाठविले आहेत; त्यांत एक जातीचा कुणबी आहे व दुसरा जातीने कारकुनीचा धंदा करणारा आहे. तत्रापि तो जन्मापासून मुका व बहिरा असल्यामुळें त्याच्या आईबापानीं त्यास सोनाराच्या हाताखालीं ठेवून हाच धंदा शिकविला आहे. पाश्चिमात्य सुधारणेच्या योगानें आपल्या देशांत अनेक प्रकारचे फेरफार होत चालले आहेत, त्यांत सोनारा सारख्या आणखी पुष्कळ उत्तम कारागिरांचा पूर्वापार धंदा एकाच जातींत राहिल्यामुळें त्यांचे कौशल्य वाढून व त्यांच्या धंद्यांतील बारीक खुब्या जातीच्या बाहेर न गेल्यामुळें त्यांचें हजारों वर्षे राखून ठेविलेलें कौशल्यवर्चस्व अलीकडे लयास चाललें आहे; कारण पाहिजे त्या जातीचा मनुष्य पाहिजे तो धंदा शिकूं लागला. पूर्वी आपल्या जातीचा धंदा सोडून इतर जातीचा धंदा करणारास बहिष्काराची धास्ती होती ती आतां राहिली नाहीं. आतां जाती अन्नव्यवहार, लग्ने व धर्मसंबंधी कृत्यें येवढ्याच पुरत्या आहेत.

 सोनार दागिने घडतात परंतु त्यांस रत्नें जडविणें असेल तर त्यांच्यांतच पच्चीकार ह्मणून एका प्रकारचे लोक आहेत त्यांजकडे हे दागिने पाठवावे लागतात. तसेंच मिन्याचें काम करणारे वेगळे लोक आहेत. मिन्याच्या कामाबद्दल जयपूराची फार ख्याती आहे. पश्चिम हिंदुस्थानांतील दागिने वर्णन करण्याची येथें कांहीं जरूर नाहीं. परंतु बंगाल्यांतील कांहीं दागिन्यांचीं नांवें खालीं दिलीं आहेत.

बंगाली दागिने.
डोक्यांतील दागिने.

 सिंथी--ह्मणजे बिंदी.

 झिंजिर--केंस बांधण्याची सोन्याची किंवा रुप्याची सांखळी.

 कांटा--चांदीचा लांब कांटा व त्याजवर सोन्याचें फूल असतें तें.

 चिरूनी--सोन्याची फणी, ही दागिन्यासारखी डोक्यामध्यें घालतात.

नाकांतील दागिने.

 नाकछाबी--नाकांतील कुड्यांच्या आकाराची नथ.

 माकरी--सोन्याचे वाळे.

 बेसर--चंद्रकोरीच्या आकाराची सोन्याची बाळी. ही बैलाची वेसण असते त्या ठिकाणीं घालतात.

 नोलक--एकच लांबट मोत्ये असलेली सोन्याची बाळी. ही वरच्या दागिन्याप्रमाणें घालतात. हा दागिना मुसलमान लोकांपासून बंगाली लोकानीं घेतला असावा. बंगाल प्रांत मुसलमान लोकांच्या हाताखाली पुष्कळ वर्षे होता त्यामुळें त्यांच्यांतील पुष्कळ रीतिभाती सुद्धां तेथील हिंदु लोकांत शिरल्या आहेत.

कानांतील दागिने.

 धेनरी--आपल्या तोंगलाच्या ठिकाणीं हा दागिना घालतात.

 माक्री--मुसलमानांप्रमाणे कानाच्या सर्व पाळीभर घालावयाच्या बाळ्या.

 पाशा--ह्मणजे कुडीं.

 झुंका--ह्मणजे तोंगल.

 कर्णफूल--एक प्रकारचे कुडें.

 कान--हा कानाच्याच आकाराचा व तितकाच मोठा सोन्याचा दागिना असून त्याजवर बाळ्याबिळ्या असतात. ह्याचें कानावर झांकण घालितात.

 पिंपळपाता--पिंपळपानी बाळ्या.

 चापा--चाफ्याच्या फुलाच्या आकाराच्या बाळ्या.

 अशा प्रकारचे अनेक दागिने आहेत. परंतु येथें त्यांचें वर्णन करण्याची जरुरी दिसत नाहीं.

 ब्रह्मदेशांतील सोनार, सोन्याचे दागिने तांबडे दिसण्याकरितां बंदुकीची दारू एक भाग, मीठ अर्धा भाग, व तुरटी एक भाग घेऊन त्यांत पाणी घालून ते अर्धा तासपर्यंत उकळावतात. या पाण्यानें सोनें धुतलें ह्मणजे साफ होतें. त्याजवर चिंच, गंधक आणि मीठ पाण्यांत कालवून लावितात, त्यामुळें सोनें तांबडें होतें. चिंच, गंधक व मीठ हे किती किती घ्यावयाचे हे सोनारास माहित असतें, ते कोणास सांगत नाहींत.

पच्चीकाम.

 श्रीमंत लोक जडावाचे दागिने वापरतात. त्यांत हिरे, माणीक, लाल, पाच, पिरोज, अकीत, पुष्कराज, गोमेद, हीं रत्नें मुख्य आहेत, पच्चीकारास उत्तरहिंदुस्थानांत मुरासियाकार किंवा कुंडनसाज ह्मणतात. दिल्लीस पच्चीचें काम फार चांगलें होतें. अकीकावर सोन्याचीं झाडें कोंदणांत बसवून त्यांत माणकाचीं, लालडीचीं व हिऱ्याचीं फुलें बसवून तलवारीच्या मुठी तयार करितात. परंतु असले काम पाहणें असेल तर विलायतेंतील बड्या बड्या साहेब लोकांच्याच घरीं गेलें पाहिजे. हल्लीं आमच्या देशांत असलें काम स्वप्नांतही दृष्टीस पडण्याची पंचाईत होऊं लागली आहे. हुक्कयाच्या तोट्या, तलवारीच्या, जंबियाच्या, काठ्यांच्या व कुबडीच्या मुठी या सर्व जिनसा विलायतेंत दृष्टीस पडतात. असल्या कामास लाविलेलीं रत्नें लहान लहान असल्यामुळें तीं फारशीं मौल्यवान नसतात. तत्रापि पच्चीकाराच्या कौशल्यामुळें तीं अकीकांत बसविलीं ह्मणजे फार सुरेख दिसतात. पूर्वी पच्चीकार लोकांस राजे लोकांच्या कपड्यावर रत्नें बसविण्याचें काम मिळत असे. श्रीमंत खंडेराव महाराज गाइकवाड यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी तयार करविलेली चादरही असल्या मौल्यवान कामाची अखेरची झुळुक समजली पाहिजे. ..जसा दिव्याचा प्रकाश मोठा होऊन तो विझतो त्याप्रमाणे या रत्नखचित चादऱ्येच्या रूपानें आमच्या देशांतील पच्चीकारांचा लोप झाला. कापडावर कान करितांना अकीकांत बसवितात त्याचप्रमाणे सोन्याच्या पत्र्याचीं कोंदणें करून त्यांत ते बसवितात.

 आंगठीत बसवितांना रत्नें खुलीं ठेवण्याची चाल युरोपियन लोकांपासून आम्ही घेतली आहे असें किपलिंग साहेबांचें मत आहे. हलक्या हिऱ्याच्या मागें बेगड बसविणें किंवा फुटलेला हिरा सारखा कांतून बेमालूम बसविणें हीं कामें आमच्या लोकांस अजून साधलीं नाहींत. मुंबई व कलकत्ता या शहरीं दिल्लीचे पच्चीकार येऊन राहिले आहेत. बंगाल्याकडे रत्नजडित काम फार थोडें होते, त्याचीं कारणें दोन आहेत. एक खरे राजघराण्यांतील पुरुष तिकडे नाहींत, आहेत ते पदव्या धारण करणारे आहेत. व दुसरें इंग्रजी विद्येच्या प्रभावामुळें श्रीमंत लोकांस दागिन्याची फारशी आवड राहिली नाही. अकीक, लाल व स्फटिक यांच्या माळा, आंगठ्या, लोलक इत्यादि जिनसा तयार होतात; त्यांचे वर्णन “ मणीकारांचे काम " ह्या सदराखाली पुढें दिलें आहे.

साहेब लोकांकरितां तयार होत असलेले देशी दागिने.

 हल्लीं युरोपियन लोकांची भक्ति आसाम व ब्रम्ह देशांतील दागिन्यांवर बसत चालली आहे. हिंदुस्थानांत डाका, कटक, लखनौ, दिल्ली व त्रिचनापल्ली या शहरीं युरोपियन लोकांचे दागिने तयार होत असतात. हे बहुतकरून चांदीचे असतात. त्यांचा आकार युरोपियन तऱ्हेचा असून त्याजवरील नक्षीकाम देशी धर्तीवर असतें. कटक येथील काम चांदीच्या तारेचेंच असतें. सोळा भार शुद्ध चांदी व एक भार कथील एकत्र आटवून सांच्यांत ओतून त्याच्या लगडी करितात. ह्या लगडी ठोकून लहान मोठ्या जंत्रीतून ओढून त्याच्या बारीक तारा कारतात. नंतर अभ्रकावर एका प्रकारची चिकोटी लावून त्याजवर तारेची नक्षी चिकटवितात. आणि मग त्याला ठिकठिकाणी डाग देतात. हे दागिने साफ करणें व त्यांस झील देणें ही कामें मोठ्या कौशल्याचीं आहेत.

 कटक येथें साहबे लोकांकरितां तयार होत असलेल्या कांहीं दागिन्यांचें वर्णन खालीं दिलेलें आहे.

 लिलिब्यांगल्स--कमळाचीं फुलें एका ठिकाणीं माळून तयार केलेलें कंकण.
 लिलिनेकलेस--वरप्रमाणेंच कंठ
 लिलिब्रेसलेट--वरप्रमाणेच कंकण.
 लीलिब्रोच--कमळाच्या आकाराचें गळ्यांतील फूल.
 लिलिइयररिंग--वरच्याप्रमाणेंच कानांतील फूल.
 डायमण्ड ब्यांगल्स--चांदीच्या बिलोरी बांगड्या.
 डायमण्ड ब्रोच-गळ्यांतील बिलोरी फूल.
 लिफ ब्रोच--पानाच्या आकाराचें गळ्यांतील फूल.
 लीफ ब्यांगल्स--पानाची नक्षी ज्यावर काढलेली अशी बांगडी.

 बटर फ्लाय ब्रोच
 बटर फ्लाय नेकलेस यांत फुलांच्या बदला पाकोळ्या असतात.
 बटर फ्लाय ब्रेसलेट
 बटर फ्लाय इयर रिंग

 हंत्रीवजा दागिने-- याच तऱ्हेचे तयार होतात.

 कटक येथें तयार होणारे सर्व दागिने सुमारें तीनशें रुपयांस विकत मिळतात. ते खरेदी करून पुणें येथील सर्व संग्रहालयांत ठेवून गांवच्या सोनारांस वारंवार दाखवून त्यांजकडून त्याच प्रकारचे दागिने तयार करविले तर या जुन्या राजधानीत एक नवीन धंदा सुरू केल्याचें श्रेय येणार आहे. असलेंच काम डाक्यासही होत असतें. या डाका शहरीं पूर्वी 'मंदिला' या नांवाचें फारच बारीक काम होत असे. परंतु अलीकडे तसलें काम कोठेच दृष्टीस पडत नाहीं.
 वायव्य प्रांतांत युरोपियन लोकांकरितां लखनौ शहरीं पुष्कळ दागिने तयार होतात. हें काम बिलोरीच असतें. परंतु त्याजवर इतकी झील देतात कीं, कधीं कधीं त्याजवर हिऱ्यासारखी चमक मारते.हा धंदा करणारे दिल्लीचे लोक इतके हुशार आहेत कीं, त्यांच्यापुढें कोणताही नमुना ठेवा ते त्याची हुबेहूब प्रत उठवून देतात मेहेरबान किपलिंग साहेबांचें असें ह्मणणें आहे कीं दिल्लीच्या सोनारांनी हिंदुस्थानांतील सर्व सोनारांचा धंदा आपल्या स्वाधीन करून ठेविला आहे. मद्रासेंतील "स्वामी" ची नक्षी ह्मणजे देवादिकांच्या मूर्तीची नक्षी ही सुद्धां ते साहेब लोकांच्या दागिन्यांवर करूं लागलें आहेत. घड्याळाच्या सांखळ्या तर शेंकडों तऱ्हेच्या तयार करितात. युरोपियन तऱ्हेच्या साखळ्या पुढें ठेवून त्यांत कांहीं फेरफार करून देशी रूप त्यांस देऊन त्याच पुनः युरोपियन लोकांस विकतात. परंतु ही अमुक तऱ्हा आपल्या देशांतील पूर्वीच्या तऱ्हेवरून बनविली आहे असे गिऱ्हाइकाच्या लक्षात येऊं देत नाहींत. इतके ते कुशल आहेत. या लोकांचे काम कधीं कधीं इतके नाजूक असतें की युरोपियन लोकांस त्याची नक्कल सुद्धां करितां येत नाही. "बाभूळ काम" ह्मणजे बाभळीच्या फुलांसारखें काम हेंच फार बारीक असतें. दिल्ली येथें हस्तिदंतावर काढलेल्या बारीक तसबिरीचें पाठीमागे वर्णन केलेंच आहे. त्याच्या माळा व कंकणे करून विकितात. तसेच सोन्या रुप्याचे नाण्यासारखे तुकडे पाडून त्यापजवर मिन्याचें काम करून त्याच्याही माळा करितात. हलक्या सोन्याच्या बारीक पत्र्यावर शंभर नंबरी सोन्याचीं फुलें किंवा रत्नें बसवून त्यांत लाख भरून त्याचेही दागिने करितात. कधीं कधीं पोवळीं, तैलस्फटिक अथवा जुनीं नाणी यांचेही दागिने करितात.

 मद्रास इलाख्यांतील व मुख्यत्वेकरून त्रिचनापल्ली शहरांतील “स्वामी" दागिने युरोपखंडांत पुष्कळच प्रसिद्धीस आले आहेत. पाश्चिमात्य आकाराचे दागिने करुन त्याजवर देवांच्या मूर्ति काढून विकण्याचा सपाटा सुरू आहे. त्रावणकोर, कोचीन, साऊथ कानडा व विजगापट्टण या शहरींही असले दागिनें होऊं लागले आहेत. मदुरा, चिंगलपट, कर्नूल, सालेम, अनंतपूर, कृष्णा, मलबार, गोदावरी व तंजोर या सर्व जिल्ह्यांत असलें काम होतें. आमचे महाराष्ट्र देशांतील सोनार मात्र स्वस्थ झोंपा घेत आहेत. त्यांचे डोळे लवकर उघडतील तर बरें.

मिन्याचे दागिने.

 मिन्याचें काम करण्याची माहिती आमच्या लोकांस जरी प्राचीनकाळापासुन आहे तरी हल्लींच्या काळीं या धंद्याला तेज नाहीं. जयपूर, अलवार, दिल्ली व बनारस या गांवीं मिन्याचें काम सोन्यावर होतें. मुलतान, भावलपूर, काश्मीर, कांग्रा, कुल्लू, लाहोर, सिंधहैदराबाद, कराची, अबट्टाबाद, नूरपूर, लखनौ, कच्छ, आणि जयपूर या ठिकाणीं मिन्याचें काम चांदीवर होतें. काश्मीर आणि जयपूर येथें तांब्यावर हें करितात. या सर्व ठिकाणांत जयपूर येथें होत असलेल्या सोन्यावरील मिन्याच्या कामाची कोणत्याही देशांतील कारागिरांच्याने बरोबरी करवत नाहीं, इतकें तें सर्वोत्कृष्ट असतें. एक साहेब ह्मणतात:--" या सोन्यावरील मिन्यांतील रंग इंद्रधनुष्याची सुद्धां बरोबरी करण्यास समर्थ आहेत व ते जयपूर येथील कारागीर अशा रीतीनें वापरतात कीं, त्यांत सुधारणा करण्यास काहीं मार्गच रहात नाहीं, ह्मणजे त्यांत बेरंग मुळींच नसतो.

 जर्नल आफ इंडियन आर्टस् नांवाच्या त्रैमासिक पुस्तकांत जयपूरच्या मिन्याबद्दल खालीं लिहिलेला मजकर डाक्टर हेडले यांनीं छापला आहेः--
 " मिन्याचे काम दोन प्रकारचें आहे-एक ज्या दागिन्यांवर मिना जडवावयाचा आहे त्याजवर बायकांच्या डोक्यांतील दागिन्यांप्रमाणे घडींव नक्षी करून तिच्या पोकळींत रंगारंगाची पूड घालून तो भटींत जाळावयाचा. दुसऱ्या प्रकारांत तारेचें नक्षीदार काम करून तें सोन्याच्या तबकडीवर बसवून त्यांत रंगारंगाची पूड घालून जाळावयाचा. जयपुरास सोनार लोक प्रथम दागिना घडतात; नंतर तो घडई लोकांकडे जाऊन त्याजवर नक्षी घडून येते. ही नक्षी करण्याला लागणारीं पोलादी हत्यारें फारच साधीं असतात, परंतु त्यांनीं काम मात्र फार सुरेख होतें. पोलादाच्या हत्यारानें नक्षी केल्यावर अकिकाच्या खड्यानीं झील देतात, व अखेरीस नक्षीच्या खोचींतून पैलू पाडतात. या पैलूंमुळें रंग नीट चिकटतो इतकेंच नाहीं, तर त्यामुळें उजेडाची चमकही विशेष भासते. पैलू मारून दागिना तयार झाला ह्मणजे त्याजवर “ मीनाकार " आपल्या हातानें रंगारंगाची पूड टाकितो.त्यांत ज्या रंगास ज्यास्त आंच लागते, ती पहिल्यानें टाकतो. हे मिन्याचे रंग कांचेसारखे टिसूळ असतात व ते लाहोर येथून मणिहार नांवाने प्रसिद्ध असलेल्या मुसलमान लोकांकडून घ्यावे लागतात. खुद्द जयपूर येथील कारागिरांस हे रंग तयार करितां येत नाहींत. रंग कांचेवर चढविलेले असतात. व ते तयार करण्यांत मंडुरासारखी कांहीं भस्में (आक्झाइडस ) वापरण्यांत येतात. जयपूर संस्थानांतीलच खेत्री नांवाच्या शहराजवळ भगोरिया गांवीं कोबोल्ट या धातूचें भस्म सांपडते, त्याचा निळा रंग होतो. सोन्याच्या भांड्यावर सर्व जातीचे रंग उठवितां येतात. चांदीवर काळा, हिरवा, निळा, पेवडी, नारंगी, किरमिजी व विटकोरी इतके रंग उठवितां येतात. तांब्याच्या भांड्यावर पांढरा, काळा, गुलाबी हे रंग वठतात. त्यांतही गुलाबी रंग वठवतांना जयपूर येथें बरेच वेळां भट्टी बिघडते. कोणकोणत्या रंगास जास्त आंच द्यावी लागते हें कळण्याकरितां त्यांचे नंबर लाविले आहेत तेः--पांढरा, निळा, हिरवा, काळा व तांबडा. लालडीचा उत्तम तांबडा रंग सर्वच कारागिरांस साधत नाहीं. हा वठविणारे लोक जयपुरास सुद्धा फारच थोडे आहेत. सन १८५१ सालच्या युरोप खंडांतील पहिल्या प्रदर्शनांत बक्षिसें देण्यास नेमलेल्या परीक्षकांस या तांबड्या रंगाच्या अंगीं असलेल्या पारदर्शकत्वानें अगदीं चकित करून सोडलें होते. अलवार येथील मिनाकार जयपुराहूनच तेथें गेले आहेत. ते तांबडा रंग वठवितात हें नवल नाही. परंतु दिल्ली शहर-कीं जेथें लाखों रुपयांचे मिन्याचे दागिने नेहमीं तयार होतात -तेथल्या देखील मिनागार लोकांची मजल जेमतेम नारिंगी रंगापर्यंत येऊन पोहोंचते पुढें जात नाहीं."

 जयपुरास तायत्या, पेट्या, कांकणें, वाळे, बांगडया, गळसऱ्या, पदकें इत्यादि पुष्कळ दागिने मिन्याचे होतात. उत्तम प्रकारचें मिन्याचें काम स्वदेशी दागिन्यांवर त्यांच्या पाठीमागच्या बाजूला किंवा कडेवर अजूबाजूला होत असतें; कारण त्यांच्या दर्शनीं बाजूस हिरे माणकें जडविलेलीं असतात. जयपुरास कइरीच्या आकाराची सोन्याची मिना चढविलेली डबी तयार होते, ती साहब लोकांस फार आवडते; तिचा उपयोग उत्तर हिंदुस्थानांत अत्तराचा फाया ठेवण्याकडे करितात.

 युरोपियन लोकांकरितां केलेल्या कंकणांवर दोनही बाजूंस मिन्याचें काम करावे लागतें. मिना चढविलेली पदकें दुहेरी सांखळ्यांनीं गुंतवून त्यांच्या माळा करतात, त्यांस इंग्रजीत 'नेकलेस' ह्मणतात. हीं पदकें बहुतकरून रूपयासारखीं वाटोळी असतात व त्यांच्या दोनही बाजूस मिन्याचें काम असतें. असलें काम प्रतापगड व रतलाम या गांवी होतें. सोन्याचे किंवा रुप्याचे घुंगुर करून त्यावर मिन्याचें काम करतात, व तें सांखळ्यांत गोंवून त्यांच्या माळा व घड्याळांचे छेडे करतात.     सन १८७२ सालीं मेहरबान पॉवेल साहेब यांनी पंजाबी हुन्नरावर एक पुस्तक लिहिलें आहे, त्यांत बनारस येथें मिन्याचे काम होतें असे तें लिहितात; परंतु सन १८८० सालापासून आह्मी १३ प्रदर्शनांचे काम केलें, त्यांत कोठेही बनारस येथून या कामाचे नमुने आलेले पहाण्यांत आले नाहीत. बनारस येथे मिन्याचे काम करविल्यास होईल असे कित्येकांचे ह्मणणे आहे.

 पंजाबांत, दिल्ली, कांग्रा, मुलतान, भावलपूर, जंग आणि हजारा या गांवीं मिन्याचें काम होतें. परंतु त्या सर्वात दिल्लीचेंच काम नांवाजण्यासारखे आहे. जयपुरांतील कामांप्रमाणेच याही कामास परदेशस्थ गिऱ्हाइकेंच जास्त मुलतान, जंग आणि कांग्रा या गांवचा मिना बहुतकरून पिरोज रंगाचा असतो या कामासंबंधाने किलिंगसाहेबांचे असें ह्मणणे आहे कीं, "तांबडा व पांढरा रंग फारसा कोठें आढळत नाहीं; व या रंगाच्या आंगी पारदर्शकत्व नाहीं. मिनां चढवितांना घडीव काम करून त्यावर मिना चढवितात. परंतु हें घडीव काम छिनीनें ठोकून केलेलें नसतें. ठशावर (थप्पा) सोन्याचा किंवा चांदीना पत्रा ठेवून त्याजवर ठोका मारून नक्षी वाढवितात. भावलपुरास मिन्याचे ठळक ठळक दागिने होतात. तेथील एकदोन रंगाचा मिना मात्र पारदर्शक असतो. हजारा या गांवी हिरवा व पिंवळा या दोनच रंगाचा मिना तयार होतो, व तोही हलक्या प्रतीचा असतो."

 दंतकथा अशी आहे कीं, चारशें वर्षांपूर्वी नौलू नावाच्या एका मनुष्यानें प्रथम हा हुन्नर मुलतानांत आणला, त्यांत झालेली सुधारणा मागाहून आस्ते आस्ते झालेली आहे. नौलू हें नौरोजी या पारशी नांवाचें मूळ स्वरूप आहे, व मिन्याचें काम इराणांत चांगलें होते, या दोन गोष्टींचा विचार केला ह्मणजे हा हुन्नर इराणांतून आमच्या देशांत आला असावा असें अनुमान होतें.

 कांग्रा येथील सोनारलोक बारीक सारीक दागिन्यांवर मिन्याचें काम बरें करतात. हातांतील आंगठ्या, जोडवीं, तायत्या, पेट्या, डुल असल्या जिनसा तेथें विशेष होतात. त्यांच्या नक्षींत कधीं कधीं चित्रविचित्र पुतळे असतात. हे जरी वेडेवांकडे दिसतात तरी त्यास विद्रूप ह्मणतां येत नाहीं. महिरापीची एक रांग काढून तिच्यांत लहान लहान पाखरें बसवून त्यांची एक माळच्या माळ करून दाखविण्याची कांग्रा येथें सर्व साधारण चाल आहे. युरोपखंडांत तयार झालेला कोणचाही दागिना तेथील सोनारांपुढे ठेविला असतां ते त्याची हुबेहूब नकल करतात अशी त्यांची कीर्ति आहे.

 विकानेर येथेंही काही मिन्याचे काम होतें, पण तें डोकीचे दागिने, तलवारीच्या मुठी, असलेंच काम होतें. एक तोळा चांदीवर मिना चढविण्यास दोन रुपये मजुरी पडते. अलवारचें काम विकानेरपेक्षा कांहीं बरें असतें.

 आसाम प्रांतीं जोरहात येथेंही मिन्याचें काम होतें. त्यांत निळा, हिरवा व पांढरा हे तीन रंग आढळतात. मडमांच्या गळ्यांतील पेट्या, डूल, कांकणे व माळा ह्याही तिकडे होऊं लागल्या आहेत.

 इंदोर व रतलाम येथें एका प्रकारचा खोटा मिना होऊं लागला आहे. हें काम कोणत्या प्रकारानें करितात हें अजूनपर्यंत बाहेर फुटलें नाही. परंतु असें ह्मणतात की, सोन्याचा पातळ पत्रा घेऊन त्याची फुलें कातरतात व तीं कांचेवर बसवितात. त्यामुळे ती दुसऱ्या बाजूने पाहिलीं असतां मिन्यासारखी दिसतात. ह्या मिन्याच्या कामांत कधीं कधीं सोन्याच्या किंवा चांदीच्या बारीक तारेची नक्षी बसवून देतात. त्यामुळें त्यास विशेष शोभा येते. [ मिन्याबद्दल आणखी माहिती मिन्याची भांडी या सदराखाली येईल. ]

हलक्या धातूचे दागिने.

 हलक्या धातूचे ह्मणजे पितळेचे, कथलाचे, काशाचे वगैरे दागिने सर्व देशभर होतात. त्यांत बंगाल्यांत व वायव्येकडील प्रांतांत जास्ती होतात. हे दागिने बहुधा गळ्यांत, हातांत किंवा पायांत घालण्याचे असतात. त्यांत हसळी, वाळे, कडी, पाटल्या, वाक्या, तायत्या, गोठ, तसेंच पायरी ह्मणून एक पायांत घालायाचा जड दागिना व बतेसी या नांवाच्या मणगटापासून कोपरापर्यंत घालावयाच्या बांगड्या व खारू नांवाचे चपटे चुडे हे मुख्य आहेत. गुजराथेंत खेडाजिल्ह्यांत पितळेचे भले जाड लंगर करितात.
 मद्रास इलाख्यांत मद्रास, मदूरा, आणि कृष्णा येथें हलक्या जातीचे दागिने होतात. हे बहुतकरून तांब्याचे असतात. मानव जातिविशिष्ट शास्त्रीय ज्ञानाचा अभ्यास करणारास ह्या दागिन्याचा पुष्कळ उपयोग आहे. कौशल्य शास्त्राचा अभ्यास करणारासही हे दागिने पुढें ठेवून त्यांतील नक्षीच्या नमुन्यावर नवीन वेलबुट्टी काढण्यासही उपयोग होतो, असले हलके दागिने जयपुरास पुष्कळ लोक तयार करतात. हे ओतींव असतात. मेणाचा व मातीचा सांचाकरून त्यांत सोन्याच्या हत्रीवजा वाक्याचा उत्तम नमुना जयपुरी सोनार पांच चार मिनिटांत तयार करितात. अगदीं प्राचीन काळचे दागिने रानटी लोकांत वापरतात. कारण त्यांच्यांत अजून सुधारणेचा प्रकाश पडून परदेशांतील नव्या नव्या जिनसा आपल्या घरांत भरण्याची स्फूर्ति झाली नाहीं. व त्यांजजवळ असलेले वडिलोपार्जित जुनाट दागिने विकण्यास काढले तर त्याजपासून कांहीं उत्पन्न व्हावयाचें नाहीं. त्यामुळें ते तसेच शिल्लक आहेत.

खोटे दागिने.

 सोन्या रुप्याच्या दागिन्यांसारखे खोटे दागिने जिकडे तिकडे हल्लीं होतात; व पूर्वीही होत असत. मृच्छकटिक नाटकांत अशा दागिन्यांबद्दल उल्लेख आहे. त्याजवरून पाहतां प्राचीन काळीं खोट्या दागिन्याचा अभाव होता असें नाहीं.

 पुण्यास खोटे दागिने अगदीं हुबेहुब खऱ्या सारखे होतात. व ते चांगल्या शोधक मनुष्याच्या हाती न गेले तर खरेच आहेत असे वाटण्याचा संभव आहे. मुंबईस कांही लबाड लोक असले खोटे दागिने खिशांत घालून रस्त्यांत फिरतात व कोणी बाहेर गांवचा गैर माहित मनुष्य दृष्टीस पडला की त्याच्या जाण्याच्या रस्त्यावर टाकून आपण बाजूस कोठे तरी उभे राहतात. हा नवखा आपल्यास सोन्याचा दागिना सांपडला आहे असे समजून तो उचलतो न उचलतो इतक्यांत वरील भामटा जवळ येऊन उभा राहतो. व मला त्यांतला भाग दे नाहीतर पोलिसांत वर्दी देईन अशी धमकी देतो. पाहुणा लालचीला लागून त्या भामट्यास आपल्या भागींत घेण्याचा यत्न करितो. पुढें दागिना विकावयाचा न विकावयाचा त्याची किंमत ठरवावयाची या गोष्टीचा मुख्य विचार करून अशी मसलत ठरते कीं दुकानांत किंवा सोनाराकडे जाण्यांत कांहीं अर्थ नाहीं. अपसांतच किंमत ठरवून एकानें दुसऱ्यांस अर्धी किंमत द्यावी ह्मणजे झालें. किंमत ठरविणें व त्या कामांत एकमेकास सहलत देणें या कृत्यांत भामटा तरबेत असतो. तो अखेरीस असें ठरवून आणितो कीं पाहुण्यानें त्यास अमुक रुपये द्यावे व त्यानें आपला हक्क सोडावा. या प्रमाणें रुपये हातांत पडले कीं लागलेच भामटे बुवा पोबारा करितात. पाहुणे घरीं येऊन मोठ्या आनंदाने आपल्या आप्तमित्रांस एकीकडे बोलावून साधलेली शिकार दाखवितात. व अखेरीस पस्तावा पावून ५० रुपये देऊन चार आण्याचा माल घेतला या बद्दल चुरचरत बसतात. पुढें 'तेरेबी चीप् और मेरीबी चीप्.' पोलिसांत वर्दी देतां येत नाहीं व भामटा पुन्हा हातीं लागण्याचा संभव नाहीं व मिळाला तर आपण चोराचे भागीदार बनणार ही भीति आहेच. अशा रीतीनें पुष्कळ लोकांचें नुकसान झालेलें आमच्या कानीं आलें आहे. तेव्हां पुढें ही गोष्ट वाचून त्यांनी सावध रहावें अशी आमची त्यांस सूचना आहे. रस्त्यांत सांपडलेला दागिना खरा असो अगर खोटा असो तो पोलिसांत द्यावा हा उत्तम मार्ग व त्यांत एखादा भामटा हातीं लागत असेल तर त्यासही सरकार दरबारीं पोहोचविण्याचें साधलेच तर तेंही काम मोठ्या चतुराईनें उरकून घ्यावें.

 बंगाल्यांतही कोठें कोठें खोटे दागिने तयार होतात.

 हलक्या प्रकारचे खोटे दागिने ह्मणजे ते दुरून खऱ्या सारखे दिसावेत परंतु जवळ घेऊन पाहिले तर त्याच्या खोटेपणाबद्दल कधींच शंका राहूं नये. असले दागिने दिल्लीस पुष्कळ तयार होतात. मेहेरबान किपालिंग साहेब यांनीं या दागिन्याचें जें वर्णन केलें आहे त्यावरून यांचे अंगीं सुबकपणा व स्वस्तपणा हे दोन्ही गुण चांगलेच असतातसें दिसतें. आलीकडे त्यांचे स्वरूपांत भेसळ दृष्टीस पडूं लागली आहे; परंतु कसबाची इतकी कमाल आहे कीं अस्सलाचा भाग कोठपर्यंत व भेंसळ कोठून याचा निर्णय ठरविणें मुष्किल होतें. त्यांच्या स्वस्ताई बद्दल ही अशीच विस्मयकारक हकीकत आहे. निरनिराळ्या तऱ्हेच्या, निरनिराळ्या जिनसेच्या व निरनिराळे रीतींने गाठवलेल्या अशा ३२ माळांची किंमत अवघी दोन रुपये. या सर्व कारणानीं दिल्ली या जिनसांबद्दल फारच प्रसिद्ध होऊन बसली आहे.

बांगड्या व चुडे.

 कांचेच्या बांगड्या व लाखेचे चुडे जिकडे तिकडे होतात. आपल्या देशांत तांबडी, हिरवी, आणि काळी या तीन रंगाची कांच होते. परंतु लाखेच्या रंगाचा मात्र नेम नाहीं. सुरतेस चुडे फार चांगले होतात. पितळेच्या पाटल्या करून त्यांजवर लाख चढवून त्या लाखेवर टिकल्या बसवून तयार केलेले चुडे दोन आण्यापासून सहा आण्यापर्यंत विकत मिळतात. कांचेवर लाख चढवून केलेले चुडे ह्याहून स्वस्त मिळतात. गाझीपूर, बनारस, लखनौ, आणि दिल्ली या गांवीही बांगड्या व चुडे तयार होतात. बंगाल्यांत हजीपूर, पाटणा, भागलपूर, आणि मुर्शिदाबाद येथेंही बांगड्या व चुडे तयार होतात. शिवापूर येथें लिंगाईत कासारी लोक बांगड्या तयार करीत असतात. हे लोक पूर्वी हैदराबादेहून कांच आणीत असत परंतु अलीकडे "कांच बांगडीवाले" लोक चुरमुरे डाळें घेऊन सर्व गांवभर फिरतात. व त्याच्यावर कांच मिळवितात. ठाणें जिल्ह्यांत चिंचणी येथें रंगी बेरंगी कांचेचे फारच चांगले चुडे तयार होतात. शिवापूरच्या बांगड्या अगदींच हलक्या असतात. चिंचणीचे चुडे व गजरे पांढरे सफेद असून त्यांत रंगारंगाचे नागमोडी पट्टे असतात. सुमारें चोवीस वर्षामागें अल्लीभाई गुलाम मोहिदीन नावाच्या मनुष्यानें हे चुडे व गजरे करण्याची प्रथम सुरुवात केली. पुण्याच्या प्रदर्शनाकरितां हल्ली असले चुडे, गजरे, 'राणीचा बावटा' या नांवाच्या नवीन तऱ्हेच्या बिलोरी बांगड्या, टांक बसविण्याकरितां दांड्या [हान्डल्स ] व काठ्या आल्या आहेत. असल्या सामानास कलकत्ता प्रदर्शनांत सन १८८३ सालीं लायकीचें सर्टिफिकेट मिळालें होतें. परंतु त्या सामानापेक्षां हल्लींचें सामान फार चांगले आहे.

 'राणीचा बावटा' या नांवाच्या बांगड्या ह्या चिंचणीच्या बांगड्यावरून तयार होऊन विलायतेहून इकडे आल्या. त्याचा इतिहास असा आहे कीं, सन १८८३ सालीं कलकत्ता येथील प्रदर्शनांत चिंचणीचे चुडे व गजरे गेले होते. ते पाहून विलायतेच्या एका साहेबानें ते सर्व आमच्याजवळ विकत मागितले. असला माल एकदम एकाच व्यापाऱ्यास देणें आम्हांस पसंत पडलें नाहीं त्यामुळें साहेब महशूर निराश होऊन त्यांनी तसलेच दुसरें पुष्कळ सामान आह्मांस सांगून चिंचणी येथून पत्र लिहून आणविलें. पुढें लंडन शहरी या साहेबांची व आमची गांठ पडली तेव्हां त्यांनी तोच माल पुन्हा मागितला. ही गोष्ट झाल्यानंतर थोड्याच महिन्यांनी जुबिली आली त्या वेळीं हा 'राणीचा बावटा ' झळकला. या गोष्टीवरून प्रदर्शनांतील माल नुसता पाहून सुख न मानतां त्याजपासून व्यापार धंद्यास कांहीं तरी फायदा होईल असले उद्योग करण्याचा कित्ता आपण गिरविला पाहिजे हा बोध होतो.

 खेडा जिल्ह्यांत कपडवंज येथे कांच तयार होते तिच्याही बांगड्या करितात.
 मद्रास इलाख्यांत व्यंकटगिरी या गांवी अशीच कांच तयार होते.

 असाम प्रांतीं सिलहेट जिल्ह्यांत करीमगंज गांवीं लाखेचे चुड़े तयार होतात. लाख मातींत कालवून तिचे चुडे करून त्यांजवर रंगारंगाची शुद्ध लाख चढवितात.

 दिल्लीस लाखेचे चुडे करून त्यांजवर टिकल्या व बेगड लावितात. कांहीं चुडयांवर पहिल्यानें बेगड लावून त्यांजवर पाण्यांत कालविलेल्या रंगाने नक्षी काढून मग रोगण चढवितात. चुडे बहुतकरून बायकाच करितात.

 रेवा व इंदूर या गावीही लाखेचे चुडे होतात.

शिंपांचे दागिने.

 शंख कापून त्याच्या बांगड्या करून त्यांजवर लाखेची व सोनेरी वर्खाची नक्षी करून बंगाल्यांतील सर्व जातींच्या बायका पूर्वी घालीत असत. अलीकडे सुधारणेच्या प्रकाशामुळें कलकत्याकडे ही चाल बंद पडलो आहे; परंतु खेड्यांपाड्यांतून पुष्कळ बायकांच्याहातांत ह्या बांगड्या दृष्टीस पडतात. असल्या बांगडया हातांत घालाव्या असें शास्त्र आहे. अशी बंगालच्या लोकांची समजूत होती. अजूनही लग्नाच्या वेळीं मुलीचा बाप तिला शंखाच्या बांगड्यांचा आहेर करतो. डाका शहरीं मडमाच्या उपयोगी पडण्या सारख्या शंखाच्या बांगड्या अलीकडे तयार होऊ लागल्या आहेत. सिलहेट या गांवींही ह्या बांगड्या आयत्या विकत मिळतात. बंगाल्यांतील पूर्वेकडील प्रांतांत अजूनही सर्व जातीच्या हिंदू सवाशिणी शंखाच्या बांगड्या घालितात.

हस्तिदंताचे, शिंगाचे व लाकडाचे दागिने.

 हस्तिदंताचे मोठमोठाले चुडे अमदाबाद, सुरत, खेडा, मूर्शिदाबाद, कटक, अमृतसर, सियालकोट, मुलतान, पाली व इंदोर याठिकाणीं होतात. घड्याळाचे छेडे ख्रिस्त्यांच्या गळ्यांतील खुरूस, इत्यादि जिनसाही ठिकठिकाणीं होतात. बंगाल्यांतील सारणगांवाहन कलकत्त्याच्या प्रदर्शनांत हस्तिदंती बांगड्या आल्या होत्या. टिप्पेरा नांवाच्या बंगाल प्रांतांतील ईशान्येकडील जंगलांतील एकाप्रकारचे रानटी लोक कानफाट्या लोकांप्रमाणें कानांत हस्तिदंताचें वळें घालितात.

 हस्तिदंती बांगड्यांबद्दल मेहेरबान किपलिंग साहेबानें खाली लिहिलेला मजकूर प्रसिद्ध केला आहे:-साहेब महशूर ह्मणतात. " हस्तिदंती बांगडी ह्मटली मणजे एक मोठें वळे असतें, त्याच्यावर नक्षी खोदलेली, किंवा जाळी काम खोदून तें कधीं सुशोभित केलेलें आमच्या अजून दृष्टीस पडलें नाही. खरें ह्मटलें असतां एतद्देशीय कारागिरांस असले काम सहज येणार आहे. असल्या बांगड्या तयार न होण्याला कांहीं जातिबितीचा प्रतिबंध असावा असें आह्माला वाटतें. पंजाबांत लग्नाच्यावेळीं मुलीच्या मामानें तीस तांबड्या, हिरव्या, काळ्या किंवा बेगड लाविलेल्या अथवा त्यांजवर बारीक रेघा किंवा वर्तुळें खोदलेल्या अशा हस्तिदंताच्या बांगड्या बक्षीस द्याव्या अशी चाल आहे. उंच वर्णाच्या बायका ह्या हस्तिदंती बांगड्या लग्न झाल्यापासून एक वर्षभर हातांत ठेवून पुढें त्या काढून त्यांच्याबदला सोन्या रुप्याच्या घालितात. हिंदुलोकांतील कांहीं जातीच्या बायका असल्या बांगड्या नेहेमीं वापरतात. परंतु त्यांस रंग दिल्यामुळें हस्तिदंत झांकून जातो. त्या लांकडासारख्या दुसऱ्या एखाद्या अतिस्वस्त पदार्थांच्या केल्या असाव्या असा भास होतो. पंजाबाप्रमाणें मुंबई इलाख्यांत मध्यप्रांतांत राजपुतान्यांत व बंगाल्यांतील कांहीं भागांत बायका हस्तिदंती बांगड्या वापरतात. मुंबई बंदरांत जितका हस्तिदंत आयात होतो त्यांतील बहुतेक भाग राजपुताना रेलवेच्या जोधपूरकडे जाणाऱ्या फांट्यावर पाली नांवाचें एक स्टेशन आहे तिकडे जातो. हा पालीगांव मुंबईपासून अमदाबाद व अजमीर या गांवाहून दिल्लीकडे जाणाऱ्या जुन्या रहदारीच्या रस्त्यावर आहे. या गांवच्या हस्तिदंती बांगड्यांची पूर्वीपासून फार ख्याती आहे. हिंदुस्थानांतील हुन्नर व्यापाराच्या प्रसिद्ध जागा सोडून एखाद्या भलत्याच ठिकाणी असलेल्या आडगांवीं कसा वृद्धिंगत पावतो याचें हें एक उदाहरण आहे. असें कां होतें हें मात्र आमच्या लक्षात येतनाहीं. पाली गांवीं बांगडी करणाऱ्या लोकांच्या दुकानांनी रस्तेच्या रस्ते व्यापून टाकिले आहेत. खांद्यापासून मणगटापर्यंत एका खालोखाल एक अशा हस्तिदंती लहानमोठ्या बांगड्या तयार करितात व त्या राजपुताना प्रांतांतील पश्चिमेकडील बहुतेक सर्व संस्थानांत वापरल्या जातात."
 हत्वा येथील महाराजानीं अबनुसचे व हस्तिदंताचे चुडे कलकत्ता येथील प्रदर्शनांत पाठविले होते. मुंबई, सुरत व अमदाबाद या गांवीं लांकडाचे हस्तिदंतासारखे चुडे करून त्यांजवर लाखेचा तांबडा रंग देतात व वर कधीं कधीं बेगड लावितात. हस्तिदंताच्या चुड्यावर सोन्याचे पत्रे लावून तयार केलेला एक जोड जुनागडच्या नवाबानें लंदन येथील प्रदर्शनांत पाठविला होता. गेंड्याच्या शिंगाचे ह्मणजे खड्गपात्राचे चुडे व आंगठ्या खंबायतेहून याच प्रदर्शनांत गेल्या होत्या. राजकोटास व मोंगिर येथें ढोरांच्या शिंगाच्या बांगड्या व आंगठ्या होतात. अबनुसचे व सुपारीच्या लांकडाचेही दागिने मोंगीर येथें करितात. परंतु ते अलीकडेसच होऊं लागले आहेत. व त्यास गिऱ्हाइकेंही पाश्चिमात्यांपैकींच मिळतात. असलें दागिने हल्लीं ग्लासगोच्या प्रदर्शनांत पाठविले आहेत. गळ्यांतील माळा व इतर दागिने आणखी पुष्कळ लांकडापासून किंवा बियापासून आपल्या देशांत तयार करितात. खाली लिहिलेली यादी डाक्तर वॉट साहेबांच्या कोशांतून घेतली आहे.

 गुंज--काळ्या तोंडाच्या गुंजा, शिंप्या, व इतर काळ्या रंगाच्या बिया यांच्या माळा किंवा मणगट्या करितात.
 वालगुंज-- याच्याही माळा करितात.
 अडुळसा-- याच्या लांकडाचे मणी करून उत्तर हिंदुस्थानांत माळा करितात.

 बेल-- याच्या लांकडाचे किंवा फळाच्या कवचीचे मणी कांतून हलक्या जातीचे बंगाली हिंदु लोक आपण मुसलमान नाहीं असे दाखविण्याकरितां आंगावर घालितात.

 सोला-- या लांकडांतील गीर रंगवून व त्याजवर बेगड चढवून मूर्तीवर किंवा नवरा नवरीच्या अंगावर त्याच्या माळा घालितात.

 कृष्णागर--या सुगंधी लाकडाच्या माळा करून शोकी लोक गळ्यांत घालितात.
 सुपारी--सुपाऱ्या कांतून त्याचे मणी करून त्याच्या माळा करितात. मोंगीर येथें सुपारीच्या लाकडाचे दागिने करितात.

 बांबू--मणीपूर येथील तोकुलनाग नांवाच्या जातीचे लोक बांबूची वळीं कानांत घालितात.

 ताड--संताळ जातीच्या मुली ताडपत्राचे दागिने करून अंगावर घालितात दक्षिणेकडे त्याजवर लाखेची नक्षी काढितात.
 तूर--याच्या लाकडाचे मणी करितात.
 कर्दळ--याच्या बियांच्या माळा करितात.

 बजरबट्टू--घोडयाच्या अंगावर घालण्याकरितां व मुसलमान लोक आपल्या    गळ्यांत घालण्याकरितां याच्या माळा करितात. मुलांच्या गाठल्यांत बजरबटू असलें म्हणजे दृष्ट पडत नाहीं असें भोळे लोक समजतात.

 भेर्ली माड--याच्या बियांचे मणी होतात.

 गवताचें बीं-- यांत दोन प्रकार आहेत. एकांत बीं बहुतकरून वाटोळें असून पांढरें किंवा काळें असतें. याच्या माळा करितात. हिंदुस्थानाच्या पूर्वेकडील सरहद्दीवरील लोक तें खातात. दुसऱ्या प्रकारचें बीं अर्धा इंच लांब असो. करिन नांवाच्या जातीचे लोक या बियांची पोतीच्या नक्षीप्रमाणें आपल्या कपडयावर नक्षी करितात. असामांतील नाग या जातीचे लोक या बिया कुड्यासारख्या कानांत घालितात, व त्याचे इतर सुबक दागिने बनवितात.

 कापूस--मणीपुराच्या उत्तरेकडील नाग नांवाचे लोक कानांत व डोक्यांत कापसाच्या गुंड्या किंवा झेंडू करून घालतात.

 टेंभूरणी--एका जातीच्या टेंभूरणांच्या लांकडाची कुडीं करून ब्रम्ह देशांतील लोक कानांत घालतात.

 रुद्राक्ष--पंचमुखी रुद्राक्ष शिवभक्त गळ्यांत, कानांत व हातांत घालतात इतकेच नाही तर डोक्यांत सुद्धा त्यांच्या माळा बांधतात. जावा बेटांत उत्पन्न होणारी धाकटे रुद्राक्ष ह्मणून एक जात आहे तिच्या माळा कोंगाडी लोकांत वापरतात. खोटे रुद्राक्ष लांकडाचे करितात. रुद्राक्षाच्या माळा, "ब्रौच", कुंडलें, मणगटया इत्यादि पदार्थ पाश्चिमात्यांस फार प्रिय झालेले आहेत. लंडन येथील प्रदर्शनांत कांहीं व्यापारी चार आण्याची माळ बारा आण्यांस विकीत तरी हजारों खपल्या.

 सिकी--या हिमालय प्रांती उत्पन्न होणाऱ्या झाडाच्या बियाच्या माळा करितात.

 झैतून--वरप्रमाणें

 अलशी-जवस--सहारणपूर येथील सरकारी मळ्यावरील मुख्याधिकारी मि० डुथी यांच्या आढळण्यांत असें आले आहे कीं, अळशीच्या लाकडाचे मणी करितात, परंतु आमच्या इलाख्यांत असें कोठें आढळत नाहीं.

 कमळकाकडी--कमळाचे बीं याच्या माळा करितात.

 तुळस--तुळसीच्या लाकडाच्या मण्याच्या माळा प्रसिद्ध आहेत.  भात--तांदुळाच्या भाताच्या माळा बंगाल्यांतील बर्दवान जिल्ह्यांतील गुशकारा गांवाहून कलकत्ता प्रदर्शनांत आल्या होत्या.

 पुत्रंजीव--मुलांच्या गळ्यांत कोणी कोणी याच्या माळा आयुष्यवर्धन हेतूनें घालितात.

 बोरू--आसाम प्रांतीं बोरूचे तुकडे कानांत घालतात. कानाची भोकें मोठीं व्हावीं ह्मणून त्याचा गीर त्यांत बसवितात.

 चंदन-अजमिरास मुसलमान लोक चंदनाच्या मण्याच्या माळा करून विकतात.

 बूरी--सिल्हेत प्रांतीं या झाडाच्या बियाच्या माळा भूतबाधा न व्हावी ह्मणून मुलांच्या गळ्यांत घालतात.

 फराप्त--याच्या लांकडाचे दागिने करतात.

 राळ--एका प्रकारच्या राळेचे मणी करून गारोडी लोक सांचे मणी ह्मणून विकतात.


प्रकरण ५ वें.
धातूंचे पदार्थ.

 सोनें, रुपें, तांबें, पितळ इत्यादि धातूंचे जितकें सामान हिंदुस्थानांत होतें तितके इतर कोणत्याही जिनसाचे होत नसेल. इतर देशांतील लोक दगडाची हत्यारे वापरीत होते. त्यांच्या पूर्वी आमच्या देशांतील लोकांना हत्यारांची माहिती होती इतकेंच नाही, तर ते आपल्या हत्यारांवर सोन्यारुप्याची नक्षी करून त्यांस हिरेमाणकें जडवीत असत. ऋग्वेदांत सोन्याच्या भांड्यांविषयी दिग्दर्शन केलें आहे. त्वष्ट्रा नांवाचा ( दैविक शिल्पकार ) मनुष्य धातूंचीं भांडीं फार उत्तम तऱ्हेचीं करीत होता. परंतु रिभू नांवाचे लोक देवपूजेची भांडी त्याच्याही पेक्षा फार सुरेख करीत त्यामुळें त्यांस आपले प्रतिस्पर्धी मानून त्यांस मारण्याचा प्रयत्न तो करीत होता.व वेदांतच एका ठिकाणीं असे लिहिले आहे कीं त्वष्टा याने त्यांच्या कौशल्याची आपण होऊन पुष्कळ तारीफ केली आहे. पुराणांत तर सोन्यारुप्याच्या व इतर धातूंच्या भांड्यांविषयी पुष्कळ ठिकाणी उल्लेख आहे. कालिका पुराणांत सोन्याच्या भांड्यांत जेवलें असतां वात, पित्त व कफ यांचा नाश होतो व दृष्टी साफ होते असें लिहिले आहे. रुप्याच्या भांडयानें पित्ताचा नाश होतो परंतु वात व कफ हीं वाढतात. तांब्याच्या भांड्याचा उपयोग केला असतां बुद्धि वाढते. परंतु रक्त व पित्त यांचा प्रकोप होतो. पितळेच्या भांड्यांनी कफाचा नाश होतो परंतु ती ऊष्ण आहेत व त्यांच्यामुळें वात वाढतो. लोहचुंबकाच्या भांड्यांमुळे जलत्वक्* कामीण ( कावीळ ) व पंडु रोग यांचा नाश होतो. लोहचुंबकाशिवाय इतर दगडांचीं व मातीचीं भांडी अशुभ मानली. आहेत. लांकडाचीं भांडी शक्तिवर्धक, तेजोद्दीपक व विषविकारनाशक अशीं मानली आहेत."

 वैदिक व पुराणिक कालाच्या अलीकडे म्हणजे बौद्ध धर्माची प्रवृत्ति झाली त्या वेळीं धातूंची भांडी सर्व देशभर वापरीत असत याबद्दल लेख जिकडे तिकडे सांपडतात. या हिंदुस्थानदेशांतील वापरावयाचीं घरांतील भांडी धातूंची असतात. यूरोपखंडांत अजूनही मातीचीं व कांचेचीं भांडीं वापरतात. अलीकडे तिकडे द्रव्यसंचय झाल्यामुळें चांदीचीं भांडीं प्रचारांत येऊं लागलीं आहेत इतकेंच नाही तर बऱ्याच ठिकाणीं सुवर्णपात्रेंही दृष्टीस पडतात.

 पितळेचीं व तांब्याचीं भांडीं पुष्कळ उपयोगांत आहेत त्यामुळें त्यांचे आकार किती प्रकारचे आहेत याचें स्वतंत्र वर्णन करण्यास एक ग्रंथ लिहावा लागेल. ह्यांतील कांहीं आकार भोपळ्यासारख्या झाडाच्या फळापासून घेतले आहेत. उदाहरणार्थ तुंबी. कांहीं भोंवरी व कमळासारख्या फुलापासून घेतले आहेत; उदाहरणार्थ-पडघीचा प्याला, तबक. काही जनावरांच्या शिंगापासून घेतले आहेत; उदाहरणार्थ कर्णा. प्रत्यक्ष भोपळे, पानें वगैरे यांचा अजूनही उपयोग होत आहे. आमचे सन्याशी लोक धातूंचीं भांडी टाकून भोपळ्याचा कमंडलू वापरतात. केळीची पानें, करमळाची पानें, पोईसराचीं पानें व वड, फणस इत्यादि पानांच्या पत्रावळीही आमच्या वापरण्यांत आहेत. खड्गपात्राचा व गव्याच्या शिंगाचा देवपूजेंत उपयोग होतो. देवाचीं भांडीं तांब्याचीं असावींत असा पुष्कळांचा समज आहे तरी पितळेचीं भांडीं पुष्कळ लोक वापरतात.


* जलोदर या रोगानें पोटांत पाणी होतें. त्याप्रमाणें जलत्वक् या रोगांने सर्व शरीरावर असलेल्या त्वचेंत पाणी होतें. या रोगास मराठींत साधारणतः आपण सूज म्हणतो. परंतू सूजेचे प्रकार अनेक आहेत. म्हणून तो शब्द येथें वापरला नाहीं. याचें कारण त्याच्या अंगचा सोन्यासारखा मोहक रंग हें असावें. पितळ चकचकीत ठेवण्यास मेहनत फार लागते, म्हणून काशाची भांडीं वापरण्यांत येऊ लागली असावींत. कासे, चार भाग तांबें व एक भाग कथील, यांच्या मिश्रणानें होतें असें म्हणतात. पितळ, तीन भाग तांबें व एक भाग जस्त यांपासून होतें. मुसलमान लोक पितळेच्या भांड्यांपेक्षां तांब्याचीं भांडीं फार वापरतात, व त्यांस ते आंतून बाहेरून कल्हई लावितात.

सोन्यारुप्याचीं भांडी.

 ऋग्वेदांत सोन्याच्या भांड्यांचें वर्णन आहे हें मागे सांगितलेंच आहे. प्राचीन ग्रंथांतून सुद्धां याविषयीं उल्लेख आहेतच. आनंद प्रदर्शित करण्याकरितां एकमेकांस नजराणा द्यावयाचा तो सोन्याच्या तबकांत घालून पाठवीत असत, असें सर एडविन आरनोल्ड यानें कपिलवस्तु या गांवीं सिद्धारथ राजपुत्राच्या जन्माचें वर्णन करितांना लिहिलें आहे. फार प्राचीनकाळचीं सोन्याचीं भांडीं आपल्या देशांत हल्लीं कोठें शिल्लक असतील कीं काय तें कळत नाहीं. असल्या मौल्यवान जिनसा मोठमोठ्या राजवाड्यांत किंवा जुनाट देवस्थानांत असावयाच्या. परंतु राज्यक्रांतीमुळे या दोन्हीही ठिकाणीं इतकी उलथापालथ झाली आहे कीं तिच्यामुळें बहुतेक सर्व मौल्यवान धातू सोनाराच्या मुशीत ओतल्या जाऊन त्यांचें पुनःपुनः रूपांतर झालें असावें अशी आमची समजूत आहे. तशांतून एखादा जिन्नस चुकून कोठें राहिला असला तर तो किती वर्षांचा जुना आहे हें कळण्याची पंचाईत पडते कारण आमचे इतिहाससुद्धां कवी राजांच्या हातीं सांपडून रूपांतर पावले आहेत. सर जॉर्ज बर्डवूड या प्रसिद्ध विद्वानाचें मत असें आहे कीं जलालाबाद या गांवीं एका बौद्ध इमारतींत एक पंचपात्री सांपडली आहे तिच्यापेक्षां जुनें सोन्याचें भांडें कोठें आढळण्यांत नाहीं. या पंचपात्रीत कांहीं नाणीं होतीं त्यावरून ती येशु ख्रिस्ताच्या पूर्वी ५० वर्षे राज्य करीत असलेल्या एका राजाच्या वेळीं घडली असावी असें दिसतें.

 या सुवर्णपात्राविषयीं साहेब महशूर यांच्या पुस्तकांत खालीं दिलेल्याप्रमाणें मजकूर दिला आहे.
 "या पंचपात्रीचा वरचा व खालचा गलथा या दोहींस माणकें जोडलेलीं आहेत, व त्यांच्या मधून मधून श्रीवत्स काढले आहे. तिच्या चौफेर आठ कोनाडे आहेत त्यांत चार चित्रें आहेत ह्मणजे एकेक चित्रें दोनदां दिलें आहे. कोनाड्याच्या बाजूला चौकोनी खांब काढून त्यांजवर कमानी काढिल्या आहेत. या कमानीची आंतली बाजू अर्धगोलारुती आहे व बाहेरून मधोमध टोंक आहे. दोन कमानीच्यामध्यें राहिलेल्या त्रिकोणाकृती जागेंत पंख पसरलेले बगळे आहेत. ह्या भांड्यावरील नक्षीकाम फारच सर्वोत्कृष्ट आहे."

 ह्या पंचपात्रीवर हल्लीं इंडियासरकाराची मालकी आहे. व ती लंडन शहरांतील साउथ केनसिंगटन नांवाच्या सर्वसंग्रहालयांत ठेवण्यांत आली आहे.

 सोन्यारुप्याचीं भांडीं हल्लीं या देशांत फार थोडीं होतात, कारण स्वदेशीय राज्यें कमी होत चाललीं आहेत. साहेब लोक नकस कामाचीं चांदीचीं भांडीं विकत घेतात. परंतु विलायतेस चांदीवर जकात द्यावी लागते त्यामुळें या धंद्यास मिळावें तितकें उत्तेजन मिळत नाहीं. ही जकात उठेपर्यंत नकस काम करणाऱ्या सोनारांचा धंदा चांगल्या रीतीनें चालेल असें आह्माला वाटत नाहीं.

 चांदीच्या नकस कामांत हल्लीं कच्छभूज येथील कारागिरांची मोठी कीर्ती आहे. काश्मीर प्रांतीं गंगाजमनी रुप्याचीं भांडीं होतात ह्मणजे चांदीच्या भांड्यावर नक्षी खोदून तिजवर सोन्याचा मुलामा देतात, परंत मधून मधून रुप्याचा भाग तसाच दाखविलेला असतो. नक्षींत बहुतकरून पत्तीच सोडविलेली असते. पाणी पिण्याची सुरई हें भांडें फार करून काश्मीरी सोनारांच्या दुकानांतून तयार मिळतें.

 अलिकडे इंग्रज लोकांकरितां चहाचीं भांडी, दारूचे प्याले वगैरे जिनसा होऊं लागल्या आहेत. सुरईचा आकार साहेब लोकांस फार पसंत आहे. या भांड्यावर सोन्याचे वेल खोदून त्यांत मधून मधून चांदी दिसती ठेविल्यामुळें त्यास फारच शोभा येते; व सोन्याचा रंग सुद्धां विशेष खुलून दिसतो ,हें नकस काम मोंगलबादशाहांनीं हिंदुस्थानांत आणलें असें ह्मणतात;तरी सर जार्ज बर्डवुड साहेब यांचें असें ह्मणणें आहे कीं काश्मीर प्रांतीच्या रहिवाशी लोकांच्या अंगीं असलेलें नैसर्गिक कौशल्य या हुन्नरास उंच पदास चढविण्यास कारण झालें यांत शंका नाहीं. प्याले व तबकें हीं सुरईप्रमाणेच सुरेख दिसतात. युवराज प्रिन्स ऑफ वेल्स हिंदुस्थानांत आले होते त्यावेळीं त्यांस काश्मीरच्या महाराजांनी एक तबक व सहा बशीप्याल्याचे जोड नजर केले त्यांजवरील काम फार सुबक आहे.

 काश्मीरी चांदीचें काम सुमारें सव्वा रुपया तोळ्यानें विकतें. मिन्याचें काम करणारे लोकच काश्मिरास चांदीची भांडी करतात; ह्यांत श्रीनगर येथें राहणार अहमदजू व हबिवजू हे प्रसिद्ध आहेत.

 पंजाबांत दिंल्ली, कपरथळा, जलंदर, अमृतसर आणि लाहोर या गांवीं सोन्यारुप्याची भांडीं करितात. मोठी भांडीं तयार करणारा दिल्लींत काय तो एकच इसम आहे. पंजाबांत गांवोगांव सोनार आढळतात, परंतु ते दागिने करण्याचे व सावकारीचें काम करण्यांत निमग्न असतात. सोन्यारुप्याची मोठीं भांडीं राजे लोकांस लागतात, परंतु तीं त्यांच्या पदरीं असलेले 'दरबारी' सोनारासच करावीं लागतात. साहेब लोकांकरितां ह्मणून पंजाबांत भांडीं तयार होत नाहींत, कोठें जरूर लागलीच तर "तलियार" या नांवानें प्रसिद्ध असलेले कासार लोक तेवढीं घडून देतात. पंजाबांत चांदीचीं भांडी चांगलीं होत नाहींत असें मेहेरबान पॉवेल साहेबांचेही ह्मणणे आहे. हे साहेब ह्मणतात " नेटिव लोकांच्या घरांत असलेली चांदीची भांडीं अगदींच विद्रूप असतात. नक्षी करून किंवा कांहीं भाग चकचकीत व कांहीं खडबडीत असा ठेवून भांड्यांस शोभा आणणें तद्वेशीयांस ठाऊकच नाहीं. चांदी शुद्ध असली व भांडें वजनानें जड असलें ह्मणजे त्यांस बस्स आहे." हेच साहेब काश्मीराहून पंजाबांत येऊन राहिलेल्या सोनारांच्या कामाची मोठी तारीफ करितात. अमृतसर येथे कांहीं असलें सामान तयार होत असतें. कपरथळ्यास कांचेच्या प्याल्यांवर सोन्यारुप्याचे नक्षी काढलेले पत्रे बसवून शोभा आणणारे एक दोन असामी आहेत.

 कच्छभूज येथील चांदीच्या कामाची बरोबरी कोठेंच होत नाहीं. हल्लीं साहेब लोकांत या भांड्यांस गिऱ्हाईक फार आहे. मुंबईंत सुद्धां चांदीचीं भांडीं होतात परंतु तीं कच्छ येथील कामासारखींच असल्यामुळें “कच्छ सिल्व्हर " या सदराखालींच विकतात. कच्छ भूज येथें उमरसी मावजी ह्मणून एक सोनार आहे त्यास तीस वर्षांपूर्वी चांदीच्या बिल्लयासुद्धां २०० रुपये बक्षीस मिळालें. हें बक्षीस लार्ड मेयो यांच्या स्मरणार्थ मुंबई सरकाराने ठेविलें आहे. त्यांत इयत्ता अशी आहे कीं, दरसाल जाहिरातींत प्रसिद्ध केल्याप्रमाणें नेमलेला माल मुंबईतील चित्रशाळेंत दिजेंबर अखेर पाठवावा. पुढें त्याचा कमटींत तपास होऊंन बक्षीस कोणास द्यावयाचें तें ठरतें. हिंदुस्थानांतील कोणत्याही प्रांतांतील कारागिरानें माल तयार केला तरी चालतो ह्याप्रमाणें बक्षीस मिळवून उमरसी मावजीनें कच्छ प्रांताची अब्रु वाढविली आहे, त्याप्रमाणें आमच्या इलाख्यांतील इतर कारागीर पुढें सरसावतील अशी आमची उमेद आहे. असो; कच्छच्या धर्तीवर हल्लीं अहंमदनगर येथे "खरशेटजी ॲान्ड सन्स' या कंपनीने चांदीचा माल तयार करण्याची सुरवात केली आहे. खानसाहेब खरशेटजी शेट यानीं याप्रमाणें कारखाना काढून देशी कारागिरांस पोट भरण्याची सोई लावून दिली आहे. हे त्यांचे आमच्या अहंमदनगरच्या सोनारांवर उपकार आहेत. चांदीच्या भांड्यांचा व्यापार मुंबईत जितका होतो तितका इतर कोठेंही होत नाहीं. ही गोष्ट लक्षांत ठेवून आमच्या प्रांताचे वर्चस्व राखण्यास होईल तितका यत्न करणें आपलें काम आहे. असें सर्व तत्संबंधीय व्यापाऱ्यांनी समजलें पाहिजे. कच्छचें सामान तोळ्यास दीड रुपयापासून दोन रुपये भावानें विकते. अहंमदनगरचा माल खानसाहब खरशेटजी शेट यांनी मुद्दाम स्वस्त लाविला आहे. तोळ्यास तीन आण्यांपासून आठ आणेपर्यंत भावानें तें माल विकतात.

 सेंट्रल प्राव्हिन्समध्यें चंदा या गावी पूर्वी सोन्यारुप्याचें काम चांगलें असे. परंतु इंग्रजी राज्यांत जुन्या प्रकारच्या सामानास गिऱ्हाईक थोडें व नव्या प्रकारचा ह्मणजे साहेब लोकांच्या उपयोगी पडण्यासारखा माल चंदा येथील लोक तयार करीत नाहींत त्यामुळें तेथील पेठ बुडाली.

 वायव्ये कडील प्रांतांत लखनौ व रामपूर या दोन गांवी चांदीचें सामान होतें अशी ख्याति आहे, परंतु तेथें परदेशी पाठविण्यासारखा माल अजून फारसा होऊं लागला नाही. काही भाग पितळेचा व कांहीं चांदीचा असें काम लखनौ शहरीं पूर्वी होत असे,परंतु ती राजधानी मोडल्यापासून तेथील इतर हुन्नरांप्रमाणे सोनारांचाही धंदा बुडाला असें सर जार्ज बर्डवूड साहेब यांचें ह्मणणें आहे.

 सीतापुरास कांहीं चांदीचें काम होऊं लागलें आहे. परंतु त्यांत फारसा दम नाहीं. फैजाबाद व हमीरपूर येथें चांदीची माशाच्या आकाराची शिशि करितात. मथुरा जिल्ह्यांत गोकुळांत चांदीचे गाई बैल वगैरे जनावरांचे पुतळे करितात.

 बंगाल्यांत डाका व कटक हे दोन गांव खेरीज करून इतर ठिकाणीं चांदीची भांडी मुद्दाम करविल्या शिवाय होत नाहींत. या दोन शहरीं होत असलेले चांदीच्या तारेचें काम मोठें वर्णनीय आहे, परंतु त्यास मजुरी फार पडत असल्यामुळें व तें तारेच्या दागिन्याप्रमाणें युरोपियन लोकांच्या उपयोगीं पडण्यासारखे नसल्यामुळें त्यांस गिऱ्हाईक नाहीसें झाले आहे. मुर्शिदाबादेसही चांदीचें काम होतें. चितागांग येथें चांदीचे काम होतें असें सर जार्ज बर्ड वूड साहेब ह्मणतात. खडकपूर, दरभंगा, रांची व बोद या गांवी होत असलेल्या चांदीच्या माशांची बाबू त्रिलोकनाथ मुकरजी बरीच स्तुती करितात.

 काश्मीर, कच्छ, व जयपूर या देशी संस्थानांत सोन्यारुप्याचें काम करणारांस तेथील दरबारांतून मदत मिळत असल्यामुळे या तीन ठिकाणी रहाणाऱ्या सोनारांस अकरावा गुरु लागला आहे असें ह्मटले तरी चालेल. यांतील काश्मीर व कच्छ येथील सामानाबद्दल मजकूर वर आहे. आतां जयपूर येथील कारागिरीचें वर्णन करूं. जशी कच्छ व काश्मीर या प्रांतांची कीर्ति पूर्वापार आहे तशी जरी जयपूरची नाहीं, तरी तेथील महाराज व दिवाण बाबू कांतिचंद मुकरजी हे डाक्टर हेंन्डली साहेब व मेहेरबान जेकब साहेब यांच्या विचारानें वागून विलायतेस उपयोगी पडणारा माल काढवूं लागले आहेत त्यामुळें अलीकडे जयपूरचें नांव सोन्यारुप्याच्या भांड्याच्या व्यापारांत पुढें येऊं लागलें आहे. कलकत्ता प्रदर्शनांत जयपूर येथील चित्रशाळेवरील अधिकारी पूर्णचंद्र बाबू हे आले होते. त्यांनी कच्छ येथील भांडी खरेदी केलीं तेव्हांच आह्मी त्यांस सांगितलें कीं आतां असलें काम जयपुरास होऊं लागेल व पुढें लंडन येथील प्रदर्शनांत त्यांजकडून त्या-त्या प्रकारचा माल आलाही होता. ही गोष्ट आमच्या पुण्याच्या हुशार कारागिरांनी व दक्ष व्यापाऱ्यांनी लक्षांत ठेवण्यासारखी आहे. हल्लींच्या प्रदर्शनांत पुष्कळ माल आला आहे तेव्हां आम्हीच काय ते शहाणे, पुण्यांत काय ती अक्कल हुशारी वाढली गेली आहे, हा वृथाभिमान ज्यांस झाला असेल त्यांनी तो सोडून चांगले चांगले नमुने खरेदी करावे व त्याची नक्कल उठविण्याची सुरवात करावी अशी आमची त्यांस विनयपूर्वक सूचना आहे.

 टोकें येथेंही चांदीची भांडीं होतात. जयपूरच्या दरबाराप्रमाणें अलवारच्या दरबारींही सोनार ठेवून चांदीचीं व रुप्याचीं भांडीं करविण्याची सुरवात झाली आहे.    १०  झालवर प्रांती पट्टण म्हणून एक गांव आहे तेथें बगळ्याच्या आकाराचें गुलाबदान चांगलें होतें.

 बिकानेर येथें कांहीं चांदीचें काम होतें. त्याचें वर्णन करतांना बाबू त्रिलोकनाथ मुकरजी यांनीं मराठे लोकांवर थोडी आग झाडली आहे. त्यांच्या मतें आम्ही लुटारूंपणांतच प्रसिद्ध आहों. या उल्लेखाबद्दल आमचे स्नेही बाबू साहेब यांजवर न रागावतां आम्ही आमच्या कारागिरांस मात्र विनंती करितों कीं, हस्तकौशल्यांत अजून बंगाल प्रांत आमच्यापुढें जाण्यास अवकाश आहे तरी बंगाली लोक त्यांतही आपल्या स्तुत्य उद्योगानें आम्हांस मागें सारण्यास पाहत आहेत. तेव्हा आम्हीं कमरा बांधल्याच पाहिजेत. मागें पडतां कामा नये.

 ग्वाल्हेर, होळकरशाहींतील रामपूर, धार, अल्लीपूर व छत्रपूर या गांवीं सोन्या रुप्याचीं भांडीं होऊं लागलीं आहेत. धोलका, विरमगांव, अमदाबाद, जुनागड या गांवी पूर्व सोन्या रुप्याचीं भांडीं होत असात. परंतु आलिकडे सामसूम आहे.

 मद्रास इलाख्यांत दिंडिगुल, पलई, मोदावरी, तंजावर, तिसपट्टी, कोचीन व विजयनगर या गांवीं रुप्याची भांडीं होतात.

 म्हैसुरास चांदीचीं तबकें चांगलीं होतात.

 निजामशाहीत औरंगाबाद व झेलूगंडल गांवीं असलें काम होतें अशी अफवा आहे.

 ब्रम्हदेशांत होणारें चांदीचें काम मात्र आमच्या कच्छच्या कामास मागें सारील अशी धास्ती आहे.

मिन्याचीं भांडीं.

 मिन्याच्या दागिन्याचें वर्णन देतांना याबद्दल कांहीं माहिती आलीच आहे. जयपूरासारखें उत्तम काम पृथ्वींतही कोठें होत नाहीं असें आम्हांस वाटते. या सुंदर शहरी पुष्कळ जातीच्या कारागिरांस महाराजांचा आश्रय असल्यामुळें ते पिढ्यानपिढ्या तेथेंच राहिले आहेत. त्यांतच मिनागारही शेंकडो वर्षांपूर्वी तेथें जाऊन राहिले आहेत. जयपूर येथील मिन्याच्या कामाचा जुन्यांत जुना नमुना म्हणजे एक कुबडीची कांठी आहे. सोळाव्या शतकाच्या अखेरीस जयपूर येथील महाराज मानसिंग अकबर बादशहाच्या दरबारीं गेले होते त्या वेळीं ही काठी त्याच्या हातांत होती. ती बावन इंच लांब आहे व तीस लहान नळ्या एकास एक जोडून त्या एका तांब्याच्या भक्कम कांठीभोवतीं बसविलेल्या आहेत. तिची कुबडी किंवा मूळ हिरव्या अकीकाची केली असून तिजवर मौल्यवान रत्नें जडविली आहेत. शेवटली नळी खेरीज करून बाकीच्या बत्तीस नळ्यावर जनावरांचीं व पाखरांचीं चित्रें काढली असून कोठें कोठें सृष्टीतील देखावे मिन्यांत काढलेले आहेत. जनावरांचीं व पाखरांचीं चित्रें फारच सुरेख व हुबेहूब आहेत. मिन्याचा रंग फार स्वच्छ व सतेज आहे. प्रस्तुत काळीं कितीही काळजी घेऊन व जयपूर येथील कोणत्याही कारागिरानें तयार केलेल्या कामापेक्षां या कांठींचे काम फारच चांगलें आहे. प्रस्तुत होत असलेल्या सोन्यावरील उत्तम नमुना युवराज प्रिन्स आफ वेल्स यांस महाराजानीं दिलेल्या सोन्याच्या ताटावर आहे. हें ताट तयार करण्यास चार वर्षें लागलीं. व मिन्याच्या कामाचा मोठ्यांत मोठा नमुना सर्व पृथ्वीत काय तो हाच आहे. सरजॉर्ज बर्डवुड साहेबांचें असें ह्मणणें आहे कीं " हिंदुस्थानांतील मिनागार लोकांच्या कौशल्याचा हा एक ध्वजस्तंभच आहे असें ह्मटलें तरी चालेल. जयपूर येथील मिनागारांचे पूर्वजांस महाराजा मानसिंग यानें लाहोर येथून बोलावून आणिलें असें ह्मणतात. त्यांचा धर्म, व धंद्यास लागणारे साहित्याकरितां पंजाब प्रांतावर त्यांचें अवलंबन या दोन गोष्टींवरून हें ह्मणणें खरें दिसतें. चांदीवर जरी मिन्याचें काम होतें तरी जयपूर येथील कारागीर सोन्याच्याच भांड्यावर विशेष मेहनत घेऊन काम करितात. कारण चांदीवर चांगला रंग वठत नाहीं व तो बिघडण्याची विशेष भीति आहे असें त्यांच्या अनुभवास आलें आहे.

 मिना चढविण्याचे तीन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारांत भीतीवर चित्रें रंगविल्याप्रमाणे भांड्यांवर नुसता रंग चढवितात दुसऱ्या प्रकारांत नक्षी भांड्यावर पहिल्यानें ठोकून किंवा खोदून काढून तिच्यावर पारदर्शक मिना चढवितात. हें दोन्ही प्रकार अर्वाचीन आहेत. तिसरा प्रकार फार प्राचीन आहे. व त्याच्याही दोन जाती आहेत. एकींत भांड्यांच्या पृष्टभागावर धातूचे पत्रे किंवा तार ठेवून त्याची नक्षी करितात. व त्या नक्षीवर मीना बसवून तो पाटावर बसविलेल्या फुल्यांप्रमाणे वरच्यावर चिकटवितात. दुसऱ्या प्रकारांत भांड्यावर नक्षी खोदून काढून तिच्यांत मीना भरतात. आणखी एक चवथा प्रकार जपानी लोकांस माहीत आहे. त्यांत पहिल्यानें भांडयावर मिन्याच्या रंगानें नक्षी काढावयाची व नंतर त्या नक्षीच्या भोंवतीं तांब्याचे किंवा सोन्याचे पत्रें बेगडासारखे चिकटावन नंतर भांडें भट्टींत घालावयाचे. भांडयावर नक्षी खोदून तिच्यांत मीना भरण्याचा जो प्रकार सांगितला त्या प्रकारांनीं तयार केलेलें काम व जपानी लोकांनीं तयार केलेले काम एक सारखेंच दिसतें ह्मणजे दोहींतही भांड्याची मूळ धातू मिन्यापेक्षां जास्ती उचलून दिसते.

 जयपूरगांवीं हरीसिंग अमरसिंग, किशनसिंग, घूमासिंग, शामसिंग, भिसासिंग, अंबासिंग, गोकूळ व हरसूकसिंग हें मिनागार प्रसिद्ध आहेत. त्यांत हरी सिंग व किसनसिंग याची गणनां चांगल्यांत केली आहे.

 जयपूरच्या खालोखाल मिन्याचें कामांत काश्मीरचा नंबर लागतो. अलीकडे जिकडे तिकडे प्रदर्शनें होत असल्यामुळें काश्मीरास मिन्याचें काम जास्ती जास्ती होऊं लागलें आहे. व मुंबई, कलकत्ता व इतर शहरीं काश्मीरी मिन्याचीं भांडी बाजारांत पाहिजे तेव्हां आयतीं विकत मिळतात त्यांत लोटे, ताटें, तबकें, तुंब्या, सुरया, गुलाबदाण्या, मेणबत्यांचीं घरें, फूलदानें, इत्यादि जिनसा मुख्य आहेत. तांब्याच्या भांडयावर निळा रंग चांगला वठतो. चांदीच्या भांडयावर अस्मानी रंग चांगला शोभतो. काश्मीरी मिना पारदर्शक असत नाहीं.भांड्यावरील नक्षी सुद्धां काश्मीर देशांत शालीच्या नक्षीच्या धरतीवर असते. ह्मणजे तिच्यांत सुद्धा सुरूचीं व कैरी वजा झाडें असतात. कधीं कधीं मिन्याचें काम केलेल्या भांड्यावर सोन्याचें पाणीं चढवितात. मिन्याचीं भांडीं वजनावर विकतात. तीं चांदीचीं असल्यास सुमारें सव्वा रुपया तोळा व तांब्याचीं असल्यास अडीच आणे पासून चार आणे तोळा या भावानें मिळतात. काश्मीरांत अहंमदजू, हबीबजू आणि नबीजू हे कारागीर प्रसिद्ध आहेत.
 दिल्लीस पानपुडे, चौफुले, हुक्के व डब्या वगैरे लहान पदार्थ मिना चढवून तयार होतात. दिल्ली येथील काम जयपूर च्या बरोबरीनें चांगलें होतें. मुलतान जंग, भावलपूर, आणि कांग्रा या ठिकाणींही मिन्याचें काम होत असतें. जंग व मुलतान येथें कधी एखादा प्याला, कधीं तबक, किंवा कधीं दुसरें कांहीं लहानसें भांडें अशा किरकोळ जिनसा तयार होतात खऱ्या, तरी व्यापाराकरितां तेथें माल तयार होतो असें ह्मणतां येत नाहीं. भावलपुरास “भोखबा" नांवाचें एक झांकणाचें भांडें तयार होत असतें. त्याची विशेष प्रसिद्धी आहे. दारू पिण्याकरितां लहान लहान वाट्या पूर्वी राजे लोक कांग्रा येथे करीत असत असें त्रैलोक्यनाथ बाबू म्हणतात. या गांवांतील निळ्या रंगाचा मिना इतर ठिकाणच्या मिन्यापेक्षां चांगला होतो असें म्हणतात. कुल्लू या गांवीं मिन्याचे दागिने होतात.

 वायव्य प्रांतांत मिन्याच्या कामाबद्दल बनारस शहर सर्व प्रसिद्ध आहे. हें काम लखनौ व रामपूर येथेंही होतें. लखनौच्या कामाचा एक उत्तम नमुना कलकत्ता प्रदर्शनांत आला होता. हें काम एका हुक्यावरती फार चांगलें केलें होतें त्यामुळें तो खरेदी करून कलकत्ता येथील सर्व संग्रहालयांत ठेविला आहे. असा एक दुसरा हुक्का रेवा संस्थानांतूनही कलकत्ता प्रदर्शनांत आला होता. त्याच्या निळ्या रंगावर काढलेलीं पांढरीं फुलें फार सुशोभित दिसत.

 राजपुतान्यांत प्रतापगड या गांवीं खोटा मिना होत असतो. हें काम कसें करितात याची कांहीं माहिती अजून कळली नाहीं. तत्रापि सर जार्ज बर्डवुड साहेब याचें असें ह्मणणें आहे कीं, हिरव्या रंगाचा मिना सोन्याच्या पत्र्यावर ठेवून तो भट्टींत तापवितात. व वितळला म्हणजे त्याच्यावर सोन्याचीं बारीक फुलें, वेल, खबुतरें, पोपट, मोर, हरिणें, घोडे व हत्ती इत्यादिकांची चित्रे ठेवून देतात. मिना निवाला म्हणजे सोन्याच्या कामावर खोदणी करण्याचें काम करून त्याजवरील नक्षी जास्ती उठवून दिसेलशी करितात, कांहीं कांहीं कामावर याच्या उलट प्रकार दिसण्यांत येतो म्हणजे मिन्याचें काम खोदून त्याच्यांत सोनें बसविलेलें आहे असें दिसतें. परंतु हें काम कसें करितात हें कोणास ठाऊक नाहीं. रतलाम येथें असल्या तऱ्हेचें खोटें काम होत असतें.

 ब्रह्मदेशांत होणाऱ्या मिन्याच्या कामाविषयीं मेहेरबान टिली साहेबानें खालीं लिहिलेली माहिती आपल्या पुस्तकांत दिली आहे.

 "हें काम करण्यांत ब्रम्हदेशांतील पुष्कळ सोनार कुशल आहेत, परंतु काम करितांना भट्टीजवळ पुष्कळ वेळ बसून गंधकाचा धूर अंगावर घ्यावा लागतो त्यामुळें काम करण्यास कंटाळतात. काम तयार झालें ह्मणजे असें दिसतें कीं एखाद्या काळ्या पदार्थावर चांदीच्या तारेनें नक्षी काढिली असावी. प्याले, चुनाळ, तबकें, डब्या व चाकुच्या मुठी हेंच पदार्थ मुख्यत्वें करून तयार होतात. व ते इतकें गुळगुळीत असतात कीं त्याजवर हात फिरविला असतां कोठें मिना चढविला आहें हें स्पर्शेंद्रियद्वारानें कळत नाहीं. काळ्या मिन्यांत दोन भाग कथील, एक भाग चांदी व एक भाग तांबें असतें. या जिनसा विस्तवावर वितळून त्यांजवर कमजास्त मानानें गंधक टाकितात. सुमारें एक अष्टमांश इंचा एवढा चांदीचा पत्रा घेऊन त्यांची भांडीं करितात. व त्यांजवर नक्षी काढून तीं खोदतात. काढलेल्या नक्षीच्या रेघायेवढी मात्र जागा जशीच्यातशीच शिल्लक रहातें. बाकीचा सर्व भाव उकरून उकरून खोंदणीनें काढून टाकिलेला असतो. अशारीतीनें भांडे तयार झाल्यावर वर सांगितलेला मिना कुटून त्यांत थोडी सवागी टाकून तो नक्षींतून भरतात. नंतर भांडे लोखंडाच्या जाड पिंजऱ्यांत ठेऊन त्यांच्या भोंवतीं कोळसेर चून खूप आंच देतात. भांडें बाहेर काढून कानसीनें, पालीश कागदानें व कोळशानें घांसतात. व अखेरीस त्यांजवर घोटणी करितात. याकामास " नीलो" असें नांव आहे. त्यांस गिऱ्हाइकें ही पुष्कळ आहेत परंतु काम करणारे थोडे असल्यामुळें त्याची किंमत आलीकडे फार वाढत चालली आहे. ब्रह्मदेशांतील श्वेगइन शहरचा राहणारा मांगपो नांवाचा उत्तम कारागीर असलें काम करण्याबद्दल एका तोळ्यास तीन रुपये घेतों."

पत्री काम.

 तांब्याचें किंवा पितळ्याचें भांडे करून त्याच्यावर खंडोबाच्या टाका प्रमाणें चांदीच्या पत्र्याचें ठोकून केलेले पूतळे डाग लावून बसविलेले असतात अशा कामास पत्री काम ह्मणतात. हीपत्र्याची नक्षी बहुत करून मूर्तीच्याच आकाराची असते, ह्मणून मद्रासेकडे तीस स्वामीची नक्षी असें ह्मणतात. मद्रासेंत देवाला स्वामी ह्मणतात. पत्रीकाम मद्रास इलाख्यांत तंजोर गांवीं होतें. तांब्याची मोठमोठीं भांडीं करून त्यांजवर पहिल्यानें नक्षी ठोकून काढून तींत ठेविलेल्या रिकाम्या जागेंत पत्रीकाम डाग लावून अगर पाचरा सारखे ठोकून किंवा स्क्रू मारून वसवितात. याकामाची साहेबलोकांस फार आवड आहे. त्यामुळें अलीकडे तंजोर गांवीं पत्री कामाची मोठी पेठच वसली आहे. ह्या व धातूच्या इतर भांड्यांचें खाली दिलेलें वर्णन डाक्तर बिडी साहेबांच्या पूस्तकांतून घेतलें आहे.

 " तंजोर येथें 'तांबें व चांदी ' 'पितळ व चांदी' आणि 'पितळ आणि तांबें या तीन मिश्रणांची नक्षीदार भांडी तयार होतात त्याचे तीनप्रकार आहेत. पितळेचे घडीव काम पितळेच्या भांडयांवर केलेलें तांब्याचें पत्रीकाम, व तांब्याच्या भांडयांवर केलेलें चांदीचें पत्रीकाम, कधीं कधीं पितळेच्या व तांब्याच्या भांड्यांवर कथलाचे पत्रीकाम करितात. पितळेचें घडीव काम करितांना पहिल्यानें भांडयांवर ठसे मारून नंतर तीं हातोड्यानें ठोकितात. व त्यांजवरील नक्षी वरील उठवून दिसूं लागलीं म्हणजे मधली जागा नीट नेटकीं करून त्यांजवर खोंदणीनें बारीक बारीक दाणे उठवितात. शेवटीं मूर्तीवर रेखणी काम करून त्या नीट नेटक्या करितात. असलें काम बहुतकरूनगडव्यावर करण्याचा प्रघात ज्यास्ती आहे. त्यांजवर मेहेरपी काढून त्यांत मूर्ती उठवून अजूबाजूस वेलबुट्टी काढितात. हें फाम जवळ घेऊन पाहिलें असतां ओबड धोबड आहे असें कळून येतें परंतु दुर ठेऊन पाहिलें असतां फारच सुशोभित दिसतें. दुसऱ्या प्रकारांत ह्मणजे तांब्या पितळ्याच्या मिश्रणांत भांडी पितळेची केलेलीं असतात व त्यांजवरील नक्षी तांब्याच्या पत्र्याची केली असून ती नुसती लाकडाच्या पेटया करितांना कोंपऱ्यावर जशी फळ्यास कळाशी करावी लागते त्याप्रमाणें कळाशी करून बसविलेली असतें. तांबे व पितळ यां दोन्ही धातू धनवर्धनीय असल्यामुळें कळाशी बसण्यास लांकडी कामा सारखें खिळे मारावे लागत नाहींत. ती नुसती हातोड्यानें ठोकली ह्मणजे सांधली जाते. या कामांतही अखेरीस मूर्तीची रेखणी करावी लागतेच. या कामावरील नक्षी पितळेच्या घडींव भांड्यांवरील नक्षी सारखीच असते. परंतु ती जास्ती उचललेली असून पिवळ्या जमीनीवर तांबड्या रंगाची असल्यामुळें जास्ती उठून दिसते. तांब्याच्या भांड्यांवर चांदीचे पत्रीकाम हें अलीकडे होऊं लागलें आहें व हें दुसऱ्या प्रकारचाच एक पोटभाग आहे असें ह्मटलें तरीं चालेल. मात्र चांदी जास्ती मौल्यवान असल्यामुळें व तिचा अंगी धनवर्धनीयता तांब्यापेक्षां जास्ती असल्यामुळें मूर्ति विशेष सुरेख उठतात. व त्या साहेब लोकांत खपतात, ह्मणून त्याजवर महेनतही जास्ती केलेली असते. ही भांडीं जुनीं झालीं ह्मंणजे तांब्याची व चांदीची झांक नाहीशी होऊन ती विशेष सुशोभित दिसतात. उत्तर अर्काट जिल्ह्यांत तिरुपट्टी गांवी पितळेच्या भांड्यावर ठसे मारून उठविलेल्या नक्षीत तांब्याचें व चांदीचें पातळ पत्रे बसवून तें ठोकून कळाशी प्रमाणें बसवितात. या कामांतील पत्री नक्षी टिचणीनें कातरलेली असते. नाशीक क्षेत्राप्रमाणें तिरुपट्टीही मद्रास इलाख्यांत एक प्रसिद्ध क्षेत्र आहे तेथें जाणारी यात्रेकरू मंडळी असल्या प्रकारची भांडीं खरेदी करितात. त्यामुळें त्या धंद्यास बरीच तेजी आहे."

कुफ्तगारी काम.

 कुफ्तगारी काम ह्मणजे लोंखडाच्या भांड्यांवर बारीक नक्षी खोदून काढून तिच्यांत सोन्याच्या किंवा रुप्याच्या तारा बसवून त्या ठोंकून त्यांचा एक जीव केलेला असतो असलें काम हा हुन्नर प्रथमतः डमास्कस शहरीं उदयास आला व तेथेंच प्राचीन काळच्या सोनाराच्या हांतून सुधारणेंच्या शिखरांस जाऊन पोहोचला. ही सुधारणा अलीकडील नाहीं. कौशल्य संबंधाची होती. हिंदुस्थानांत हा हुन्नर इराण व काबूल या देशांतून आला. पंजाबांतील सियालकोट आणि गुजराथ या दोन गांवाची हल्लीं या कामाबद्दल प्रसिद्धी आहे तरी लाहोर, जयपूर, करवली, आलवार व दात्या इत्यादि ठिकाणींही तें होत असतें. मुलतानास महंमद मुराद नांवाच्या कारागिरानें सुमारें दोनशें वर्षापूर्वी कुफ्तगारी काम करण्याची सुरुवात केली. ह्या धंद्याची मूळ उत्पत्ति प्राचीन काळच्या महान महान योध्यांची चिलखतें व हत्यारें करण्याच्या संबंधानें झाली. ते योद्धे गेले व प्राचीन हत्यारांचा उपयोग करण्याचें कारण राहिलें नाहीं. त्यामुळें धंदाही बसत चालला. मध्यंतरी कारागीर लोकांस यूरोपियन लोकांच्या उपयोगी पडण्या सारख्या जिनसां तयार करण्याची बुद्धि झाली त्यामुळें धंद्याचें पुनरुज्जीवन झालें.

 कुफ्तगारी कामाचें महेरबान व्याडन पावेल साहेबानें केलेलें वर्णन खालीं दिलें आहे.
 "वर सांगण्यांत आलेच आहे कीं पूर्वी कुफ्तगारी काम फक्त हत्यारांवर होत असे, परंतु अलीकडे हाणामारीचे दिवस गेले व हत्यारांची जरूर राहिली नाही. त्यामुळें कारागीर लोक पंजाबांत सियालकोट व गुजराथ ह्या दोन गांवी जाऊन राहिले आहेत. व तेथें पेट्या, फुलदानें, फण्या व हातांतील बांगड्या इत्यादि पदार्थीवर नक्षीचें काम करून आपला उदर निर्वाह करितात.
 कुफ्तगारी काम ज्या लोखंडाच्या भांड्यावर करणें असेल त्यांजवर पहिल्यानें तिख्याच्या सळईनें नक्षी खोदून काढितात, या नक्षींत सोन्याची किंवा रुप्याची तार बसवितात. तारेचे सोनें अगदीं शुद्ध व नरम असतें व ती पुण्यातील तारकसी लोक वापरतात तसल्या जंत्रांतून काढलेली असते. नक्षीच्या खोचींतून बसविलेली तार हातोड्यानीं ठोकितात व नंतर भांडे विस्तवावर तापवून त्याजवरील नक्षी पुन्हा एकदा ठोकतात. त्यानंतर एका जातीच्या पांढऱ्या भुसभुशीत दगडानें घांसून भांडें चक्क करितात. कधीं कधीं नक्षींत पत्ते काढलेले असतात तेव्हां त्यांच्या रुंदीच्या मानानें हातोड्यानें कम जास्त ठोकावें लागतात." 'तहन शान ' या नांवाचा कुफ्तगारी कामाचा एक प्रकार आहे. त्यांत भांड्यावरील नक्षी खोल खोदून त्यांत सोन्या रुप्याच्या तारा बसवून त्या हातोड्याने ठोकतात व भांडें तापवून पुन्हा ठोकतात. अशा रीतीनें दोन चार वेळ भांडें तापवावे लागतें. या कामाला मेहेनत फार लागते. त्यामुळें मालाची किंमत जास्त वाढून तो सोहलतीनें विकण्यास कठीण जातें. त्यामुळें अलीकडे हलकें काम होऊं लागलें आहे.

 कुराणांतील वाक्यें किंवा एखादा दोहरा अगर प्रदर्शन कमेटीनें आह्मांस बक्षीस द्यावें अशी प्रार्थना इत्यादि लेख सोन्या रुप्याच्या अक्षरांनीं काढण्याची कारागीरांस फार हौस असते.

 पुणे येथील प्रदर्शनांत गुजराथ येथोन कुफ्तगार अहंमद अझीम हा स्वतः आला आहे.

 जयपुरासही अलीकडे कुफ्तगारी काम होऊं लागले आहे. चाकू, कातरी आडकित्ते असल्या किरकोळ जिनसांवर अलवार व लिमडी येथें कुफ्तगारी काम होत असते. दात्या येथेंही असले काम होत असतें.

 ब्रह्मदेशांत काळ्या तांब्यावर किंवा लोखंडावर कधीं कधीं कुफ्तगारी काम करितात. शेकडा पांच भार सोनें आणि थोडा गंधक तांब्यांत घालून तें मिश्रण मुशींत तापविलें ह्मणजे काळें तांबे तयार होतें.

बिदरी काम,

 कुफ्तगारी कामाप्रमाणेंच परंतु त्याजपेक्षां विशेष ढळढळीत असें काम हुक्क्यावर वगैरे होत असतें त्यास बिदरी काम असें ह्मणतात. हें नांव बेदर शहरावरून पडलें आहे. बेदरशहर दक्षिण हैद्राबादेपासून पाऊणशे मैलांवर तिच्या वायव्येस निजामाच्या राज्यांत आहे. दंतकथा अशी आहे कीं हें शहर बेदर नांवाच्या एका हिंदु राजानें ख्रिस्ती शकाच्या ४०० शें वर्षांपूर्वी वसविलें. मुसलमानांचे ब्राह्मणी किंवा (बाहामणी ) राज्य ( १३४७ इ. स.) स्थापन होईपर्यंत बेदर गांवीं हिंदुचेंच राज्य होतें. तेथील एका हिंदुराजानें आपलें देवपुजेचें तबक अशा रीतीनें पहिल्यानें तयार करविलें.त्याच्या पश्चात त्याच्या वंशजांनीं या कामांत पुष्कळ सुधारणा करविली. तत्रापि त्यांत हल्लीं दिसून आलेलें कौशल्य मुसलमान राजांच्या वेळी विशेष वाढलें. हें कबूल केलें पाहिजे. तबकासारखे
   ११ देवपुजेचें सामान जाऊन त्याच्या बदला मुसलमानी हुक्के तयार होऊं लागले परंतु कामांत फार सुधारणा झाली. बेदराहून कांहीं कारागीर लखनौस गेले, व तेथेंही या कामाची सुरवात झाली. मुसलमानी राज्य लयास गेल्यावर बिदरी कामासही उतरती कळा लागली. लखनौशहरीं या कामाची सुरवात झाल्यापासून त्याची सुमारें शंभर वर्षे एकसारखीं भरभराट होत होती असें असूनही " औध ग्याझेटियर " या पुस्तकांत त्याजबद्दल कोठें लेख सापडत नाही. मेल बोर्न, कलकत्ता, जयपूर, सिमला व लंडन येथीळ प्रदर्शनांत हा माल जाऊं लागल्यापासून मात्र या कामाचा जास्ती फैलावा होत चालला आहे.

 बिदरी काम हल्लीं बेदर, लखनौ, पुर्णिया, मुर्शिदाबाद या गावीं होत असतें. हें काम करण्यास तीन प्रकारचे कारागीर लागतात. पहिल्यानें ओंतीव भांडें तयार करून तें चरकावर फिरविलें जातें. नंतर त्यांजवर एक कारागीर नक्षी खोदतो, आणि तिसरा त्यांत कोंदणाप्रमाणे सोन्यारुप्याचे पत्रे बसवून त्यास झील देतो. निजामशाहींत मुसलमान व अमीर उमराव नवऱ्या मुलास बिदरी कामाच्या भांडयाचा आहेंर करीत असतात, त्यामुळें या धंद्याला बरीच तेजी आहे. ह्या कामास किंमत जास्ती पडत असल्यामुळें मुलीचा बाप लग्नापूर्वी कित्येक वर्षे तीं जमवून ठेवीत असतो.

 बिदरी कामाची सुरवात मुर्शिदाबादगावीं मीर इलाहिबक्ष नांवाच्या मनुष्यानें सुमारें ८० वर्षांपूर्वी केली. या इलाइबक्षाचा लक्ष्मी नांवाचा एक हिंदु चेला होता, त्याचा मुलगा पन्नालाल यानें या कामांत पुष्कळ सुधारणा केली. पन्नालाल मरून सुमारें ४५ वर्षें झाली. अलीकडे तेथें हें काम मुसलमान लोक करीत आहेत. त्यांत लाडू नांवाच्या एका स्त्रीस हें काम करितां येतें ही गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखीं आहे. बंदर येथील कारागीर लिंगाईत जातीचे हिंदु आहेत. पुर्णिया येथें कासार जातीच्या चार घराण्यांत या कामास लागणारीं ओंतीव भांडी तयार करितात. हे कासार लोक खुद्द पुर्णिया गांवीं न राहतां तेथून चार मैलांवर बिल्लोरी ह्मणून एक खेडें आहे तेथें जाऊन राहिले आहेत. भांडी खोदून तयार करण्याचें व कोंदणे बसविण्याचें काम खुद्द पुर्णिया गांवीं सोनार लोक 'धनुक ' ह्मणजे मजूर लोक व 'सुरनिज' ह्मणजे दारू विकणारे लोक आणि मुसलमान लोक करितात. लखनौ शहरीं हा व्यापार मुसलमानांच्याच हातीं आहे. परंतु ते कासार लोकांकडून भांडी तयार करून घेऊन कारागीर लोकांकडून बाकीचें काम करून घेतात. इ. स. १८८१ सालीं लखनौ शहरीं तेरा व्यापारी होते, व त्यांनीं एका वर्षांत सुमारें चार हजार रुरुयांचा माल तयार केला. इ. स. १८८२ सालीं कारागिरांची संख्या ३१ झाली, परंतु मालाची किंमत काय ती चार हजार पांचशेच झाली. बिदरी कामाची नक्षी बहुतकरून फुलाच्या आकाराची असते. पुर्णिया गांवीं होत असलेल्या कामास काहीं अंशीं चिनी कामाची झांक मारिते, त्यावरून सर जार्ज बर्डवुड साहेबांचे असें ह्मणणें आहे कीं, सिकीम व भूतान या देशांतून चिनई देशाकडचें कौशल्य पुर्णिया येथे आलें असावे. लखनौ येथें बिदरी कामांत खोदीव नक्षी करितात तिच्या ऐवजीं चांदीच्या पत्री कामाची नक्षी तयार होऊं लागली आहे. या कामास मेहनत कमी लागत असल्यामुळें तें थोडक्यांत विकतां येतें. पत्री मासे तयार करून ते भांड्यांवर बसविण्याची पद्धत लखनौच्या नबाबानीं काढिली. त्याचें कारण असें ह्मणतात कीं, दिल्ली दरबारी हा नवाब पहिल्या प्रतीच्या उमरावांत मोडत असे, व पुण्यांतील हरीपंत तात्याच्या 'जरी पटक्या' प्रमाणें या नबाबास "माहिमुरातीब" मिळालें होते. "माहिमुरातीब" ह्मणजे एका लांब बांबूच्या दांड्यावर बसविलेला एका धातूचा मासा, व त्याच्या दोन बाजूस मुलामा चढविलेल्या दोन घंटा. ही 'माहिमुरातीब ' केवळ पहिल्याच प्रतीच्या सरदारास मात्र मिळत असे, व दिल्लीच्या बादशहाच्या हातून असला मान मिळण्याचें शेवटलें उदाहरण शहाअलम बादशाहाच्या वेळीं घडून आलें. व तेंही लार्ड लेक साहेबांकरितां. हा मानदर्शक मासा सरकार दरबारीं मात्र दाखवून तृप्त न राहतां लखनौच्या नबाबानीं आपल्या घरच्या भांड्यावरसुद्धां प्रचारांत आणिला होता. पूर्णिया गांवीं दोन प्रकारचें काम होतें. एकास 'घरकी' ह्मणतात. त्यांत भांड्यावर खोल घरें खोदून त्यांत नक्षी बसविली असते. दुसरे "करणाबिदरी " या नांवानें प्रसिद्ध आहे. त्यांत नक्षी साधी असून हलकी असते. बिदरी कामांत पत्री कामाचा जो प्रकार वरती सांगितला आहे त्यास "झरबुलंद" ह्मणतात. हें काम मागें वर्णन केलेल्या तंजोर येथील पत्री कामासारखें असते. तें करितांना कोंदणे खोदण्याच्या ऐवजीं भांडीं ओततांना त्याजवर ओतीव नक्षी ओतून तिजवर पत्रें बसवून ती हातोड्यानें ठोकून नीटनेटकीं करितात. या कामांत कधीं कधीं चांदीच्या पत्र्याच्या ऐवजीं रुप्याचा मुलामा दिलेले तांब्यापितळेचे पत्रेही वापरतात.
तांबे, पितळ, जस्त, कयील, कासें इत्यादि प्रातूचीं भांडी.

 विलायतेस स्वयंपाक करण्यास लोखंडाची भांडीं व जेवण्यास चिनई बरण्यांसारखी मातीची भांडीं वापरण्याची रीत असल्यामुळें त्या देशांत तांबे व पितळ या धातूचा विशेष खप नाहीं. आमच्या देशाची स्थिति अशी नाहीं. आह्माला स्वयंपाकाला जेवणाला, देवपूजेला, पानसुपारीला, व हरएक कामाला तांब्या पितळेचीं भांडीं लागल्यामुळें सगळ्या देशभर जिकडे तिकडे त्यांचा खप आहे. तांबें व जस्त यापासून पितळ होते, व तांबे आणि कथील या पासून कांसें होते. काशास उत्तर हिंदुस्थानांत फूल ह्मणतात. स्वयपाकाचीं व पाणी पिण्याचीं भांडी नक्षीचीं नसताच इतकेंच नाहीं, तर तीं चांगल्या तऱ्हेनें स्वच्छ घांसतां यावीं म्हणून जितकीं साधीं ठेववतील तितकीं ठेवतात. आम्ही हिंदू लोक कल्हई लावलेलीं पितळेचीं भांडीं वापरतों. मुसलमानास आंत बाहेरून कल्हई केलेलीं तांब्याचीं भांडीं विशेष प्रिय आहेत.

 देवपूजेच्या भांडयांचा आकार वेगळ्या वेगळ्या प्रांतीं वेगवेगळाले आहेत. व तीं वेगळ्याला धातूंचीही करतात. बंगाल्यास देवपूजेचीं भांडी तांब्याची करितात. नाशिकास पितळेचीं करितात. देवपूजेची भांडीं करण्याच्या कामांत काशाचा उपयोग करीत नाहींत.

 समया, खंदील व इतर प्रकारचे दिवे हे मात्र काश्मीरापासून कन्याकुमारीपर्यंत पितळेचेच होतात. देवाच्या मूर्ती तांब्याच्या, पितळेच्या व इतर धातूंच्याही करितात.

 बाबू त्रैलोक्यनाथ मुकरजी स्वतः कबूल करितात कीं अलीकडे बंगाल प्रांतांत एक नवीन तऱ्हेचें तांदूळ धुण्याचें भांडें प्रचारांत आलें आहे. पूर्वी त्या प्रांती बांबूच्या टोपल्यांतून तांदूळ धुण्याची चाल असे. ते ह्मणतात हें नवीन प्रकारचें “ विलक्षण ' भांडे कलकत्ता प्रदर्शनांत मुंबईहून गेलेंले होतें. त्याचें हें वर्णन आहे. या ' विलक्षण ' भांडयाचें नांव 'रोवळी' !!!

 मुंबई इलाख्यांतील बहुतेक मोठमोठ्या गांवीं तांब्यापितळेची भांडीं, ताशे, ढोल, साखळ्या, दिवे, वगैरे करणारे कासार आहेत. मुंबई, नाशिक, पुणें, सोलापूर, हुबळी, व शिहोर या गांवीं जितके होते इतके इतर कोठें ही होत नाहीं. त्यांत ही नाशिक व पुणे हे गांव विशेष प्रख्यात आहेत. नाशिक येथील पाणी पिण्याचीं व देवपूजेचीं भांडी पुण्यांतील भांडयांपेक्षां सुरेख व विशेष झिलईदार असल्यामुळें अजूनपर्यंत तीच लोकांस विशेष प्रिय आहेत. परंतु अलीकडे रावबहादूर धाकजी काशीनाथ व इतर मंडळोनें विलायती यंत्रें आणून चांगलें झिलईदार काम करण्याचें मनावर घेतलें आहे. त्यामुळें यापुढें नाशकाचें नांव किंचित मागें पडेल असा संभव आहे. त्यांत ही एक अडचण आहेच. नाशिक ही तीर्थाची जागा आहे. व तीर्थास जाणारे हजारो यात्रेकरू तेथें गेल्यावर कांहीं तरी भांडी विकत घेतातच. असली गिऱ्हाइकी पुण्याला मिळणें फार कठीण दिसतें.

 पुणें शहरांत तीन पासून चार हजार पर्यंत तांबट आहेत. व येथें दरसाल पंचवीस लक्षाचा माल तयार होतो. खेडा जिल्ह्यांत अमोद गावीं पंचवीस तीस कासार लोक आहेत.त्यांच्याही कामाची गुजराथेत कीर्ति आहे.शिकारपुरास व लारखाना गांवीं ही पुष्कळ भांडीं होतात. या दोन ठिकाणीं वर्षास सुमारे १२०९३५० रुपयांचा माल तयार होतो. नाशीक व पुणें येथील मुख्य व्यापारी जातीचे दक्षणी कासार आहेत. तरी पुण्यांत कांहीं गुजराथी लोकांचीही मोठमोठी दुकानें आहेत. भांड्याचा व्यापार करणाऱ्या लोकांशिवाय कामगार लोक तीन प्रकारचे आहेत. एक तांबट लोक. हे मोठालीं भांडीं घडतात. दुसरे कल्हईकार अथवा ओतारी. हे लहान लहान भांडीं ओततात. आणि तिसरे चरकवाले. हे भांड्यांस झील देतात. हे कल्हईकर बेदर शहरापासून आले असावेत. नाशीक येथें ग्यानु पांडोबा या नांवाचा एक कल्हईकर आहे त्यांचे काम फार नीट नेटकें व सुरेख असतें.

 गायकवाडी राज्यांत विसानगर या गांवी भांडी तयार होतात. त्यांस काठेवाड व अमदाबाद येथे पुष्कळ गिऱ्हाइकी मिळते. दाभोई व कडी या दोन ठिकाणींही भांडीं तयार होतात.
 ह्या तांबे पितळेच्या कामांत अलीकडे पुष्कळ फेरफार होऊन त्याजवर नक्षीचे काम होऊं लागले आहे. ही नक्षीचीं भांडीं साहेब लोकांस फार प्रिय आहेत. त्यामुळें त्यांस किंमतही पुष्कळ येते. चांदीच्या भांडयावर कच्छी नक्षी होत असते त्याप्रकारची नक्षी तांब्या पितळेच्या भांड्यांवर करून तीं साहेब लोकांस विकण्याची सुरुवात करण्यांचे यश पुणें शहराकडे आहे. हें काम पहिल्यानें पुण्यासच सुरू झालें. हल्लीं मुंबईस व बडोद्यास कांहीं सोनार लोक असलें काम करूं लागले आहेत. तरी पुण्याचेच पाऊल अझून पुढें आहे. मुंबई येथील चित्रशाळेचे मुख्य अधिकारी मेहेरबान ग्रिफिथ्स साहेब यांनी तांब्याचीं नक्षीचीं भांडीं करण्याचा नवीनच प्रकार काढला आहे. तांब्याचा मोठा रांजण तयार करून त्याजवर अजंटा येथील पांडव लेण्यांत दगडावर कोरलेली नक्षी विद्यार्थ्यांकडून ते काढवितात. व तें भांडें सोनाराकडून घडवून घेतात. यांत हिंदुस्थानांतील शुद्ध आकाराचें भांडें व त्याजवर अडीच हजार वर्षापूर्वी आमच्याच लोकांनीं काढलेली सर्वमान्य व खरोखरीच देशी नक्षी या दोहीचें एकीकरण होऊन तयार झालेलें काम पाश्चिमात्यांस अतिशय प्रिय झालें आहे. तें ३०० पासून ३५० रुपयापर्यंत विकतें. याचा एक नमुना पुणें प्रदर्शनांत आहेच. अमदाबाद येथील शहाअलम मशीद व राणी शिपरीकझोपडा" या नावानें प्रसिद्ध असलेली अत्युत्तम मशीद यावरील जाळीदार व कोंरीव नक्षी याचेही नमुनें याच साहेबानें तयार करविलें आहेत. त्यांतील दोन मोठाल्या खिडक्या व आठ जाळीदार पत्रे पुणें येथील प्रदर्शनांत आले आहेत.

 ह्मैसूर प्रांतीं देवाच्या मूर्ति, समया व हिंदुधर्मात मानलेले पूज्य पशु व पक्षी यांचें पुतळे तयार होतात. परंतु तें काम सुरेख नसतें. श्रावणी, बेल्लागोळा नागमंगल आणि मगडी हीं गांवें असल्या कामामध्यें विशेष प्रसिद्ध आहेत.
 पंजाब प्रांतीं तांब्यापितळेचीं भांडीं फार होतात. तिकडे स्वयपाक घरांतून भिंतीला फळ्या मारून त्यांजवर घरांतील पितळेचीं भांडीं चकचकीत घांसून लावून ठेवण्याची चाल आहे. व ज्या घरांत भांडी जास्ती तें मोठे व श्रीमंत घराणें असें मानलें जातें त्यामुळें भांड्यांची खरेदीही देशांत फार होते. चकचकीत ताट मांडून त्याच्यावर एक मोठी समईचें झाड ठेवून तिज भोंवती असलेल्या अनेक फांद्यावर लहान मोठीं पाळीं बसवून त्यांतील सर्व वाती एकदम लावून तयार केलेल्या दिपोत्सवाच्या झाडाबद्दल पंजाब प्रांताची पूर्वी प्रसिद्धी असे. परंतु अलीकडे 'घासलेटचें' दिवे जिकडे तिकडे प्रचारांत आल्यामुळें समयाची झाडे फारच थोडीं तयार होतात. हिमालय पर्वताच्या पंजाब प्रांती असलेल्या भागांत गुडगुड्या, दौती, कलमदानें वगैरे कांहीं जिनसा तयार होतात.
 अमृतसर, पेशावर, दिल्ली, जगदि, रिवारी, हुषारपूर, दसका, गुजरानवाल व " पिंड पतन खान " या गांवीं तांब्या पितळेचीं भांडीं पुष्कळ होतात. अमृत सर येथील भांड्यावर नक्षी खोंदून कल्हई चढवितात. हा प्रकार काश्मीरी आहे. व काश्मीरच्याच कांहीं लोकानीं येऊन तेथें दुकानें घातलीं आहेत. काश्मीरास तांब्याचीं खोंदीव भांडीं पुष्कळच होतात. त्यांजवरील नक्षी फार बारीक असून ती शाली वर असलेल्या नक्षीच्या धरतीवर असते. अमृतसरास एक सोन्याचें देऊळ आहे. त्याजवरील नक्षी तांब्या पितळेच्या भांड्यावर काढून ती साहेबलोकांस विकण्याची सुरवात झाली आहे याच जिल्ह्यांत जंडियाला नांवाच्या गांवीं स्वयंपाकाचीं भांडी फार तयार होतात. रिवारी व जगद्धि या गांवीं ओतीव भांडी फार तयार होतात. पेशावरास इराणी धरतीचीं भांडी पुष्कळ तयार होतात. दिल्लीस 'डेगची ' या नांवाचे मोठे भांडें तयार होत असतें. त्यास कोठेही सांधा नसतो. लहान लहान भांड्यांवर नक्षी करणाऱ्या लोकांस दिल्लीस चटेरे ह्मणतात. नाशीक येथें चरकावरील काम करणारे आपल्यास " थटेरे परदेशी " ह्मणवितात. हें लोक उत्तरकेडचेच आहेत. बहादरपूर गांवीं भांडयांचा मोठा कारखाना आहे. दसका या गांवाची तेथील प्याल्या बद्दल फार प्रसिद्धी आहे. भावलपूर येथें नक्षींचीं भांडीं होतात. जलंदर प्रांती फगवाडा या गांवीं झील दिलेली भांडीं तयार होतात.

 वायव्य प्रांतीं अयोध्येंत सुलतानपुरी व अज्जीमगड जिल्ह्यांत उमलीपर्दा या गांवीं साधीं भांडीं पुष्कळ होतात. नक्षीचीं भांडीं बनारस, लखनौ, मुरादाबाद झांशी, ललितपूर व गोरखपूर येथें होतात. बनारसेस या भांडयां शिवाय मूर्तिही फार होतात. बनारस येथील नक्षीचीं पितळेचीं भांडीं, मुरादाबाद येथील लाख भरलेलीं नक्षीचीं पितळेचीं भांडीं, व लखनौ येथील तांब्याचीं नक्षीचीं भांडीं यांस साहेबलोकांत गिऱ्हाईके पुष्कळ मिळत असल्यामुळें त्यांची हल्ली पुष्कळ भरभराट आहे. अनेक तऱ्हेचे वेगवेगळाले आकार त्याजवर चमत्कारिक तऱ्हेतऱ्हेची नक्षी व त्यांतही त्यांच्यावर चढविलेले सोन्यासारखें पाणी या कामांत बनारसच्या भांडयाची बरोबरी करण्याचें या देशांतील कोणत्याही गांवाचे सामर्थ्य नाहीं.

 मुरादाबाद येथील लाख भरलेली नक्षीचीं भांडींही हिंदुस्थानांतही इतर कोणत्याही गांवीं होत नाहींत. त्यांजवरील नक्षी करणारे लोक मुसलमान आहेत. त्यामुळे त्यांजवरील नक्षींत प्राण्याची चित्रें आढळण्यांत येत नाहींत. सन १८७६ सालापूर्वी या धंद्यास फारसे तेज नव्हतें. त्या साली तेथें सर एडवर्ड बक हे साहेब शेतकी खात्यावर मुख्याधिकारी झाले. त्यानीं अलहाबाद येथील एका ' हॉटेल' वाल्याची पुष्कळ विनवणी करून आपल्या विलायती खाणावळींत या भांड्यांचे नमुने विकावयास ठेवण्याचें कबूल करून घेतलें. त्या 'हॉटेलांत ' विलायतेस जाणारे पुष्कळ साहेब लोक उतरत असत. त्यानीं ही सोन्यासारखी चकचकणारी व रंगी बेरंगी लांखेच्या नक्षीनीं सुशोभीत केलेलीं सुंदर भांडीं पाहून ती खरेदी करण्याची सुरुवात केली. तेव्हांपासून मुरादाबादच्या भांडी करणारांस अकरावा गुरू आला आहे. ह्या कामाचे दोन प्रकार आहेत. एक साधा व एक सियाकलम. साध्या कामांत भांड्यांवर पहिल्यानें कल्हई करून नंतर नक्षी खोदून काढितात. त्यामुळें ती पांढऱ्या जमिनीवर पिंवळी दिसते. 'सियाकलम' कामांत भांडे घडून त्याच्यावर नक्षी करितात. व त्या नक्षीच्या खोचींत काळी लाख भरतात. आलीकडे तांबडी व हिरवी लाख भरूं लागले आहेत. पुणें येथील प्रदर्शनांत मुरादाबाद येथून पुष्कळ भांडीं आलीं आहेत. व तेथील एक महंमद यारखान नांवाचे व्यापारी येथें येऊन बसले आहेत.
 लखनौ शहरीं तबकें, पानपुडे, पानसुपारीचें डबे, गुलाबदाण्या, अत्तरदाण्या इत्यादि पुष्कळ भांडीं तयार होतात. तेथील जाळीच्या कामाची विशेष प्रसिद्धी अहि. बनारस, झांशी व ललितपूर येथें गंगाजमनी भांडीं पुष्कळ तयार होतात. गोरखपूर व मथुरा येथील समयांची प्रसिद्धी आहे. सुलतानपूर जिल्ह्यांतील हसनपूर गांव अझमगड जिल्ह्यांत उमलीपट्टी गांव यांची काशाच्या भांड्यांबद्दल कीर्ति आहे.

 मथूरेस देवाच्या मूर्ति पुष्कळ होतात, व तेथें यात्रेकरू फार जात असल्या कारणानें त्या विकतातही. हमीरपुरास पंच धातूच्या मोठाल्या मूर्ति तयार होत असतात.
 बंगाल्यांत मुर्शिदाबादेस खांग्रा ह्मणून एक गांव आहे तेथें, व दरभंगा शहराजवळ झंझारपूर ह्मणून एक गांव आहे तेथें, तसेंच कलकत्ता, कांचनगड, राजशाही कृष्णागंज, इसलामबाग बांसवेरिया व कटक या सर्व गांवीं भांडीं तयार होतात. पाटणा गांवीं एका प्रकारचें पितळेचें चहाचें भांडें तयार करीत असतात त्याला गिऱ्हाइकें फार आहेत असें म्हणतात.

 मध्यप्रांतांत शिंदवाडा जिल्ह्यांत भंडारा, लोधी खेडा, हुसंगाबाद जिल्ह्यांत तिमोरणी तसेच मंडला व संबळपूर या गांवीं पितळेचीं भांडीं तयार होत असत, परंतु गेल्या दहा वर्षांत तेथील कासार लोकांचा धंदा अगदीं बसत चालला आहे. फक्त भंडारा गांवीं दोनशे घराणीं हें काम करीत असत. परंत अलीकडे ती पन्नास साठच आहेत, या प्रांतांतील कामगारांचें असें ह्मणणे आहे कीं तिकडील धंदा बसण्यास मुंबई कारण आहे. व मुंबई शब्दांत पुण्याचा समावेश होतो अशी आमची समजूत आहे. इकडील माल मध्यप्रांतांत जाऊन तेथें सवंग विकला जातो, नागपूर व भंडारा गांवच्या कांहीं कासार लोकांस बनारस येथें होणाऱ्या नक्षीच्या भांड्यासारखीं भांडीं तयार करितां येतात.शिंदवाडा येथील डेप्युटी कमिशनर आपल्या रिपोर्टांत असें लिहितात कीं नागपुरास आगगाडी झाल्यापासून त्या जिल्ह्यांतील कासार लोकांच्या धंद्यास उतरती कळा लागली आहे. दाबोहा जिल्ह्यांत जकेरा गांवीं समया तयार होतात.
 जयपुरास झील दिलेलीं भांडीं चांगलीं होतात. परंतु त्यांत तेथील गुडगुड्याची हिंदुस्थानांत फार प्रसिद्धी आहे. अलीकडे डाक्तर हेन्डली साहेबांनीं नक्षीची भांडीं करण्याचा कारखाना काढिला आहे. जयपूरचे महाराज उदारमनाचे असल्यामुळें आपल्या राज्यांतील कलाकौशल्यांस उत्तेजन देण्याचें कामीं ते फार पैसा खर्च करत असतात. त्यामुळें इतर प्रांतांतील कांहीं कारागीर तिकडे जाऊन राहिले आहेत. तेथील हुन्नर शाळेंतही नक्षीचें पितळी काम पुष्कळ व चांगलें होतें. कलकत्ता येथील प्रदर्शनांत जयपूर येथील हुन्नर शाळेवरील मुख्याधिकाऱ्यांनीं नाशिक, बडोदें, व पुणें, येथील पुष्कळ भांडीं आमच्या देखत खरेदी केली तेव्हांच, जयपुरास असली भांडीं होऊं लागतील अशी आमची खात्री झाली. व त्याप्रमाणें तयार होऊन आलेलें नमुनें लंडन शहरांत आम्ही पाहिले ही. जयपुरास पुतळ्यांच्या हातांत दिलेले दिवे, देवपुजेची भांडीं, वगैरे पुष्कळ जिनसा तयार होतात.
 चिरोवा व 'झणझण ' गांवी जस्ताच्या सुरया व हुक्के तयार करून त्यांजवर पितळेची नक्षी तयार करीत असतात. तेथें घंटा व तास हीं तयार करीत असतात.
 बिकानेर येथें काशाच्या किंवा चिनी जस्ताच्या सुरया करून त्यांस पितळेचे तोटी सुद्धां पूड बसवितात. पितळेचे दागिने ठेवण्याचे " कटोरादान" यानांवानें प्रसिद्ध असलेले डबे ही तेथें पुष्कळ तयार होतात.
 जलंदर याप्रांती डाग या गांवीं पलंगाचे गातें चांगलें तयार होतात अशी कीर्ति आहे. रकाबी, पितळेच्या दौती, कलमदानें, गुलाबदाण्या, व गरीब लोकांकरितां तयार केलेले पितळेचे खोटे दागिने तयार होतात.
 करवली गांवीं लोटे व इतर भांडीं तयार होतातच. परंतु तेथील हुक्के विशेष प्रसिद्ध आहेत. कारण त्यांजवर पारा चढवून नंतर नक्षी खोदीत असतात.    १२  धोलपूर येथेंही नक्षीचे हुके तयार करितात.

 जोधपूरच्या लोटण दिव्याची प्रसिद्धी आहे. वाटोळा पिंजऱ्यासारखा दिवा करून त्यांत फिरत्या दांडीवर एक दौतीसारखें दिवठण बसवून, त्यांत शिसें ओतलेलें असतें. त्यामुळें दिवा जमिनीवर गडबडां लोटला तरी दिवठणाचें तोंड वरतीच रहातें व दिवा विझत नाहीं. हल्लीं असले दिवे बडोदें, जयपूर व इतर पुष्कळ ठिकाणीं होऊं लागले आहेत. मारवाड प्रांतींही मागें वर्णन केलेली 'कटोरादान' नांवाची पेटी, व 'तिरोंची' नांवाची एक तिवई ह्या तयार होतात. तसेंच नगर गांवीं जवाहीर वजन करण्याचा कांटा तयार करितात. हा कांटा धारवाडी कांट्याप्रमाणें पुष्कळ प्रसिद्ध आहे.

 टोंक येथे चांगली अत्तरदाणी पूर्वी होत असे असें ह्मणतात.

 मध्य हिंदुस्थानांत तिहरी, उज्जयिनी, इंदोर, रतलाम, छत्रपूर, दात्या, रेवा व चर्खारी या गांवचीं भांडीं प्रसिद्ध आहेत. तिहरी येथें हत्ती, घोडे, व इतर जनावरांचीं चित्रें फार चांगलीं तयार होतात. उज्जयिनीस कांशाचे लोटे व चमत्कारिक देवाच्या मूर्ति तयार होतात. इंदोरचीं उपकरणीं, रतलामचें कणस, छत्रपूर व दात्या येथील दिवे व कुलुपें, ह्यांचीही प्रसिद्धी आहे. छत्रपुरास एका प्रकारचें कुलुप तयार करितात त्यांत दोन बारी पिस्तूल असतें. त्यामुळें तें उघडतांना मोठा अवाज होऊन रक्षक सावध होतो. छत्रपूर व रेवा येथें खोटे दागिने होतात. चर्खारी येथे पितळेचीं बुद्धिबळें होतात.

 मद्रास इलाख्यांत पितळेची व काशाची भांडी पुष्कळ ठिकाणीं होतात. बेलारी, करजगड, मलाबार, व विजागापटण हें गांव कांशाच्या भांड्यांकरितां प्रसिद्ध आहेत. अनंतपूर, बलारी, सालेम, मद्रास, मदूरा, मलाबार, गोदावरी, कडाप्पा, विजागापटण व तंजोर या गांवीं पितळेचीं भांडीं होतात. तिरूपट्टी या गांवचीं तबकें फार प्रसिद्ध आहेत. 'घासलेट' चें तेल निघाल्या पासून पितळेच्या समया पूर्वीपेक्षां फार कमी निघूं लागल्या असें मागें सांगितलेंच आहे. मदुरा जिल्ह्यांत 'तिरुपतूर ' व मदूरा या गांवीं, व कृष्णा या गांवीं, पितळेच्या भांड्यावर नक्षीचें काम होतें. स्वयंपाकाची भांडी कृष्णा, सालेम, मद्रास, मदुरा, मलबार गोदावरी, कडाप्पा, विजागापट्टण व तंजोर या सर्व गांवीं होतात कथलाच्या भांडयाबद्दल सालेम, विजागापट्टण व तंजोर या गांवाची प्रसिद्धी आहे सालेम व तंजोर येथें शिशाचीही भांडीं तयार होतात, बेलारीस चिनई जस्ताची भांडी तयार करितात. या भांडयांत ठेविलेले अन्न व पाणी शरीर प्रकृतीस थंडावा आणितें अशी शमजूत असल्यामुळें त्यांची विक्रीही फार होते.

 नेपाळ देशांत पट्टण गांवीं नेवार लोक देवाच्या मूर्ति, देवपुजेचीं भांडीं, तरतऱ्हेचे दिवे, व समया तयार करतात. देवळांत टांगण्या करितां ते लहान लहान घंटा तयार करीत असतात त्या घंटाच्या लोळ्यास पानाच्या आकाराचे पितळेचे पत्रे बांधितात हें पत्रे वाऱ्यानें हालल्यामुळें घंटांचा आवाज एक सारखा चालत असतो. आमच्या हिंदु लोकांच्या देवळांत बांधण्या करितां मोठाल्या पितळेच्या घंटा व बौद्ध धर्माच्या देवळांत बांधण्या करितां पंचरशी घंटा नेपाळांतच तयार होतात.

 आसाम प्रांतीही पितळेचीं व काश्याचीं भांडीं तयार होत असतात. हें काम करणारे लोक जातीचे मुसलमान आहेत व त्यांस त्या प्रांती मरिया ह्मणतात.

 ब्रह्मदेशांत बुद्धाच्या लहान मोठ्या मूर्ति, बैलाच्या गळ्यांत बांधण्या करितां लहान घंटा व घुंगुर, आणि देवळांत टांगण्या करितां पराती सारखे मोठाले तांस तयार होतात. सन १८८१ सालीं ब्रह्मदेशांत पितळेचें काम करणारे लोक कायते ५६४ होते त्यांत रंगून, प्रोम, व हंतवाडी याच गांवीं ह्याच लोकांची वस्ती फार होती. मेण दाहा भाग, व राळ साडेसात भाग, एकत्र करून त्यांत टरपेन्टाईन ओंतून तें पातळ झालें ह्मणजे पाण्यांत ओततात नंतर तूस, रेती व माती एकत्र करून त्याचा एक पुतळा बनवितात. ह्या मूर्तिवर वर सांगितलेल्या मेणाचे थर देतात व ते कोरण्याने कोरून काढितात. पुतळ्या वर पुनः माती थापतात. मात्र कोठेतरी त्याला एक भोंक ठेवावें लागतें. वर दिलेला मातीचा थर सुकला ह्मणजे तापवून त्यांतील मेण काढून टाकितात. सर्व मेण वितळून गेल्यावर मूर्तिच्या बुडाशीं असलेलें भोंक मातीनें बंद करितात. व बर असलेल्या भोंकातून त्यांत पितळेचे पाणी ओततात. पितळ एकदोन दिवस निवत ठेवून त्याच्या वरची व आतली माती काढून टाकितात व कानशीनें घांसून नंतर पालिश कागदानें साफ करून तिख्याच्या घोटणीनें झील देतात. पितळ तयार करितांना साठभार तांबें व चाळीस भार कथील घेण्याची चाल आहे परंतु चांगला माल तयार करण्याचा असल्यास ५४ /१० तांबे, ४० भार कथील, व  /१० भार जस्त घ्यावें लागत. मोठ्या घंटा करण्याकरितां एक भार तांबें, व पाऊण भार जस्त घेतात. घुंगरा करितां १० भार तांबें व  / भार कथील घेतात, व तास करण्याकरितां १० भार तांबे आणि  / भार कथील घेण्याची चाल आहे.

 पूणें, मुंबई, नरावी, कोसगड, मलावार, विजागापट्टण, तंजोर, जोधपूर, व इतर कांहीं ठिकाणीं लोखंडाचीं भांडीं होतात. तसेंच विलायती जस्ती पत्र्याचे डबे वगैरे पुष्कळ ठिकाणीं होऊं लागले आहेत.

 तांब्या पितळेची प्राचीन काळची भांडीं दृष्टीस पडणें फार कठीण आहे. कारण आपल्या देशांत जुनीं भांडीं कासारास परत देऊन नवी घेण्याची चाल आहे, त्यामुळें जुनामाल कोठें शिल्लक रहात नाहीं. हल्लीं हिंदुस्थानांतील जुन्यांत जुना गडवा विलायतेंतील एका सर्व संग्रहालयांत आहे. त्याजविषयीं खालीं लिहिलेलें वर्णन सरजाज बर्डउड साहेबांच्या पुस्तकांतून घेतलें आहे.
 "हा गडवा कुलु प्रांतीं कुंडला गांवीं इ. स. १८५७ सालीं मेजर हे साहेबांस सांपडला. डोंगराच्या एका बाजूची माती सुटून कोसळून पडली त्यामुळे तींत सुमारें सोळाशें वर्षें पुर्वीचें पुरून राहिलेलें एक लेणें सांपडले. त्यांत हा ' लोटा' होता. हा गडवा वाटोळा गरगरीत असून बैठकीजवळ थोडा थबकट आहे. व त्याचा गळा रामपात्रासारखा आहे. त्याजवर चित्रें खोदून काढिलेलीं आहेत, त्यांत गौतमबद्ध वैराग्य धारण करण्यापूर्वी राजपुत्र सिद्धार्थ या नावानें प्रसिद्ध होता त्या वेळीं निघालेल्या त्याच्या स्वारीचें चित्र आहे. त्यांत पहिल्यानें हत्तीवर बसून एक मोठा सरदार चालला आहे, त्याच्या मागें दोघी नायकिणी आहेत, त्यांत एकीच्या हातांत विणा आहे, व दुसरीच्या हातांत मुरली आहे. त्याच्या मागें चार घोडयाच्या रथांत बसून राजपुत्र सिद्धार्थ चालला आहे. व सर्वांच्या मागें दोन घोडेस्वार हातांत भाले घेऊन चालले आहेत. या सर्व चित्राचा रोंख ऐहिक विषयाच्या उपभोगाची व ऐषआरामाची प्रत्यक्ष साक्ष देण्याकडे आहे. "

 चांदीचा व सोन्याचा मुलामा देण्याचें काम कोठें कोठें होत असतें, त्यांत काश्मीर, दिल्ली व आग्रा येथील कामाची विशेष ख्याती आहे. लखनौ व रामपूर येथेंही पानसुपारीच्या डब्यांवर व तबकांवर मुलामा देण्याचें काम चांगलें होतें. विलायती तऱ्हेनें ह्मणजे विद्युल्लतेच्या मदतीनें सोन्यारुप्याचें पाणी चढविण्याचें काम हल्ली चहूंकडे होऊं लागलें आहे. त्यांत मुंबई, दिल्ली, लाहोर, अमृतसर व जयपूर या गावांचें पाऊल पुढें आहे. पुणें शहरांत मात्र या कामाची एक दोन तरी दुकानें बुधवारांत दृष्टीस पडण्याचा प्रसंग केव्हां येईल तो येवो.
चिलखतें व हत्यारें.

 ऋग्वेदांत असें लिहिलें आहे कीं ' बाण ' या हत्यारास पक्षाचे पंख लाविलेले असतात. त्याच्या टोंकांस हरणाचें शिंग असतें व तें गाईच्या आतडयांतील तातीनें बांधिलेलें असतें.' हें अगदीं फार प्राचीन काळच्या बाणाचें वर्णन आहे. या काळापुढें आमच्या हत्यारांत पुष्कळ सुधारणा होत गेली.

 पुणें येथील प्रदर्शनांत शक्ती नामक हत्याराचे नमुने आले आहेत. यांस बाणही ह्मणतात. कुरुक्षेत्रीं एका पिंपळाच्या झाडाखालीं असलेला एक फार जुनाट पार पुनः बांधण्याचें काम एका 'पुण्यशीळ ' व्यापाऱ्यानें सुरू केलें त्यावेळीं तेथें पाया खणतानां त्यास मोठ्या वरोट्या येवढाले लोखंडाचे तुकडे सांपडले, ते तपासून पाहतां असें आढळून आले कीं त्यांतील प्रत्येकाच्या एका बाजूस बारीक भोंक आहे, व त्यांत दारू आहे. हे बाण कुरुक्षेत्रीं सांपडले असल्यामुळे कौरव पांडवांच्या युद्धांतील असावेत असा कित्येकांचा तर्क आहे. एका इंग्रेजी ग्रंथकाराने १०२४ सालीं सोरटी सोमनाथ येथें झालेल्या लढाईचें वर्णन करितांना हिंदु लोकांनीं मुसलमान लोकांच्या हत्तींवर असल्या तऱ्हेचे बाण सोडले असें वर्णन आहे. त्यांत हा लोखंडी वरोटा एका मोठ्या बांबूस बांधून त्यास बत्ती लावून मोठ्या चपळाईनें शत्रूच्या अंगांवर ते फेंकून देत असें ह्मटलें आहे. तेव्हां निदान ८०० वर्षांपूर्वी असल्या बाणांच्या अस्थित्वाचा पुरावा होता असें सिद्ध होतें.

 शुक्रनीति नांवाच्या संस्कृत पुस्तकांत बंदुकीचें, तोफेचें, व दारूचें, वर्णन आहे. डाक्टर राजेंद्रलाल मित्र यांनी या ग्रंथाचे इंग्रेजी भाषान्तर केलें आहे, त्यांत नंबर १३५ पासून १५१ पर्यंतच्या श्लोकांत हेंच वर्णन केलें आहे. त्यावरून दारू व दारूगोळा प्राचीनकाळीं होता याबद्दल संशय राहिला नाहीं.

 बर्च्या , भाले, अंकुश, चक्र, तलवारी, जंबिये, परशु. गदा, त्रिशुळ, धनुष्यें, गुप्ती, धांव, वगैरे हत्यारें प्रसिद्धच आहेत. विष्णूच्या हातांतील चक्र कसें असतें हें कोणास पाहणें असेल तर त्यानें पुणें येथील प्रदर्शनांत जाऊन पहावें. हें हत्यार अजून सूद्धां पंज्याबांतील शीख लोक वापरतात. हें चक्र वाटोळें असून तल वारीच्या पानासारखें आंतून जाड व बाहेरून चपटें असतें. तें बोटावर धरून गरगर गरगर फिरवितात. व त्यास गती आली ह्मणजे एकदम शत्रूच्या अंगावर फेंकितात. कलकत्ता प्रदर्शनांत एक शीख जातीचा लष्करी कामदार आला होता, तो असें सांगत असे कीं याच आमच्या हत्याराच्या योगानें पांचशें पावलावरून शत्रूचा शिरच्छेद करितां येतो.या कामदाराच्या डोक्यांवर पागोट्यांत गुंडाळलेलीं एका पेक्षां एक लहान अशीं पंचवीस चक्रें होतीं. दुरून त्याजकडे पाहिलें असतां त्याचें काळ्या रंगाचें पागोटें डोक्यावर सुमारें दीड हात उंचोच्या जटे सारखें दिसत होते.

 अलीकडे जिकडे तिकडे शांतता झाली आहे. त्यामुळें हत्यारांची गरज राहिली नाहीं व इंग्रेज सरकारानें कायदा काढून तीं वापरण्याची बंदीही केली आहे, त्यामुळें शोभेकरितां किंवा डोल मिरविण्याकरितां सुद्धां हत्यारें घेऊन फिरतां येत नाहीं. हा धंदा अगदीं बसला आहे. तथापि कच्छ, पालनपूर, जयपूर, बडोदें व इतर संस्थानांत हत्यारें होत असतात. त्यांत कच्छ येथील हत्यारें फार सुरेख असतात. म्हणजे त्यांजवर सोन्या रुप्याची नक्षी पुष्कळ केलेली असते. तलवारी व जंबिये इत्यादिकांच्या म्यानावर तांब्याचें पत्रें लावून त्याजवर सुरेख नक्षी केलेली असते. व वर सोन्याचा मुलामा चढविलेला असतो. त्यामुळें ती फार शोभिवंत दिसतात आणि तेवढ्याच साठीं पुष्कळ लोक आपल्या दिवाणखान्यांत शोभेकरितां लावण्याच्या हेतूनें विकत घेतात.

 जयपुरासही हत्यारें होतात परंतु ती कच्छ येथील हत्यारांसारखीं शोभिवंत नाहींत.

 जयपुरास तर ढाली कागदाच्या करूं लागले आहेत, उत्तम ढाली अमदाबादेस होतात. गेंड्याच्या एका ढालीवर सुरेख नक्षी खोदून ढालगर पुरुषोत्तम खुशाल यानें एक पुणे प्रदर्शनांत पाठविली आहे. ती ३६५ रुपयांस राजपुत्र ड्यूफ आफ कॉनाट यानीं विकत घेतली.

चाकु, कात्र्या वगैरे.

 चाकू, कात्र्या, विळ्या, आडकित्ते, इत्यादि जिनसा जिकडे तिकडे होतात. तरी हल्लीं असलीं हत्यारें विलायतेहूनच पुष्कळ येतात. पुणें प्रदर्शनांत सियालकोट, गुजराथ, व दिनापूर येथन चाकू कात्र्याचे नमूने आले आहेत. तसेंच अल्लीगड येथें पोस्ट खात्याच्या संबंधानें एक कारखाना काढिला आहे त्यांत तयार झालेलीं कांहीं लहान सहान हत्यारें आलीं आहेत. गोंडल संस्थानांतून आलेलीं हत्यारें सुरेख आहेत. कच्छभूज, लिमडी, बडोदें, तळेगांव, संगमनेर, सिन्नर, तळोजें, बुलढाणा येथील आडकित्ते प्रसिद्ध आहेत.

 गोविंदराव आठवले यानीं पुण्यांत चाकू, सुऱ्या, व वस्तारे, यांजवर पाणी देण्याचा कारखाना काढिला आहे.

 पंजाब इलाख्यांत करनाळें गांवीं आडकित्ते यतार होतात. त्यांस पितळी दांडे असतात. त्यांत आरशा बसवितात. याच गांवीं तशाच कांच बसविलेल्या कात्र्या तयार होतात. पुष्कळ पातीचे चाकू करून त्यांत कात्री, बूच काढण्याचा स्क्रू, हूक, करवत, कानस, इत्यादि बरीच हत्यारें असतात. हे चाकू गुजराणवाला जिल्ह्यांत निजामाबाद येथें होतात.

 बेहेरा गांवींही चाकू, कात्री, सुऱ्या वगेरे जिनसा होतात. त्यांस मुठी दगडाच्या बसविलेल्या असतात. कधीं कधीं विलायतेहून आलेल्या मोडक्या कानशी घेऊन त्याचीं हत्यारें या गांवीं करितात. इमामउद्दीन, महंमदद्दीन, खुदाबक्ष, आणि अल्लाजोवायाँ असे तीन शिकलगार बेहेरा या गांवीं प्रसिद्ध आहेत,

 गुजराथ गांवीं कांहीं लोहार लोक चाकू, आडकित्ते, व कात्र्या, तयार करून तेथील कुफ्तगार लोकांस विकतात.

 राजपुतान्यांत जयपूर, बिकानेर, झालवार व जोधपूर या प्रांतीं चाकू, कात्र्या, आडाकित्ते वगैरे होतात. जोधपूरच्या राज्यांतील नगर गांवीं पिंचा या नांवाचें एक हत्यार तयार होतें. त्यांत चाकू, कात्र्या, व बूचकाढण्याचा स्क्रू, असे तीन जिन्नस असतात.

 मध्यहिंदुस्थानांत रतलाम येथें चाकू होतात. व छत्रपूर येथें आडकित्ते होतात. नागपूर येथील एका प्रसिद्ध शिकलगारानें आपला हत्यारें करण्याचा धंदा सोडून चाकू कात्र्या करण्याचा धंदा सुरू केला आहे, कारण त्यांत त्याला विशेष फायदा होतो. या मनुष्याचें काम नागपूरच्या आसपास बरेंच नावाजलें आहे. दाबोआ जिल्ह्यांत जोब्रा गांवींही चाकू कात्र्या तयार होतात.
 वायव्यप्रांतांत मिरत, शहाजहानपूर, व ललितपूर,या तीन गांवीं होत असलेले चाकू, कात्री, वगैरे सामान विलायती सामानासारखें तयार होतें.

 बंगाल्यांत बरद्वान प्रांतांतील बनपास गांवची पूर्वी चाकू, कात्री, आडकित्ते, वगैरे करण्याची फार ख्याती असे. हल्लींही तेथें असलें काम करणाऱ्याची ६०० कुटुंबें आहेत. कांचनगड गांवीं प्रेमचंद मिस्त्री या नांवाचा एक मनुष्य विलायतच्या तोडीचें काम करितो. सिकिम येथें हाडाच्या किंवा चांदीच्या मुठीचे चाकू होतात. नडियाद जिल्ह्यांत सेनहाद गांवीं खाटकाच्या सुऱ्या व विळे तयार होतात. चाकूच्या व सुऱ्याच्या मुठी पाटणा येथें चांगल्या होतात. सारण जिल्ह्यांत हाजीपूर येथेंही ह्या जिनसा होतात. याच जिल्ह्यांतील लवापूर येथील खेड्यांतील एका विहिरीचें पाणी चाकू कात्रीवर पाणी देण्यास फार उपयोगी पडतें, अशी समजूत आहे. परंतु त्याचा अर्थ इतकाच की तेथें कोणी तरी हुषार शिकलगार आहे. दिनापूर येथील आडकित्ते चांगले आहेत असें बंगाली लोक मानितात. खान्द्रा या नावांने प्रसिद्ध असलेली एका प्रकारची तलवार रंगपूर येथें होते. तिचा उपयोग बंगाली लोक बळी मारण्याकडे करितात. सांबराच्या शिंगाच्या मुठीच्या साहेब लोकांस जेवतांना उपयोगी पडणाऱ्या सुऱ्या राची येथें होतात.

 मद्रास इलाख्यांत सालेम गांवीं एक घराणें चाकू, सुऱ्या, व भाले, करण्यांत प्रसिद्ध आहे. कृष्णा व मलबार येथें ही असला माल तयार होतो.

तारकशी काम.

 तारकशी लोकांचें काम ज्या ज्या गांवीं मुसलमान राज्यकर्ते किंवा अमीर उमराव रहात असत त्या त्या सर्व गांवीं होत असतें. दिल्ली, बनारस, अमदाबाद, सुरत, दक्षिण हैद्राबाद, सिंध हैद्राबाद, कराची, सिकारपूर, औरंगाबाद, ही सर्व गावें तारकशी काम व कलाबतु, याबद्दल प्रसिद्ध आहेत. मुसलमान लोकांस किनखाप, व कलाबतूनें केलेलें कशिद्याचे काम वापरण्याची आवड फार, त्यामुळे त्यांच्याच आश्रयानें हा हुन्नर वृद्धिंगत झाला आहे. कलाबतू व किनखाप हे दोन्ही शब्दही त्यांच्याच भाषेंतील आहेत. हल्लीं पुणें, येवलें, व मुंबई, या तीन गांवीं तारकशी काम पुष्कळ होत असतें. परंतु येथील बहुतेक कारागीर औरंगाबाद व पैठण येथून आले आहेत. हल्लीं विलायतेंहून यंत्रांत तयार झालेली कलाबतु येऊं लागली आहे, त्यामुळें आस्ते आस्ते हा धंदा बसत जाईल असा सुमार आहे. मुंबईत मात्र दाऊतभाई मुसाभाई या नांवाच्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्यानें कांहीं यंत्रें हिंदुस्थानांतच तयार करून त्यांजवर कलाबतु तयार करण्याचा कारखाना काढिला आहे. ही यंत्रें इतर गांवीं उपयोगांत आणिलीं तर फायदा होईल. हल्लीच येवल्यास कारागीर लोकांस उपासमार होऊं लागली आहे, असें तेथील प्रसिद्ध व्यापारी नथुभाई श्यामलाल कळवितात.  पुण्यातील तारकशी लोक निजामशाहींतून येथें आले. येथें सुमारें आठशे तारकशी आहेत. त्यांत लाट सोनार, कोंकणी सोनार,खानदेश सोनार,अधेर सोनार, वैश्य सोनार, लाड. कुणबी,व परदेशी इतक्या जातीचे लोक काम करितात. सुमारें २५ घरें पावटेकऱ्याचें काम करितात. ७८ घरी तारकसचें काम होतें, व ८० घरीं चापडी याचें काम होतें. आणि २०० कलाबतु वळणारे आहेत. हें वळण्याचें काम बहुत करून बायकाच करितात. या कामांत कांहीं देशस्थ ब्राह्यणही आहेत. या शिवाय जुने जर खरेदी करून त्यांजपासून सोने रुपें वेगळे करण्याचें काम तीन चार घरीं होतें. या लोकांस गोटेवाले ह्मणतात. कलाबतु करण्यास एका प्रकारचे रेशीम लागतें. तें तयार करणाऱ्या लोकांस धुरेवाले ह्मणतात. असले धुरेवाले पुण्यांत सुमारे ८० आहेत. त्यांत पैठण आणि बऱ्हाणपुरचे मराठे व दिल्ली व आग्रा येथील परदेशी लोक, येथें येऊन राहिले आहेत. सदाशीव पेठेंतून भिकारदासाच्या बागेवरून हिराबागेंत जाताना एक बाग लागतो तेथे धुरेवाले लोक काम करितांना दृष्टीस पडतात.

 लाहोर, दिल्ली, आग्रा व इतर कांहीं ठिकाणीं खोटी कलाबतु होत असते.

 लोखंड, तिखें, व तांबें, या धातूंच्याही तारा तंबुऱ्याकरितां व सतारीकरितां आपल्या देशांत तयार होतात.

 वायव्य प्रांतांत रामपूर व बंगाल्यांत कुंजबिहार ह्या दोन गांवीं पक्की तार चांगली होते.


प्रकरण ६.
लांकडाचें नकसकाम.
लांकडावर खोंदीव काम.
प्राचीनकाळचें लांकडावरचें खोंदीव काम.

 "शिल्पकलेंत लागणारें लांकडांवरील खोंदीव काम " या सदराखालीं यां कामाबद्दल कांहीं माहिती पूर्वी दिलीच आहे. घरांत वापरण्यात येणाऱ्या लहान सहान जिनसांवरही खोंदीव काम होत असते. प्राचीनकाळीं आर्यलोक डामडौलानें राहात नसत त्यामुळें खोदून नक्षी केलेल्या लांकडी जिनसांची फारशी जरूर लागत नसे. तत्रापि सुताराची गणना गांवपंचांत होऊन त्यास बराच मान मिळे. त्याला सूत्रधार ह्मणत आणि तो युद्धप्रसंगाकारतां रथ तयार करीत असे इतकेंच नाहीं, तर सारथ्याचेही काम त्याच्याचकडे असे. ऋग्वेदांत सुताराबद्दल उल्लेख आहे; आणि मनूनें आपल्या संहितेत त्यांची एक वेगळी जातच मानिली आहे. रथाशिवाय पलंग, सिंहासन. पाटव्यासपीठ, देव्हारे इत्यादि पदार्थही सुतार लोक करीत. बृहत्संहितेंत व शिल्प शास्त्रांत झाड केव्हां तोडावें, कसें तोडावें, व लांकूड सुकवून तयार कसें करावें, व त्याच्या जिनसा कशा तयार कराव्या, हें सांगितलें आहे. पलंगाचे गाते खोंदून त्याजवर नक्षी काढण्याची चाल असे, व त्यांस कधीं कधीं सिंहाचाही आकार देत. कधीं कधीं त्यांजवर हस्तिदंत, सोनें, व रत्नें ही कोदणें खोंदून बसवीत असत. सिंहासनें पुष्कळ तऱ्हेची करीत. डाक्टर राजेंद्रलाल मित्र यांच्या “इंडो आरयन्स" नावांच्या पुस्तकांतून खालीं लिहिलेला मजकूर घेतला आहे. सिंहासनाच्या पावक्यांवर सिंहाचीं चित्रें काढीत असत, ह्मणून त्यांस हें नांव पडलें असावें. परंतु सिंहासन ह्मणजे राजाची बसण्याची जागा ह्या अर्थानें त्याची प्रसिद्धी होऊं लागल्यापासून त्याच्या नांवांतही फरक पडूं लागला. पद्मसिंहासन ह्मणजे कमळाच्या आकाराची राजास बसण्याची जागा असा अर्थझाला, मग त्यास सिंहच पाहिजेत असें नाहीं.गजसिंहासन ह्मणजे हत्तीच्या आकाराचे पावके ज्यास आहेत असे.राजासन सिंहासनाच्या पावक्यांवर कमळें, शंख, हत्ती, हंस, सिंह, घट, हरिणें व घोडे यांचीं चित्रें काढीत असत. व या पायाच्या नक्षीवरून सिंहासनास नांव देत. संभार नांवाच्या लांकडाचे आसन करून त्याजवर सोन्याची नक्षी करून त्यांत माणकें बसवून गलथ्यावर कमळें खोंदून काढून पावक्यांच्या जागीं कमळाच्या कळ्या खोंदलेल्या असल्या ह्मणजे, त्यास पद्मसिंहासन ह्मणत. तांबड्या कापडाचा त्याजवर चांदवा असून त्याच्या आठही दांड्याखाली बारा बारा बोटें उंचीचे मनुष्याचें चित्र असे. याच लांकडाचे राजासन करून त्याजवर चांदीची व स्फाटकांची नक्षी केलेली असली, त्याचा चांदवा पांढऱ्या रंगाचा असला, आणि त्याजवर व पावक्यांवर शंखाची आकृति कोरलेली असली, ह्मणजे त्यास शंखसिंहासन ह्मणत असत. त्याच्या भोंवती चांदव्याच्या दांड्या सत्तावीस असत, व त्यांजवरही माणसाचे पुतळे खोदीत. फणसाच्या लांकडाचें राजासन करून त्याजवर जडावांत सोनें, याकूत, प्रवाळ, वैडूर्य (नीलोपल) व त्याजवर तांंबडा चांदवा व त्याचें आसन, हात, व पाठ, याजवर हत्तीच्या ओळी व पावक्याला हत्तीचीं गंडस्थळें असली ह्मणजे त्यास गजसिंहासन ह्मणत. याचप्रमाणें त्याजवरील हंसाच्या चित्रावरून हंस सिंहासनास त्याचें नांव प्राप्त झालें. तें साल या लाकडाचें करीत व त्याजवर चुन्याच्या कोंदणांत पुष्कराज व अकीक हे बसवीत असत आणि त्यांचा चांदवा पिवळ्या रंगाचा असे. चांदव्याच्या दांड्या पुतळ्या सह असून एकवीस असत. गजसिंहासन चंदनाचेही करीत असत. व त्याजवर सोन्याच्या कोंदणांत हिरे व मोत्याचे शिंपे बसवीत. त्याजवरील चांदवा पांढरा असे. चांदव्याच्या दांड्या एकवीस असत. घटसिंहासन सोनचाफ्याच्या लांकडाचें करीत, त्याजवर नक्षी सोन्याची किंवा पाचूची करीत, व त्याजवर घट कोरुन काढीत असत. पावके कमळाच्या कळ्याच्या आकाराचे केलेले असत. चांदव्याच्या दांड्या २२ असून त्याजवरील कापड निळ्या रंगाचें असे. निंबाऱ्याच्या लांकडाचें सिंहासन करून त्याजवर हरणांची चित्रे खोंदून व पावके हरणांच्या डोक्याच्या आकाराचे करून त्याजवर सोनें व पाच बसविली ह्मणजे त्यास मृग सिंहासन ह्मणत, याजवरीलही चांदवा निळ्या रंगाचा असे. हरिद्रा नांवाच्या लाकडाचें राजासन करून त्याजवर सोनें व नवरत्नें बसवून त्यांत घोडयाची चित्रें खोंदून त्याचे पावकें घोड्याच्या आकाराचे करून त्याजवर चित्रविचित्र रंगाचा चांदवा चढविला, ह्मणजे त्यास हयसिंहासन म्हणत. याच्या चांदव्यास ७४ दांड्या असत.

 कोंच, खुर्चि, बांक, तिवई, ह्याही जिनसा प्राचीन काळी होत असत. यांच्या पावक्यांची टोंकें सिंहाच्या पंजांप्रमाणें किंवा गरुडाच्या नख्यांप्रमाणे होती. ज्यांच्या हाताच्या व दांडयाच्या टोकांस मगरीचें तोंड खोदीत त्यांस मकरमुख ह्मणत.

लांकडावरील अर्वाचीन खोंदीव काम.

 प्रस्तुतकाळीं पलंग, तक्तपोश व चौरंग या जिनसा तयार होत असतात. विलायती धरतीचे सामान तर पुष्कळच होऊं लागलें आहे.

 मुंबई इलाख्यांत अमदाबाद, पट्टण, बडोदें सुरत, मुंबई व कुमठा या ठिकाणीं पुष्कळ खोंदीव काम होतें. अमदाबादेस खोंदीव काम करणाऱ्या लोकांची सुमारें ८०० घराणीं आहेत. या आमदाबाद शहरीं लाकडावरील कोरींव कामाचा ऱ्हास होत चालला होता,व फूलदानें आणि आरशांच्या चौकटी या शिवाय विशेष कांहीं काम होत नव्हतें, परंतु थोड्या वर्षापूर्वी अमेरिकेंतून फारेष्ट साहेब या नांवाचे गृहस्थ तेथें आले, तेव्हां त्यांनीं चार हजार रुपयांस ज्याजवर पुष्कळ नक्षी आहे असें एक घर खरेदी केलें व तें पाडून आपल्या देशांत पाठवून दिलें. हें घर अमेरिकेंत गेल्यावर तेथें जाहिराती दाखल लावून ठेविलें व अमदाबाद शहरीं शेट मगनभाई हत्तीसिंग यास आपले एजंट नेमून त्या जवळ एकलाख रुपये अमानत ठेविले. शेट मगनभाई हे त्या शहरांतील एका मोठ्या श्रीमान व वजनदार व्यापाऱ्याचे चिरंजीव आहेत. यांनी हल्लीं सुमारें साठपासून ऐंशी सुतार नोकरीस ठेवून एक कारखाना काढिला आहे. त्यांत अमदाबाद, कडी, पट्टण, व सुरत या चार गांवचे कारागीर आहेत. या सर्वांत पट्टण येथील लोक फार हुषार आहेत असें शेट मगनभाई यांनी आह्मास सांगितलें. या लोकांनी तयार केलेलें काम अमेरिकेंत गेलें ह्मणजे त्याची किंमत फारेष्ट साहेब पाठवून देतात त्यामुळें एकलाख रुपयाची रकम या कारखान्यांत नेहमीं खेळती रहाते. बडोदे येथें हल्लीं बांधीत असलेल्या राजवाड्याकरितांही अमदाबादेहूनच काम तयार होऊन जात आहे.

 बडोदें संस्थानांत बिलिमोरा ह्मणून एक गांव आहे तेथें खोंदीव कामाच्या चंदनाच्या पेट्या तयार करणारी पंधरापासून वीस पारशी कुटुंबें आहेत. त्यांत मिस्तर सोराबजी जामासजी हे मुख्य असून तेच पुणें प्रदर्शनांत माल घेऊन आले आहे. सुरतेस घरे बांधण्याकरितां दरवाजे, खिडक्या, झरोके, घराच्या चौकटी, गणेश पट्या, व छतपट्या, इत्यादि सामान तयार होत असतेंं. ही नक्षी ठळक असून मोठी सुरेख असते, याशिवाय चंदनाच्या पेटया जनावरांची व पांखराचीं चित्रें, व इतर खेळणीं हीं ही सुरतेस फार होतात. सुरतेंतील कारागिरांत मूळचंद काशीरामाची विशेष प्रसिद्धी आहे. त्याचें काम इतर लोकांच्या कामापेक्षां फारच सुरेख असतें. मूळचंद काशीराम हा स्वतः आपलें काम घेऊन पुणें प्रदर्शनांत आला आहे. आमच्या नाशीक शहराकडे पाहिलें ह्मणजे त्या गांवीं पूर्वी लांकडावरील खोंदीव काम फार उत्तम प्रकारचें होत असे, अशी आपली खात्री होते. परंतु सन १८८३ सालीं त्या शहरीं मेहेरबान ग्रिफिथ्स साहेबांबरोबर आम्हीं गेलों होतों, तेव्हां पुष्कळ तपास केला तरी काय तो एकच कारागीर सांपडला. हा कारागीर तेथील पेशव्यांच्या वाड्यावर ज्या सुताराच्या हातची नक्षी आहे त्याचा वंशज आहे. याजकडून पेशव्यांचे उपाध्याय हिंगणे यांच्या अतिसुंदर वाडयांतील एका खिडकी सारखी खिडकी खोंदून घेतली तीस ११७ रुपये लागले. या मानानें या अफाट वाड्याची किंमत काय झाली असेल त्याचें अनुमान वाचकानींच करावें. नाशीक शहरीं कोणत्याही जुन्या घराकडे पाहिलें तरी त्याची बहाले, दरवाजे, खिडक्या व छतपट्या याजवरील नक्षी नेहमीं कमळाच्या आकाराची आहे असें दिसून येतें. नाशिकाचे प्राचीन नांव पद्मावती आहे, व हें नांव ठेवण्याचें कारण असें सांगतात कीं हें शहर बसलें आहे त्या ठिकाणीं गोदावरीस सहा नद्या मिळून त्याजमुळें त्या जागेस कमळाचा आकार आला आहे. कमळाचीच नक्षी जुन्या घरांवर जिकडे तिकडे खोदण्याचें कारण 'पद्मावती' हें नांव असावें असें दिसतें. पद्मावती शहरीं वाडे बांधावयाचे तेव्हां त्यांजवर पद्माची ह्मणजे कमळांची नक्षी काढावी अशी बुद्धि होणें साहजिक आहे. टामस मारिस या साहेबानें सन १८०१ सालीं प्रसिद्ध केलेल्या आपल्या " इन्डियन अन्टिक्विटी" नांवाच्या पुस्तकांत हिंदुस्थानांतील कमळांपासून ग्रीस देशांतील कॉरिन्थियन या नांवाच्या खांबाची उत्पादकत्ति आहे असें कबूल केले आहे. कॉरिन्थियन खांब मुंबईच्या टाऊन हालास आहेत. त्यांजकडे पाहिले ह्मणजे खांब हा कमळाचा देंठ व त्याच्या वर खाली असलेला गलथा हा कमळाच्या पांकळ्या तोडून टाकिल्यावर आंत राहिलेला मधला भाग आहे असें लक्षांत येईल. या मधल्या भागास चार बाजूला चारच कमळाच्या पाकळ्या शिल्लक ठेवून बाकीच्या तोडून टाकिल्या, व त्या चार पाकळ्या सारख्या लावून त्याचीं टोकें जरा मुरडली, ह्मणजे जो आकार होईल तो कारिन्थियंन खांबाचा मूळ " श्री ग" आहे. मग त्याजवर कमळाच्या पाकळ्या बदला आक्यांन्थस नांवाच्या पानांची योजनाकरून ग्रीक लोकांनी त्या आकारांत फेरफार केला आहे.

 आमच्या घरांत टेबल, खुर्च्या, कपाटें, दिवालगिरी इत्यादि पदार्थ इंग्रजांच्या सहवासामुळेच येत चालले आहेत. मुंबईत मेहेरबान वुइंब्रिज साहेब, अमदाबादेस फारेस्टसाहेब, रत्नागिरीतील स्कूलआफइंडस्ट्रींतील मुख्य अधिकारी, या तिघांनी उत्तम प्रकारचें 'फरनिचर' करण्याचे कारखाने काढले आहेत.व त्यांचे अनुकरण करून मुंबईतील शेट जमशेटजी नसरवानजी कॉबिनेट मेकर इत्यादिव्यापाऱ्यांनीं मोठाले कारखाने काढल्यामुळें मुंबईतील जुन्या प्रकारच्या खोंदीव कामास पूर्वी सारखी तेजी राहिली नाही. वायव्य प्रांतांत नगीना गावीं लांकडाची खोंदीव टेबलें, पेट्या, मकलदानें, वगैरे जिनसा पुष्कळ होतात. निनामशाहींत कमाम व झेल या दोन गांवीं लांकडाचें खोंदीव काम होतें. परंतु त्यांत मुख्यत्वें चित्रें व फळांचे नमुने जास्त असतात. हे नमुने गोकाकास चांगले होतात, व अलीकडे मिरज, भावनगर, बडोदा इत्यादि ठिकाणीं होऊं लागले आहेत.

 सांवतवाडीस, कानडयास व मद्रासेस नारळाचे बेले खोंदून त्यांची नक्षीदार भांडीं करितात.

चंदनावरील खोंदीव काम.

 चंदनावरील कोंरीव काम मुख्यत्वें कानडा, सुरत, मुंबई, बिलीमोरा, त्राव्हनकोर, त्रिचिनापल्ली, हळदगी, रायदुर्ग, तिरुकतुर, मदुरा, उदयगीर, कर्नुल, कोइंबतूर, कृष्णा, गोदावरी, सोराब व सागर याठिकाणीं होतें. चंदनावरील काम फार बारीक व अतिशय सुरेख असतें. सुरत व बिलीमोरा येथील कामाबद्दल माहिती मागें आलीच आहे. पांच दहा वर्षांपूर्वी सुरतेस वेलबुट्टी शिवाय दुसरी कांही नक्षी होत नसे; परंतु अलीकडे कानडा जिल्ह्यांतील लोकांचे अनुकरण करून सुरतेचे कारागीर देवादिकांच्या मूर्तीही खोंदूं लागले आहेत. सुमारें ८० वर्षांपूर्वी सुरतेस चंदनाच्या पेट्या करणारीं ८० कुटुंबें होतीं; परंतु त्यांतील कांहीं मुंबईत येऊन काळबादेवीच्या रस्त्यावर राहिलीं आहेत व कांहींनी आपला धंदा सोडून कारकुनी पत्करिली आहे.

 मद्रास इलाख्यांत त्रावणकोर व दक्षिण कानडा हे दोन प्रांत चंदनाच्या कामाबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत. साहेबलोकांचें असें ह्मणणें आहे कीं चंदनाच्या लाकडावर खोंदीव काम करण्यास जितकी मेहनत व जितका वेळ लागतो तितकी मेहनत व तितका वेळ खर्च करून न कंटाळतां शांतपणे काम करण्याची शक्ति हिंदुलोकांच्या अंगीं मोठी विलक्षण आहे. चंदनाच्या चंवऱ्या करण्यास तर फारच मेहनत लागते. पुणें प्रदर्शनांत असल्या दोनचार चंवऱ्या आल्या आहेत. पंखे, फण्या, कागद फाडण्याच्या सुऱ्या, व इतर लहान लहान जिनसांस गिऱ्हाइकीं फार असतें. कानड्या प्रमाणें होळकरशाहींत रामपूर गांवींही चंदनाच्या चौऱ्या होतात.

लांकडावरील कोंदण काम.

 लांकडावर खोंदीव काम करून म्हणजे कोंदणासारखीं घरें पाडून त्यांत हस्तिदंत, सांबर शिंग, पितळ, चांदी, कथील किंवा मोत्याचे शिंपले, बसवितात. मुंबई, सुरत, बिलीमोरा आणि कच्छ याठिकाणीं चंदनाच्या पेट्या करून त्यांत हस्तिदंत, सांबर शिंग व कथील बसवितात. ही विद्या इराण देशांतून म्हणजे शिराज येथून सिंधप्रातांत येऊन तेथून सुरतेस व सुरतेहून मुंबईस आली आहे. पांढरा किंवा रंगविलेला हस्तिदंत, शिसवी लांकड, रक्त चंदन व कथलाच्या पट्या, ह्या एकाठिकाणीं बांधून तिकोनीं, चौकोनीं, पांच कोनीं, षड्कोनी किंवा वर्तुलाकाराच्या दांड्या करतात. ह्या दांडया बांधण्यापूर्वी पटयाच्या आंत मसाला घालून त्या एकमेकांस चिकटवितात. नंतर बारीक करवतीनें त्याच्या पातळ चवली सारख्या आडव्या चकत्या पाडतात. ह्या चकत्यांत रंगा रंगाच्या टिकल्या दिसुं लागतात. लांकडावर सिरस लागून त्यानें ह्या टिकल्या नंतर एकमेकांस लावून सारख्या चिकटवितात. असल्या कामास इंग्रजीत 'बांबेवर्कबाक्सिस ' असें नांव पडलें आहे.

 काठियावाडांत भावनगरास लांकडाच्या पेट्या करून त्यांजवर कोंदणांत पितळेची नक्षी बसवितात, व नवानगरयेथें मोत्याच्या शिंपाची नक्षी बसवितात.

 पंजाबांत हस्तिदंत व पितळेच्या पट्याबसविण्याची चाल आहे. हस्तिदंताची नक्षी कोंदणांत बसविलेली आहे असें लांकडी काम हुशारपुर येथे पुष्कळ होते. ह्या कामाचे पुणें प्रदर्शनांत एक गाडाभर नमुने आले आहेत. पितळेच्या पट्या बसविलेलें सामान जंग जिल्ह्यांत चिरिअट गांवीं होतें. हस्तिदंती काम सागाच्या लांकडावर विशेष शोभिवंत दिसावे ह्मणून त्यांत कधीं कधीं शिसवाच्या पट्याही बसवितात. हुशारपुर शहराजवळ गुलामहुसेनबासी म्हणून एक खेडें आहे, त्यांत असलें काम करणाऱ्या कारागिरांची पुष्कळच घरें आहेत. मेहरबान किप्लिंग साहेब यांचे मतें हा धंदा भरभराटीस येण्यास मेहरबान कोल्डस्ट्रीम साहेब कारण झालें असें ठरतें. पूर्वी हुशारपुरास कलमदानें, काठ्या, आरशाच्या चौकटी व चौकी नामक लहानसा चौरंग ह्याच कायत्या जिनसा तयार होत असत, व त्याही शिसवाच्या. पुढें कोल्डस्ट्रीम साहेबांनी टेबलें, कपाटें, दिवालगिऱ्या वगैरे पाश्चिमात्य पदार्थ करविण्याची सुरुवात केली; तेव्हां पासून हा व्यापार एकसारखा वाढतच चालला आहे. हुशारपुरचे कारागीर लाहोरास गेले म्हणजे तेथील हुनर शाळेचे मुख्य अधिकारी मेहरबान किप्लिंग साहेब हे त्यांस आरबी व देशी सामानाचे सुबक नमुने दाखवितात, व त्यांचे नकाशे उतरून देतात, त्यामुळें त्यांच्या कामांत सुधारणा होत चालली आहे. हे सर्व कारागीर एका हिंदु व्यापाऱ्याच्या मुठींत आहेत. तो त्यांस पैसे देतो व त्याजबद्दल त्यांचे कडून काम करवून घेतो. हस्तिदंतीचुडे, किंवा फण्या करणाऱ्या लोकांनीं टाकलेले ढलपे गोळाकरून त्यांचा या कामीं उपयोग करितात. शिसवी लांकडास अबनूस ह्मणण्याचीं पंजाबांत चाल आहे. याचाही कधीं कधीं उपयोग करितात. पितळेच्या पत्र्याच्या वेलबुटया कापून त्याही इशारपुर येथें लांकडांत बसवितात. तसेंच रंगारंगाचीं लांकडेंच घेऊन त्यांचीही वेलबट्टी कांहीं लोक काढूं लागले आहेत. लाहोर येथील हुन्नर शाळेंत मेस्त्री रामसिंग हा फार उत्तम काम करणारा आहे. त्रिनिअट येथें लांकडाचें कजावा ह्मणजे उंटावरील एका प्रकारचें खोगीर तयार करून त्याजवर कधीं कधीं घराच्या खिडक्यावर पितळेची नक्षी बसविलेली असते.
 हुशारपुरासारखें शिसवी काम करून त्याजवर मोत्याचे शिंपले बसविण्याची राजपुताना प्रांतांतील कोटा संस्थानांत एटवा गांवीं सुरवात झाली आहे. लंडन शहरांतील सन १८८६ च्या प्रदर्शनांत कोटा संस्थानांतून एक सुमारें चाळीस फूट लांब व बारा फूट उंच शिसवी पडदा पाठविण्यांत आला होता. त्याजवर असलें मोत्याच्या शिंपल्यांचें काम केलेलें होतें.

 वायव्यप्रांतांत नगीना गांवीं होत असलेलें अबनूसचें खोदीव काम चांगलें दिसावें ह्मणून कधीं कधीं त्याजवर मोत्याच्या शिंपल्याचें किंवा चांदीचें कोंदण काम करीत असतात; तथापि त्या गांवीं मैनपुरी प्रांतीं होत असलेल्या तारकशी कामाचीच मोठी प्रसिद्धी आहे. शिसवी लाकडाच्या पेटया कलमदानें वगैरे करून त्यांजवर पितळेची तार बसवून अनेक तऱ्हेची फारच सुबक वेलबुट्टी ठोकून बसवितात व ती पालिश करून साफ करतात. त्यामुळें ती सोन्याप्रमाणे चकाकून फार सुशोभित दिसते हा हुन्नर अगदी निकृष्ट दशेस येऊन पोचला होता, परंतु आलीकडे जिकडे तिकडे प्रदर्शनें होऊं लागल्यामुळें भरभराटीस येत चाललाआहे. मैनपुरी गांवीं लांकडावर तारकशीकाम करणारे सुमारे पस्तीस कारागीर आहेत. त्यांची काम करण्याची रीत अशी:-- लांकडाचं सामान तयार करून त्याजवर पेनसलीनें वेलबुट्टी काढन ती तीक्ष्ण चाकूच्या धारेनें खोदून काढतात. व त्या खोचीतून पितळेची तार भरून ती हातोड्यानें ठोकून बसवितात. या कामास मेहनत फार लागून वेळही पुष्कळ खर्च होतो. बाराइंच व्यासाची थाळी तयार करण्यास एका कारागिरास वीस दिवस लागतात. पूर्वी तारकशी कामाची कलमदानें व खडावा या जिनसा होत असत ; परंतु अलीकडे विलायती तऱ्हेचें सामान पुष्कळ तयार होऊं लागलें आहे. हिमालय पर्वताच्या पायथ्याशीं असलेल्या “पिलिभित" गांवीं असल्या खडावा तयार होतात; परंतु ते काम । आह रखें चांगले नसते या खडावाच्या अंगठ्यावर ए परंतु त्याशिवाय चितान्यनदंति कळी बसविलेली असते तिच्या साहीं । चितान्याचे काम झणजे मनुष्य चालू लागला असता त्याजवर दाबच्या पेठ्या की, ज्यास कालासारखी पसरते. असल्या खडावा घालण्यास पदाथावर हाताने रंगा बरगा। मात्र पाहिजे. मग सुभद्रेची नजर स्वामीच्या हा थर देण्यापूर्वी लाकूड तडावरील कोंदण कॉमः , पारदशती अगदी व ती वितळू लागली ह्मणजे सात आठ सुतारलोक कधील क हा उद्योग'टावर, पोथीच्या फळ्यांवर, व गो का करीत; परंतु अलीकडे येत अठवे खात्यांतालीकडे मेहरबान त्यामळे येती हा धंदा सोडन दिला आहे.याकाम केली आ

दलारख्यांत विजागापरळावी लांकडाच्य इत्यादि कांसवांच्या कवटीच्या पेट्यांवर हस्तिदंताचे जाळीकाम पुष्कळ होत अस... अलीकडे साहेध लोकांकरितां असली पन्हेत-हेचा माल खूप तयार होतो. हस्तिदंताच्या जाळी कामाशिवाय नुसते हस्तिदंताचे पातळ पत्रे बसवून, त्यांजवर बारीक वेलबुट्टी किंवा देवादिकांची चित्रें खोदून, त्यांत काळा रंग भरण्याची चाल आहे. हें काम फार सुबक असल्यामुळें त्यास साहेब लोकांत पुष्कळ गिऱ्हाइकी आहे.

 ह्मैसूर प्रांतीं अबनुसचीं टेबलें, खुर्च्या, कपाटें तयार करून त्यांजवर हस्तिदंत वसवून कानडी व मोगली तऱ्हेची नक्षी करितात. या कामाच्या सहा फूट रुंद व बारा फूट उंचीच्या दरवाजास सन १८८३ साली पंधराशें रुपये किंमत पडली. हा दरवाजा कलकत्ता प्रदर्शनांत जाऊन तेथून बंगलोर येथील राजवाड्यास जाऊन लागला आहे. टिपूसुलतानच्या दरग्यास ह्या कोंदणकामाचे दरवाजे आहेत, ते फारच सुरेख आहेत.

लाखटलेलें काम.

 लांकडावर लाखेचें काम दोन तऱ्हेचें होते; एक कातारकाम व दुसरें चितारकाम. कातारकामांत लांकूड दोन लोखंडी आंसाच्यामध्धे धरून कमानीच्या योगानें गरगर फिरवितात, व तें फिरत असतांना त्याच्याशीं लाखेची दांडी    १४ टेंकूने धरतात; त्यामुळें घर्षणजनित ऊष्णतेच्या योगानें ती वितळून लांकडास चिकटते. नंतर बांबूच्या चिपाटीनें किंवा केतकीच्या पानानें तिजवर झील देतात, व अखेरीस फडक्यानें तेल लावतात. लांकडावर नागमोडीसारखी पुष्कळ अबनूस झणण्याची पंजाल तर, रंगारंगाची लाख घेऊन ती ठिकठिकाणी तात. पितळेच्या पत्र्याच्या मग बांबूच्या चिपाटीने सारखी पस. रतात. सवितात. तसेच रंगारंगाचीनतीन रंगांची लाख चढवून, नंतर तिच्यांत काढू लागले आहेत. लाहोतीने खोदून काढून, वेलबुट्टी सोडवितात. हे कामात्तम काम करणारा आहे. किापून काढावयाचे असतील तितकेच नेमके एका प्रकारचे खोगीर तयारसते. उदाहरणार्थ एका डब्यावर पहिल्याने र पितळेची नक्षी बसविलेली तेजवर हिर हिरवीवर काळीचा असे पुरागरखें शिसवी काम करून न कल्पना त्याचे आतां जर तांबडा रंग दार विणे आहे त कोटा संस्थानांहिरवा हे वो मुदोनच थर छिणीने खोदून काढावयाचे ६ च्या प्रट जर पांढरा सस्थानदाखविणे आहे तर काछा, हिरवा, व कूट उंच, हे तीनही पाठनिफाढून पांढरें लाकूड दाखपावे लागते. शंपले काम पंजाब व सिंध प्रांती पूर्व सून होत असते. अलीकडे जयपुरासही होऊ लागले आहे. पंजाबांत हुरिपुर, डेराइमाएल. वान, पाकपट्टन, फिरोजपुर व सहिवाल या गांवांची लाखटलेल्या कामाबदल विशेष ख्याति आहे. पूर्वी पाकपट्टण हे गांव विशेष प्रसिद्ध होते, परालीकडे हुशारपुर व डेराइस्माएल खान हे गांव पुढे सरसावले आहेत, डेरामाळखान या गांवचें काम फार नाजुक असते, व त्याजवर नक्षी खोदन काढणे ती बायका काढितात.

 सिंध येथील कातारी लोक जातीचे मुसलमान आहेत, व आपण झांजीबाराहन हिंदुस्थानांत आलों असें त्यांचे ह्मणणें आहे. ते मोठे आळशी अव्यवस्थित, व दरिद्री आहेत त्यामुळें लांकूड व लाख घेण्यास सुद्धां त्यांजवळ पैसे नसतात, व ते व्याजी काढावे लागतात. आगस्ट महिन्यापासून सिंधी लाखटलेल्या कामास कांहीं गिऱ्हाइकी असते. तथापि हा धंदा अलीकडे बसत चालला आहे. सगळ्या वर्षांत कायतो हजारपंधराशांचा माल तयार होतो. काठेवाडांत गोंडळ व भावनगर या गांवीं लाखेचें काम सुरेख होतें. गायकवाडी राज्यांत संखेडा गांवीं लाखटलेलें काम होतें. लांकडावर लाख चढविण्यापूर्वी आंत कारागरि लोक वर्खाचा पातळ थर देत असावे अशी आमची अटकळ आहे. कल्याण व पेण या दोन गांवांचे पाळणें, आषाढ व श्रावण पाटीचे खेळ तयार करण्याचे कामीं कोकणपट्टींत पूर्वी मोठी ख्याति असे, परंतु अलीकडे आषाढ व श्रावण पाट्या मोडत चालल्या आणि विलायती मच्छरदाणीचे पाळणे प्रचारांत येऊं लागले त्यामुळें धंदा बसत चालला आहे.

 सांवतवाडीस काताऱ्याचें काम होतेंच; परंतु त्याशिवाय चिताऱ्यांचे काम होतें तसें इतर ठिकाणीं होत नाही. येथें चिताऱ्याचें काम ह्मणजें काय हें सांगितलें पाहिजे. पाट, चौरंग, गंजिफाच्या पेट्या कीं, ज्यांस कमानीनें आंसावर फिरवितां येत नाहीं, असल्या पदार्थावर हातानें रंगीबेरंगी चित्रें काढून त्यांजवर लाखेचा थर द्यावयाचा. हा थर देण्यापूर्वी लांकूड तापवावें लागतें, व त्याजवर पारदर्शक लाख ठेऊन ती वितळूं लागली ह्मणजे सारखी पसरावी लागते. असलें काम पूर्वी पाटावर, पोथीच्या फळ्यांवर, व गंजिफांच्या पेट्यांवर मात्र होत असे; परंतु अलीकडे मेहरबान वेस्ट्राप साहेब यांनीं पुष्कळ मेहनत घेऊन याकामांत सुधारणा केली आहे, त्यामुळें कपाटें, टेबलें, खुर्च्या, दिवालगिऱ्या, नारळाच्या बेल्याचे डबे इत्यादि पुष्कळ पदार्थ तयार होऊं लागले आहेत, आणि त्यांचा साहेबलोकांत खप विशेष असल्यामुळें धंद्यालाही तेज येत चाललें आहे. साहेब बहादूर यांनीं स्वतः सतत मेहेनत घेऊन या धंद्याचा ऊर्जितकाळ केल्यामुळें त्यांचे आमच्यावर मोठे उपकार आहेत.

 राजपुतान्यास बुद्धिबळें, सोंगट्या, वगैरे पदार्थ होतात. जयपुरास मात्र काम फार चांगलें होऊं लागलें आहे. तें तेथील चित्रशाळेंतच होत असतें, त्यांत काश्मीर किंवा पंजाब येथील कामाचें अनुकरण करून केलेलें असतें. राजपुतान्यांत शहापुरा गांवीं लाखटलेल्या चितारी कामाच्या ढाली तयार होत असतात. खंडेला गांवीं बडकुलीं होतात. सवाईमाधवपुरास चामड्याचे लाखटलेले गंजिफे होतात. जयपूर व इतर ठिकाणीं रंगीत धुळीच्या पाट्या तयार होतात. कोठा संस्थानांत इंद्रगड गांवीं खिरणीच्या लाकडाच्या सुरया व डबे तयार होतात. लोखंडाच्या सळईवर लाख घेऊन ती वितळवून सुरईवर लावण्याची या गांवीं चाल आहे. बिकानेरास मडक्यांवर, दगडांवर, कांचेवर व हस्तिदंतावरही लांकडाप्रमाणें लाख चढवितात. या बिकानेरी कामाचा वीस चौरस फूट लांबीचा मखरासारखा मोठा एक पडदा विलायतेच्या प्रदर्शनांत सन् १८६९ सालीं गेला होता. त्याजवर केलेल्या कामाची शैली वेगळ्या तऱ्हेची आहे. ती अशी:-लांकूड साफ करुन त्याजवर मातीचा एक थर द्यावयाचा; व तो सुकला ह्मणजे त्याच्यावर भोंकें पाडलेले नक्षीचे कागद ठेऊन रांगोळ्याप्रमाणें कोळशाच्या पुडीची नक्षी उठवितात. या नक्षींत खारीच्या शेपटीच्या केसाच्या कलमानें पाण्यांत कालविलेल्या पातळ मातीचे थरावर थर देतात, त्यामुळें नक्षींतील वेल, पाने, फुलें, फळें उठून दिसतात. अखेरीस रोगण चढवून काम घट करतात, व सुखलें ह्मणजे त्याजवर मधून मधून सोन्याचा वर्ख चढवितात. जयपुरास व राजपुतान्यांतील शहापुरासही लाखटलेल्या ढाली होतात. कांचेचे लाखटलले लोटे, हुक्के व कांहीं सुरेख खेळंणी करवली गांवीं होतात. झालवार प्रांतीं बकैन गांवीं खेळणीं, डबे, वगैरे किरकोळ काम होतें. या गांवीं नरोट्यांचे लाखटलेले चुडेही होतात. अलवार संस्थानांत गडावर व राजगड गांवीं लाखटलेलें काम होतें.धोलपुरास तालमीच्या जोड्या व पलंगाचे गाते होतात. वायव्य प्रांतांत बरेली, आग्रा, लखनौ, फत्तेपूर, शहाजहानपूर, बनारस, व मिरजापूर, या गांवीं लाखटलेलें काम होतें. बरेलीस मुख्यत्वें टेबल, खुर्च्या वगैरे विलायती सामान, व आग्रयास डबे, रकाबी वगैरे लहान सामान होतें. लखनौ, फत्तेपूर आणि शहाजहानपूर येथें पलंगाचे गाते होतात; व बनारस आणि मिरजापूर या गांवीं मुलांचीं खेळणीं होतात. फत्तेपुरास लांकडी गंजिफे व डब्याचे गंज होतात.

 बंगाल्यांत हें काम अगदींच थोडें होते. मुरशिदाबाद व पाटणा या दोन गांवीं कोठें जुजबी काम होतें. शिराजगंज या गांवीं लाखटलेलें काम होतें असें ह्मणतात, परंतु त्याचे नमुने बंगाल्यांतील एक्झिबिशन कामदार बाबू त्रिलोकनाथ मुकरजी यांच्याही अजून पहाण्यांत आले नाहीत.

 मद्रास इलाख्यांत कर्नूळ गांवच्या लाखटलेल्या कामाची पूर्वापार कीर्ति आहे. टेबलें, पेटया, पंखे, वगैरे जिनसा कर्नूळ येथें होतात. विजागापट्टम व कडाप्पा जिल्ह्यांत नोसम गांवींही असलें काम होते. याशिवाय नोसमास चामड्याच्या तुकड्यावर लाखेची नक्षी करून ते साहेब लोकांत विकतात. सांवतवाडीच्या गंजिफाप्रमाणें नोसम येथील गंजिफा प्रसिद्ध आहेत. नोसमगांवीं ताडाच्या कागदाच्या किंवा कापडाच्या पंख्यावरही नक्षी काढतात. नंदियाळ गांवीं साधारण प्रतीचें लांकडाचें काम होतें.वेलोरास कुड्याच्या लांकडाचीं खेळणी करतात. ह्मैसूर प्रांतीं चन्नापट्टण गांवीं खेळणीं,पेटया, इत्यादि लाखटलेलें सामान तयार होतें. याच गांवीं सोंगटया व बुद्धिबळें होतात. तसेंच तिरुपती गांवच्या तीर्थास नेण्याकरितां लागत असलेली एका प्रकारची असुरमुखी ढाल तयार करण्याबद्दल या गांवाची मोठी ख्याती आहे.

 निजामशाहींत रायचूर जिल्ह्यांत बैंगण पल्लीं गांवी होत असलेल्या लाखटलेल्या कामाची पुष्कळ लोक मोठी तारीफ करतात. बेदर येथील चांदीच्या कोंदण कामाप्रमाणे या गांवच्या लाखटलेल्या कामाचा लग्नांत नवऱ्या मुलास अहेर होत असतो. बैंगणपल्ली येथील कामाचे दोन प्रकार आहेत. एक 'मुना बथि' आणि दुसरें 'लाजवर्दि' 'मुनाबथि' कामांत शिंप्या किंवा बीड घेऊन त्याची वस्त्रगाळ पूड करतात. ही पूड सरसा सारख्या कांहीं चिकट पदार्थात कालवून तिचे थरावर थर देऊन लांकडावर वेलबुट्टी सोडवितात. या वेलबुट्टीवर सोन्याचा वर्ख चिकटवून त्याच्यावर मधून मधून रंग भरून नंतर रोगण चढवितात. असल्या कामाची किंमत मात्र फार पडते. त्याचें कारण असें सांगतात कीं निजामशाहींतील जहागीरदार लोक या कारागीर लोकांपासून 'कोंबडी पटी' उपटीत असतात. मोगलाईच ती!

 आसाम प्रांती मुसलमान लोक लांकडाचीं खेळणीं तयार करतात. त्यांजवर रंगीबेरंगी लाख चढवून तीं शेंकड्याच्या हिशोबानें विकतात. याच गांवीं एक कारागीर शंभर बाणांसह एका प्रकारचें बांबूचें धनुष्य तयार करून तीन रुपये दोन आण्यास विकतो. बाणाच्या एका टोंकास लोखंडाचें पातें व दुसऱ्या टोंकास कागदाचा पोकळ शंकु बसविलेला असतो.

 ब्रह्मदेशांतही दोन प्रकारचें लाखटलेले काम तयार होतें. एक सुपें टोपल्या वगैरे करून त्यांवर केलेले काम आणि दुसरें लांकडावरील काम. या सामानाचे त्याच्या उपयोगाच्या संबंधानेंही दोन भाग करतां येतील. एक संसारांत लागणारें सामान, व एक परलोक साधनार्थ बौद्धधर्मी देवळांत व समाधींत लागणारें सामान, गेल्या खानेसुमारींत ब्रह्मदेशांत लाखटलेलें काम करणारे व तें विकणारे मिळून एकंदर सहाशें शहात्तरांचा आंकडा पडला आहे. सुपल्या व टोपलीवजा काम उत्तरप्रांतीं होतें. दक्षिण प्रांतीं लांकडाचे डबे, पेट्या वगैरे होतात. त्यांत ब्रह्मीलोकांस जेवण्या करितां एक मोठें परळ होत असतें. कांहीं कारागीर ताडपत्रीवर लिहिलेलीं धर्म पुस्तकें ठेवण्याकरितां पेट्या, घुमटाच्या आकाराच्या झाकणाच्या देवळांत नैवेद्य नेण्याच्या डब्या, व बुद्धाची मूर्ति ठेवण्या करितां सिंहासनें, आणि प्रभावळी तयार करितात. ब्रह्मीलोक तयार करितात त्यापेट्या काळ्या रंगाच्या असून त्यांजवर सोन्याच्या शाईनें नक्षीकाढलेली आहे असें भासतें, त्यामुळें तसल्या तऱ्हेचीं टेबलें, नसत्या पोथीच्या फळ्या सारख्या फळ्या, इत्यादि जिनसांचा साहेबलोकांत खप होऊं लागला आहे. थित्सिया नांवाच्या एका झाडाचा रस साडेबारा भार काढून, त्यांत दहाभार हिंगूळ घालून, एकाप्रकारचा रंग तयार करितात. नंतर ज्यापेटीवर रंग द्यावयाचा असेल ती अगदीं गुळगुळीत करतात. लांकडास कोठें फाटफूट असेल तर सागाच्या लांकडाचा बारीक भुसा या रंगातच कालवून त्यांत भरतात. हें लुकण सुकलें ह्मणजे थित्सिचा रंग सर्व लांकडावर हातानें चोळतात. हातानें रंग लावण्यांत फायदा असा आहे कीं रंगांत कोठें बारीक केरकचरा गेला असला तर तो तेव्हांच कळतो. रंग लावल्यावर पेटी सावलींत सुकत ठेवतात. उनांत ठेविली तर लाखेला पोपडे येऊन भेगा पडतील अशी भीति असते. दोनतीन दिवसांनीं पेटी सुकली ह्मणजे थित्सीचा रस, तांदळाची पेज, व तुसाची राख, या तीन पदार्थापासून तयार केलेल्या लुकणाचा घट्ट थर देतात. ही पेटी पुनः सुकत ठेवावी लागते. सुकली ह्मणजे तिजवरील थर दगडासारखा टणक होतो. तो पाणी, तुसाची राख व दगडाच्या घोटण्या, या तिहींच्या मदतीनें अगदी गुळगुळीत करतात, तेव्हां त्याजवरील तकाकी नाहींशीं होते. नंतर त्याजवर काळें किंवा तांबडें रोगण चढवितात. तें अर्धवट सुकलें ह्मणजे हरताळ पाण्यांत घासून त्यांत गोंद घालून त्याची नक्षी काढतात. ही नक्षी तिच्या पूर्वी लावलेला थर अगदीं सुकण्यापूर्वी पुरी झाली पाहिजे. नक्षी काढल्यावर पेटीवर सोन्याचा वर्ख चिकटवितात. ज्या ठिकाणीं हरताळ लागलेला असतो त्या ठिकाणी वर्ख चिकटत नाहीं, व इतर ठिकाणीं तो चिकटतो. वर्ख चढिवल्यावर पेटी पुन्हा सुकत ठेवितात. ती अगदी सुकी टांक झाली ह्मणजे कापसाच्या बोळ्यानें पाणी घेऊन धुवून टाकितात. हरताळ धुपून गेला ह्मणजे त्याच्या खालीं असलेली तांबडी किंवा काळी लाख पुनः दिसूं लागते. कधीं कधीं दगडीच्या दगडचा कोरलेला ठसा घेऊन त्यांत थित्सिचा रस व हाडकांची राख यांचे केलेले लुकण घालून खंडोबाच्या टाकासारखे सपाट सांचे घेतात, व ते लांकडावर चिकटवितात; अथवा लाकडाचे गलथे व गोलच्या बसवून त्यांनीही कधीं कधीं शोभा आणतात. सिंहासने पहिल्यानें खोदून काढून त्यांजवर नक्षी करतात. त्याचप्रमाणें यति लोकांचें भिक्षापात्र हे पहिल्यानें खोदून त्याजवर नक्षी करतात. नक्षी केलेल्या सामानावरही लाखटलेलें काम करतात, व त्यांत विशेष शोभा आणण्याकरितां रंगारंगाचे कांचेचे तुकडे, व आरशाचे तुकडेही कधीं कधीं बसवितात,
दगडी नकसकाम.

 'दगडावरील नक्षीचें खोदीव काम ' व 'शिल्प कामांत लागणारें दगडावरील कोरीव काम ', या दोन सदराखालीं या विषयांसंबंधानें मागें काही माहिती दिलेलीच आहे. आता या प्रकरणांत दगडाच्या नकस कामाच्या लहान लहान जिनसा कोठें कोठें होत असतात त्यांचें वर्णन दिलें जाईल. तसेंच आग्रा येथे संगमरवरी दगडावर होत असलेलें दगडी कोंदण काम याचेंही वर्णन करण्यांत येईल.

दगडावर खोदलेली नक्षी.

 ज्या ज्या ठिकाणी चांगलें खोदीव काम करतां येईल असे दगड सांपडतात त्या त्या ठिकाणीं कमजास्त मानानें दगडाच्या मूर्ति, सिंहासनें किंवा खेळणीं तयार होतच असतात. काठेवाडांत पोरबंदर व वढवाण या दोन गांवीं एका प्रकारच्या रेताड दगडाच्या कोरीव मूर्ति, प्याले, बशा, खेळणी, गाई, बै इत्यादि चित्रें, वगैरे जिनसा होत असतात. भावनगर व जामनगर या दोन ठिकाणी संगमरवरी दगड सांपडतो त्याचे लहान लहान पुतळे खोदून तयार करतात. कच्छ व बडोदा प्रांतीं कधीं कधीं असलें काम होते. कानडा जिल्ह्यांत नादिग या उपनांवाचे गृहस्थ आहेत, ते दगडीच्या दगडाचें सुबक कोरीव काम तयार करून त्यास कांहीं मालमसाला लावून तें विशेष टिकाऊ व टणक होईल असें करतात.

 गोंडळ संस्थानांतही संगमरवरी दगडाच्या जुजबी जिनसा तयार होतात. मोरवी संस्थानांत मच्छा नांवाची एक नदी आहे, तींत एका प्रकारचा काळाभोर दगड सांपडतो. त्याच्या खलबत्ते व नक्षीच्या बशा, पुतळ्या, वाटगे, कुत्रे इत्यादि जिनसा तयार होतात.

 सांवतवाडीस अलीकडे दगडाची भांडीं करून त्यांजवर नक्षी खोदून तींत पारा चढविण्याची सुरुवात झाली आहे.

 पंजाबांत असलें सामान फार थोडें होतें. दिल्ली, लाहोर, अमृतसर व चिनिअट ,या गांवीं कधीं कधीं दगडाचीं कोरीव चित्रें वगैरे विकत मिळतात. अमृतसर येथील सोन्यानें मढविलेल्या प्रसिद्ध देवळाच्या संबंधानें सरकारांतून एक चित्रशाळा स्थापन झाली आहे. तींत शीख लोकांचीं मुलें दगडाच्या लहान लहान सुरेख जिनसा तयार करीत असतात. मध्य प्रांतांत चंदा या गांवीं, व भंडारा जिल्यांत कान्हेरी गांवीं, रत्नागिरी जिल्ह्यांतील दगड्यांप्रमाणें कांहीं किरकोळ जिनसा तयार होतात.
 राजपुतान्यांत जयपुर संस्थानांत संगमरवरी दगडाच्या मूर्ति, पुतळे, चित्रें वगैरे अनेक जिनसा विपुल होतात. पुणे प्रदर्शनांत या कामाचे तीन चारशें नमुने आले आहेत. एकटें जयपूर हिंदुस्थानांतून सर्व हिंदुलोकांस दगडाच्या मूर्ति पुरवितें. त्या रंगाने पांढऱ्या, गुलाबी व काळ्याही असतात, व त्यांजवर कधीं कधीं सोन्याच्या वर्खानें नक्षी केलेली असते. डंगरपुर येथें एका प्रकारचा दगड सांपडतो त्याच्या मूर्ति व चित्रें करून त्यांजवर तेल काजळ चढवून घोटतात., अगदीं पाढरासफेत संगमरवरी दगड सांबर सरोवराच्या जोधपुर संस्थानाच्या बाजूस असलेल्या मक्राणा गांवीं सांपडतो. यापेक्षां काही हलका व मधून मधून निळसर रंगाचे छटे असलेला असा दगड अलवार संस्थानच्या सरहद्दीजवळ रैयालो गांवीं सांपडतो. तो धौसा यागांवीं नेऊन तेथें त्याच्या मूर्ति वगैरे जिनसा करतात. हे पाथरवट लोक उन्हाळ्यांत मूर्तीच्या राशींच्या राशी तयार करून त्या गुजराथी साठेकऱ्यास विकतात. हे गुजराथी लोक याप्रमाणें घाऊक माल घेऊन गांवोगांव पाठवितात. मक्राणा येथील खाणीचे दगड पहिल्यानें जयपुरास जाऊन नंतर तेथें त्यांजवर काम होतें. अलवार संस्थानाच्या सरहद्दीवर व वळदंवगड म्हणून एक गांव आहे, तेथें काळ्या रंगाचा संगमरवरी दगड सांपडतो. त्याचेही असेच पुतळे बनतात. त्याच गांवीं गुलाबी रंगाचाही संगमरवरी दगड सांपडतो, त्याचे बहुत करून उंट करतात. पाथरवटाची लहान लहान मुलें पहिल्यानें दगडीच्या दगडाची चित्रें खोदण्यास शिकतात. व काम चांगले येऊं लागलें म्हणजे संगमरवरी दगड वापरतात. दगडीच्या दगडावरील चित्रें फार स्वस्त असल्यामुळें गोरगरीब लोकांत पुष्कळ खपतात.

 जयपुर येथील संगमरवरी दगडाच्या मूर्तीवर चितारी लोक रोखणीकाम करतात. जसलमिर, करवली, बिकानेर, भरतपुर, याठिकाणींही असलें सामान कधीं कधीं होते. मध्यप्रांतांत बिजावर, छत्रपुर, ओछी आणि अल्लिपुरा यागांवांची अशीच ख्याति आहे.

 बंगाल्यांत मोंगीर, गया, सासेरम, छोटानागपूर, ओरिसा, बरद्वान, व मानभूल येथें दगडाच्या मूर्ति वगैरे होतात, परंतु त्या वर्णन करण्यासारख्या चांगल्या नसतात. फक्त गयेस मात्र कांही पहाण्यासारखें काम होतें; व तें तीर्थस्थान असल्यामुळें त्यास गिहाइकी बरीच मिळते. मोंगीर येथे आम्लर आणि कंपनी नांवाच्या एका व्यापारी मंडळीनें स्लेटीच्या दगडाचें काम करून त्यावर एका प्रकारचें रोगण चढवून तो संगमरवरी दगडासारखा दिसावा अशी युक्ति काढली आहे.

 वायव्य प्रांतांत आग्र्यास दगडीच्या दगडाचें कोरीव काम फारच सुबक होतें. मिरझापूर व इतर कांही गावी क्वचित् मूर्ति वगैरे करून काशी व प्रयाग येथें विकण्याकरितां पाठवितात.

 मद्रास इलाख्यांत दगडीच्या दगडाच्या तिणिताणी, चंद्रगिरी, सालेम कृष्णा, मदुरा, कडाप्पा व विजागापट्टण या ठिकाणीं कांहीं जिनसा होतात. हलाल, सैदापूर, अनंतपूर, पलादन, कडाप्पा, बुड्डियातम, त्रिचिनापोली व तंजावर या ठिकाणीं देवाच्या मूर्ति तयार होत असतात. ह्मैसुरासही कधीं कधीं मूर्ति तयार होतात. नुल्लुर गांवीं दगड्या तयार करणारे लोक आहेत.

आग्रयांतील संगमरवरी दगडांवरील कोंदणकाम.
 आग्र्यांतील ताजमहालांत असलेल्या कोंदण कामाचा आलीकडे इमारती बांधण्याकडे उपयोग न होतां साहेब लोकांस विकण्याकरितां त्या कामाचे प्याले, बशा, पेट्या, वगैरे पदार्थ तयार होत असतात. या कामांत पांढऱ्या रंगाच्या संगमरवरी दगडावर कोंदणें खोदून त्यांत रंगारंगाचे अकीक व इतर दगड बसवून वेलबुट्टी व फुलें काढिलेलीं असतात. आलीकडे मोत्याचे शिंपलेही कधीं कधीं बसवितात. परंतु ते चांगले दिसत नाहींत. कित्येक लोकांचें असें ह्मणणें आहे कीं ताजमहालाचें काम इटली देशांतील कारागिराचें आहे. ज्या वेळेस ताज महालाचें काम चाललें होतें त्यावेळीं लाहोर शहरीं फादर डाकास्ट्रो या नांवाचा एक पाद्री रहात असें, त्याच्या येथें १६४० सालीं फादर म्यानरिक् हा पाहुणा आला होता. त्यास त्यानें असें सांगितलें कीं ताजमहाल जिरोनिमो व्हेरोनियो नांवाच्या व्हेनिस शहरांतील एका शिल्पकारानें काढिलेल्या नकाशा वरून रचला आहे. व त्याच्या आंत असलेली कोंदण कामाची नक्षी आगस्टिन डी बोर्डो नांवाच्या फ्रेंच मेस्त्रीच्या नजरेखालीं तयार झाली आहे. दुसऱ्या बाजूनें दंत कथा अशी आहे की तुर्कस्थानांतील सुलतानानें इसा महंमद इफेन्डी नांवाचा एक शिल्पकार शहाजहान बादशहाकडे पाठविला होता. त्याच्या नकाशावरून ही इमारत बांधिली आहे. व सर जार्ज बर्डवुड साहेबानी "जर्नल आफ इन्डियन आर्ट',

   १५ नांवाच्या त्रैमासिक पुस्तकांत एक निबंध प्रसिद्ध केला आहे, त्यांत ते असें लिहितात कीं हें काम पूर्वेकडील आहे व पाश्चिमात्यांस असें काम कधींच करितां येत नव्हतें. ज्यावेळीं ताजमहालाचें काम झालें त्याच वेळीं तयार झालेल्या इटली देशांतील कामाची व त्याची तुलना करून पाहतां साहेब महाशूर यांची अशी खात्री झाली कीं ताजमहालाचें काम पाश्चिमात्याच्या हातून खचित झालेलें नाही. इटली देशांतील कामांत जीं फळांची व पक्ष्यांचीं चित्रें आहेत तीं त्या देशांतील भिंतीवर काढलेल्या जुनाट चित्रांवरून घेतलेलीं आहेत. त्यामुळें कलमानें काढावयाचें काम दगडांवर न साधून तें छिन्नभिन्न व विद्रूप झालें आहे. असल्या धेडगुजरी कारागिरांच्या हातून हिंदुस्थानांतील ताजमहालाचें अत्युकष्ट व मनोल्हादक आणि शिस्तवार कोंदणकाम खचित झालें नसावें, अशी त्यांची संपूर्ण खात्री होते.


प्रकरण ८ वें.
मणेरी काम.

 या देशांतील मणीकारांच्या कौशल्याची फार प्राचीन काळा पासून सर्व जगांत प्रसिद्धी आहे. हिंदुस्थानांतील भूस्तरविद्या * या नांवाचें एक मोठें पुस्तक मेहेरबान बॉल या नांवाच्या एका साहेबानें केलें आहे, त्यांत ते ह्मणतातः-- "हिंदुस्थानांत पैलू पाडून तयार झालेले स्फटिक व इतर रत्नें पृथ्वीच्या पृष्ट भागावरील सर्व प्रदेशांत अनंत कालापासून आज पर्यंत किती गेलीं असतील याची कोणाला देखील कल्पना करितां येणार नाही. प्रवाशी लोक युरोप खंडांतील वेगवेगळ्या बंदरीं उतरले ह्मणजे त्या गांवचे स्मरण रहावें ह्मणून तेथें उत्पन्न झालेले असें समजून विकणारावर भरवसा ठेवून ते खरेदी करितात ते स्फटिक, हिरे व ती रत्नें हिंदुस्थानाच्या खाणींतून निघालेली असतात इतकेंच नाहीं तर त्यांस पैलू सुद्धां हिंदुस्थानांतच पाडलेले


* खंबायत येथें अकीक सांपडतात व तेथे त्याचें पुष्कळ प्रकारचें सामान तयार होऊन भडोच बंदरीं विकावयास हल्लीं जातें त्याप्रमाणें पूर्वीही जात असेलच. त्या गोष्टीचा येथें संबंध आहे. असतात. ही जर गोष्ट खरी आहे तर लंकेस विकण्याकरितां कांचेचे मणी पाठविणाऱ्या आह्मां पाश्चिमात्यांच्या धंद्या पेक्षां या लोकांचा धंदा विशेष भूषणार्ह आहे, कारण हे लोक ज्यास स्फटिक ह्मणतात तो खरोखरी स्फटिक असतो, कांचेचा गोळा नसतो. इतकेंच नाही तर तो कधीं कधीं मौल्यवान रत्नाप्रमाणें चमकतोही. ब्रोच हा इंग्रजी शब्द हिंदुस्थानांत स्फटिक सांपडत होते याचा वाचक आहे, परंतु ही गोष्ट खरी नाहीं. हा शब्द फ्रेंच भाषेतील ब्राची ह्मणजे सळइ किंवा शलाका या शब्दापासून झालेला आहे. भडोच या शब्दापासून झालेला नाहीं. पुष्कळांचें असें ह्मणणें आहे कीं गुजराथेंतील भडोच हें गांव पूर्वी बॉरिगाझा या नावानें प्रसिद्ध होतें, व तेथील अकीकांपासूनच ग्रीक लोकांचे व रोमन लोकांत प्रसिद्ध असलेले स्फटिकाचे प्याले तयार झाले असावे.

 तांबड्या रंगाच्या अकीकाच्या एका प्याल्याची रोमन सरदार नीरो यानें ५५५१२५ रुपये किंमत दिली होती. हा प्याला मुंबई शहरांत आजरोजीं मिळत असलेल्या अकीकाच्या प्याल्यापासून भिन्न असावा असें आह्मांस वाटत नाहीं.

 हे मुंबईतील प्याले खंबायतेकडून आलेले असतात. खंबायतेस सुऱ्याच्या मुठी, कागद कापावयाच्या सुऱ्या, कागदावर ठेवावयाचीं वजनें, येशू ख्रिस्ताचे खुरुस, मडमाच्या गळ्यांतील ब्रोच, स्फटिकाच्या माळा, आंगठ्या, चहाचे प्याले व बशा, आणि इतर पुष्कळ पदार्थ तयार होतात. हे अकीक राजपिंपळा संस्थानांतील रतनपूर येथील खाणींत सांपडतात. त्याजबद्दल मेहेरबान क्यांबेल साहेब यांनीं आपल्या 'मुंबई ग्याझेटियर ' नांवाच्या ग्रंथमालेत दिलेल्या वर्णनांतून खालीं दिलेली माहिती घेतली आहे.

 "हे दगड रतनपूर किंवा रत्नपूर ह्मणजे रत्नाचें नगर या गांवापासून साठेकरी आणतो. खाणींत सांपडलेल्या दगडाचे दोन भाग करितात. एक भाजावयाचा व दुसरा भाजल्याशिवाय ठेवावयाचा. तीन जातीचे दगड भाजीत नाहींत. एकास “मोरा” किंवा “बवा चोरी" ह्मणतात. दुसऱ्यास " चशमदार” किंवा “डोळा" ह्मणतात. आणि तिसऱ्यास "रोरी" किंवा " लसण्या " ह्मणतात. प्रत्येक दगड वजनानें बहुत करून एक रतलापेक्षां जास्ती नसतो. परंतु त्याचा अमुकच आकार असतो असें नाही. हे तीन जातीचे दगड खेरीजकरून रत्नपुराच्या खाणींत सांपडणारे सर्व प्रकारचे दगड त्याचा रंग जास्ती खुलण्याकरितां भाजावे लागतात. सूर्याच्या तापानें किंवा अग्नींत भाजल्यामुळें अगदीं फिकट तांबूस रंगाचे दगड पांढरे सफेत होतात, व तांबड्या रंगाचे दगड विशेष तांबडे होतात. पिवळट रंगाच्या दगडांत मक्याच्या दाण्यासारखा पिवळट रंग असला तर तो गुलाबी होतो. नारिंगी असला तर तो तांबडा होतो, आणि अर्धवट पिवळा असला, तर तो तांबूस जांबा होतो. ज्या दगडांत मळकड तांबूस रंग व पिवळा रंग यांची मिसळ असते तो भाजला ह्मणजे त्याजवर तांबड्या व पांढऱ्या रंगाचे स्वच्छ पट्टे उठतात. तांबड्या रंगाचा दगड पिकलेल्या रामफळाच्या फिकट रंगापासून तो रक्ता खारख्या लालभडक रंगाचाही असतो. तांबडा असून त्यांत शिरा नसल्या किंवा कोठें फाटफूट नसली ह्मणजे तो दगड उत्तम असा मानिला आहे. दगड जितका मोठा व जाड असेल तितका चांगला. पिवळा किंवा अनेक रंगाची मिसळ झालेला दगड कमी किंमतीचा असें व्यापारी लोक मानितात. साधा अकीक, शेवाळीचा रंग ज्यांत असतो असा अकीक, कपडवंज येथील अकीक, व पट्टेदार अकीक, हे चार जातीचे दगड राजपिंपळ्यांतील तांबड्या द0गडाच्या खालोखाल मानिले आहेत. सध्या अकीकाचें दोन प्रकार आहेत. एक " डोळा" अथवा " चशमदार" व दुसरा 'जामो.' याचा रंग बहुतकरून निळसर-पांढरा असतो. हे दोन्ही दगड काठेवाड प्रांताच्या ईशान्येस मोर्वी संस्थानांत टंकारा गांवापासून तीन मैलावर माहेरपूर गांवाजवळ सांपडतात. ह्या खाणीत सापडणारे दगड' जमिनीच्या पृष्टभागाजवळच असतात, ह्मणजे ते काढण्या करितां फार खोल खणावें लागत नाही. त्यांतील निखोडी दगड वजनानें पांच रतलांपेक्षा अधिक नसतो.परंतु फाटफूट असलेले हलक्या जातीचे दगड कधीं कधीं पन्नास साठ रतल पर्यंत भरतात. हे दगड मोर्वी संस्थानच्या ठाकूर साहेबांस कांहीं कर देऊन खंबायतचे व्यापारी कोळी लोकांकडून गोळा करवितात. साधा अकीक साहाणेवर घासला ह्मणजे करड्या पांडुरक्या रंगाचा दिसतो; व तो कठीण तरी, हातोड्यानें लवकर फुटण्यासारखा व आकारानें मोठा असून त्याजवर झील ही चांगल्या तऱ्हेची बसते. शेवाळी सारख्या दगडास "सबजी" ह्मणतात तो टंकारा शहरापासून तीन मैलावर बुदकोटरा गांवीं एका मैदानांत सांपडतो. सुमारे दोन फूट खोल जमीन खणली ह्मणजे या दगडाचे थरावर थर लागतात. ते वजनानें अर्ध्या रतला पासून ४० रतल पर्यंत असतात.ते साफ केले ह्मणजे त्यांजवर चांगली झील येते, व त्याजवर स्फटिकांत बसविलेल्या शेवाळी प्रमाणें हिरवी किवा तांबूस नक्षी दिसते. कपडवंज येथील अकीक या नावानें प्रसिद्ध असलेला दगड खेडा जिल्ह्यांतील कपडवंज गांवींच सांपडतो असें नाहीं. कपडवंजापासून पंधरा मैलांवर अमलियारा आणि मंडवा या दोन खेड्यांच्यामध्ये माजम नदींतही हा दगड सांपडतो. नदीच्या किनाऱ्यावर किंवा तिच्या तळाशीं बदामाच्या व करंजाच्या बीच्या आकाराचे व अर्ध्या रतलापासून दहा रतल वजनाचे दगड नेहमी आढळतात. ते भिल्ल लोक गोळा करून मंडवा येथील एका बोहऱ्यास विकितात. हा बोहरी दगड खंबायतेस नेऊन तीनपासून बारा रुपये मण या भावानें विकतो.या दगडांवरही झील चांगली येते, व ते कधीं कधीं पांढऱ्या व चित्रविचित्र रंगाचे असतात. मधून मधून त्यांजवर झाडें, डोंगर, नद्या इत्यादि नैसर्गिक देखावे काढले आहेत कीं काय असा भास होतो. या दगडास “खैयू " " अजीयू " आणि " राताडियू " अशी नांवें आहेत. सगळ्यांत उत्तम ज्याला दोरादार अकीक ह्मणतात तो अमदाबाद जिल्ह्यांत रामपूर गांवी मिळतो. जमिनीच्या पृष्ठ भागावर गारगोट्या प्रमाणें हे दगड सांपडतात. त्यांच्या आकाराचा कांहीं नेम नसतो. वजन मात्र अर्ध्या रतलापेक्षां जास्ती नसतें. हे गोळा करण्याची तऱ्हा वर सांगितलेल्या सबजी दगडाप्रमाणें असून त्यांजवर झीलही फार चांगली येते. झील दिल्यावर काळ्या जमिनीवर पांढरे ठिबके द्यावे त्याप्रमाणें हा दिसतो, किंवा एखाद्या फिकट रंगाच्या जमिनीवर काळसर शिरा दाखवाव्या त्याप्रमाणें दिसतो. खंबायतच्या दगडाच्या इतर जातींत 'ब्लड्स्टोन' ह्मणून एक प्रकार आहे तींत हिरव्या रंगाच्या जमिनीवर रक्त शिंपडल्या सारखे तांबडे छटे दिसतात. आणखी एक राता दगड ह्मणून असतो दुसरा एक मैमारियम नांवाचा असतो यांच्यांत पुष्कळ रंगाची मिसळ असते. कधीं कधीं स्फटिकही सांपडतात. तसेंच नीलोत्पल नांवाचे दगड आढळतात. व कधीं कधीं पिरोजाही मिळतो. यांतील कांहीं कांहीं दगड गुजराथेंत सांपडत नसून इतर ठिकाणांहून आणिलेले असतात. राजकोटापासून वीस मैलावर भाग ह्मणून एक टेंकडी आहे तिजवर असलेल्या किल्ल्यावर ह्मणजे टंकारा गांवच्या आसपास मौर्वी संस्थानांत, ब्लड्स्टोन व इतर जातीचे अकीक सांपडतात. त्यांत लीला छाटदार ह्मणजे हिरव्या दगडावर लाल छटे असा व पटोलिया ह्मणजे हिरवा, पिंवळा व तांबडा ह्या तीन रंगांनीं मिश्रित हे दोन प्रकार मुख्य आहेत. रात्या दगडावर झील चांगली देतां येत नाहीं. मैमारियम दगडाचा रंग यकृताच्या रंगाचा असतो व त्यांत शिंप्या व क्षुद्र कीटक यांचे रज असल्यामुळें पिवळे डाग दिसतात. हा दगड कच्छच्या रणांत डिसा शहराच्या उत्तरेस साठ मैलांवर धोकवाडा या गांवीं सांपडतो. ह्याचे मोठाले चिरे असतात, तरी त्यांजवर चांगली झील देतां येत नाहीं. खंबायती स्फटिकही मौर्वी संस्थानांत टंकारा येथेंच सांपडतात. ते पांढरे सफेत असल्यामुळें त्यांजवर झीलही चांगली चढते. मद्रास, लंका (सिलोन ), आणि चीन येथून स्फटिक आणून त्यांसही खंबायत शहरीं पैलू पाडून खंबायती स्फटिक या नांवानें विकितात. नीलोत्पल याला व्यापारी लोक लाजवर्द असें ह्मणतात. हा दगड इराण व बखारा येथून मुंबईच्या द्वारें खंबायतेस येतो.याजवरही चांगली झील देतां येत नाहीं, काळा पथ्थर या नांवाचा एक दगड बसोरा व एडन यथून येतो,व खंबायतेस येतो त्याजवर पैलू पडतात.हा दगड फूटलेल्या कांचेप्रमाणें दिसतो, परंतु त्याजवर झील फारच उत्तम तऱ्हेनें देतां येते. हल्लीं खंबायतेस पिरोजा नांवानें विकत असलेला दगड खरा पिरोजा नाहीं. हा कांहीं तरी रांधा आहे. तो चीन देशाहून येतो. याचे तुकडे सुमारें वजनानें अर्धाअर्धा रतल भरतात. हा दगड किंवा रांधा निळ्या कांचेसारखा दिसतो, परंतु त्याजवर झील फार चांगली बसते.

 दगड खाणींतून गोळाकरून आणिला ह्मणजे त्याजवर तीन प्रयोग घडतात. एक तो कापण्याचा; दुसरा छीणीनें त्यास आकार द्यावयाचा, आणि तिसरा झील चंढवावयाचा. खंबायतसे होणाऱ्या दगडाच्या दागिन्याचेही तीन प्रकार आहेत. एक चिनी लोकांचे दागिनें; दुसरा अरबी लोकांचे दागिनें; व तिसरा युरोपियन लोकांचे दागिनें. चिनई लोकांचे दागिनें रात्या दगडाचे करितात. त्यांत दोन प्रकार आहेत, एक पदकें, त्यांस मुगलाई गुल ह्मणतात; आणि दुसरे मणी, त्यास डोल म्हणतात. पदकें चपटीं, पातळ, बदामी किंवा चौकोनी रंगाचीं असतात. तीं चीन देशांत पोंचीप्रमाणें वापरतात किंवा कपड्यांवर बसवितात. मण्याच्या माळा करितात. प्रत्येक माळेंत ५० मणी असतात. अरबस्थानांत पाठविण्याकरितां रामपूर येथील अकीक, रतनपूर येथील राता व लसनी दगड, व लाल छाटदार दगड, यांचा उपयोग होतो. यांच्या आंगठ्या, आंगठ्याचे खडे, गळ्यांतील माळा, हातांतील कांकणें, बाजूबंद वगैरे जिनसा होतात. अरबस्थानांत पाठविण्याकरितां तयार केलेले मणी पैलूदार किंवा गोखणदार म्हणजे हिऱ्या सारखे, व बदामी आकाराचे व भाल्याच्या टोंकाच्या आकारा सारखे ह्मणजे " चमकळी" डौलाचे असतात. अनेक तऱ्हेचे ताईतही अरबस्थानांत विकतात. युरोपियन लोकांकरितां गाड्यावर बसविलेले तोफेचे नमुने, पेट्या करण्याकरितां सपाट चौकोनी तुकडे, चहाचे प्याले व बशा, बुद्धिबळें, फूलदानें, लेखण्या, घड्याळें, किंवा कागद ठेवण्याच्या चौकटी, दौती, चाकूच्या मुठी, आखण्या, कागद कापण्याच्या सुऱ्या, टांकाच्या दांड्या, मडमांच्या गळ्यांत घालण्याकरितां माळा व ब्रोच, हातांत घालण्याकरितां कांकणे, कागदावर ठेवण्याचीं वजने, लोंकरी काम करण्याच्या सळया, रेशीम गुंडाळण्याच्या फिरक्या, बुतामें, शिक, इत्यादि पदार्थ तयार होत असतात. गेल्या ३८ वर्षांत ह्मणजे १८५१ पासून अरबस्थानांत माल जावयाचा तो काठेवाड प्रांताच्या नैऋत्येस असलेल्या विरावळ बंदरापासून जातो. हल्लीं बहुतकरून सर्व माल बोहरी लोक मुंबईस आणतात. व तेथूस चीन, अरबस्थान, व यूरोप या ठिकाणीं रवाना करितात. क्वचित् सिंध, काबूल व अरबस्थान येथील घोड्याचे व्यापारी खंबायतेस येतात तेव्हां तेही कांहीं माल आपल्या देशास घेऊन जातात."

 मणीकार लोक आपल्या देशांत ठिकठिकाणीं सांपडतात. वायव्य प्रांतांत बांडा जिल्ह्यांत केण नदींत अकीक सांपडतात. त्यांचे साहेब लोकांकरितां नग करीत असतात. आग्रा व लखनौ या गांवीं शिक्के मोर्तब खोदण्याचें काम चांगलें होतें.

 पंजाबांत भेरा येथें खोट्या दगडाचे मणी वगैरे तयार होतात. हा दगड कंदाहाराजवळ सांपडतो, तो तेथून बकऱ्याच्या कातड्याच्या पिशवींत घालून वाफ्यावर ठेवून सिंधू नदींत सोडून अटक गांवीं आणितात. व अटक गांवांतून भेरा येथें नेतात. भेरा येथें इमामउद्दीन, महंमदद्दीन व खुदाबक्ष असे तीन मणीकार प्रसिद्ध आहेत. अमृतसर येथें काही काश्मीरीलोक मणीकाराचें काम करितात. लाहारे व दिल्ली या गांवींही मणीकार आहेत.
 जबलपूर येथें गारेचे मणी होतात, व नर्मदेंत सांपडलेल्या कांहीं दगडाच्या चाकूच्या मुठी, कागद कापावयाच्या सुऱ्या, बुतावें वगैरे जिनसा होतात. ह्या नर्मदेंत दाणासुलैमानी नांवाचा एक दगड सांपडतो. हा एका जलचराच्या डोक्याच्या हाडापासून बनतो. हाडें हजारों वर्षे चिखलांत पुरून राहिल्यामुळें त्याच्यावर एका प्रकारचा रसायन प्रयोग घडून त्याचा दगड होतो, तरी त्याच्या आकारांत फारसा फरक पडत नाहीं. मुसनमान लोकांत या मण्यास फार मान आहे. त्यांची अशी समजूत आहे कीं सुलैमान याचें तक्त विमानाप्रमाणें आकाशांतून उडत जात असतां नर्मदा नदी ओलांडून जातानां त्यांतील कांहीं मणी या नदींत पडले, ते हे होत.

 जयपूर संस्थानांत राजमहाल शहराजवळ बनास नांवाच्या नदींत याकूत या नांवाचा एक लालडीसारखा दगड सांपडतो. हाच दगड उदेपूर व कृष्णगड ह्याही संस्थानांत कोठें कोठें मिळतो. अभ्रकाचे व संखजिऱ्याच्या एका जातीचे दगड सांपडतात ते फोडले ह्मणजे त्यांतून बारा पैलू असलेले याकूत आढळतात. त्यांचा रंग पिवळ्या रंगापासून लाल व जांभळा असतो. जांभळ्या रंगाचा याकूत उत्तमांत गणला आहे.

 हे दगड पेगू व सिरीयम येथें सांपडणाऱ्या दगडासारखे असतात. प्लिनी नांवाच्या एका ग्रंथकारानें असें लिहून ठेविलें आहे कीं हिंदुस्थानांतील याकूत दगड फार मोठाले असतात, व त्यांत बारा औंस पाणी ठेवितां येते. इतका मोठा दगड जयपूर संस्थानांत हल्लीं कोठें आढळत नाहीं. मोठ्यांत मोठा ह्मणजे पांच सव्वापांच तोळे वजनाचा मिळतो. दगड गोळा केले ह्मणजे राजमहालास साठेकरीलोक ते विकत घेतात,अथवा जयपूर येथें पाठवून सारवार नांवाच्या लोकांस विकतात. आमसुलाच्या ओल्या फळाचीं दोन टरफलें केलीं ह्मणजे ती जशी बाहेरून लिंबा प्रमाणें गोल व आंतून वाटी प्रमाणें खोलगट दिसतात त्या तऱ्हेवर याकूत मोठा असला ह्मणजे त्यास कापतात व तो स्वित्झर्लंड जर्मनी, इंग्लड, इटली व आस्ट्रिया या देशांत पाठवितात. तेथें तो पुन्हा कापिला जाऊन त्याचे दागिने होतात. घड्याळें करण्याच्या कामीं ह्या दगडाचा उपयोग करितात. जयपुरास सहा आण्यापासून दिडरुपया रतल या भावानें कच्चा दगड विकतो. पक्या ह्मणजे, कांपलेल्या दगडास पांच पासून पाऊणशें रुपये रतल भाव येतो.

 जयपुरास याकुताचे लोलक व गोखरूदार मणी करून त्याच्या माळा तयार करितात. हल्लीं जयपूरची इतकी कीर्ति पसरली आहे कीं इतर गांवच्या लोकांस आपला माल नेऊन तेथें विकावा लागतो. जयपूरच्या महाराजानीं यंदाच्यासालीं ग्लासगो येथील प्रदर्शनांत असला माल दहाहजार रुपये किंमतांचा पाठविला आहे.

 बंगाल्यांत मणीकाराचें काम नांव घेण्यासारखें कोठेंच होत नाहीं. ब्रह्मदेशांत हिरे खेरीज करून इतर रत्नें कापण्याचें काम होते. सन १८८५ सालीं रंगुनशहरीं मणीकारांची १४ दुकानें होतीं.


प्रकरण ९ वें.
हस्तीदंत, शिंगे व शिंपल्या यांचे केलेले पदार्थ.
 बृहत् संहितेंत पलंगाचे गाते करण्यास उत्तम पदार्थ हस्तीदंत गणला आहे. त्यांत असें लिहिलें आहे कीं पलंगाचे पावके हस्तीदंताचे करावे व त्याचें इतर सामान लांकडाचें करुन त्याजवरही हस्तीदंत बसवावा. आणखी असेंही लिहिले आहे कीं ज्या हत्तीच्या दाताचे पावके करावयाचे असतील तो मैदानांत धरिला असेल तर, त्याच्या खालचा किंवा मुळाजवळचा पोकळ असलेला भाग कापून टाकावा व तो डोंगरावर चरणारा असला तर कांहीं थोडा कांपला तर चालेल. हल्लीं पतियाला येथील महाराजांचा पलंग हस्तीदंताचा केलेला आहे. प्राचीन काळीं हस्तीदंताचा पुष्कळ उपयोग होत असे किंवा नसे यांतील कोणतीही गोष्ट हल्लीं जरी सिद्ध करितां येत नाहीं, तरी हल्लीं लांकडावरील खोंदीव कामांत बसविण्याकरितां जो कांहीं हस्तीदंताचा खर्च होत असेल त्याच्या शिवाय आणखी कोठें फारसा होत नाहीं. हस्तीदंताचे चुडे व लांकडावरील काम याजबद्दल माहिती मागें दिलीच आहे. हस्तीदंतावर खोंदीव काम फारच थोडे ठिकाणीं होते. हल्लीं तर मुर्शिदाबाद व त्रावणकोर या दोनच गांवांचीं नांवें ऐकूं येतात. आफ्रिकाखंडांतून मुंबईस पुष्कळच हस्तीदंत येतो परंतु त्यांतील बहुतेक माल परदेशास पुनः जातो. आसाम व दक्षिण हिंदुस्थान या दोन ठिकाणीं कधीं कधीं हस्तीदंत सांपडतो, व त्यांतही आलीकडे हत्तीच्या संरक्षणार्थ इंग्रज सरकाराने कांहीं नियम ठरविल्यामुळें हा व्यापार कमी कमी होत चालला आहे. हस्तीदंताचे देवादिकाचें पुतळे, हत्ती, घोडे, उंट, बैल वगैरे जनावरें; गाडया, पालख्या, म्याने, गलबतें वगैरे खेळणीं; फण्या, कंगवे, चौऱ्या, पेटया व चटया इत्यादि किरकोळ पदार्थ ह्याच जिनसा आपल्या देशांत होत असतात.

 कलकत्ता प्रदर्शनांत मुर्शिदाबाद, गया, दुमरावण, दर्भंगा, ओढिसा, रामपूर    १६ बरद्वान, टिपेरा, चितागांग, डाका, पाटणा, त्रावणकोर आणि पुणें या ठिकाणांहून हस्तीदंती काम गेलें होतें. त्यांत मुर्शिदाबादेहून आलेलें काम पुष्कळ होतें. हल्लीं मूर्शिदाबादेस सुद्धां हें काम पूर्वी सारखें होत नाहीं व वीस वर्षांपूर्वी तेथें जितके कारागीर होते त्यांतला चौथा हिस्सा सुद्धां आजला शिल्लक नाहींत. अशी या धंद्याची रड आहे.

 ओदिया व बहार या दोन प्रांतांतील संस्थानिकांच्या दरबारीं हस्तीदंताचे काम करणारे कारागीर आहेत. दर्भंगाच्या महाराजानीं हस्तीदंताच्या बारीक शलांका करून त्याची एक हातरी तयार करवून कलकत्त्यास पाठविली होती. तिची किंमत १३२५ रुपये होती. इतका हस्तीदंत, उत्तम रीतीनें ब्रह्म देशांत कोरतात त्याप्रमाणें कोरला असता तर त्याच्याकडे पहात बसावें असें प्रेक्षकांस वाटलें असतें. परंतु या चटईत तें काय पहावयाचें होतें ? असो; रजवाडी काम. हस्तीदंताच्या गंजिफा, खेळणी, बुद्धिबळें, सोंगट्या, फण्या, पंखे, बांगड्या इत्यादि कांहीं पदार्थ इतर ठिकाणांहूनही कलकत्ता प्रदर्शनांत आले होते. सिलहद येथें हस्तीदंताच्या हांतऱ्या होतात.

 वायव्य प्रांतांत हस्तीदंताचें काम फारच थोडें होते. फक्त बनारस येथील महाराजानीं दोन कारागीर आपल्या नोकरीस ठविले आहेत. व अयोध्या प्रांतीं गोंडा जिल्ह्यांत कांहीं कारागीरलोक आहेत.

 पंजाबांत अमृतसर, दिल्ली, पतियाला, शहापूर, मुलतान आणि लाहोर याठिकाणी हस्तीदंताचें जुजबी काम होतें. फण्या, कागद कापावयाच्या सुऱ्या, लहान डब्या, व चुडे या जिनसा अमृतसर येथें होतात. दिल्लीचे कांहीं कारागीर चित्रें वगैरे खोदितात. शहापूर येथील बुद्धिबळाची प्रसिद्धी आहे. मुलतानचे चुडे व खेळणीं आणि लाहोरचे चुडे व फण्या याही कधीं कधीं विकावयास येतात. अमृतसर येथें हस्तीदंतावर जाळीचें काम फार चांगलें करितात.

 जयपुरास दोन तीन कारागीर आहेत. बांगडया, सुरमादाणी, व बाटलींत घातलेलें हस्तीदंताचें झाड असल्या कांहीं किरकोळ जिनसा बिकानेर येथें होतात. भरतपूरच्या चौऱ्या, पालीच्या सुरमादाण्या, अलवार येथील हत्ती, रेवा येथील गाई, बैल, घोडे इत्यादिकांचीं चित्रें; रतलाम, धार व अल्लीपुरा येथील फण्या, तलवारीच्या मुटी, व कागद कापण्याच्या सुऱ्या, लंडन येथील प्रदर्शनांत आल्या होत्या.  मद्रास इलाख्यांत विजागापट्टण येथें पेट्या वगैरे करण्याकडे लागणाऱ्या जाळी कामास हस्तीदंताचा उपयोग होतो. त्रावणकोराची मात्र हल्लीं मोठी कीर्ति आहे. सन १८५१ साली त्रावणकोराहून एक हस्तीदंती सिंहासन लंडन येथील प्रदर्शनांत पाठविलें होते, व तेंच पुढें राणीसाहेबांस बक्षीस देण्यांत आलें. हें सिंहासन राणीसरकारच्या राज्यांत तयार होणान्या अत्युत्तम चिजांपैकीं एक उत्तम चीज आहे असें ह्मणतात. लंडन शहरांतील साऊथ केन्सिंगटन नांवाच्या सर्वसंग्रहालयांत आह्मीं टिपुसुलतानाच्या दोन हस्तीदंती खुर्च्या पाहिल्या आहेत. त्यांजवरील कामही फारच सुरेख आहे. त्रावणकोर येथून लंडन प्रदर्शनांत तसबिरीच्या चौकटी, आरशाच्या चौकटी, फण्या, कागदावर ठेवावयाचीं वजनें इत्यादि जिनसा गेल्या होत्या. पुणें प्रदर्शनांत एक देवीची मूर्ति, एक आरशाची चौकट, एक फणी, व एक कागद कापावयाची सुरी, इतक्या जिनसा आल्या आहेत. बडोदें संस्थानांतून त्रावणकोरच्याच कामाचे सुंदर नमुने आले आहेत. त्यांत कागदावर ठेवावयाचीं दोन वजनें आहेत त्यांचें वर्णन करावें तितकें थोडें. एकाच ठिकाणीं सर्प, पक्षी, पक्ष्यांचीं घरटीं, शिंप्या, तलवार, सुपाऱ्या व आणखी अनेक जिनसा अशा कांहीं सुबक रीतीनें खोदिल्या आहेत कीं त्याजकडे पहात रहावेसें वाटतें.

 पुण्यांत कसबा पेठेंत गणपतीच्या देवळा समोर फण्या, डब्या, व फांसे इत्यादि जिनसा होतात. पुण्याहून कलकत्ता प्रदर्शनांत भिवा मेस्त्री याच्या हातचा एक मुरलीधर आह्मीं एका मारवाड्याच्या येथून विकत घेऊन पाठविला होता. कच्छ, भूज, येथून एक ३८५ रुपयाची पेटी कलकत्यास गेली होती. तीच पेटी हल्लीं मुंबईच्या हुन्नर शाळेंतील सर्व संग्रहालयांतून पुणें प्रदर्शनांत आली आहे.

 आसाम प्रांती पूर्वीच्या संस्थानिकांच्या पदरीं असलेल्या कारागिराचे कांहीं वंशज जोरहाट या गांवीं हस्तीदंतावर काम करितात. त्यांत आपले पंख साफ करीत असलेले बगळे, व तोंडांत सर्प धरलेली सुसर या दोन चित्रांची तेथील कारागिरांस विशेष आवड असल्यामुळें तींच फार करितात.

 ब्रह्मदेशांत मौलमीन व रंगून या दोन गांवीं हस्तीदंताचें काम होतें. त्याचें मेहेरबान टिली साहेबांनीं खालीं दिलेल्या प्रमाणें वर्णन केलें आहे. “वेलबुट्टी व चित्रें यांची मिसळ,तलवारीच्या मुठी,कागद कापावयाच्या सुऱ्या व टेबलावर ठेवण्याचें नक्षीचें सामान यांत केलेली असते.मूर्ति गौतमाच्या होतात. मौलमीन गांवीं उत्तम करागीर तीन आहेत. रंगून येथे दोन तीन आहेत व सगळ्या देशभर मिळून आणखी कांहीं थोडे आहेत. अगदीं लांकडावर होत असलेल्या कामाप्रमाणें सुरेख काम करणारा असा सगळ्या ब्रह्मदेशांत एकच कारागीर आहे. याचें नांव माऊंग नियायिंग. हा मौलमीन येथें राहतो. इतर कारागिरीचें काम इतकें चांगलें असत नाहीं. त्यांनीं सोडविलेल्या पत्त्यांत खाचाखोची रहातात व चित्रें बेढब असतात. ब्रह्मी लोकांनीं तयार केलेल्या धांव नामक हत्याराच्या मुठी सर्व प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बाहेरून वेल व फुलें सोडविलेली असतात. वेलांच्या फटीतून ह्मणजे जाळींतून हत्यारें आंत घालून मधला गाभा पोकळ करून त्यांत माणसांचीं चित्रें खोंदतात. त्या चित्रांकडे पाहिलें ह्मणजे ती बाहेरून खोदून नंतर आंत बसविलेलीं आहेत असा भास होतो. परंतु खरी स्थिति अशी नाहीं. हस्तीदंताचा गाभा अशा रीतीनें खोंदून तयार करितांना पुष्कळ कारागीर दृष्टीस पडतात. हा मौलमीन येथील कारागीर नेहमीं सयामच्या राजाचें काम करीत असतो; व पूर्वीही ब्रह्मदेशच्या राजाचें आणि श्यान सरदारांचें काम करीत असे. ह्या राजेलोकांकरितां खुर्च्या, सिंहासने, उभा कोंरलेला सगळा दांतच्या दांत, व बुधाच्या मूर्ति ह्या जिनसा तयार होतात. त्यानें ब्रह्मदेशाच्या माजी राजा करितां एक हांतरी केली होती. ती गुंडाळून ठेवितां येत असे. हत्तीचे दांत अप्पर-ब्रह्मदेश व सयाम या देशांतून येतात.

 नेपाळांत कोठें कोठें देवाच्या मूर्ति, फण्या, फांसे, चोपदाराच्या कांठ्या, व "कुकरी" ह्मणजे जंबियाच्या मुठी इत्यादि जिनसा होतात.

शिंगाचें सामान.

 प्राचीन काळापासून अर्घ्ये, संपुष्टें, गोमुखाचीं शिंगें, व वाद्यें इत्यादि पदार्थ शिंगापासून करण्याची वहिवाट आहे, चाकूच्या व जंबियाच्या मुठी आणि बाणाची टोंकें हीही कधीं कधीं शिंगाचींच करितात. खढ्गपात्राचा ह्मणजे गेंड्याच्या शिंगाचा प्याला पाणी पिण्यास पवित्र मानिला आहे. आलीकडे मात्र शिंगें विलायतेस जाऊं लागलीं. विजयदुर्ग, जैतापूर, मालवण, व सांवतवाडी या ठिकाणीं गव्याच्या शिंगाचें काम फार चांगलें होतें. तीस वर्षापूर्वी देवपुजेचें संपुष्ट, नंदी, गोमुखी , शिंग, इत्यादि जिनसा मात्र होत असत; परंतु आलीकडे साहेब लोकांकरितां मोठालीं फुलदानें, मेणबत्यांचीं घरें, हरिणें, उंट हत्ती इत्यादि जनावरें व सर्पाच्या अकाराचीं कागदावरील वजनें इत्यादि पदार्थ होऊं लागले आहेत. सुरतेस व मुंबईस होत असलेल्या चंदनाच्या पेट्यावर सांबरशिंगाचें कोंदणकाम होत असतें हें मागें सांगितलेंच आहे. या शिवाय सांबरशिंगाची लहान लहान चित्रें करून त्यांस तांबडा रंग देऊन त्यांजवर वर्ख चढवून सुरतेस तयार करितात. राजकोटास बैलाच्या शिंगाच्या फण्या, कंगवे व इतर पुष्कळ पदार्थ होऊं लागले आहेत.

 बंगाल्यांत सातखीर, कटक, आणि मोंगीर यां गावीं शिंगाचें काम होतें. जयपुरास बैलाच्या शिंगाचीं धनुष्यें करून त्याजवर लांखेचें रोगण चढवून नक्षी करितात. कधीं कधीं शिंगाच्या ढालीही तेथें होतात. राजपुतान्यांत बंदुकीची दारू ठेवण्याकरितां शिंगाचीं तोसदानें करून त्यांजवर हस्तीदंताचें खोंदीव काम करितात. मद्रास इलाख्यांत विजागापट्टण गांवीं शिंगाच्या पेट्या करून त्यांजवर हस्तीदंताचें जाळीकाम करितात. तपकिरीच्या डब्या, छत्र्याच्या मुठी, टांकाच्या दांडया, वगैरे किरकोळ पदार्थ ह्मैसुरास होतात, आंब्याच्या आंकाराची एक तपकिरीची डबी ह्मैसुराहून लंडन प्रदर्शनांत गेली होती. तिजकडे पाहून प्राफेसर रोलो फार खुष झाले व असें ह्मणाले कीं आमच्या जर्मनी देशांत असल्या डब्या पुष्कळ विकतील. नेपाळांत प्याले, अर्घ्ये, डब्या, व आंगठ्या इत्यादि जिनसा खड्गपात्राच्या करितात खड्गपात्राचा अर्घ्यातर्पण करण्यास फार पवित्र मानिला आहे.

शिंपल्याचें काम.

 शंखाचीं कंकणें प्राचीन काळीं होत असत हें दागिन्याच्या सदरा खालीं दाखविलेंच आहे. डाका येथील शंखारी लोक ज्या शिंपल्या वापरितात त्यांस त्यांनीं वेगवेगळालीं नांवे दिलीं आहेत. तिटकुरी, पाती, लालपाती, अलाबेला, धला, कुलई आणि सुरती अशींहीं नांवें आहेत. त्यांत तिटकुरी शिंपली घट्टपणांत, तकाकींत, व रंगांत, फार चांगली मानिलेली आहेत. साध्या चपट्या आंगठी पासून तों उत्तम कांकणापर्यंत किंवा व्याघ्रमुखी कडया पर्यंत शंखाचें काम डाका येथें होतें. सुरती शंख मोठे असल्यामुळें त्यांचा कांकणें व बांगड्या करण्याकडे जास्ती उपयोग होतो. तिटकुरी व पाती हे दोन जातीचे शंख फारच मोठे असल्यामुळें त्यांचे चुडे करितां येत नाहींत. ते जाड असून त्यांच्या अंगीं लखाखी जास्ती त्यामुळे कोंदण कामांत त्यांचा उपयोग जास्ती होतो.

 कांसवाच्या कवटीच्या पेट्या होतात. कवड्यांच्या टोप्या, अंगरखे, टोपल्या इत्यादि पुष्कळ जिन्नस होतात. बंगाल्यांत कुंकवाच्या करंडीवर कवड्या लावण्याची चाल आहे. जयपुरास तेथील एका नदींत सांपडणाऱ्या शिंप्याचें दागिने होतात.प्रकरण १० वें.
मातीचीं भांडीं.

 मातीचीं साधीं भांडीं या देशांत अनंत कालापासून होत आहेत. 'घट' ह्मणजे पाण्याची घागर, व 'कलश' ह्मणजे पाणी पिण्याचा तांब्या, या भांड्याचें वर्णन संस्कृत ग्रंथामध्यें जिकडे तिकडे आढळतें. एक वेळ उपयोगांत आणलेलें मडकें धर्म संबंधीं कृत्यांत फेंकून द्यावें लागतें, किंवा फोडून टाकावें लागतें, त्यामुळें मडक्यास गिऱ्हाइकेंही फार आहेत. संक्रातीच्या दिवशीं, अक्षतृतीयेच्यादिवशीं, लग्नांत, मुंजीत, व औध्र्वदेहिकक्रिया करण्यांत मडक्यांची जरूर लागते. पण ही सर्व साध्या मडक्याची गोष्ट झाली रोगण चढविलेलीं मडकीं, ह्मणजे बरण्या, वगैरे जिनसा करण्याची सुरवात आपल्या देशांत अलिकडेच झाली असावी,व ती विद्या चीन देशांतून इराण देशांत जाऊन तिकडून आपल्या देशांत आली असावी असें अनुमान आहे. असल्या भांड्यांस अझुनही आपण चिनी भांडी ह्मणत असतों.

 पंजाबांत दिल्ली, मुलतान व पेशावर या गांवांची चिनी भांड्याबद्दल फार प्रसिद्धि आहे. सुरया, मोठाल्या थाळ्या, आपकोरे, लोटे, व भिंतीस बाहेरून लावायाच्या विटा या जिनसा दिल्लीस होतात. हें काम इराणी कामासारखें दिसते. ज्या मातीची हीं भांडीं करावयाचीं तींत क्षार पदार्थ नसावा. गर तयार करतात त्यांत फेल्स्पार नांवाच्या दगडाची पूड असते. या रोगणी कामास काशीकाम म्हणतात. व तें करणाऱ्या लोकांस काशीगर असें ह्मणतात. दिल्ली, आग्रा आणि लाहोर, या गांवीं निळा व पिरोज, हे दोन रंग फार चांगले होतात. तेथील काशीगारांस तांबडा व पिंवळा रंग चांगला साधत नाहीं. मुलतानांत गारेची पूड करून, ती पाण्यांत कालवून, तिनें मडकें सारवून, नंतर तिजवर नक्षी काढून मग रोगण चढवितात. पेशावर येथें होणारीं भांडी मूलतान येथें होणाऱ्या भांड्यासारखी चांगलीं नसतात. लाहोरास 'मर्तबान' या नांवाची मिठाई ठेवण्याची भांडीं, हुक्के व प्याले असल्या कांहीं जिनसा तयार होतात. लाहोरच्या आसपास मडकीं व विटा भाजून शिल्लक राहिलेल्या गाळाचीं मोठालीं टेपाडें आहेत, त्यावरून पूर्वी त्या गांवीं चिनी भांडी पुष्कळ होत असावीं असें वाटतें. जलंदरास महंमद शरीफ या नांवाचा एक कशीगर आहे, त्यास मडक्यावर पाहिजे त्या रंगाचें रोगण चढवितां येतें असें ह्मणतात. गुजरणवाला व भावलपूर, या गांवीं कागदीं मडकीं ह्मणजे अतिशय पातळ मडकीं तयार होत असत हुशारपुरास साध्या मडक्यावर भिंतींवरील चित्रांप्रमाणे चित्रें काढितात. छाजर गांवीं मडक्यांवर नुसता काळा रंग देतात.
 सिंध प्रांती हाला व ठट्टा शहरीं चिनी मडकीं होतात. ह्या दोन गांवीं पूर्वी मीर नांवाच्या राज्यकर्त्यांची वस्ती होती. त्यांतील एका राज्यकर्त्यांने एका चिनई मनुष्यास आपल्या राज्यांत ठेवून घेऊन त्यास जाहागिरी करून दिली, त्यामुळें हा हुन्नर सिंध देशांत आला, अशी तेथील काशीगर लोकांची समजूत आहे. त्यांच्यांतील दोन असामी मुंबईस आले होते तेव्हां त्यांनी आह्मांस तर असे सांगितले की आह्मी त्या चिनई कुंभाराचे वंशज आहोत. सिंध येथील बरण्यांस हल्लीं साहेब लोकांत पुष्कळ गिऱ्हाइकें आहेत. मुंबईत मेहेरबान टेरी साहेब यांनीं हाला येथील एका काशिगारास आणून ठेविला आहे, त्याच्या मदतीनें साहेबबहादूर पुष्कळ तऱ्हेचीं भांडीं तयार करवीत असतात. त्यांत अजंठा येथील लेण्यांत असलेल्या भिंतीवरील नक्षी मडक्यांवर काढतात यामुळें त्यांस अधिकच शोभा आणितां येते. गायकवाडींत पट्टण गांवीं होत असलेल्या मडक्यांची ख्याती आहे. या मडक्यांचा आकार चित्रविचित्र असतो. एका हुक्यांस कधीं कधीं पांच पांच तोंडे करितात. रोगणाचें काम पट्टणांत फार क्वचित होतें. नागांव येथें शेट पिरोजशा यांनीही चिनई भांडीं करण्याचा कारखाना काढिला आहे.  वायव्यप्रांतांत अजमगडास चांगले खुजे तयार करितात. तेथील भांडीं काळ्या रंगाचीं असून त्यांजवर पांढऱ्या वर्खाची नक्षी चिकटविलेली असते. त्यामुळें तीं बिदरी भांड्यांसारखी दिसतात. हीं मडकीं कशी करितात हें कळत नाहीं. तरी सर जार्ज वर्डऊड यांचें असें ह्मणणें आहे कीं भाजतांना मडक्याला मोहरीची पेंड लावून भाजतात त्यामुळें तीं काळीं होतात, त्यांजवर पांडरा वर्ख लावीत नाहींत तर आरशावर पारा चढवितात. त्याप्रमाणें, भांडीं खोंदून त्यांच्या कोंदणांतून पारा चढवितात. लखनौस सुरया, बशा वगैरे जिनसा होतात. रामपूर येथील मडकीं निळ्या, पांढऱ्या, किंवा तांबूस रंगाचीं असतात. बुलंदशहर जिल्ह्यांत सुर्ज्या म्हणून एक गांव आहे तेथें फार चांगलीं मडकीं होतात. अयोध्या प्रांतांत बारबंकी जिल्ह्यांत देवा गांवीं कुंभाराच्या एका कुटुंबांत चिनी भांडीं होतात. अल्लीगडास एका प्रकारचीं मडकीं होतात त्यांचीही प्रसिद्धि आहे. अमरोहा गांवीं फार पातळ मडकीं करितात. त्यांस " कागझी " ह्मणजे कागदी असें ह्मणतात. साहारणपुरास सुरया वगैरे मडकीं करून त्यांजवर वर्ख चढवितात. गोंडा जिल्ह्यांत अत्रावला या गांवीं तसेंच सितापूर या गांवीं मातीचीं सुंदर भांडी करून त्यांजवर हातानें नक्षी काढितात.

 राजपुतान्यांत आलीकडे मातीच्या चिनई मडक्यांबद्दल जयपुराची फार ख्याती झाली आहे. हीं भांडीं कांहीं अंशीं दिल्लीच्या भांड्यासारखीं असून कांहीं अंशीं मिसर देशांतील भांड्यांसारखीं दिसतात. जयपुरास होणारीं बहुतेक भांडी तेथील हुन्नर शाळेतं किंवा शाळेंत शिकून स्वतंत्र दुकान काढणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तयार होऊन येतात. माती गाळून तयार करून ती साच्यांत थापून तिचीं भांडीं करितात. व त्यांजवर फेल्सपार व गव्हाचा आटा याचें पूट देऊन भाजतात. रोगणास रंग देण्याकरितां लागणारे पदार्थ जयपूर संस्थानांतच भगोर आणि खेत्री या गांवीं सांपडतात. मातीचीं साधीं भांडीं जयपूर संस्थानांत बासी गांवीं होतात, त्यांतही तेथील हुक्के विशेष प्रसिद्ध आहेत. बासी येथील आगगाडीच्या स्टेशनावर हीं भांडीं विकावयास ठेविलेलीं आहेत. लालसोट नांवाच्या खेड्यांतही चांगलीं मडकीं होतात असें कित्येकांचें ह्मणणें आहे. सांबर सरोवराच्या कांठावर गुढा ह्मणून एक गांव आहे, तेथेंही एका प्रकारची मातीची भांडीं तयार होतात. तीं बटक या नांवानें प्रसिद्ध आहेत. बिकानेर संस्थानांत कांहीं मातीचीं चिनई भांडी तयार होतात. अलवार येथील साध्या चिलमी, व सुरया, प्रसिद्ध आहेत.
 मध्यप्रांतांत बऱ्हाणपूर येथील मातीचीं चिनई भांडीं पूर्वापार प्रसिद्ध आहेत. हीं भांडीं तांबड्या रंगाचीं असून त्यांजवर पिवळी नक्षी असते. हेंही काम एकाच घरांत होतें. दुसऱ्या कोणास त्याची कृति माहीत नाहीं. त्यामुळें काम फार थोडें होऊन व्यापाराची वृद्धि होत नाहीं. इंदुर, मुदेश्वर, व छत्रपूर येथून मातीची चिनई भांडीं लंडन येथील प्रदर्शनांत गेलीं होतीं.
 मद्रास इलाख्यांत बहुत करून साधींच मडकीं होतात. त्यांचा रंगही बहुधां तांबडा असतो. कधीं कधीं मडकीं ओलीं असतांनाच हातानें नक्षी काढावयाची किंवा भाजल्यावर खोदावयाची चाल आहे. या इलाख्यांत मोडकळीस आलेल्या जुन्या शहरांतील उकीरड्यांत कधीं कधीं फुटकीं मडकीं सांपडतात. त्यांचा आकार व त्यांजवरील नक्षी ग्रीस देशांतील ट्रॉय शहरांत सांपडणाऱ्या प्राचीन मडक्या प्रमाणें आहेत, असें डाक्टर बिडी साहेब म्हणतात. कधीं कधीं मडक्यांवर लाखेचें वारनीस देतात अथवा गारबीनें घांसून त्यांस झील आणतात. ज्याप्रमाणें मडकें काळें करणें असेल तर आस्ते आस्ते व त्यास पुष्कळ धूर लागेल अशा तऱ्हेनें जाळण्याची ग्रीस देशांत चाल होती, ही चाल हिंदुस्थानांतही पूर्वी असावी यांत संशय नाही. अलीकडे तांबड्या मडक्यांवर पांढऱ्या मातीचें सारवण करून त्यांजवर अभ्रकाची पूडबसवून, नक्षी करितात. परंतु ती धुतली ह्मणजे निघून जाते. उत्तर अर्काट जिल्ह्यांत खुजा सारखीं पाझरणारीं व स्वच्छ मातीचीं भांडीं तयार होतात. गुडियाटम तालुक्यांत कन्टीगेरी गांवीं या मडक्यांवर हिरवें रोगण चढवितात. या भांडयांपर तीं ओलीं असतांना मातीचीच वेलबुट्टी काढण्याची चाल आहे. दुहेरी ह्मणजे दोन पडद्याचा खुजा करून त्यांतील बाहेरील पडद्यास जाळी करण्याचीही या गांवीं चाल आहे. त्याजवर रोगण चढविणें तें " साउदुमन " या नांवानें प्रसिद्ध असलेली एका प्रकारची माती घेऊन तींत जंगाल घालून ती भाजली ह्मणजे तयार होतें. हें रोगण कुटून त्याची वस्त्रगाळ पूड करून ती पाण्यांत कालवून तिनें भांडयावर नक्षीं काढितात. या रोगणांत भारंभार सफेता घातला ह्मणजे त्याचा रंग पिवळा होतो. परंतु भट्टीस आंच जास्ती लागली तर तोच काळा पडतो. शिवगंगा, मदुरा, तिमणगलम, पिरियाकुलम, हे मदूरा जिल्ह्यांतील गांव, तसेंच नेलोर जिल्ह्यांत उदयागरी, कडाप्पा, विजा-
   १७ गापट्टण; उत्तरआर्काट जिल्ह्यांत गुडियाटम, सालेम, अनंतपूर, उपिनंगड; दक्षिणकानडा, कृष्णा, त्रिचनापल्ली, मलबार, गोदावरी, व तंजावर, या सर्व गांवीं कमजास्त भावानें मातीचीं भांडीं होतात.

 कूर्गप्रांतीं विलायती तऱ्हेच्या बरण्या होतात. मरकारा येथें यूरोपियन लोकांनीं काढिलेली एक भट्टी आहे.
 ब्रह्मदेशांत मातीचीं साधीं भांडीं होतात तेथें खारें पाणी मडक्यांत घालून त्याचें मीठ करण्याची चाल आहे. शेग्विन्, रंगून, मौलमीन, व इतर ठिकाणीं हीं मातीचीं भांडीं होतात. " पेगूजास " या नांवानें साहेब लोकांत प्रसिद्ध असलेलीं मातीचीं भांडीं त्वंत्त गांवाहून येतात. बसीन गांवीं होत असलेल्या चिनई भांड्याचे खालीं दिलेलें वर्णन मेहेरबान टिली साहेबांच्या पुस्तकांतून घेतलें आहे.

 "मातीची मडकीं करण्याची वेळ नोव्हेंबर पासून मे महिन्या पर्यंत आहे. दोन भाग माती, व एक भाग समुद्रातील बारीक रेती घेऊन तिच्यांत पाणी घालून कुटतात. नंतर तीतींल एक गोळा घेऊन त्याचा वरवंट्याच्या आकाराचा गोळा करून चाकावर ठेवून तें फिरवितात. चाक फिरत असतांना, भांड्याला आकार देतात. नंतर एक दिवस पर्यंत भांडीं सुकत ठेवून त्यांज वर शिशाची अशुद्ध धातू व भाताची पेज एकत्र करून तिचें पूट देतात. पूट दिल्यावर भांडें लागलेंच भट्टीत घालून तीन दिवस पर्यंत जळत ठेवितात."


प्रकरण ११ वें.
कांच.

 प्राचीन काळीं आपल्या देशांत कांच माहीत होती. यजुर्वेद लिहिला त्यावेळीं ह्मणजे येशूख्रिस्ताच्या पूर्वी ८०१ व्या वर्षी आमच्या देशांतील स्त्रिया कांचेच्या बांगड्या घालीत असत. महाभारतांत व युक्तिकल्पतरू या नांवाच्या ग्रंथांत असें लिहिलें आहे कीं कांचेच्या प्याल्यानें पाणी प्यालें असतां स्फटिकाच्या प्याल्यानें पाणी प्याल्याचें श्रेय लागतें. डाक्टर राजेंद्र लालमित्र यांचें ह्मणणें असें आहे कीं, प्राचीन काळीं स्फटिक कुटून त्याचीच कांच करीत असत. स्फटिकाचीं भांडीं वगैरे करितांना शिल्लक राहिलेल्या तुकड्यांचा अशा रीतीनें उपयोग होत असे. परंतु अर्वाचीन काळीं जमिनींत एका प्रकारचा पापडखार सांपडतो त्यापासून कांच करितात. या पापडखारास गुजराथेंत खारो किंवा ऊस असें ह्मणतात. व उत्तर हिंदुस्थानांत रे असें ह्मणतात. आपल्या देंशांत होत असलेली कांच अगदींच हलकी असते. तिच्यांत बुडबुडे असतात, व ती लवकर फुटते. कांच करण्याची कृति अगदीं सोपी आहे. खारी माती किंवा ऊस भट्टींत घालून पुष्कळ आंच लावून वितळविली ह्मणजे झालें. प्लिनी नांवाच्या ग्रीक देशांतील ग्रंथकारानेंही असें लिहून ठेविलें आहे कीं, ग्रीस देशांत एका प्रकारची माती भाजून तिची कांच करीत असत. आपल्या देशांत देशी कांचेच्या बांगड्या, मणी, व अत्तराच्या कुप्या करितात. रोम शहरांत व्हॉटिकन या नावाचा एक मोठा वाडा आहे; त्यांतील संग्रहालय पाहाण्यास आह्मीं गेलों होतों तेव्हां तेथें ग्रीस देशांतील प्राचीन काळचीं कांहीं कांचेची भांडी पाहिलीं तीं व हल्लीं खेडा जिल्ह्यांत कपडवंज येथे होत असलेलीं भांडीं, केवळ रंगानेंच नाहीं तर आकारानें सुद्धा फारच साम्यता पावतात असें आमच्या नजरेस आलें. कपडवंज गुजराथेंत आहे, व गुजराथी लोकांचा आमच्या देशांत कौशल्यांत पहिला नंबर आहे. त्यांचें निरालस्य, व कौशल्य, हीं ग्रीक लोकांच्या स्वभावशीं मिळतीं आहेत तेव्हां त्यांचे पूर्वज ग्रीस देशाहून येथें आले ह्मणा किंवा येथून ग्रीस देशांत गेले ह्मणा, कांहीं तरी शरीरसंबंध असावा ह्यांत शंका नाही.

 आमच्या देशांत हल्लीं कांचेचें काम विलायतेहून आगबोटीच्या आगबोटी भरून येत आहे. मुंबई इलाख्यांत कांच फारच ठिकाणीं तयार होते. खेडा जिल्ह्यांतील कपडवंज येथें होणारी कांच, व्हेनीस शहरांत प्राचीन काळीं होत असलेल्या कांचेप्रमाणे दिसते. या गांवीं कांच करणारे सर्व लोक जातीचे मुसलमान असून त्यांची संख्या सुमारें साठ पासून सत्तर आहे. ते दरिद्री असून कर्जबाजारी आहेत. “ ऊस" या नांवाची खारीमाती, साजीखार, व जयपूर येथील रेती हीं भाजून त्यांची कांच करितात. मातीच्या लहान सुपल्या करून त्यांत हे पदार्थ घालून भट्टींत ठेवितात. भट्टी पेटली ह्मणजे कांहीं वेळांनीं त्या मिश्रणाचें पाणी होऊन तें भट्टींत केलेल्या खळग्यांत जाऊन पडतें. हें पाणी थंड झालें झणजे त्याचा गठ्ठा बनतो, तो फोडून त्याच्या बांगड्यां व लहान लहान कुप्या करितात. ठाणें जिल्ह्यांत चिंचणी गांवीं कांचेच्या बांगड्या होतात. त्यांच्या पोटांत तांबड्या, हिरव्या, व पिवळ्या रंगाचे नागमोडीसारखे पट्टे असतात. असल्या बांगड्यांस 'राणीचा बावटा' असें नांव दिलें आहे. पुणें जिल्ह्यांत शिवापुरास लिंगाईत काचारी लोकांचे बांगड्या करण्याचे चार कारखाने आहेत. त्यांत सुमारें पंचवीस पासून तीस कामगार काम करीत आहेत. ते आपण सोलापूर जिल्ह्यांतून पांच सात पिढ्यांपूर्वी आलों असें ह्मणतात. चिनई बांगड्याच्या कांचा " कांच बांगडी फुटाणे" वाल्याकडून विकत घेऊन हे लोक त्याच्याच बांगड्या करितात. ह्या 'कांचबांगडी फुटाणे' वाल्या मारवाड्यांची पुणें शहरीं भवानी व वेताळ पेठांत दुकाने आहेत. हे लोक चणें फुटाणें घेऊन सगळ्या गांवभर फिरतात. व बांगडी विकणाऱ्या कासार लोकांकडून कांचा गोळा करितात. शिवापूर येथील काचारी निजामशाहीतील गुंतूर व खेडा जिल्ह्यांतील कपडवंज येथन पूर्वी कांच आणीत असत.

 ह्या काचारी लोकांचीं हत्यारें अगदींच साधीं आहेत:--(१) बांबूच्या लहान लहान पांच सहा टोपल्या शेणानें सारवून सुकवून ठेवितात. ह्या टोपल्या फुटक्या बांगड च्या कांचा ठेवण्यास उपयोगीं पडतात. (२) लोखंडाच्या करंगळीपेक्षां सुद्धां बारीक दोन फूट लांबीच्या एका बाजूस बारीक टोंक असलेल्या निमुळत्या सहा सळया. (३) मातीच्या सुपल्यांच्या आकाराच्या सात आठ मुशी. (४) मात्रा किंवा सांचा ह्मणजे मातीचा गोळा एका टोंकावर बसविलेली सळई, ह्या सळईचें एक टोंक एका जमिनींत मारलेल्या उभ्या खुंटीवर असलेल्या कोयड्यांत अडकविलेलें असतें, व दुसरें टोंक एका दगडावर ठेवलेलें असते. (५) लोखंडाचे कागद कापावयाच्या कात्रीच्या आकाराचे सहा इंच लांबीचे पांच सहा तुकडे, त्यांस पट्टे ह्मणतात. (६) आंकडी ह्मणजे लांकडाच्या मुटींत बसविलेली व टोकाशी जरा वांकविलेली एक सळई. (७) लाकडाच्या मुठीत बसविलेल्या सात आठ "चाती " ह्मणजे सुमारें सहा इंच लांबीचे खिळे. (८) सात आठ लहान लहान हातोडे. (९) पांच साहा मातीच्या कुंडया. (१०) एक बुरडी व ओबडधोबड तराजू, (११) कांहीं वजनें अथवा वजनाप्रमाणें उपयोगांत आणलेले दगड. (१२) व पांच सहा लोखंडाच्या पळ्या.  काचारी लोकांची भट्टी लहानशा वेगळ्या झोपड्यांत किंवा पडवींत असते. झोपडें सुमारें वीस फूट लांब व पंचवीस फूट रुंद असून त्याची भिंत १० फूट उंच असते. त्याच्या भिंती मातीच्या असतात. त्याला दक्षिणेस व पश्चिमेस दरवाजे असतात. व उत्तर दक्षिण आणि पश्चिम या तीन दिशेस दोन दोन खिडक्या असतात. पूर्वेकडील बाजू अगदीं बंद असते. घरावर कौलेंच पाहिजेत. पेंढा वगैरे ज्वाला ग्राही पदार्थ चालत नाहींत. घरांतील मधला खांब सुमारें वीस फूट उंच असतो. भट्टी घराच्या मध्यभागीं कोठें तरी असते. भट्टी करण्याकरितां तीनचार फूट खोल खाडा जमिनींत खणतात, त्या खाड्यावर देवळाच्या घुमटाप्रमाणें मातीचा घुमट बांधितात. घुमटाच्या सभोवतीं कमानीसारख्या चार इंच रुंद व सहा इंच उंचीच्या खिडक्या पाडितात. घुमटाच्या शिखरावर भोंक असतें, त्याजवर मातीचाच झडपा असतो. घुमटाच्या आंत व खळग्याच्यावर एक सज्जा असतो,त्याच्यावर प्रत्येक खिडकीच्या समोर एकएक मूस ठेवितात. घुमटाच्या बाहेर दोन खिडक्यांच्यामध्यें एक असे सहा उभे दांडे मारिलेले असतात, व त्यांजवर आडव्या सहा दांड्या बांधितात. अशा ह्या षड्कोनी मांडवावर दोन तीन फुट जाडीचा थर होई अशा झाडाच्या ताज्या फांद्या सुकत टाकितात; त्यामुळें रानांतून आणलेलीं ओलीं फांटीं सुखविण्याची सोय होते व जागाही थंड राहते. प्रत्येक खिडकी समोर दोन उभ्या दांड्या पुरुन त्यांजवर एक आडवी दांडा बांधून तिच्यावर फाटक्या गोधडीचा तुकडा टाकलेला असतो त्यामुळें खिडकीसमोर बसणाऱ्या कारागिराचें डोकें तापत नाहीं. या प्रत्येक किडकीसमोर एकएक मनुष्य आपलीं हत्यारें व फुटक्या बांगड्यानी भरलेली एकएक टोपली घेऊन बसतो. खिडकीसमोर ठेविलेल्या मुशींत कांचा घातल्या ह्मणजे भट्टीच्या खाली ठेविलेल्या भौकांतून तीत फांटी घालून ती पेटवितात. भट्टी पेटवून सुमारे एक तास झाला म्हणजे कांच वितळू लांगते. व कारागिरही कामाची सुरुवात करितात. त्यांतील प्रत्येक जण आंकडीनें कांच ढवळून सारखी पातळ झाली किंवा नाहीं हें पाहतो. पातळ झाली ह्मणजे सळईनें त्यांतील एक वाटाण्या येवढा गोळा घेतो. गोळा भट्टींतून बाहेर काढला म्हणजे सळईस फिरकी सारखा हिसका देतो त्यामुळें त्या गोळ्याचा फुगा होतो. या सळईस पट्यानें झटकन् फटका मारिला म्हणजे गोळ्याची आंगठी होते. पट्यानें वरचेवरसळईस ठोके देऊन आंगठी लांबवून तिची सांखळीच्या कडीसारखी उभोंडी कडी होते. आपल्यास जरूर आहे इतकी मोठी ही कडी झाली ह्मणजे पटकन् सांच्यावर टाकून पट्यानें कारागीर ती सारखी करतो, व ही कडीसाच्यावर बसवीत असतांना सांचा एका हातानें गरगर फिरवीत असतो. हें सर्व काम इतक्या चपळाईने होतें की, भट्टींतून कांच घेतल्यापासून तों बांगडी तयार होईपर्यंत अर्धे मिनिटसुद्धां लागत नाहीं. कांहीं कारणानें वेळ लागलाच तर कांच निवते व ती कडक होऊन जाते. त्यामुळें तिचा वेडा वांकडा आकार सुधरून घेण्याकरितां सांचा क्षणभर भट्टींत धरतात. बांगडी तयार झाली ह्मणजे सांच्यावरून जमिनीवर पाडतात. पुनः दुसरी बांगडी करण्याची सुरवात करण्यापूर्वी सळईचे टोंक तापवून ठोकून पुनः बारीक करावे लागतें. शिवापुरचे काचारी लोक तीन प्रकारच्या बांगड्या करितात. एकाला बांगडीच म्हणतात; दुसऱ्याला गोल असें नांव आहे; आणि तिसऱ्याला कौल किंवा कारला असें ह्मणतात. बांगडी आंतल्या बाजूस रुंद असून वर निमूळती असते. गोल वाटोळा असतो. आणि कौल किंवा कारला बांगडी सारखा निमूळता असून त्याच्यावर दांते असतात. याशिवाय असल्या तिन्ही प्रकारच्या आंगठ्याही तेथें होतात. काचारी लोक शिवापुराहून ह्या बांगड्या व आंगठ्या पुण्यास आणून बत्तीस रत्तलास सुमारें पांच रुपये या भावानें कासार लोकांस विकतात. परंतु हीच कांच कासार लोकांनीं त्यांस दिली असली तर मजुरी सुमारें तीन रुपये मिळते. शिवापुरच्या काचारी लोकांस सगळा दिवस मेहेनत करून काय ती चार किंवा पांचच आणे मजूरी मिळते.

 पुण्यांत मिस्तर शंकराव पाठकर यांनीं बिलोरी बांगड्या व कांचेची कांहीं भांडी तयार करून प्रदर्शनांत पाठविलीं आहेत. बडोद्यास रावसाहेब जगन्नाथ सदाशिवजी अजबा येथील तलावाच्या कामावरील मुख्याधिकारी यांनीं पुष्कळ मेहेनत घेऊन कांच तयार करण्याची सुरवात केली आहे. ही कांच पुष्कळ टणक व पांढरी सफेत होते. इतकी चांगली कांच आपल्या देशांत अजूनपर्यंत कधीं झाली नव्हती. रावसाहेब जगन्नाथजी यांचा स्तुत्य उद्योग, व श्रीमंत सयाजीराव महाराज सेनाखासखेल समशेर बहादर यांचा पूर्ण आश्रय, या चोहींचे सम्मीलन होऊन गायकवाडी राज्यांत कांचेचा कारखाना लवकरच सुरू होईल असें वाटतें. तशांत पुणें प्रदर्शन उघडण्याकरितां भरलेल्या जंगी दरबारांत नेक नामदार गव्हरनर साहेब लार्ड री यांनीं संभाषण केलें त्यांत हिंदुस्थान देशांत निदान काचेच्या बाटल्या तरी तयार होऊं नयेत हें मोठें आश्चर्य आहे, असें ह्मणून दाखविलें. ही गोष्ट आमचे स्वदेशाभिमानी पुरमद्रास इलाख्यांत कोठें कोठें होतात. जयपुरासही कातड्याच्या गंजिफा चांगल्या होतात. तेथील एक उत्तम कारागीर थोड्या दिवसापूर्वी मरण पावला.


प्रकरण १३ वें.
टोपल्या, करंडया, वगैरे बुरडी कामासारख काम.

 प्राचीन काळापासून बांबू, वेत, बोरू, देवनळ, गवत, व ताड, माड, आणि खजूरी यांचीं पानें या पदार्थांचा टोपल्या वगैरे करण्याकडे उपयोग होत आला आहे. याच पदार्थांचा अझून ही उपयोग होतच आहे. बिडी तालुक्यांत वेताचें पेंटारे फार चांगले होतात. यापेटऱ्यांवर कातडें चढवून तें सरकारी दफतरें व खाजगी कपडे ठेवण्याकरितां स्वारति फिरविण्याची चालपडली आहे. अलीकडे पेटारे आस्ते आस्ते नाहींसे होऊन त्यांच्या बदला विलायती पोर्टमान्टोंची किंवा जस्ती पेट्याची योजना होत चालली आहे. बायकांच्या कुंकवाच्या करंड्या, पूर्वी बांबूच्या किंवा वेताच्या होत असत. अलीकडे लांकडाच्या होऊं लागल्या आहेत; तरी अझून सुपें, टोपल्या, व रोवळ्या, वगैरे पुष्कळ जिनसा घरोंघर दृष्टीस पडतात. सांवतवाडीस बांबूच्या करंड्या तयार करून त्यांजवर कापड चढवून, त्या कापडावर नक्षीकाढून तिच्यावर लांख-चढविण्याची चाल आहे. असल्या लहान लहान करंड्या, सुपल्या, व रोंवळ्या मुलींच्या खेळांत दृष्टीस पडतात. अलीकडे सरकारी तुरुंगातून असलेल्या चिनई कैदी लोकांनीं तयार केलेल्या वेताच्या करंड्या जिकडे तिकडे मिळतात. यांतील कांहीं जन्मठेपीच्या कैदीस मुंबईत काळवादेवीच्या रस्त्यांवर दुकानें काढण्याची परवानगी मिळाली आहे. पुणें येथील प्रदर्शनांत कच्छ भूज येथून वेताच्या करंड्या आल्या होत्या त्या सुरेख व फार स्वस्त असल्यामुळें लवकरच लोकांनी विकत घेतल्या. सांवतवाडी, मुंबई, व पुणें या तीन गांवीं वाळ्याचे डबे करून त्यांजवर कलाबतूची, टिकल्यांची, व माशाच्या पंखांची नक्षी करितात. हे डबे पाश्चिमात्यांस फार प्रिय झाले आहेत. वाळ्याचे पंखें करून त्यांजवर ही कलाबतूंची, टिकल्यांची, व माशाच्या पंखांची नक्षी करितात. हीं पंखें आपल्या दिवाणखान्यांत शोभे करितां लावण्याची साहेबलोकांनीं चाल पाडिली आहे. मुंबईस चिकाचे पडदे करून त्यांजवर हिरवा रंग देऊन विकतात. असले पडदे आजपर्यंत चीन देशांतून येत असत परंतु आलीकडे जपान व जर्मनी या दोन देशांतून येऊं लागले आहेत. जर्मनी बद्दल खात्रीलायक बातमी मिळत नाहीं; परंतु असें ह्मणतात कीं चिकाचे पडदे तयार करून त्यांजवर जपानी तऱ्हेची नक्षी काढून ते जपान देशांतलेच आहेत असें दाखवून जर्मन व्यापारी इंग्रज लोकांस हा माल विकतात. हें कौशल्य आमच्या लोकांनीं घेण्यासारखें आहे. आमच्या देशांत बांबू पुष्कळ आहेत; बुरुडही पुष्कळ आहेत; व चिताऱ्यांचाही तोटा नाहीं, तेव्हां एखाद्या शहाण्या व्यापाऱ्यानें ओबड धोबड पडदे न करितां हेच सुरेख होतील अशी तजवीज केली, आणि त्यांजवर आमच्या देवादिकांची चित्रें काढिली तर त्यांस गिऱ्हाइकें पुष्कळ मिळतील. चांगला पडदा दृष्टीस पडल्यावर तो विकत घेऊन आपल्या दिवाणखान्यांत टांगणार नाही असा साहेब विरळा. याच प्रमाणें पुष्कळ जातीच्या गवताच्या टोपल्या, कुरकुल्या, परड्या, वगैरे सुरेख जिनसा तयार करून साहेबलोकांस विकतां येतील.

 बंगाल्यांतही वेताचे पेटारे तयार होतात. पूर्वी जुनी दफतरें ठेवण्या करितां झापी या नांवाच्या एका प्रकारच्या बुरडी टोपल्या बंगाल्यांत करीत असत. कलकत्त्याजवळ डायमंड हारबर नांवाच्या गांवीं ताडाच्या पानाच्या करंड्या करीत असतात. ह्या करंड्या चिनई व जपानी धरतीच्या आहेत. कलकत्त्याच्या आसपास खजूरीच्या पानांच्याही करंड्या करूं लागले आहेत. खजूरीची कोंवळीं पानें काढून आणून सुकविलीं ह्मणजे तीं मऊच राहतात, व त्यांजवर तकतकी येते. मोंगीर येथेंं साहेब लोकांच्या टेबलांवर ठेवण्या करितां लहान लहान सुरेख चटया करितात. त्या "शिकी" " सर ” किंवा “ मुंज ” या नांवाच्या गवतांपासून करितात. याच गवतांच्या लहान लहान मुशोभित करंड्या दर्भंगा येथील ब्राह्मणांच्या बायका करितात. त्या विकत मिळत नाहींत.

 वायव्य प्रांतांत हिमालयाच्या पायथ्याशीं असलेल्या बाहारिक गांवीं मुंज गवताच्या करंड्या क्वचित होतात. त्यांजवर कवड्या बसवून नक्षी करण्याची वहिवाट आहे.

 पंजाबांत व मध्यप्रांतांत गवताचे वगैरे काम विशेष होत नाहीं. जयपुरास वाळ्याच्या करंड्या, डबे, वगैरे किरकोळ सामान होतें. मद्रास इलाख्यांत गंजम जिल्ह्यांत किमेडी व चिंगलपट जिल्ह्यांत पलीकत या दोन गांवीं असलें सामान होतें. गंजम येथें विलायती तऱ्हेच्या करंड्या तयार करून त्यांस रंगही विलायतीच देतात. पलीकत येथें पूर्वी देशी रंगाच्या करंड्या होत असत ; परंतु अलीकडे तेथीलही लोक विलायती रंग वापरूं लागले आहेत. या इलाख्यांत तिनेवेल्ली जिल्ह्यांत टेनकशी मदुरा जिल्ह्यांत अनंतपूर व पेरियाकुलम, दक्षिण कानडा जिल्ह्यांत सालेम, तंजावर जिल्ह्यांत सियाली, तंजावर, तसेंच गोदावरी, कडप्पा व विजागापट्टण या गांवींही किरकोळ सामान होतें. कुर्ग येथें वेताच्या करंड्या तयार होतात. आसास प्रांती बांबूचें व वेताचे सामान पुष्कळ होतें. असामी लोक बुरडी टोपी डोक्यांत घालतात. या टोपीस असामी लोक, झापी म्हणतात. लंडन येथील प्रदर्शनांत आसाम प्रांतांतुन वेताच्या जाळीचा एक मोठा थोरला सुंदर पडदा गेला होता.

 हात्र्या व चटया हिंदुस्थानांत जिकडे तिकडे होतात. बांबूचे तट्टे कुडासारखें बांधून भिंती करण्याची बंगाल्यांत चाल आहे. ताडाच्या व खजूरीच्या चटया गरीब लोक त्या प्रांतीं पुष्कळ वापरतात. बंगल्यांतील मादुर व सीतळपटी नांवाच्या गवताच्या चटया फार सुरेख असतात. ह्या चटयांस आपण चिनई हात्र्या ह्मणतों. परंतु त्या मुख्यत्वेंकरून बंगल्यांतील मिडनापूर जिल्ह्यांत तयार होत असतात. बाबू त्रैलोक्यनाथ मुकरजी याचें असें म्हणणें आहे कीं आमच्या देशांतील मसनद या चटयाची केलेली असे. आणि म्हणूनच या हत्र्यांस मजलंद म्याट्रस असें इंग्रज लोकांनीं नांव दिलें आहे.

 मद्रासइलाख्यांत पालघट व तिनेवल्ली या दोन गांवीं फार सुरेख चटया तयार होतात. या गांवीं चटया करण्यास नदींतील लव्हाळ्याचा उपयोग होतो. तिनेवेल्ली येथील हात्र्या इतक्या बारीक व मऊ असतात कीं एका मनुष्यास निजावयास पुरेल इतकी मोठी हात्री गुंडाळून, हातांत घेण्याच्या कांठी येवढ्या पोकळ कांठीत ठेवितां येते. पालघाट येथील हात्र्यांवर त्रिकोनी, चाकोनी, षड्कोनी, इत्यादि भूमितींतील सरळरेषाकृति काढलेली असते. ह्या दोन ठिकाणच्या व वेलोर येथील हात्र्या एका प्रकारच्या ओबड धोबड मागावर काढितात. मागावरील ताणा सुताचा असतो. व 'वाणा' म्हणजे आडवे धागे लव्हाळ्याच्या बारीक चिपाचे असतात. या चिपांस कधीं कधीं रंग देतात. काळा रंग लोखंड, मायफळ, व बाभळीच्या शेंगा यापासून होतो. चिपा रक्तचंदना-    १९ च्या व कासणीच्या पाल्याच्या काढयांत उकळविल्या ह्मणजे तांबड्या होतात. पिवळा रंग हळदी पासून करितात; परंतु तो टिकत नाहीं.

 बंगाल्यांत कर्दळीच्या सोपटाच्या चटया करितात. त्यांस 'सीतळपाटी' असें नांव आहे.

 असें म्हणतात कीं उत्तम सीतळपाटी फारच गुळगुळित असते. व तिच्यावरून सर्पास सुद्धां जातां येत नाहीं. सीतळपाटी अंगास गार लागते त्यामुळें ती फार थंड आहे असें समजून बंगाल्यांतील श्रीमंतलोक उन्हांळ्यांत आपल्या बिछान्यावर पलंगपोसा ऐवजीं वापरतात. उत्तम सीतळपाटी फरीदपूर, बाकरगंज, टिपेरा, व चितागांग चा जिल्ह्यांत होते. हें काम बायका करीत असतात. नवऱ्या मुलीच्या कौशल्यानुरूप तिच्या बापास या कामावरून उलट हुंडा मिळत असतो. एका सीतळपाटीची किंमत पांचपासून शंभर रुपये असते.

 ब्रम्हदेशांत सिळहर गांवीं हस्तिदंताच्या चटया होतात.

 घायपाताच्या दोऱ्याच्या गोणपाटासारख्या केलेल्या जाड पट्यांस इंग्रजींत म्याट्रेस म्हणजे हात्र्या अशीच संज्ञा आहे. काथ्याच्या तरटालाही साहेब लोक म्याट्रेसच म्हणतात. घायपाताची तरटें हजारी बाग, लखनौ, अलाहाबाद धारवाड येथील तुरुंगांत होऊं लागली आहेत. काथ्याची तरटें मुंबई व समास इलाख्यांतील पुष्कळ तुरुंगांत होतात. मुंज नामक गवताचीं तरटें अलाहाबाद लखनाै, बनारस, दिल्ली, लुधियाना, अंबाला, सियालकोट, गुजराथ व इतर पुष्कळ ठिकाणच्या तुरुंगांत होतात. मुंज गवताची ओलीं ताटें लाकडाच्या कुंदीनें ठोकून धुतात व त्याजवर रंग देऊन विणण्याकरितां तयार करितात.
 मद्रास इलाख्यांत बाबू, वेत, ताडपत्री, खजूरीची पानें केवड्याची पानें व लव्हाळे या सर्व पदार्थाच्या चटया होतात.

 पंखे मुख्यत्वेंकरून बांबू, वाळा, गुंज गवत, खजूरी, मोराचीं पिसें हस्तिदंत अभ्रक, व कागद इत्यादि पदार्थाचे करितात. ताडाचे मोठे पंखे मद्रास इलाख्यांतून येतात. बांबूचे पंखे जिकडे तिकडे तयार होतात. ते हलक्या किमतीचे असून त्यांजवर नक्षीही फारशी नसते. वाळ्याच्या पंख्यावर कधीं कधीं भरत कामाची, टिकल्याची, मोरांच्या पिसांची, व इतर पुष्कळ नक्षी असते. सांवतवाडी येथील वाळ्याचे पंखे फार प्रसिद्ध आहेत. पुण्यासही वाळ्याचे पंखे होतात. बिकानेर संस्थानांत रेणीग नांवाच्या गांवीं वाळ्याचे पंखे करून त्यांस हस्तिदंताच्या मुठी लावितात, वाळ्याचे पंखे करण्याचें काम फार कठीण नाहीं. बांबूच्या ताटींत वाळा बसवून तो दोऱ्यानें शिवून त्याजवर मखमल, कलाबूत, बेगड, टिकल्या, इत्यादिकांच्या योगानें तऱ्हेतऱ्हेची नक्षी टांचून सभोंवतीं जाळीच्या अथवा साध्या कापडाची किंवा मोरांच्या पिसांची झालर लाविली ह्मणजे झालें. पंख्याच्या दांड्या कातारी लोक तयार करितात. ह्मैसूर प्रांतीही वाळ्याचे पंखे होतात. ह्यांची झालर वाळ्याचीच असून तिजवर मयूरपुच्छादिकांची नक्षी असते. ह्मैसूरांत पंख्याच्या दांड्या चंदनाच्या करितात व त्याजवर पुष्कळ नक्षी असतें. झाशी, एटवा आणि आग्रा, या गांवीं मोरांच्या पिसांचे पंखे तयार होऊन विकण्याकरिता कलकत्त्यास जात असतात.

 मद्रास इलाख्यांत कडाप्पा जिल्ह्यांत चितवेल गांवीं ताडाचे पंखे तयार होतात, तसेंच तंजावर गांवींही होतात. तंजावर येथील माल फार सुरेख असतो, व त्यास अभ्रकांची सालर असतें. आणि त्यांच्या दांडयावर रंगारंगाचें कांचेचें तुकडे बसविलेलें असतात.कडाप्पा जिह्यांत नोसनगांवीं एकाप्रकारचे कागदांचे पंखे होतात त्यांजवर अगदीं पातळ कापड चिकटविलेलें असतें. ताडाच्या पानांत असलेल्या शिरांप्रमाणें बांबूच्या काड्या सारख्या लावून त्यांजवर पहिल्यानें कागद चिकटवून मागावून कापड चिकटवितात व त्याजवर रंग देतात. यारंगांतच तऱ्हेतऱ्हेचीं चित्रें काढून व सोनेरी वर्खाचा उपयोग करून सुशोभित नक्षी बनवितात. यापंख्याच्या एका बाजूस मोरांच्या पिसांचे डोळे काढण्याची व दुसऱ्याबाजूस फुलें वगैरे काढण्याची चाल आहे. प्राचीनकाळीं तंजावर गांवीं अभ्रकाचे फार चांगले पंखे होत असत परंतु अलीकडे हलके काम फार निघू लागले आहे. तंजावरास बेगड चिकटविलेलें कापडाचें पंखेही तयार होतात. गंजम जिल्ह्यांत कालीकोट गांवीं पंखे तयार होतात.

 मद्रासइलाख्यांत ताडपत्रीच्या छत्र्या प्राचीनकाळीं होत असत, परंतु इंग्रजी छत्र्या देशांत येऊ लागल्यापासून ताडपत्रीच्या छत्र्या नाहींशा होत चालल्या आहेत. ताडपत्रीची, पळसाच्या पानाची, किंवा इतर कांहीं जातीच्या पानांची इरली मुंबई इलाख्यांत तयार होतात. पुणें प्रदर्शनांत कोल्हापूर येथोन एक इरलें आलें होतें त्याजवर अभ्रक बसवून नक्षी केलेली होती. रत्नागिरी येथूनही मे. क्यांडी साहेबानें एक लहानसें सुरेख इरलें पाठविलें होतें.

 लग्नांत, वराच्या डोक्यावर धरण्याकरितां रेशमी कापडाच्या छत्र्या कोठें कोठें तयार करतात तसेंच सोनेरी कळसाचें रंगा रंगाच्या छालरीचे व सुरेख नक्षीदार दांडीचें अबदागीरही ठिकठिकाणीं तयार होतात. परंतु त्या दोन्ही जिनसा व्यापाराच्या संबंधानें महत्वाच्या आहेत असें ह्मणवत नाहीं.

कुंचे, मोरचल वगैरे.

 मोरांच्या पिसांचें कुंचे जैन लोक वापरितात. आपल्या लोकांच्या देवळांतूनही कोठें कोठें मोरांच्या पिसांचे कुंचे आढळतात. गवताचें कुंचे देव्हारे झाडण्या करितां तयार करितात इंग्रेजी कुंचे ह्मणजे ब्रश, केंसांचें, तारेचें किंवा इतर पदार्थांचें होतात. तसले ब्रश काथ्याचें किंवा भेरली माडाच्या पानास असलेल्या एका प्रकारच्या धाग्याचें करिता येतील असें डा. वाट यांचे ह्मणणें आहे. वेताची एक छडी घेऊन तिज भोंवती कोंबडीची किंवा खबुतरांची अथवा बगळ्याची रंगविलेली पिसें चिकटवून चिन देशांत पंखे तयार करितात. त्याचा साहेब लोक आरसे व कांचेचे इतर सामान झाडण्याकडे उपयोग करितात. अशा प्रकारचें पिसांचे कुंचे आमच्या देशांत उत्पन्न होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नसून अझूनपर्यंत कां होऊं लागलें नाहींत हें कळत नाहीं. पुण्यास मोरांच्या पिसांचे कुंचे करणारे जिनगर लोक आहेत तेंच असलें कुंचेही तयार करूं लागलें तर त्यांत त्यास विशेष फायदा होईल यांत संशय नाहीं.

 मोरचेल हें राज्य चिन्ह आहे त्याचा ज्या ज्या ठिकाणीं मराठी राजे आहेत तेथें तेथें आणि देवळांत व जैन लोकांच्या गुरूच्या येथें उपयोग होतो. पुणें, सांवतवाडी, मुंबई, व कोल्हापूर, यागांवीं मोरचेल तयार करणारे जिनगर लोक आहेत. पुणें येथील प्रदर्शनांत कोल्हापूर संस्थानांतून एक चांगले मोरचेल पाठविण्यांत आलें होतें.प्रकरण १४ वें.
कपडे.
सुतीकापड.

 या पुरातन व अफाट हिंदुस्थान देशांत कापड किती लागत आहे व तें विलायतेहून मातीच्या मोलानें आगबोटीच्या आगबोटी भरून येत आहे, तरी अजूनही आमच्या देशांत मुळींच कापड होत नाहीं असा जिल्हा सांपडणे कठीण.यंत्रविद्येच्या जबरदस्त साहाय्यानें पाश्चिमात्यांनीं किती जरी सुरेख कापड काढलें तरी सुद्धां त्याच्यावर कडी करून त्याहीपेक्षां सुरेख माल काढणारे आमच्या देशांत कारागीर पुष्कळ आहेत ही गोष्ट मोठी भूषणार्ह आहे. भूस्तर विद्येच्या साहाय्यानें ज्याप्रमाणें कोणचा प्रदेश कोणच्या खनिज तत्वांनीं भरलेला आहे असें कळतें त्याप्रमाणें आमच्या देशांतील लोकांच्या पोषाखावरून त्यांच्या प्राचीन इतिहासाचा बराच उल्लेख होतो. हिंदुस्थानाच्या उत्तरेस शेवरीच्या सालींच्या व हिंदुस्थानाच्या दक्षिणेस चांदळ किंवा चांदकुडा या नांवाने प्रसिद्ध असलेल्या झाडाच्या सालींच्या विजारी करितात. यावरून आमच्या पूर्वजांनी अनंत काळापूर्वी कपडे प्रथमच कसे शोधून काढले असावे याचें अनुमान करितां येतें. तसेंच अजूनही मंत्रतंत्र लिहिण्याकरितां भूर्जपत्रांचा उपयोग करितात, त्यावरून व ताडपत्रावर लिहिलेले ग्रंथ आमच्या जवळ शिल्लक आहेत त्यावरून लिहिण्याची कला प्रथम निघाली तेव्हां आमच्या पूर्वजांनी कागदाच्या बदला कोणत्या पदार्थाचा उपयोग केला असावा याचें ही धोरण बांधितां येतें. अजून ओढिया प्रांतीं जोवंग लोक झाडाचीं पानें एका ठिकाणीं शिवून त्याचे कपडे करितात, व वायव्येकडील सरहद्दीवरील लोक बकऱ्याच्या कातड्याचे कपडे वापरून थंडीचें निवारण करितात. एकीकडे जाडे भरडे सुताडे विणून त्याचे कपडे करून आपल्या शरीराचें रक्षण करणारे लोक या देशांत आहेत, व दुसरीकडे अब्रवान ह्मणजे वाहतें पाणी व “शबनम " ह्मणजे संध्याकाळचे दंव या नांवांनीं प्रसिद्ध असलेलीं डाका येथील मलमलीचीं पातळें नेसून कपडे असून नाहींत असें भासविणाऱ्या चैनी नायिकाही आढळतात. यामुळें शरीराचें रक्षण करण्याचें साधन या देशांत कसें शोधून काढिलें व तें अत्युत्तम दशेस कसें येऊन पोंहोचलें या दोन्ही गोष्टींचें विवेचन करून दाखवितां येतें.
 अलीकडे मात्र सुती कापड उत्तरोत्तर थोडें थोडें होऊं लागून साळी लोकांच्या पोटांवर लवकरच पाय येण्याचीं चिन्हें दिसू लागलीं आहेत. विलायतेंतील "तीन राक्षसांपुढें " आतां आमचा टिकाव लागण्याची आशा नाहीं. यापुढें देशी मागावर काम करून पोटापुरतीही मजूरी मिळण्याचा संभव नाही. कारण लोक गरीब होत चालले. त्यांस विलायती माल स्वस्ता मिळूं लागला व साळी लोकांनीं पोट बांधून काम केल्याशिवाय तितका स्वस्ता माल यार होणे संभवतच नाहीं. विलायती कपडा गांवठी कपड्यासारखा टिकाऊ नसतो त्यामुळेंच काही दिवस साळी लोक जेमतेम पोट भरतील.

 सुताडे, झोरे, सत्रंज्या, खादी, इत्यादि ओबडधोबड किंवा जाड्या भरड्या कापडापासून तो एक सुती मलमलीपर्यंत साधें कापड या देशोत आहे. तसेंच चारखणी, सुसी, लुंगी, खेस, इत्यादि चौकडीचें कापड व. बलचषम झणजे बुलबुल पक्ष्याचा डोळा या नावानें प्रसिद्ध असलेले रंगीबेरंगी कापड, धोतरजोडे, लुगडीं, खण, इत्यादि किनारीचें कापड या सर्व तऱ्हा विणण्यांत येतात. तरी हल्लीं आपल्या देशांत सूत फारच क्वचित निघते ही शांत ठेविली पाहिजे.
 मुंबई इलाख्यांत फल्टण, कोल्हापूर, मिरज, बेळगांव, शहापूर, बडोदें, व अमदाबाद या गांवीं कधीं कधीं धोतरजोडे तयार होतात. तरी घाटी पंचा शिवाय इतर धोतरें फारशीं होत नाहींत असें ह्मणण्यास कांहीं हरकत नाहीं. लुगडीं, बांड, साड्या, खण, इत्यादि स्त्रियांस उपयोगी पडणाऱ्या जिनसा अमदाबाद, बडोदें, खंबायत, मुंबई, पुणें, येवलें, अहमदनगर, सोलापूर, बारशी, नाशीक, भिवडी, बेळगांव शहापूर, या ठिकाणीं पुष्कळ तयार होतात. तरी मधून मधून इतर गांवींही बऱ्याच तयार होतात. लुंग्या, सुस्या, खेस व इतर चौकडीचें काम सिंध, बडोदें, भडोच, व ठाणें या गांवीं विणतात. ठाणें येथील असल्या कपड्यास ठाणाक्लाथ हेंच नांव पडलें आहे, हें कापड साष्टीतालुक्यांतील व वांदरें आणि मुंबई येथील किरिस्ताव शिनार लोक पुष्कळ वापरतात. व मुंबईस साहेब लोकांची नोकरी करण्याकरितां आलेले बुटनेर लोकही याच कापडाचा पोषाख करितात. तसेंच कांहीं साहेब लोक, व हिंदु लोकांचीं शाळेंत जाणारीं मुलें हेंच कापड वापरूं लागलीं आहेत. ठाणें जिल्ह्यांत खारव्याच्या बदला गाद्या, उशा, गिरद्या, व तक्के याच कापडाचे असावेत अशी प्रतिष्ठित लोकांची समजूत आहे. या सर्व गोष्टींमुळें ठाणाक्लाथ बरेंच विकतें. आलीकडे या ठाणाक्लाथसारखें कापड विलायतेहून येऊं लागलें आहे. यास वेंगुर्ला ह्मणतात. येवलें, अमदाबाद, बडोदें, चाळीसगांव, पुणें व मुंबई या ठिकाणी पागोटीं विणण्याचे माग आहेत.
 पंजाबांत पूर्वी दिल्लीस मलमल फार चांगली होत असे. ही मलमल चिनी कापसाची करीत असत असें मेहेरबान बाडन साहेबांचें ह्मणणें आहे. लंडन येथील प्रदर्शनाकरितां सन १८८६ सालीं असली मलमल विकत मिळावी ह्मणून सरकारतर्फे पुष्कळ तपास झाला परंतु ती हल्लीं होत नाहीं असें कळलें. या बारीक मलमलीचीं पागोटीं हुश्शारपूर, सिरसा, जलंदर, लुधियाना, शहापूर, गुरुदासपूर, व पतियाला या गांवीं होतात, परंतु तीं पूर्वीसारखी खुमासदार निघत नाहींत. उत्तम मलमल सगळ्या पंजाब प्रांतांत रोहतक गांवीं होते. बारीक मलमलीस त्यां गांवीं तान्झेब म्हणतात, व तिचा उन्हाळ्याकरितां सदरे करण्याकडें उपयोग होतो. जलंदर गांवीं घाटी या नांवाचें चकचकीत पांढरें अंगरख्याचें कापड तयार होतें. विलायती लांगक्लाथ या देशांत येण्यापूर्वी याचाच उपयोग आमच्या अमीरउमरावांचे अंगरखे करण्याकडे होत असे. दोरव्याची मलमल चौखाना किंवा बुलबुलचषम हेही प्रकार पूर्वी पंजाबांत होत असत. हल्ली लुंगी, खेस, सुसी, दोसुती, गाऱ्हा आणि गझी (गिझनी) इतक्या प्रकारचें कापड पंजाबात होतें. लुंग्या मुख्यत्वेंकरून पेशावर येथें होतात व त्या इतर ठिकाणच्या लुंग्यापेक्षां मौल्यवान असतात. लुधियाना, गुगैरा, कोहात, लाहोर, व हुश्शारपूर, या गांवीही लुंग्या होतात. रंगारंगाच्या चौकटीच्या कापडास खेस म्हणतात याचा थंडीच्या दिवसांत पासोड्यांसारखा उपयोग होत असतो. खेस विणण्याकरितां सूत विलायतेहून आणावें लागतें, किंवा कधीं कधीं मुंबईच्या गिरण्यांमधून विकत आणावें लागते. सुशी या नांवानें प्रसिद्ध असलेल्या कापडाचें पंजाबांत बायकांकरितां पायजमे करितात. आतां दिसण्यांत सुसीसारखें कापड यंत्रावर छापून विलायतेहून इकडें येऊं लागलें आहे.
 मुजाफरगड, लाहोर, सियालकोट, फिरोजपूर, करनाळ, जंग, डेराइस्मायलखान, आणि पतियाला या गांवीं खेस तयार होतें. जलंदर, गुरुदासपूर, व सियालकोट या गांवीं सुसी हें कापड विणतात. लुधियाना गांवीं गबरूम किंवा गंरूम या नांवाचें कापड तयार होत असतें, त्यास ठाणाक्लाथ प्रमाणें लुधियानाक्लाथ असें नांव पडलें आहे, व त्याचा उन्हाळ्यांत युरोपियन लोक कपडे करण्याकरितां उपयोग करितात.

 राजपुतान्यांत जयपूर प्रांतीं सुसी, मान्हा, गझी, आणि दोसुती इतक्या प्रकारचें कापड होत असतें. विलायतेहून आणलेल्या बारीक सुताची मलमल कोटा या गांवचें हिंदु व मुसलमान कोष्टी विणतात. त्यांत बहुतकरून मलमली पागोटींच जास्ती होतात. कोटा येथून दरसाल पंचवीस हजार रुपयांचा माल निमच व इतर ठिकाणीं जातो. या पागोट्यास चार पासून १५ रुपये किंमत पडते. अजमीर, बिकानेर, करवली, जयपूर, व जोतपूर या गांवीं सुसी व इतर सुती कापड होत असतें.
 शिंदेसरकारच्या राज्यांत चंदेरी गांवीं बारीक पागोटीं, शेले, उपरणी, धोतरें, दुपेटे वगैरे पदार्थ होतात. धोतरास व उपरण्यास रेशमी शुभ्र कांठ असतात. किंवा कधीं कधीं हे कांठ दुरंगी असतात. ह्मणजे एका बाजूला तांबडें व दुसऱ्या बाजूला हिरवे, पिवळे व इतर रंगाचें कांठ असतात. ग्वाल्हेरीस दोरव्याची मलमल तयार होत असते.

 होळकरसरकारच्या राज्यांत इंदुरास रेशमी किंवा जरी किनारीचे चंदेरीच्या तोडीचे दुपट्टे, धोतर जोडे, व इतर कपडे होतात. देवास संस्थानांत सारंगपूर यांत धोतरें, पातळें, व लुगडीं तयार होतात. हें कपडे विकण्याकरितां खुदरती पिंवळ्या रंगाच्या कापसाचें सूत काढतात. हा पिंवळा कापूस नानकिंग काटन या नांवानें इंग्रजी व्यापाऱ्यांत प्रसिद्ध आहे. ओर्छा गांवीं चांगलीं पागोटीं तयार होतात. ग्वालेर येथें चौकटीचा दोरवा विणतात.
 सुती कापडाबहुल मध्यप्रांताची पूर्वापार मोठी कीर्ति आहे. नागपूर, भंडारा व चंदा या तीन जिल्ह्यांत फार बारीक कापड निघतें, त्यांतही नागपूर जिल्ह्यांत उंबरेर आणि भंडारा जिल्हांत पावणी या दोन गांवांची विशेष प्रसिद्धि आहे. येथें फार बारीक सूत कांतितात. सन १८६७ साली झालेल्या नागपूर येथील प्रदर्शनांत चंदा यागांवीं तयार केलेलें एक सुताचें गुंडें पाठविलें होतें त्याचें वजन एक रत्तल असून लांबी ११७ मैल होती. सुताचा व्यापार करणारे काहीं इंग्रज लोक या गुंडीला इतकें मोहून गेले होते की, प्रदर्शनांतील कोणत्याही पदार्थास हात लाऊं नये अशा अर्थाच्या जाहिराती जिकडे तिकडे लाविल्या होत्या त्यांस न जुमानितां त्यांनीं त्यांतील तुकडे आश्चर्य कारक ह्मणून संग्रहीं विण्याकरितां तोडून नेले. अलीकडे मात्र या देशांत विलायती सुत पुष्कळ येऊं लागल्यामुळें व खुद नागपुरासही सुताची गिरण निघाल्यामुळें हातानें सूत कांतण्याची विद्या उत्तरोत्तर लयास जात आहे. गिरणींतील कापड महाराष्ट्र देशांतील उंचवर्णांच्या लोकांस नापसंत आहे त्यामुळें चांगलें कापड मात्र नागपुराकडे अजूनही तयार होतें. त्यांत नागपूरच्या धोतरजोड्यांची विशेष कीर्ति आहे. अलीकडे धोतरजोडे न विणतां नुसते नागपुरी रेशमी कांठच विलायती कपड्यास शिवून ते वापरण्याची चाल पडतचालली आहे. भंडारा येथील डिपुटी कलेक्टर साहेबाच्या रिपोटीवरून असें कळतें कीं, गेल्या दाहा अकरा वर्षात सूत कातण्याचें काम दिवसेंदिवस फारच कमी होत चाललें आहे. अलीकडे काम थोडें होतें इतकेंच नाहीं तर तें फार हलक्या प्रतीचें ही असतें. पावणी यागांवीं पूर्वी फार उत्तम मंदील होत असत व भंडाऱ्यास पागोटीं आणि उपरणीं फार चांंगलीं होत असत, त्यादोनही जिनसा आलीकडे मुळींच थोड्या निघतात आणि त्याही हलक्याप्रतीच्या. नागपुरास रेलवे झाल्यापासून तर त्याप्रांतीं उंची कापड उत्तरोत्तर दुर्मिळच असें समजलें पाहिजे. शेतकरी व इतर धंदा करणाऱ्या लोकांस लागणारे जाडेंभरडें कापड पूर्वीपेक्षां जास्ती तयार होतें. हुसंगाबाद येथील डिपुटी कलेक्टर साहेबांनी आपल्या रिपोर्टांत असें लिहिलें आहे कीं, त्यागावीं पूर्वी ११६ साळी होते तें हल्लीं २१६ झाले आहेत. हरडा येथील एका कामदारानें असें लिहून पाठविलें आहे कीं, यागांवीं पूर्वीपेक्षां सुती कापड हल्ली जास्ती होतें. विलायती कापडापेक्षां देशी कापड विशेष टिकाऊ आहे त्यामुळें गरीब लोक तेंच वापरतात.
 मद्रास इलाख्यांत अरणी येथें फार बारीक मलमल तयार होते तत्रापि तिला गिऱ्हाईक कमी असल्यामुळें माल फारच कमी निघतो. अलीकडे तर मुद्दाम काढविल्या शिवाय उंची मलमल मिळेनाशीच झाली आहे. ही मलमल विणण्याबद्दलची खालीं दिलेली माहिती डाक्टर बिडी साहेबाच्या पुस्तकांतून घेतली आहे.
 पारुथी गांवीं कापसाचीं झाडें लाऊन तीं पांच वर्षांचीं झालीं ह्मणजे मग त्यांजवरील कापूस काढून त्याचा बारीक सुताकडे उपयोग करितात. पांच वर्षांपूर्वीच्या कापसाचें सूत जाडें निघतें. या पांच वर्षां नंतरच्या झाडांचे तंतू इतके बारीक असतात कीं, त्यांचें चिंगलपट या गांवच्या कसबी लोकांसही सूत काढण्यास कठीण पडतें. ट्रिव्हेलोर तालुक्यांत चेरिवी, इरुगलं, कुलाडं, पांडवखं, चिट्टलपखं व कलहस्त्री संस्थानांत कत्रवरं आणि तिंपंटकपुरें या गांवचे पारिया नांवें प्रसिद्ध जातीचे लोक हें बारीक सूत काढितात. त्यांची काम करण्याची रीत अशी आहे कीं, कापसाची बोंडे घेऊन त्यांतील धागे बोटानें बाहेर ओढून काढून त्याची रास करितात. नंतर ती रास काठीनें धोपटतात. आणि खालीं पडलेला कापूस गोळाकरून केळीच्या वाळविलेल्या खोपटांत गुंडाळून ती पुडी चारपांच ठिकाणी दोरीनें बांधून एका बाजूस ठेवितात. याप्रमाणें सगळ्या कापसाच्या पुड्या बांधून तयार झाल्यावर सूत काढण्याच्या हातराहाटानें त्याचें सूत काढतात. तेव्हां तो कापूस पुडीनेंच धरितात. तेणेंकरून तो मलीन होत नाहीं. सूत तयार झाल्यावर त्याची मलमल विणण्यास तीन मनुष्य लागतात. एक माग चालविण्यास, दोन मनुष्य मागाचे दाेनी बाजूंस बसून धोटें इकडून तिकडे देण्यास, अशा रीतीनें तयार झालेल्या मलमलीच्या ताग्याची लांबी १६ वार असते व रुंदी दीडवार असते व एका ताग्यास २५-२०० रुपयें पर्यंत किंमत पडते. अरणी गांवी इतकें बारीक काम करणारे कारागीर फारच थोडे आहेत. उंची मलमल धुतांना दगडावर आपटीत नाहींत. जाड्या कापडांत धुतलेली रेती बांधून तिचें गाठोडें घट्ट दगडासारखें बांधून त्यावर धुतात, व नदीचे वाळवंटांत खळगे खणून त्यात जमलेल्या स्वच्छ पाण्याचा त्या धुण्यास उपयोग करितात. नंतर तो कपडा आठभाग पाणी १ भाग थुंबई नांवाच्या झाडाचा चीक ५ पोलम् कळीचा चुना हीं एकत्रकरून त्यांमध्यें तें कापड तीनतास पर्यंत उकळतात. मग तें पाण्यांत आदळून पुन्हा त्या रेतीच्या गाठोड्यावर चुबकून चुबकून धुऊन तें दोन दिवसपर्यंत उन्हांत ओपवितात. नंतर स्वच्छ पाण्यांत एकवार उकळतात आणि तें लिंबाच्या रसांत बुडवून ठेवितात. दुसरे दिवशीं सकाळीं पुन्हा स्वच्छ पाण्यांत आदळून रेतीच्या दगडावर चुबकून पुन्हा ओपवितात. याप्रमाणें दहा दिवस मेहेनत केली ह्मणजे मलमल पांढरी सफेत होते. हें मलमल धुण्याचें काम जरी धोबीलोक करितात तरी साळीलोक तो कपडा खराब न होण्यासाठीं त्या धोब्यावर सक्त नजर ठेवतात. मग त्यास खळ देणें ती ते साळी स्वतःच देतात. तेव्हां कपडा खळींत बुडवून वाळवितात. याप्रमाणें ५ दिवस केलें ह्मणजें साहाव्या दिवशीं त्यास हातानें खळ लावितात. आणि वाळवून त्याच्या घड्या करून ठेवितात. मलमल विणून तयार झाल्यापासून तिची घडी होईपर्यंत २० दिवस लागतात, निजामाच्या राज्यांत रायचर येथें हलक्या प्रतीची मलमल तयार होते तिला कधीं कधीं खाकी रंगही देतात. उन्हाळ्यांत या मलमलीचे पुरुषांकरितां सदरे व बायकांकरितां चादरी करण्याची त्या देशीं चाल आहे. या पेक्षा चांगल्या प्रतीची मलमल नांदेर येथें होते.

 असाम प्रांती सूत कातण्याचें व कापड विणण्याचें काम घरोघरी होतें व तें बायका करितात. हिंदुस्थानांतील इतर प्रांतांप्रमाणें त्या प्रांती विलायती सुत येऊं लागल्यामुळें जाडे भरडें कापडें विणण्याकरितां मुद्दाम कांतविलेल्या सुताशिवाय देशी सूत मिळत नाहीं तरी त्या देशी उत्पन्न होणारा कापूस बहुशः तेथेंच कापड विणण्यास खपतो. साधीं धोतरें, चादरी, रुमाल व पलंगपोस हे जिन्नस त्या देशीं विशेषेंकरून विणले जातात. कधीं कधीं कांठाचीं धोतरेंही विणतात. चादरी, कधीं साध्या व कधीं खासगी खर्चाकरितां बारीक मलमली सारख्या काढून त्यावर कशिदाही काढतात. “ बरकापर" या नांवाचें अंगावर घेण्याचें शालीसारखें एक प्रकारचें कापड तेथें तयार करितात व तसेंच " खनिया कापर" या नांवाचें बारीक वस्त्र विणून त्याच्यावर कशिदा काढून तेंही शालीप्रमाणें वापरतात तें आंखूड व अरुंद असलें ह्मणजे त्यास 'चेलेंग' ह्मणतात. असाम प्रांतीं अतिशय च बारीक कापड निघतें त्यास 'परिडिया कापड़ ' असें म्हणतात.

 हिंदुस्थानच्या ईशान्येकडील सरहद्दीवर मणिपूर ह्मणून, एक संस्थान आहे, त्यांतही असाम देशाप्रमाणें घरोघर कापड विणण्याचे माग आहेत. जाड्या भरडया सत्रंज्यांपासून तो अतिशय बारीक मलमलीपर्यंत सर्व जातीचें कापड या संस्थानांत तयार होतें. प्रत्यक्ष महाराजांच्या राण्या व कन्या आदिकरून सर्व गोर गरीबांच्या स्त्रिया ह्या तेथें कापड विणण्याचें काम करितात. त्यांत लहानसहान मुली आपल्या अल्पवयींच तें काम शिकून त्यांत हुशार होतात. मोठ्या श्रीमंत घराण्यांतल्या बायका जें कापड विणतात तें केवळ घरखर्चाकरितां इतकेंच नाहीं तर तें तयार करून विकतातही. त्यांणी विणलेलें जाडें कापड विलायती कापडापेक्षां स्वस्त असतें, परंतु त्यांचें बारीक कापड मात्र माहाग पडतें. हें बारीक कापड विणण्याकरितां हल्लीं तेथें विलायती सूतच वापरूं लागले आहेत. मणिपूर येथील कापड स्वस्त असण्याचें कारण असे आहे कीं त्या देशांतील बायका आपला वेळ आळसांत फुकट न घालवितां फावल्या वेळीं सतत उद्योग करून कापड विणून तयार करितात. त्यामुळें त्यास मजूरीच पडते असें नाहीं. मणिपूर संस्थानचे आसपास नागा या जातीचे लोक आहेत ते हल्लीं आपल्या बायकांस शेतकीच्या कामाकडे लावूं लागल्यामुळें त्यांस कापड विणण्यास फुरसत सांपडत नाहीं. यास्तव मणिपूर येथील लोकांकडून त्यांस कापड विकत घ्यावें लागते, व मणिपुरास नागा लोकांचे उपयोगी पडण्यासारखें कापडही तयार होऊं लागलें आहे.

 असाम व मणिपूर या देशांप्रमाणें ब्रह्मदेशांतही कापड तयार होतें. ब्रह्मदेशांत कापड विणण्यास त्याच देशांत उप्तन्न झालेला कापूस वापरतात. कापसांतील सरक्या काढून साफ केला ह्मणजे त्याचें सूत तेथें विलायतेंत पूर्वी जसें सूत कांतीत असत त्याप्रमाणेंच कांततात. ब्रह्मी लोकांचे मागही विलायतेंतील प्राचीन मागांसारखेच आहेत. तद्देशीय कापड जाडें भरडें असतें परंतु तें इतर देशांतील कापडापेक्षां जास्ती टिकाऊ असतें. अलीकडे विलायती रंगाच्या भबक्यास भुलून तेथील कांहीं तरुण लोक विलायती कापड वापरूं लागले आहेत.

रेशमी कपडे.

 रेशमाचा शोध पहिल्यानें चीन देशांत लागला असें जरी आहे तरी तो शोध लागल्यापासून तें हिंदुस्थानांत लौकरच प्रसिद्ध झालें. तरी वेदांत रेशमाचा कोठें उल्लेख नाहीं असें पाश्चिमात्य विद्वानांचें ह्मणणें आहे. रामायण आणि महाभारत हे दोन ग्रंथ लिहिण्यांत आले त्या वेळीं रेशीम आपल्या देशात पुष्कळ वापरीत होते असें दिसून येतें.

 रेशमाच्या मुख्य जाती चार आहेत-१ पहिलें-तुतीच्या झाडावर राहणाऱ्या किड्यांपासून उत्पन्न झालेलें त्यास 'मलबरी ' रेशीम असें ह्मणतात. पीतांबर, मुकटे, पैठण्या, इत्यादिक कपडे, त्याच रेशमाचे होतात. २-दुसरें ‘टसर ' या नांवानें प्रसिद्ध आहे. याचा रंग तपकिरी रंगासारखा असोन तें रेशीम कितीही धुतलें तरी पांढरें होतें.याचें कापड थोडें जाड होतें तें पारशी वगैरे लोक आपले अंगरखे व विजारी करण्यास वापरतात. ३ तिसरें-‘ एरी ’ हे एरंडाच्या झाडावर राराहणाऱ्या किडयांपासून उत्पन्न होतें ४ थे 'युगा' या नांवाचें आहे. तें आसाम देशांत उत्पन्न होतें. या दोन्ही जातींच्या रेशमाचा उपयोग, मेमण जातीच्या लोकांच्या पागोटीं, आंगरखे व सदरे यांवर कशीदा वगैरे कामीं करितात. ब्रह्मदेशांत आणखी एक पांचव्या प्रकारचें रेशीम तयार होतें त्यास 'कायक्यूला' असें म्हणतात. हें केशरी पिंवळ्या रंगाचें असून त्याचे कोश शेंपन्नास किडे मिळून एक ठिकाणीं चिकटून अंगूराच्या घडांसारखें कोशांचे घड तयार करितात.

 नामदार ईष्ट इंडिया कंपनीच्या हातीं हिंदुस्थानचा राज्यकारभार होता त्यावेळीं बंगालप्रांतीं किड्यांपासून पुष्कळ रेशीम उत्पन्न करून इंग्रज लोक यूरोपखंडांत पाठवीत असत, परंतु कंपनी सरकारानें आपलें रेशीम उत्पन्न करण्याचे कारखाने बंद केल्यामुळें व स्वदेशी लोकांनीं तयार केलेला माल चांगला निघेनासा झाल्यामुळें, हा व्यापार अगदीं बंद पडावयाची वेळ आली होती, इतक्यांत सरकारांतून रेशमाच्या व्यापाराची वृद्धि होण्याविषयी सन १८५५ सालीं प्रयत्न सुरू झाला. लीक शहरांतील रेशमाचे प्रसिद्ध व्यापारी मेहेरबान टामस् वार्डल् साहेब यांस विलायत सरकारानें मुद्दाम या देशांत पाठविलें. या साहेबानीं गांवोगांव फिरून रेशमाच्या किड्यांबद्दल व जातीजातींच्या रेशमाबद्दल पुष्कळ माहिती मिळवून नेली.हिंदुस्थानासारख्या सुपीक देशांत चीनदेशांतून रेशीम येऊन त्याचे कपडे होतात हें पाहून साहेब महशूर यास मोठा चमत्कार वाटला ते म्हणतात:

 "हिंदुस्थानांतील रेशमाबद्दल आजकाल मनाला फार दुःख होणारी एक गोष्ट माझ्या दृष्टीस पडली. मी नुक्ताच सर्व हिंदुस्थानभर फिरून आलों त्यावेळीं मी जिकडे जाई तिकडे रेशमाचे उंची कपडे विणण्यास चीन व इराण देशांतून रेशीम आणावें लागतें हें पाहून मला अतिशय दुःख होई. खरें म्हटलें असतां असें होण्याचें काहीं कारण नाहीं. फक्त एक बंगालप्रांत जरी धरिला तरी त्यांत कोणी मेहेनत करील तर रेशीम इतकें उप्तन्न होईल कीं, तें हिंदुस्थानांतील सर्व देशांत पुरून इतर देशांतही पाठवितां येईल. हिंदुस्थानांत कद, पितांबर, पैठण्या वगैरे कपड्यांस व कशीदा काढण्यास रेशीम फार लागतें हें मला माहीत आहे. हिंदुस्थानांतील कारागीर युरोपियन लोकांच्या नजरेखालीं काम करीत असला तर त्याच्या हातचें काम फारच सुरेख होतें.हा कारागीर शांतपणें एकसारखी मेहनत करून पूर्वापार आपले वाडवडील ज्याप्रमाणें काम करीत आलें त्याचप्रमाणें आपणही प्राचीन धरतीवर मोठ्या कुशलतेनें काम करीत असतो. त्यांत काहीं फेरफार करण्याची इच्छा नाहीं.परंतु पाश्चिमात्य लोकांचें तसें नाहीं, त्यांची बुद्धि विशेष तीव्र आहे, व त्यास प्रत्येक गोष्टींत विशेष सुधारणा करण्याची
   २० फार आवड आहे त्यामुळें हिंदुस्थानांतील कारागिरांनीं कोणाच्या मदती वाचून स्वतःच्याच बुद्धीनें जे जिन्नस तयार केले जातात, ते जिन्नस पुष्कळ लोकांच्या विचारें फारच लौकर तयार करून स्वस्त विकणाऱ्या पाश्यात्यांकडे हिंदुस्थानी कारागिरानें आपले अधिकार सोंपविल्यामुळें घडतें, असें म्हणण्यास हरकत नाहीं." हे मेहेरबान वार्डल् साहेबांचे विचार लक्षपूर्वक वाचण्याजोगे आहेत.

 बंगाल प्रांतीं भागीरथीच्या कांठीं पुराच्या योगानें तयार झालेली हजारो एकर मळईची जमीन आहे तींत हे रेशमाचे किडे अतिशय उत्पन्न होतात. त्या प्रांती माल्डा, बोगरा, राजशाई, मुरशिदाबाद, बीर भूम, आणि बर्द्वान, या ठिकाणीं रेशमी कपडें फार चांगले होतात. सन १५७७साली माल्डा येथून शेख भिक नांवाच्या मनुष्यानें तीन गलबतें भरून रेशमी कापड इराणी आखातांतून रशिया देशांत पाठविलें, असा इंग्रज सरकारच्या दप्तरीं लेख आहे. बांकुरा व मिडणापूर या गांवीं ही रेशमी कापड पुष्कळ तयार होतें. बंगाल्याच्या पश्चिम भागीं मानभूम,सिंगभूम, आणि लोहारडागा या गांवीं टसर,या जातीच्या रेशमाचे कपडे होतात.एरी नांवाचे रेशीम हिमालयाच्या पायथ्याजवळ ह्मणजे उत्तर बंगाला व आसाम या ठिकाणी उत्पन्न होतें. 'मुगा' या नांवाच्या रेशमाची उत्पत्ति फक्त आसाम प्रांतीच आहे. रेशमी कपडा धुतलेला नसला ह्मणजे त्यास 'कोरा' ह्मणतात, व तो धुतला ह्मणजे त्यास 'गरद' ह्मणतात. कदास कांठ असले ह्मणजे त्यास धोतर ह्मणतात. स्त्रिया अंगावर बुरख्यासारखें जें रेशमी वस्त्र घेतात त्यास चादर म्हणतात. पासोडासारखा पांघरण्यास जो रेशमी कपडा घेतात त्यास लुंगी म्हणतात. हे कपडे तुतीच्या झाडांवरील किड्यांपासून झालेल्या मलबारी रेशमापासून झालेले,अगर टसर रेशमापासून झालेले असतात. एरी रेशमाचे कापड प्रथम राठ लागतें परंतु तें वापरूं लागलें म्हणजे उत्तरोत्तर नरम होत जातें. मुगा रेशीम जाडें असतें खरें परंतु त्याचा धागा फार चिवट असल्यामुळें लौकर तुटत नाही. मलबारी रेशमाच्या किडयांचे जे कोश असतात त्यांतून किडे पंख फुटून उडून गेल्यावर त्या काशाच्या रेशमाचे मुकटे करितात. त्यांस हिंदु लोक इतर रेशमी कपडयांपेक्षा फार पवित्र मानितात. कारण त्या रेशमाचा उपयोग करतेवेळीं प्राण्याची हिंसा होत नाहीं. जैन लोक व वैष्णव अशा रीतीचें कपडे मुद्दाम तयार करवून वापरितात. मलबारी रेशमांत पिवळें व पांढरें असे दोन प्रकार आहेत, त्यांतील पिवळ्या प्रकारचें रेशीम पुष्कळ ठिकाणीं मिळतें पण पांढरें रेशीम मिडनापूर येथें मात्र मिळते. तें मार्च महिन्यांत तयार होतें. पिंवळया रेशमापेक्षां पांढऱ्या रेशमांत तकाकी व मऊपणा हीं जास्ती असतात.

 वायव्य प्रांतांत बनारस व आग्रा या दोन गांवीं रेशमी कपडे विशेषेंकरून तयार होतात. बनारसी शालू शेले व दुपेटे यांची सर्व हिंदुस्थानभर आख्या आहे. याशिवाय मुसलमानांकरितां मश्रु नांवाचे गर्भसुती गजनी कापड, उत्तरेकडील स्त्रियांच्या घागऱ्याकरितां संगी नांवाचे कापड, इजारींकरितां गुलबदन नांवाचें कापड, व पट्याकरितां सुसी नांवाचें कापड इत्यादि अनेक प्रकारचें कापड त्या प्रांतीं विणतात. याशिवाय इजारबंद म्हणजे इजारी बांधण्याचे रेशमी पट्टे आग्रा येथें तयार होऊन राजपुताना व मध्याहिंदुस्थान या दोन प्रांतीं जातात. फक्त आग्रयास सुसी व गुलबदन विणण्याचें ३०० माग आहेत. कच्चें रेशीम पंजाब व बंगाल येथून येतें. तयार झालेला माल सर्व हिंदुस्थानभर जातो. आग्रा येथील विणणारे लोक जातीचे मुसलमान आहेत. सगळा दिवस मेहेनत करून त्यांस दररोज तीनच आणे राहतात असें समजते. व विलायतेहून रेशमी कापड येऊं लागल्यामुळें या लोकांच्या धंद्यांत कांहीं हांशील राहिलें नाहीं असेंही कळतें.

 पंजाब प्रांती लाहोर, पटिआला, भावलपूर, मुलतान, अमृतसर, मुलारी, पेशावर, कोहात, जलंदर, व इतरही पुष्कळ ठिकाणीं रेशमी कापड विणतात, हल्लींपेक्षां पूर्वी लाहोरास फार उंची माल निघत असे असें म्हणतात. हल्लीं गुलबदन व दर्यायी या दोन जातीचें कापड विशेष निघतें. त्याची किंमत दर वारास पांच आण्यापासून दीड रुपयापर्यंत असतें. पटिआला येथें गुलबदन कापड व इजारबंद याच दोन जिनसा विशेषेंकरून मिळतात, परंतु पंजाब प्रांती रेशमी कापडाची मुख्य पेंठ म्हटली ह्मणजे भावलपूर होय. तेथील कापडास बहुतकरून आडवे पट्टे असतात व त्यास तकाकी फारच थोडी असतें, तरी ठिकण्यास तेंच उत्तम असतें. अलीकडे मात्र विलायती रंग वापरण्यात येऊं लागल्यामुळें सर्व धंद्यांची दुर्दशा होत चालली आहे. भावलपुराप्रमाणें मुलतानासही पट्ट्याचें रेशमी कापड विणतात त्यांत सुजाखानी हा एक वेगळाच प्रकार आहे. भावलपूर येथील रेशमी कापड पडयांकरितां साहेबलोक पुष्कळ खरेदी करितात.अमृतसरास मुख्यत्वें गुलबदन तयार होते. पंजाबांतील शीखलोकाचें राज्य बुडाल्यापासून तेथें हा व्यापार बुडत चालला आहे.

 साहेबलोक कापड खरेदी करितांना आपल्याप्रमाणें त्याच्या तकाकीकडे पाहत नाहींत. तें मिशमिशीत नसून घट्ट व हातास अगदीं मऊ गुळगुळीत लागणारें असेल तें पाहून घेतात. गुलबदन कापडास हिरवे व तांबडे, नारिंगी व तांबडे, अथवा पिंवळे आणि किरमीजी अशा रंगाचे पट्टे असतात. मुलारी येथील रेशमी कापडाची पूर्वी फार आख्या असे. पेशावर, कोहात, शहापूर आणि भावलपूर या गांवीं रेशमी लुंग्या पुष्कळ तयार होतात. या वस्त्रांत अनेक तऱ्हेच्या रंगांचे मिश्रण असतें इतकेंच नाहीं, तर त्यांत कलाबतू सुद्धां असते. उत्तरहिंदुस्थानांत लुंग्यांचा पागोट्यासारखा उपयोग करितात. पंजाबाच्या सरहद्दीवरील बहुतेक लोक हाच कपडा मस्तकास बांधतात. या कपड्यांची विणकर व त्यांजवरील तरतऱ्हेची नकशी तिजवरून स्काट्लंड देशांतील लोकांच्या ' टार्टन ' नांवाचें कापड वापरणारांच्या जाती प्रमाणें हेंही वापरणाराची जात व उपजात समजते. पंजाबांत कल्ला यानांवाची एक जरीची टोपी असते तिच्या सभोंवती फेटा गुंडाळतात, त्यांस कल्लापेच ह्मणतात तोही या देशांत उत्पन्न होतो. जलंदर गांवीं फक्त रेशमी कापड विणण्याचे शंभरांहून जास्ती माग आहेत असें म्हणतात. तेथें बहुतकरून राखाड्या रंगाचे जरीकांठी दुपट्टे होतात. जेलमगांवीं लुंग्या व इतर कापड होतें. खेस यानांवानें प्रसिद्ध असलेल्या सुती कापडा सारखें रेशमी कापडही त्यांगांवीं विणतात. कांहीं खेस नुसते पांढरे असतात व कांहीं अनेक रंगांच्या चौकटीचे असतात. काहींकांस नुसते जरीचे कांठ असतात व काहींकांस जरीचे कांठ असून आणखी रेशमी कांठही असतात. तांबड्या रंगाचे सुंदर खेस लाहोर येथें होतात, त्यांस गिऱ्हाइकी फार असते. मुसलमानलोकांत लग्न कार्यात रेशमीकापड नवरानवरीस देण्याची चाल आहे त्यामुळें या कापडास गिराइकी असते. सेलचंद या नांवाच्या पलंगाच्या नाड्या, रेशमी गोंडे, चोब्यांकरितां बुतामें इत्यादि पदार्थ सियालकोट, गुर्दासपूर, लाहोर, पतियाला व दिल्ली या गांवीं तयार होतात.

 राजपुताना व मध्यहिंदुस्थान या प्रांतीं रेशमी कापड फार थोडें विणलें जातें. चंदेरीस मात्र कधीं कधीं रेशमी कापड विणतात, मध्यप्रांतांत सिओनी, बिलासपूर, संबळपूर व चंदा, या गांवीं टसर या जातीचें रेशीम उत्पन्न होतें. संबळपूर जिल्ह्यांत बारपळी गांवीं टसर रेशमाचे कपडे फार विणतात. बिलासपूर जिल्ह्यांत मेहेरबान चिस् होल्म या नांवाचे डेपुटी कलेक्टर होते यांणीं तेथें टसर रेशमाचे कपडे विणणाऱ्या लोकांस आणवून त्यांची एक पेंठच वसविली आहे. छत्तीसगड जिल्ह्यांत टसर रेशमांची बंगाली लोकांकरितां धोत्रें विणतात व अंगरख्याचें कापडही विणतात. त्यांत अर्धे रेशीम अर्धे सूत असलें ह्मणजे त्यास बाफ्ता ह्मणतात. बऱ्हाणपूरास मलबारी रेशमाचें कापड तयार होतें, व या गांवीं व नागपूर येथें धोतरजोड्यांचे कांठ विणण्याकडे रेशमाचा फार उपयोग होतो. भंडारा जिल्ह्यांत पावणी आणि अंधरगांव येथें व नागपूर जिल्ह्यांत उमरेर येथें तऱ्हेतऱ्हेच्या रंगाचे रेशमी कांठ होतात त्यांची मोठी आख्या आहे. या कांठांस किरमीज दाणा या नांवाच्या किड्यांपासून झालेल्या रंगाचा उपयोग करितात. त्या गांवचे रंगारीलोकांची अशी समजूत आहे कीं या गांवचें पाणी उत्तम ह्मणून येथें रंग चांगला होतो. अशीच कितीएक ठिकाणच्या रंगारीलोकांची समजूत आहे पण ती खोटी ह्मणण्यास हरकत नाही.

 मद्रास इलाख्यांत उत्तर सालेम, मदुरा जिल्ह्यांत पेरियाकुलं, गुडूर, करनूल,चिंगलपट जिल्ह्यांत,कुंजविराय,गंजम जिल्ह्यांत बऱ्हागपूर,टि्चनापल्ली, बिलारी, कृष्णा, आर्काटं, कडाप्पा, विषागापट्टण, तंजावर, अय्यंपेंठ, व उत्तर आर्काटं जिल्ह्यात व लाजा या सर्व गांवीं रेशमी कापड विणलें जातें. बिलारी येथें रेशमी खण फार उत्तम निघतात. त्यांचे कांठांत सर्व अंगांत ही वेलबुट्टी वगैरे उत्तम प्रकारची नकशी असते. कुंजविराम येथें पांढरें साधें व बुट्टीचें रेशमी कापड तयार होतें. मदुर, चिंगलपट व तंजावर येथें जरीकांठी रेशमी कपडे फार चांगले होतात. मदूऱ्यास कलाबतू तयार करितात परंतु अलीकडे तेथेही विलायती कलाबतू वापरूं लागले आहेत. बुट्टीचें कापड विणण्यासही कलाबतूचा फार उपयोग होतो.

 ह्मैसूरास प्राचीन काळीं रेशमी कापड उत्तम होत असे परंतु त्या देशांतील रेशमी किड्यांस पूर्वी एक वेळ कांहीं रोग होऊन ते फारच मरून गेले. त्यामुळें रेशमाचा व्यापार अगदींच कमी झाला होता परंतु आतां कर्नल लिमेझरर साहेब यांनीं असा रिपोर्ट पाठविला आहे कीं, अलीकडे पुनः तुतीची लागवड होऊं लागली आहे त्यामुळें पुढें हा व्यापार वाढेल असें वाटतें. निजामशाहींत रायचूर गांवीं रेशमी लुगडीं चांगलीं तयार होतात. हैदराबादेस मश्रु व संगी या नांवाचें कापड पुष्कळ तयार होतें त्याचा उपयोग मुसलमान लोकांच्या व पारशी लोकांच्या स्त्रियांस इजारी वगैरे करण्याकडे होतो. इंदूर व झेलमंडल या गांवीं रेशमी लुगडीं व खण तयार होतात. औरंगाबादेची रेशमी कापडाबद्दल फार वर्षांपासून प्रसिद्धि आहे. तेथें हिबु ह्मणून एक गजनीसारखें नकशीदार कापड होतें त्याचा श्रीमंत मुसलमान लोकांचे कबजे व टोप्या करण्याकडे उपयोग होतो.
 मुंबई इलाख्यांत रेशीम कोणीच उत्पन्न करीत नाहीं. मेजॉरे कौसमेकर नांवाच्या साहेबांनीं पुण्यास कांहीं खटपट केली होती परंतु व्यर्थ गेली. ठाणें जिल्हांत व मुंबई बेटांत रेशमाचे किडे पुष्कळ पाहाण्यांत आले आहेत परंतु त्याचा उपयोग कोणास ठाऊक नाहीं. इतकेंच नाही तर तो एकाद्यास दाखविला असतां तो निंदास्पदमुद्रेनें तोंडाकडे पाहून हसतो असें अनुभवास येतें. लहानपणीं खेळ खेळण्यास बाहेर डोंगरातून टसर रेशमाच्या किड्यांचें कोशेटे आणून त्यांचा खेळांत उपयोग आह्मीं करीत होतों परंतु हे रेशमाचे किडे ही गोष्ट बावीस वर्षांचे वय होईपर्यंत सांगणारा कोणीच मिळाला नाही. यावरून मुंबई इलाख्यांत रेशमी कपडे विकण्याकरितां लागणारे सर्व रेशीम परदेशांतून आणावें लागतें हें सांगावयास नको. रेशमी कापड येवलें, पुणें, अमदाबाद, सुरत व ठाणें याठिकाणीं होते. त्यांत ठाणें खेरीजकरून इतर सर्व ठिकाणी जरीचा म्हणजे कलाबतुचाही उपयोग होतो. सासवड, बेळगांव, रेवदंडा, कलादगी आणि सोलापूर याठिकाणीं रेशमी किंवा गर्भसुती लुगडीं तयार होतात. येवल्यास रेशमाचें कापड विणण्याच्या संबंधानें चार हजार कुटुंबांचा निर्वाह चालला आहे. पैठण्या, पितांबर, लुगडीं, फडक्या, व खण या जिनसांबद्दल येवल्याच्या पेंठेंची मोठी आख्या आहे. तेथें हल्लीं रेशमी कापड विणण्याचे माग ९२५ आहेत. हिजरी सन ११५५ या वर्षांपर्यंत येवलें हें अगदीं लहानसें खेडें होतें. या साली रघोजी नाईक नांवाच्या एका सरदारानें शामदास वालजी या नांवाच्या एका गुजराथ्यास हातीं धरून पैठण व औरंगाबाद येथील रेशमी कापड विणणारे लोक आणवून पेंठ वसविली. त्या आणलेल्या लोकांस रघोजी नायकानें दोन प्रकारचीं अभिवचन व लेख दिलें होते ते असे कीं, त्या लोकांखेरीज दुसऱ्या कोठेंही राहणाऱ्या लोकांनीं हुकूमाशिवाय तेथें रेशमाचें कापड विणण्याचें काम करूं नये व त्या चोर व बंडखोर वगैरे लोकांपासून रघोजीनायकाचे घराण्यांतील नाईक यांनीं रक्षण करावें. नवीन व्यापाऱ्यांस परवानगी मिळण्यापूर्वीं साडेतीनशें रुपये कर द्यावा लागत असे. त्यांतील सवा रुपया काजीस व साडेबारा रुपये पेशवे सरकारास देऊन बाकी राहिलेल्या पैशाचा तेथील रहिवाशी रेशमी काम करणाऱ्या लोकांचे सामाजिक भोजनाकडे खर्च होई. हा नियम पेशवाई बुडाल्यावरही सन १८३७ सालापर्यंत इंग्रज सरकारानें चालविला होता. ३७ सालीं बापू नांवाच्या एका मनुष्यानें रेशमाचा कारखाना काढण्याचे परवानगीबद्दल असिस्टंट कलेक्टरकडे अर्ज केला तो असिस्टंट कलेक्टरानें नामंजूर केला व तो पुढें अपिलांत कलेक्टराकडेही नामंजूर झाला. पुढें रेविन्यू कमिशनराकडे काम चालून आठ वर्षांनीं ह्मणजे सन १८४५ सालीं त्यास परवानगी मिळाली. तथापि गुजराथी लोक स्वस्थ बसले नाहीं. त्यांनीं तारीख २६ जानेवारी सन १८४८ रोजीं सिव्हील कोर्टात नुकसानाबद्दल फिर्याद करून आपल्या वतीचा निवाडा करून घेतला. पुढें त्याजवरही अपिलें होतां होतां तारीख २४ जून १८६४ सालीं हायकोर्टानें खटल्याचा अखेर निकाल करून हा कर बुडविला. तेव्हांपासून येवल्यास बाहेरगांवचे व्यापारी पुष्कळ येऊन राहूं लागले. हल्लीं तेथें २५० खत्री, ३०० कोष्टी, २०० साळी, व २५ मुसलमान आहेत. येवल्यास लागणारें सर्व कच्चें रेशीम मुंबईहून न्यावें लागतें. त्यांत चिनी, बंगाली व इराणी असे तीन प्रकार आहेत. मुंबईच्या बाजारांत कच्चया रेशमास जातीवरून व चांगलेपणावरून वेगळीं वेगळीं नांवें पडलीं आहेत. जसें अव्वल, दुय्यम, लंकीन्, सीम, सालबाफी, चारन्, बाणक, शिकारपुरी, व पंजम. वीस वीस मुठ्यांची एक एक पेटी येतें ; त्या पेट्या वाणी, पटणी, ठाकूर, शिंपी व मुसलमान व्यापारी लोक मुंबईहून येवल्यास नेतात.

 येवल्यास गेलें ह्मणजे कच्चें रेशीम पहिल्यानें राहाटकऱ्याकडे जातें. तेथें तें कांतून तयार झालें ह्मणजे रंगाऱ्याकडे जातें. अखेरीस मागवाल्याकडे जातें. राहाटवाल्याकडे रेशीम गेलें ह्मणजे तो तें निवडतो ह्मणजे जाड, बारीक, ह्या मानानें त्याचे वेगळे वेगळे भाग करितो. या कामाकरितां कच्चें रेशीम पहिल्यानें एका फाळक्यावर टाकून त्याच्या समोर कातणारास बसावें लागतें. कांतणारा त्या रेशमाचें शोधून काढलेलें एक टोंक घेऊन तें एका असारीस बांधतो नंतर फाळक्याचा मधला दांडा डाव्या पायाच्या आंगठ्यानें धरून उजव्या हा तानें तो असारी भिंगरीसारखी फिरवितो. त्यामुळें रेशीम फाळक्यावरून असारीवर जातें. या प्रसंगी तें दोन बोटांत धरून हळूच चांचपून पाहतो व त्यांत बारीकपणांत कमजास्ती प्रकार आढळला ह्मणजे तितकाच तुकडा तोडून पुढला भाग दुसऱ्या असारीवर चढवितो अशा रीतीनें नुसत्या बोटाच्या मदतीनें रेशमाचे प्रकार निवडून काढून वेगवेगळ्या असाऱ्यांवर काढून घेतल्यावर, 'तात' ह्या नांवाचें त्याच्याजवळ एक यंत्र असतें त्या यंत्रावर देवनळाच्या लहान लहान गरोळ्या बसविलेल्या असतात, त्यांसभोंवतीं तो तें रेशामाचे तंतू पुढें गुंडाळतो. शेजारच्या दोन गरोळ्यांवरील धागे एका बांगडींतून बाहेर काढून ढोल ह्मणून एक पिंजरा असतो त्यावर अडकवितो, व पीळ पडलेले रेशीम ढोलावरून फाळक्यावर काढून घेतो. रेशमाचे दोन तंतू एक ठिकाणीं गुंडाळलेले असले म्हणजे त्यास “ दोन तार शेरिया" असें म्हणतात. हेंच दोन तार रेशीम पुन: गरोळ्यावर चढवून त्यास पुनः पीळ दिला ह्मणजे चारतार असें म्हणतात. रेशीम कातणारास त्याच्या यंत्रावरून 'रहाटवाला' असें नांव पडलें आहे.
 कांतलेल्या रेशमास शेरिया असें ह्मणतात. शेरिया तयार झाल्यावर व्यापारी लोक त्यास रंगाऱ्याकडे पाठवितात. (रंगाबद्दल माहिती पुढें पहा.)
 रंगवलेलें रेशीम व्यापारी लोक मागवाल्याकडे पाठवितात. मागवाला तीन कामें करितो; एक खळ देण्याचें, दुसरें ताणा तयार करण्याचें, व तिसरें विणण्याचें. ताणा ह्मणजे मागावरील उभ्या दोऱ्यांचा समुदाय. रेशीम तनसाळेवर सारखें ताणून घेऊन त्याजवर खळ चढवून तें सुखविलें ह्मणजे ताणा तयार होतो. मागावर लागणाऱ्या आडव्या धाग्यास वाणा ह्मणतात. फाळक्यावर रेशीम चढवून तें राहाटीच्या योगानें लीखडीवर चढवितांना त्यास खळीच्या ऐवजीं गोंदाचें पाणी लावतात.

 ताणा तयार झाल्यावर तो सांधणाराच्या स्वाधीन करितात. सांधणार प्रत्येक धागा खळींतून बाहेर काढून मागावर असलेल्या पूर्वींच्या धाग्यास गांठ मारून बांधतो. नंतर सर्व धागे सारखे पसरून मागाच्या दुसऱ्या टोंकाजवळ "आटा" असतो त्यावरून घेऊन बांधून ठेवितो.

 रेशमी कापड विणण्याचा माग आठपासून पंधरा फूट लांब, व चारपासून सात फूट रुंद असतो. त्याच्या एका टोंकाखाली मोठा खळगा असतो, त्यांत पाय टाकून साळीलोक कामावर बसतात. साळ्याच्या पुढेंच एक चौकोनी आडवी तुरई असते. या तुरईभोवती कापड विणलें ह्मणजे गुंडाळलें जातें. तुरईच्या पुढें आढयास टांगलेला हात्या असतो. हात्यांत फणी बसवितात. कापड विणतांना एकएक लिखडी धोट्यांत बसवून धोटें उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे फेंकतात. दर खेपेस धोटें इकडून तिकडे गेलें ह्मणजे फणीनेंं आडवा धागा सारखा बसवितात. फणीच्या पुढें आढयास टांगलेल्या सुतळीच्या वया असतात. मागाच्या दुसऱ्या टोंकास आडवी काठी असते तीस आटा ह्मणतात. वर सांगितलेला ताणा आट्यावरून दुमटून घेऊन त्याच्या टोंकांस एक दारे बांधून तो दोर तुरईजवळ परत आणून एका मेखेस बांधून ठेवितात. कांहीं कापड विणून तयार झालें ह्मणजे आट्याचा दोर सईल करून तुरईचा पेंच खेंचून घेऊन तयार झालेलें कापड तिजवर गुंडाळितात. ताण्याच्या धाग्यांतील वेगवेगळे थर एकमेकांत गुंंतूं नयेत ह्मणून त्यांत आडवी काठी घालतात तीस 'सांध ' किंवा 'कैचि' असें नांव आहे. कापड विणून तयार झाल्यावर त्याचे जरीचे कांठ किंवा पदर अकीकाच्या मोगरीनें घोंटून साफ करितात.
 रेशमी कापड येवल्यास तयार होतें. त्याप्रमाणें पुण्यासही तयार होतें. त्यांत कद, पीतांबर, फडक्या, पैठण्या, लुगडीं व खण हे प्रकार आहेत. येवल्यास शेट गंगाराम छबीलदास यांचे दुकान प्रसिद्ध आहे. व पुण्यांत शेट हिंदुमल्ल बाळमुकुंदचें विशेष प्रसिद्ध आहे. येवल्यांच्या दुकानांची मालकी हल्लीं शेट नथुभाई शामलाल यांजकडे आहे, व पुण्यांतील सदरील दुकानाची व्यवस्था शेट रामनारायण यांचेकडे आहे. अमदाबादेस शेट चुनीलाल फत्तेचंद याचे वतीनें माल आणवितां येतो. सुरतेस हजी अल्लीभाई यांचें दुकान मोठें प्रसिद्ध आहे. मुंबईत आंग्रयाचे पेढीजवळ खाऱ्या कुव्यानजीक गंगाराम छबीलदास याचीही पेढी आहे तेथें येवलें येथील पाहिजे तो रेशमी माल मिळतो.
 सुरत, खंबायत, व बडोदें या ठिकाणीं 'पटोलो' ह्मणून एका प्रकारचें रेशमी कापड निघत असतें, त्याची जितकी स्तुति करावी तितकी थोडीच आहे. हें कापड विणतांना पहिल्यानें उभे घालावयाचे दोरें घेऊन त्या सुमारें वीस वीस दोऱ्यांस मध्यें मध्यें नियमित स्थळीं सुताचे कट देऊन नंतर ते दोरे पिंवळ्या रंगांत बुडवितात. पुनः त्यांस नियमित स्थळीं कट देऊन तांबड्या रंगांत बुडवितात. पुनः नियमित स्थळीं कट देऊन जांबळ्या रंगांत बुडवितात. याप्रमाणें आडवे घालण्याच्या दोऱ्यांचे कट बांधून ते रंगवून तयार झाल्यावर ते सर्व कट सोडून त्यांची विणणावळ अशी कुशलतेनें करितात कीं स्वस्तिकाच्या रंगासारखे ते ते रंग त्या त्या जागीं सारखे सुशोभित होऊन तयार झालेल्या कापडांत चांगली नक्षी दिसते.
   २१ सिंधप्रांतीं, हैदराबाद, कराची, व शिकारपूर इत्यादि ठिकाणीं रेशमी कापड पुष्कळ तयार होतें त्याची विणकर वगैरे पंजाबांतील कापडासारखीच असते.

 'एरी' आणि 'मुगा' या नांवाच्या रेशमाचें कापड मुख्यत्वें आसाम प्रांतीच होतें. एरी या नावानें प्रसिद्ध असलेलें रेशीम कांततां येत नाहीं. तर त्यास कापसासारखें पिंजून मग त्याचें कापड विणावें लागतें त्यामुळें तें जाडें भरडें होतें खरें तरी तें टिकाऊ असतें म्हणून गोरगरीब लोक विशेषत्वें त्याचाच उपयोग फार करितात.

लोंकरी कापड.

 मेंढ्यांची लोंकर या देशांत उंची कपड्याकरितां वापरींत नाहींत. तिच्या घोंगड्या व बुरणूस होतात. काश्मीरदेशांत एका जातीच्या बोकडाच्या लोंकरीपासून शाली तयार होतात. सिंधप्रांतीं उंटाच्या लोंकरीपासून चोगे व इतर कपडे तयार करितात. या देशाची हवा उष्ण असल्यामुळें येथील लोकांस लोंकरीच्या कापडाची विशेष जरुरी लागत नाहीं. तशांत 'रूदार ' अंगरखे तयार करून ते थंडीच्या दिवसांत वापरण्याची आपल्या लोकांस विशेष आवड आहे, त्यामुळें लोकरीचा कपडा येथें कमी खपतो. काश्मीर व पंजाब या देशांत लोंकरीचें कापड पुष्कळ तयार होतें. मारवाडांत धाबळ्या होतात, व दक्षिणेंत घोंगड्या चांगल्या होतात. पंजाबांत लाहोर, रोटक, शिरसा, कसूर, फिरोजपूर, हुशारपूर, गुजरणवाला, रावळपिंडी, झेलम व नूरपूर या सर्व गांवीं लोंकरीचे कपडे तयार होतात. रामपुर आणि बसाहीर येथील एका प्रकारच्या मेंढयांच्या लोंकरीपासून पूर्वी कपडे तयार करीत असत. हल्लीं हिमालयाच्या आसपास मात्र तसले कपडे होतात. चंबा येथें गड्डी या नांवांचे धनगर जातीचे लोक आहेत ते थंडी पासून आपलें रक्षण होण्याकरितां लोंकरीचे कपडे वापरतात. राजपुतान्यांत जयपूर, अजमीर, बिकानेर, आणि जोधपूर, या गांवीं उंची बुरणूस तयार होतात. अजमीर जिल्ह्यांत तोडगर गांवीं होत असलेल्या बुरणुसांची विशेष ख्याति आहे. वायव्य प्रांतीं मिरत आणि मुजाफर नगर या दोन गांवांतील लोंकरी कपड्यांची विशेष ख्याति आहे. अयोध्या प्रांतीं बाहारयीक या गांवांतील लोकरी कपड्याची. ही विशेष ख्याति आहे. बंगाल्यांत आरा, गया, आणि सीतामऱ्ही हे तीन गांव लोकरी कापडाविषयीं मोठें प्रसिद्ध आहेत. वायव्येकडे लोंकरी कापडांत लोई ह्मणून एक प्रकारचें कापड तयार होतें तें लाहोर, शिरसा, लुधियाना, आणि अमृतसर येथें विणतात. 'पट्टु' या नांवाच्या कापडाचे पंजाबांतील डोंगराळ प्रदेशांत कपडे करण्याची चाल आहे. पंजाबांत मेंढ्याच्या लोंकरीचे हातमोजे, पायमोजे गळपट्टे, नमदा (बुरणूस) आणि खोगीर हे पदार्थ तयार होतात. जयपुरास नमद्याच्या टोप्या तयार करितात आणि अजमीरास जाट लोकांच्या बायकां करितां लागणाऱ्या घागऱ्यांचे कापड तयार करतात. राजपुतान्यांत बिकानेर येथील पांघरण्याच्या धाबळ्यांची मोठी प्रसिद्धि आहे. जोतपूरास जाट आणि वैष्णव लोकांच्या बायका लोंकरीचे कपडे विणीत असत, परंतु आलीकडे इंग्रजी कापड येऊं लागल्यामुळें त्याचें मान कमी होत चाललें आहे.
 कपडे विणण्याच्या कौशल्यसंबंधानें पाहतां तिबेट देशांत व अशियाखंडांतील मध्यभागाच्या प्रदेशांत असलेल्या एका प्रकारच्या बोकडाच्या लोंकरीचें कापड याचीच गणना केली पाहिजे. काश्मीरी शाल व पश्मीना असे लोंकरीच्या कापडाचे दोन प्रकार आहेत. शालींतच एक कशिदा काढलेली व एक आंगच्या नक्षीची असे दोन मुख्य प्रकार आहेत. शाल साधी असली, व तिजवर कोणत्याही प्रकारची नक्षी नसली, ह्मणजे तिला "अल्वान" किंवा " याकतारा" असें ह्मणतात. रामपूर चादर ह्मणून एक साध्या शालीचा प्रकार आहे. रामपूर चादर किंवा रामपूर शाल हें कापड लोंकरीच्या केंसांचे एकेरी तंतू घेऊन याचें विणलेलें असतें त्या शाली तांबड्या, पांढऱ्या व इतर रंगाच्या असतात परंतु त्यांस कांठ व पदर अगदीं क्वचित् असतात. अलीकडे स्वस्त मालास गिराइकें फार त्यामुळें काबूल देशांत " वाहापूशाई " नांवाची हलकी लोकर निघते, ती आणवून हलक्या किंमतीचे कपडे तयार करितात. उत्तर सतलज प्रांतीं बसाहीर नावांचें एक डोंगराचे खोरें आहे, त्यांतील मुख्य शहर रामपूर येथून पूर्वी उत्तम शाली व धाबळ्या विकण्या करितां लुधियाना येथें जात असत. त्याच ठिकाणांतून हल्लीं पशम चादरी येतात, तरी रामपूर चादर हेंच नांव त्यांस पडलें आहे. पश्मीना हें कापड रिठ्याच्या पाण्यात बुडवून पुष्कळ वेळ चुबकून धुतलें ह्मणजे तें आटून घट्ट होते व त्याच्या अंगी मऊपणा जास्ती येतो तेव्हां त्यास मलिदा असें ह्मणतात. मलिद्याचे चोगे, टोप्या, कबजे, गळपट्टे इत्यादि पदार्थ काश्मीर,अमृतसर,व लुधियाना येथें तयार होतात. काश्मीराशिवाय अमृतसर, लुधियाना,लाहोर,शिमगा,नूरपूर कांग्रा जिल्ह्यांत तिलोकनाथ गुजराथी जिल्ह्यांत जलालपूर, व गुर्दासपूर जिल्ह्यांत 'निदानगर' या ठिकाणींही पश्मानी तयार होतो तरी तो विणणारे सर्व लोक काश्मीरीच आहेत. पश्मीन्याचे दुपेटे,लुंग्या,हातमोजे गळपट्टे इत्यादि किरकोळ पदार्थही पुष्कळ होतात. उंटाच्या पोटाखालच्या केंसाचे चोगे होतात.

 पंजाब व राजपुताना या प्रांतीं बोकडाच्या व उंटाच्या केंसाचे थैले, जाडेंकापड, तरट, दोरखंड इत्यादि पदार्थं करितात. पंजाबांत व नेपाळ देशांत बोकडाच्या केसांच्या चवाळी करून त्यास रंगीबेरंगी सुताच्या आंचळ्या लावतात.

मिश्र ( गर्भसुती वगैरे ) कापड.

 मुंबईइलाख्यांत व त्याचे आसपास गर्भसुती कापड ह्मणजे रेशमी व सुती कापड, अमदाबाद सुरत, येवलें, पूणें, विजापूर, कलादगी, बेळगांव, बऱ्हाणपूर, औरंगाबाद, नागपूर, इत्यादि पुष्कळ ठिकाणीं होतें. गर्भसुती लुगडीं व खण याशिवाय मश्रु, इलायची, सुसी व लुंगी हेही पदार्थ या इलाख्यांत होतात. त्यांत लुंग्या कराची, हैदराबाद, शिकारपूर, ठाठा, इत्यादि ठिकाणीं विणितात.

 बंगाल्यांत गर्भसुती कापड पुष्कळ ठिकाणी होतें त्यांत 'टसर' रेशीममिश्रित कापडाबद्दल बांकूरा व मानभूम या दोन जिल्ह्यांची विशेष प्रसिद्धि आहे. हें कापड सुमारें सव्वा रुपयानें वार मिळतें. बांकुरा येथें रंगविलेले रेशीम व रंगविलेलें सूत एकत्र विणून एका कापडाचे कापड तयार करितात, त्यास 'अस्मानी' असें ह्मणतात. पांढऱ्या गर्भसुती कापडास 'बाफूता' असें नाव आहे. हें विशेषें करून भावलपूर जिल्ह्यांत होतें. रंगपूर जिल्ह्यांत जूट व रेशीम एकत्र विणून स्त्रियांकरितां एका प्रकारचें कापड विणतात त्यास 'मखली' असें नांव आहे. डाका येथें सूत व मुगा नांवाचें रेशीम यांचे उभ्या दोरव्याचें कापड विणतात. त्याला 'अजीझुल्ला' किंवा 'अत्रीजी' असें ह्मणतात. मालडा जिल्ह्यांत पुष्कळ प्रकारचें गर्भसुती कापड तयार होतें त्यांत 'सिराजा' ह्मणून एक प्रकार आहे तो इराण देशांतील सिराज शहरापासून उत्पन्न झालेला आहे असें ह्मणतात. सिराजा या कापडाचेही पुष्कळ प्रकार आहेत. साधा सिराजा यांत पांढऱ्या व किरमिजी रंगाचे मिश्रण असतें; मच्छलीकांटा यांत पांढऱ्या भूमीवर नारिंगी पटे असतात; लाल सिराजा, यांत तांबड्या भुयीवर मच्छलीकांट्याचे पटे असतात; अस्मानी सिराजा, यांत हिरव्या व जांबळ्या रंगाच्या मिश्रणाच्या भुयीवर पट्टे असतात, सबूजी कटार,हें कापड हिरव्या रंगाचें असून त्यांजवर तांबडे, व उभे आडवे पट्टे असतात इतकेंच नाहीं तर त्या पट्ट्यांच्या मधून मधून कटारीच्या आकाराची नक्षी असते. 'लाल कटार' कापडांत पट्टे व कटार असेच असून भुईमात्र तांबडी असते. बुलबुलचसम हें कापड केशरी रंगाचें असून त्यांवर चौकटीच्या आकाराची नक्षी असते. लालकदम फुली हें कापड तांबडे असून त्याजवर कदंबाच्या फुलांसारखी केसरी रंगाची नक्षी असते. साधी कदंब फुली यांत पांढऱ्या भुईवर तांबड्या फुलांचें पट्टे असतात. साधीवेल फुली यांत पांढऱ्या भुईवर किरमिजी निळ्या व पांढऱ्या या तीन रंगाच्या मिश्रणाच्या नक्षीचे पट्टे असून त्यांत रुई फुलें सोडविलेलीं असतात. काळे पट्टेदार याकापडास जांबळ्या भुईवर किरमिजी व पांढरे व किरमिजी आणि पिवळे असे पट्टे असतात. लाल पट्टेदार यांत किरमिजी भुईवर केशरी पट्टे असून त्या पट्यासच जांबळी व पांढरी कोर असते. याखेरीज सरा बार सिरार्जा, साधाबडा कदर फुली, सफेत कोंरदार, काळा मच्छलीकांटा, लाल कोरदार व कंकिणी इत्यादि पुष्कळ प्रकार आहेत.

 वायव्य प्रांतात 'संगी', ह्यणून एका जाताचें गर्भ सुती कापड तयार होतें त्यांत 'टसर ' रेशीम मिश्र असतें तसेंच गुत्तेर ह्मणून एक कापड आहे त्यांत तुतांच्या झाडावरील किड्यांचें रेशीम असतें. ह्या दोन्ही तऱ्हा सन १८६५ सालीं निघू लागल्या असें ह्मणतात. अजीमगडास हें कापड विकणारे सहा सात, असामीच आहेत परंतु एका वर्षांत ते सुमारें तीन चार लाख रुपयांचें काम करितात.

 मश्रूबद्दल मागें माहिती दिलीच आहे. अमदाबादेस मश्रु होते त्याप्रमाणें बनारस येथेंही होते. रेशमी कापड वापरण्याची मुसलमान लोकांस परवानगी नाहीं त्यामुळें मश्रु सुजाखानी अथवा सुकी, गुलबदन, सुफी, खेस, इलाइचा, हिमु इत्यादि मिश्र कापड मुसममान लोक वापरतात.

 फानेल व काश्मीर यानांवानें प्रसिद्ध असलेले मिश्र कापड काश्मीर देशांत होते.

रंगारी काम.

 सन १७८७ च्या सुमारास सर विलियम जोन्स नांवांच्या एका मोठ्या तत्व वत्त्यानें लिहिलें होतें कीं, हिंदुस्थानांतील रंगारी पक्के रंग तयार करितात तसें जर आमच्या विलायती व्यापाऱ्यांस साधेल तर आह्मांस सोन्याची खाणच सांपडली असें ह्मटले पाहिजे. या गोष्टीस आज सुमारें शंभर वर्षे झालीं. इतक्या अवकाशांत सगळेंच उलट झालें आहे. विलायतेस हिंदुस्थानांतील चीट फार जातें त्यामुळें विलायत सरकारानें त्याजवर जबरदस्त कर बसवून पाहिला, त्यानेंही कांहीं वळेना तेव्हां हिंदुस्थानांतील चीट वापरूं नये असा कायदा काढणें त्यास भाग पडलें. तेंच हिंदुस्थान प्रस्तुत काळीं विलायती चिटांनीं ओतप्रोत भरून गेलें आहे. इतकेंच नाहीं तर विलायती रंगाची गलबतांचीं गलबतें आमच्या देशांत येऊं लागल्यामुळें देशी मालच तयार होण्याचें बंद होत चाललें आहे.

 आमच्या देशांत कपडे रंगविण्याची विद्या फार प्राचीन काळापासून अवगत असावी यांत शंका नाहीं. सुमारें २५०० वर्षांपूर्वी आमचे पूर्वज रंगविलेलें कापड वापरीत असत असें ग्रंथाधारावरून सिद्ध करितां येतें. ख्रिस्ति शकाच्या पूर्वी ५४३ व्या वर्षी काश्यपाच्या आज्ञेवरून एक सभा भरली होती तींत आलेले भिक्षु ( बौद्ध धर्माचे संन्यासी ) भगवीं वस्त्रें नेसून आले होते, असें त्याच वेळीं फोको नांवाच्या एका चिनई विद्वानानें लिहून ठेविलें आहे. त्यांत बायकांचे कपडे पिंवळ्या रंगाचे होते असें तो ह्मणतो.

 निजामशाहींत अजंटा लेणीं आहेत व मध्य हिंदुस्थानांत बाघ या नांवाचीं लेणीं आहेत. हीं दोन्हीं लेणीं ख्रिस्ति शकाच्या पूर्वी सहाव्या शतकांत रंगविलेलीं आहेत असें सिद्ध झालें आहे. या लेण्यांतील चित्रांकडे पाहिलें ह्मणजे तांबड्या, निळ्या व पांढऱ्या पट्ट्यांचें कापड पूर्वीचे लोक वापरीत असत असें सिद्ध होतें. या कापडास काठ्यावाड आणि कच्छ या प्रांतीं तिपटो असें नांव असुन तेथील स्त्रिया ते कापड अझून वापरितात. बाघ येथील लेण्यांत डाक्टर भाऊ दाजी यांणीं एक चित्र पाहिलें त्याच्या आंगावर बांधणी कामानें रंगविलेला कपडा होता. हें बांधणी काम कच्छ, काठयावाड, जयपूर या प्रांतीं अझूनही पुष्कळ होत असतें. सन १८५१ सालच्या इंग्लंडांतील प्रदर्शनाबद्दल रपोट लिहितांना मेहेरबान रायल साहेब यांनी खालीं लिहिलेला मजकूर लिहिला आहे.

 " हिंदुस्थान देशांत कपडें रंगविण्याची कळा फार प्राचीन काळापासून माहीत आहे असें ग्रीस देशांतील प्लीनी नांवाच्या एका विद्वानाच्या ग्रंथावरून सिद्ध होतें. हिंदु लोकांच्या लष्करांत रंगारंगांचीं निशाणें फडकत होतीं असें या इतिहासकारांनीं लिहून ठेविलें आहे. कपडे रंगविण्याची विद्या हिंदु लोक मिसर देशांतील लोकांपासून शिकले असें कित्येकांचे ह्मणणें आहे परंतु त्यास कांहीं आधार नाहीं. उलटें ज्याप्रमाणें ' इजिप्शियन अलम ' या नावानें युरोप खंडांत प्रसिद्ध असलेली तुरटी मिसर देशांतील नसून हिंदुस्थानांतीलच आहे असें सिद्ध झालें आहे. त्याप्रमाणें हे रंगही पूर्वी हिंदुस्थानांत होऊन नंतर इजिप्त देशांतून युरोपांत आले असावे, रंगास तुरटी लागते व ती तर कच्छ प्रांतीच उत्पन्न होते. तसेंच हिराकस वगैरे लोखंडाचे क्षार हिंदु लोकांत माहीत आहेत. आमलेल्या दारूंत किंवा भाताच्या पेजेंत लोखंड घालून त्याजपासून ते लोक कांहीं क्षार तयार करितात. हिंदु लोकांस आम्ल व आल्केली पदार्थ पुष्कळ माहीत आहेत त्यामुळे एकाच रंगामध्ये त्यास अनेक फरक करितां येतात."

 रंगांत फरक ह्मणजे काय ? हें समजण्या करितां एक उदाहरण देणें अवश्य आहे. तें असें--एक कुसुंबा रंग उदाहरणार्थ घेतला तर त्याचा पहिल्यानें मोतिया रंग होतो, नंतर प्याजी, नंतर गुलाबी, मग गहिरा गुलाबी, मग नारिंगी, गुलियानार, तांबडा, कुसुंबी, व तेलिया इतक्या प्रकारचा फरक पाडितां येतो.

 युराेप खंडांत हल्लीं सुद्धां प्रचारांत असलेल्या कपडे रंगविण्याच्या युक्त्या हिंदुस्थानांतूनच तिकडे गेल्या आहेत ही गोष्ट निर्विवाद आहे तरी इतकें लक्षांत ठेविले पाहिजें की ह्या युक्त्या जरी प्रथम आपल्या देशांत निघाल्या तरी त्यांत पुढें कोणत्याही रीतीची सुधारणा झाली नाहीं; मग ती जातिभेदामूळें ह्मणा, राज्यक्रांतीमुळें ह्मणा, अथवा धर्मभोळेपणामुळें म्हणा.

 प्रस्तुत काळीं काश्मीर, पंजाब व सिंध या प्रांतांत जसा रंग होतो तसा कोठेंच होत नाहीं. आमच्या इलाख्यांतील रंगारी लोक पूर्वी सिंध प्रांतांतून आले अशी दंतकथा आहे. व सिंधी लोक ज्या धंद्याबद्दल मोठा अभिमान बाळगतात तो धंदा उदयास येण्यास आसीरियन, इजिप्शियन्, बाबिलोनियन्, व परशियन् लोक (इराणी, दुराणी, मिसर, वगैरे लोक यांच्यांत प्राचीन काळीं व्यापाऱ्याचा भरभराट होता, त्यांचें आमचें दळण वळण होतें, व आमचा माल त्यांच्या देशांत पुष्कळ खपत असे, ह्या गोष्टी कारण झाल्या असाव्या).

 मोगली राज्यांत शिल्पकला, चित्रकला, व इतर कौशल्यास पुष्कळ उत्तेजन मिळालें. त्याप्रमाणें कपडे रंगविण्याच्या विद्येसही मुसलमानी राज्यकर्त्यांकडून उत्तेजन मिळालें. ह्यांत शंका नाहीं. अलीकडे मात्र विलायती माल येऊं लागल्यामुळें देशांतील रंगारी लोकांचा धंदा बुडत चालला आहे.
रंगाचे प्रकार.

 वेगळे वेगळे रंग देण्याचें काम भिन्न भिन्न जातीचे लोक करितात. गुळीचा रंग करणारे लोक जातीचे मुसलमान आहेत. व ते निळा, काळा, आणि हिरवा इतकेच रंग तयार करितात. सुरंगीपासून पक्का तांबडा रंग करणारे वेगळे आहेत. जाजमें, रजया, वगैरेचें काम हेच लोक करितात. हे जातीचे हिंदु आहेत. रंगविणारे वेगळे आहेत. हे लोक हिंदु असून मूळचे सिंध आणि कच्छ प्रांतांतले राहणारे आहेत. या खेरीज रेशमाच्या कापडावर बांधणीचें काम करणारे मुसलमान लोक आहेत ते वेगळेच. कच्छ, काठ्यावाड, गुजराथ ह्या तीन प्रांतांत बांधणीच्या कामास गिऱ्हायकी फार त्यामुळें पावसाळ्या दिवशीं काम धंद्याकरितां बाहेर जातां येत नाहीं ह्यामुळें बायका पुरुष घरीं काम करित असतात. याखेरीज पागोटीं रंगविणारे हे वेगळेच आहेत. हे लोक जातीचे बहुत करून मुसलमान आहेत. पागोट्यांस रंग देण्यांत कुसुंब्याचाच पुष्कळ उपयोग होतो. कुसुंब्याचा रंग कच्चा आहे तरी त्याचे मोतियापासून तेलिया रंगापर्यंत चौदा पंधरा प्रकारचे भिन्न भिन्न सुशोभित रंग तयार होतात. या रंगाची प्रतिष्ठा उत्तरेकडे जास्ती आहे. लखनौ, बनारस, दिल्ली, आग्रा, इत्यादि ठिकाणच्या लोकांस रंगी बेरंगी कपडे घालण्याची हौस फार त्यामुळें धंद्यास तेज आहे. इराणी लोकांस लागणारे हिरवे व पिवळे कपडे हेच लोक रंगवितात.

 मुंबईत लोंकर रंगविणारे कांहीं रंगारी आहेत तरी हा धंदा मुख्यत्वेंकरून काश्मीरी व पंजाबी लोकांचाच आहे. कारण या दोन देशांतच लोंकरीचे कपडे पुष्कळ विणिले जातात.

 या खेरीज हस्तिदंत रंगविणारे पारशीलोक मुंबईत पुष्कळ आहेत. हस्तिदंतावर सहा सात जातीचे रंग चढतात.

 या शिवाय कातडे रंगविणारे (कमावणारे नव्हत ) लोक आपल्या देशांत आहेत ते वेगळे.

 जाजम, रजई, चांदणी, गुजराथी बायकांच्या साड्या, वगैरेवर रंगारंगाची नक्षी छापणारे लोक आहेत त्यांस गुजराथेंत भावसार ह्मणतात. हे भावसार लोक बऱ्हाणपुराकडचे आहेत, असें ह्मणतात.जोधपुरचे मारवाडी लोक,पंजाबांतील नानकपंथीलोक, सोलापूर व तैलंगण येथील कांहीं लोक जाजमे छापण्याचा धंदा करितात. गुजराथ, काठयावाड,कच्छ, व सिंध या प्रांतीं खत्री लोकही हें काम करितात. तरी कांहीं ठिकाणीं मुसलमान लोकही हा धंदा करूं लागले आहेत. परंतु सर्वात खत्री लोकच मुख्य आहेत. खत्री हे मुसलमान, हिंदु, किरिस्तांव या तिन्ही जातींमध्यें आहेत. मुसलमान खत्र्यांस रंगरेज ह्मणतात. खत्री लोक मूळ सिंध देशांतून आले; त्यांतील कांहीं लोवरगडास येऊन राहिले. त्यांस लोहाणा असें नांव पडले. व कांहीं हिंगळाज येथें जाऊन काताऱ्याचा व रंगाऱ्याचा धंदा करूं लागले. हिंगळाज येथून हे लोक कच्छ, काठयावाड, व गुजराथ या प्रांतीं पसरले. त्यांच्यांत 'सोराथिया,' व 'सिंधवा ' असे दोन भाग आहेत. सोळाव्या शतकांत दीव, दमण, सुरत या ठिकाणीं डच लोकांनीं कारखाने काढिले. तेव्हां तेथें पुष्कळ खत्री लोकांस चाकऱ्या मिळाल्या. डच लोक चिटें तयार करून गोंवा, मोझांबिक वगैरे ठिकाणीं नेऊन विकीत, खंबायत, अमदाबाद व सुरत या गांवीं छापलेलें कापड सयाम देशांत पुष्कळ जात असे.

रंगाऱ्यांचा कारखाना.

 आमच्या देशांतील रंगाऱ्यांचे राहतें घर किंवा त्यांची झोपडी यासच कारखाना ह्मणावयाचें, परंतु त्यास तें नांव शोभत सुद्धां नाहीं. रंगारी आपलें काम नदीच्या कांठीं किंवा एखाद्या विहिरीवर करितो. कपडे उकळावे लागतात तेव्हां एक मातीचा चुला करून त्याजवरच तो ते काम घेतो. त्या चुल्यालाच रंगाऱ्याची भट्टी ह्मणावयाचें. पाणी साठविण्याकरितां एक दोन रांजण, एक दगडी उखळ, एक दोन मुसळें, व एकाददुसरी घडवंची, इतकें साहित्य असलें ह्मणजे झालें. गुळीचा रंग करणारास एक दोन पिंपें जास्ती लागतात. छाप्याचें काम करणारास एक दोन पाट व कांहीं नक्षी कोरलेले लांकडाचे ठोंकळे लागतात. या देशांत रंगारी काम करितात ती जागा फार घाणेरी असते. तींत व्यवस्था ह्मणून मुळींच असत नाहीं. नीट नेटकेपणाचा गंधही नसतो. एकंदर धड कोणतीच सोई नसते. तिकडे पाहिलें ह्मणजे साधेपणा, दारिद्र्य, व गांवढळपणा, यांचेंच चित्र डोळ्यांपुढें उभें राहतें. देशी रंगारी सर्व काम आपल्या हातानेंच करितो. यंत्रें त्याचे जवळ मुळींच नसतात, व हत्यारें असतात तींही अगदीं ओबड धोबड, इतक्याही प्रकारची उणीव असुन व आमच्या रंगाऱ्यास रसायनशास्त्राचा गंधही नसतांना त्यांच्या हातून जें कांहीं काम होतें तें पाहून पृथ्वींतील मोठमोठे सुधारलेले लोकसुद्धां कांहीं वर्षांपूर्वी चकित होऊन तोंडांत बोट घालीत. व अजूनही त्याच्या अकलेची व कौशल्याची तारीफ करितात.


   २३
" रंग देणे व रंग देत असतांना पडत असलेले रासायनिक प्रयोग "

हे रासायनीक प्रयोग मिश्र पदार्थांच्या मानानें भिन्न आहेत व एकाच रंगाचा प्रयोग, कापूस, रेशीम, किंवा लोकर याच्याशीं वेगळ्या प्रकारचा घडतो. या तिहींपैकीं प्रत्येकावर रंग चढविण्यास काय काय करावें लागते हे रसायनशास्त्राचा अभ्यास केला नसूनही माहीत झालें. तत्रापि त्यांचें काम केवळ अनुमानावर अवलंबून असल्यामुळें सर्व काळ त्यांच्या हातून चांगलाच रंग तयार होतो असें नाहीं.एकाच रंगाऱ्याच्या हातून एकच रंग कधीं कधीं चांगला वठतो व कधीं बिघडतो. रसायनशास्त्राचा अभ्यास केलेल्या एखाद्या विद्वान् गृहस्थानीं या विषयाकडे लक्ष्य दिल्यास त्यांतल्यात्यांत कांहीं नियम बांधून त्या कामांत पुष्कळ सुधारणा करितां येईल, असें आह्मांस वाटतें.

 मुंबई इलाख्यांत कराची, हैदराबाद ( सिंध ) ठठ्ठा, कच्छ, भूज, अमदाबाद, भावनगर, खेडा, बडोदा, भडोच, मालेगांव हीं ठिकाणें जाजम, पासोडी वगैरे छापण्याबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत. कच्छ, नवानगर, धांगद्रा, जुनागड, अमदाबाद, व मुंबई या गांवीं बांधणीचें काम फार चांगलें होतें.

मंजिष्ठेचे रंग.

 मंजिष्टेचा तांबडा रंग--गुजराथेंत दींव गांवीं मंजिष्ठेचा तांबडा रंग देण्यापूर्वी कापड पापडखाराच्या पाण्यांत बारा तास बुडवून ठेवितात. पक्का रंग देण्याची रीत खालीं लिहिल्याप्रमाणें आहे--

  १ खारणी  ( खारांत बुडवणें )
  २ हर्डाववूं  ( हर्डा चढवणें )
  ३ पासा करवो  ( रंग पक्का करणें )
  ४ विच्छळवूं  ( विसळणें किंवा पाण्यांत आघळणें )
  ५ रंगववूं  ( रंगवणें )
  ६ तापववूं  ( सुखवणें )

 १ खारणी--बकरीच्या लेंड्या, तिळाचें तेल, सिंधी पापडखार, व पाणी हे चार पदार्थ घ्यावे. पाण्यांत पापडखार टाकून कालवावा, व तो विरघळला ह्मणजे त्यांत तेल टाकून ढवळावें, ह्मणजे पाणी दुधासारखें होतें, त्यांत शेळीच्या लेंड्या कालवाव्या या पाण्यांस कापड घालून आंतल्या आंत मळावें. व नंतर पिळून सुखवावें, याप्रमाणें दिवसातून चार वेळ तेंच कापड पुनः पुनः बुचकळून सुखवावें हाच प्रकार तीन दिवस चालवावा. चौथ्या दिवशीं तेंच स्वच्छ पाण्यांत आघळून पुढें साहा दिवस ओपवावें व अखेरीस धुवून सुखवावें. खारणी करण्यांत जितकी मेहनत घ्यावी तितका रंग चांगला वठतो.

 २ हर्डाववूं--हर्डा चढविण्यास खालीं लिहिलेल्या जिनसा लागतात:--

 हर्डा,  तमालपत्र.‎
 नागकेसर,  मायफळ,
 हिमाज,(बाळहर्तकी)    कुर्फो, ( जाडी दालचिनी)
 साखर,  पाणी,

 या सर्व जिनसांची बारीक वस्त्रगाळ पूड करून थंड पाण्यांत टाकून पुष्कळ कालवावी, व तिच्यांत पूर्वी खारलेलें कापड बुडवून सुखवावें ( हें कापड छापून त्याचें जाजम वगैरे करणें असेल तर त्याची खालींल बाजू ( ह्मणजे जमिनीकडील बाजू ) वर करून तिजवर छापावें ह्मणजे सूर्याच्या किरणांनी सुखलेल्या बाजूपेक्षां खालच्या बाजूवर रंग चांगला वठतो )

 ३ पासाकरवो--लोध्र पाण्यांत चार तासपर्यंत उकळवून तयार झालेल्या काढ्यांत तुर्टी टाकावी व तें पाणी गाळून त्यांत कापड बुडवून सुकवावें.

 काही रंगारी लोध्राबरोबर पतंगाचें लांकूडही पाण्यांत उकळवितात. परंतु असें करण्याची कांहीं गरज नाहीं.

 ४ विच्छळवूं-थंड पाण्यांत कापड बुडवून पुष्कळ आघळून चुबकून धुवावें.

 ५ रंगववू-जमिनींत खाडा खणून, त्याच्या बाजूस लांकडे घालण्याकरितां भुयारासारखें भोंक पाडून, त्याजवर ' चेरू' या नांवानें प्रसिद्ध असलेलें एक मोठें तांब्याचें भांडें ठेवून त्यांत मंजिष्ट, धायटीचीं फुलें, व मायफळ या तीन पदार्थांच्या वस्त्र गाळ पुडी टाकाव्या. या भट्टींत कापड टाकून तीन तास उकळवावें ह्मणजे त्याजवर पक्का तांबडा रंग चढतो. या रंगास जास्ती झळक मारावी ह्मणून कधीं कधीं भट्टींत 'सुरंगी' या पदार्थाची पूड टाकितात परंतु तीच पूड जास्ती पडली तर रंग फिक्का पडून पिंवळट दिसूं लागतो.

 ६ तापववूं--रंगविलेले कापड विकण्याकरितां बाजारांत पाठविण्यापूर्वी तें उन्हांत टाकून ओपवावें लागतें. बकरीच्या लेंड्या पाण्यांत कालवून त्यांत तें एकरात्र भिजत ठेवितात, दुसरे दिवशीं सकाळीं तें तसेंच जमिनीवर उन्हांत पसरून त्याजवर वारंवार पाणी शिंपडतात. याच प्रमाणें तिसरे दिवशीं कापडाची दुसरी बाजूवर करून तोच प्रयोग एकदिवस करितात. चवथ्यादिवशीं तें स्वच्छ पाण्यानें धुवून वाळवून त्याच्या घड्या करितात.
 कपडा एकरंगी तयार करणें व त्याजवरील रंग स्वच्छ उमटण्या करितां तो सहा दिवस ओपवावा लागतो.
 दीव यागावीं मुख्यत्वें चार प्रकारचा पका रंग तयार होतो. १ गुलाबी २ जांबळा, ३ काळा, आणि ४ धूसर.
 १ गुलाबी--यांत खारणी व हरडा चढवणें हें तांबड्या रंगाप्रमाणें करावे लागतें. पुढें रंग पक्का करिताना तुरटी व लोध्र यांचें पाणी एकशेर घेऊन त्यांत एकशेर स्वच्छ पाणी व सव्वाशेर साखर घालतात. व त्यांत कपडा बुडवून सुकवितात, इतर सर्व कृति तांबड्या रंगा प्रमाणेंच आहेत.
 २ जांबळा--तुरटी व लोध्र याचें पाणी एकशेर घेऊन त्यांत एकशेर काळा रंग घालतात, व त्यांत कपडा बुडवून त्यावर वरसांगितल्या प्रमाणें तांबडा रंग चढवितात ह्मणजे जांबळा होतो यांत काळा होतो.

 जो काळा रंग घालावयाचा तो तयार करण्याचा प्रकारः-लोखंडाच्या कढईत जुने जाळलेले खिळे टाकून त्यांजवर पाणी ओतून त्यांत गूळ कालवावा. व तें पाणी एक रात्र ठेवून दुसरे दिवशीं सकाळीं त्यांतील थोडें पाणी घेऊन त्यांत बाजरीच्या पिठाची अंबील शिजवितात. ती बाकीच्या पाण्यांत मिळवून तें पाणी दोन दिवस झांकून ठेवितात. चवथ्या दिवशी पुनः त्यांतील थोडया पाण्याची आंबील करून मिळवितात. मग तिसरे दिवशीं तें पाणी तपासून पाहतात. तें ताडीच्या रंगाचें असलें तर ठीक आहे. नाही तर काळें दिसूं लागल्यास तें टाकून पुनः दुसरे तयार करावें लागतें. पाण्याची चांगलीं भट्टी उतरली तर त्यांत माडी घालून एक दिवस ठेवितात ह्मणजे काळा रंग तयार होतो.
 ३ मंजिष्टपासून तयार झालेला काळा-हरडा चढविलेलें कापड वर सांगितलेल्या काळ्या रंगांत बुडवून धुवून सुकवावें.सुकल्यावर मंजिष्टेच्या रंगांत कढवून मंजिष्टेच्या तांबड्या रंगाप्रमाणें ओपवावा.हा रंग लोखंडाच्या गंजाप्रमाणें तांबूस काळा होतो.


 ४ धूसर--एक शेर काळा रंग, तीन शेर पाणी, पावशेर तुरटी व लोध्र यांचा काढा, यांत हरडा चढविलेला कपडा बुडवून मंजिष्टेच्या तांबड्या रंगात बुडवून वर प्रमाणें ओपवावें.
मंजिष्ठेचे रंगाबद्दल आणखी माहिती.

 मंजिष्टेचे रंग देण्याचे पुष्कळ प्रकार आहेत. त्यांत खालीं लिहिलेली कृति उत्तर हिंदुस्थानांतील एका रंगाऱ्याकडून मिळविली आहे. दोन रतल वजनाचें कापड रंगविण्यास जो मसाला लागतो तो:--
 पावशेर हरड्याची पूड घ्यावी व पाणी आठ शेर घेऊन त्यापैकीं थोडें पाणी त्या पुडींत घालून ती प्रथम चांगली भिजवून मग तींत बाकीचें पाणी घालितात, व त्यांत कापड भिजवून ठेवितात.
 तुरटी अदपाव, पाणी चार शेर, व हळद दीड तोळा, ही एकत्र करून त्यांत हरडा चढविलेलें कापड पिळून घेऊन एक तास बुडवून ठेवितात. नंतर त्यांत तें पुष्कळ वेळ मळून पुनः दोन तास तसेंच ठेवितात. मग काढून पिळून धुतल्यावांचून उन्हांत वाळवितात. व दोन दिवस तसेंच ठेवून नंतर पाण्यानें धुऊन पुन्हा सुकवितात.
 अर्धा रत्तल मंजिष्टेची पूड घेऊन तिजवर चार शेर कढत पाणी ओतितात व ती निवली म्हणजे त्यांत वर तयार केलेलें कापड बुडवितात. तें चोवीस तास पर्यंत तसेंच ठेवून तें मधून मधून कालवितात.
 पापडखार पावशेर घेऊन तो पांच शेर पाण्यांत कालवितात. मग तें पाणी स्वच्छ गाळून घेऊन त्यांत मंजिष्टेचे पाण्यांत असलेलें कापड घालून अर्धा तास बुडवून ठेवितात.
 मंजिष्टेची पूडं पाव रत्तल, पाणी चार शेर, हीं एकत्र करून त्यांत कापड टाकून दोन तास उकळवितात. कापडावर रंग चढलासा वाटला म्हणजे त्या भटी खालचा आग्नि विझवून तें तेथेंच निवूं देतात. मग तें कापड धुवून सुकवितात.
 तुरटी दीड तोळा, घेऊन ती सहा शेर पाण्यांत टाकितात, व त्या पाण्यांत रंगविलेलें कापड बुडवून कालवितात,

 एरंडेल तेल दीड तोळा एका भांड्यांत घेऊन त्याजवर दीड शेर कढत पाणी ओतून त्याचा एक जीव होईपर्यत कालवितात व तें आणखी उकळवितात. नंतर निववून तें दुसऱ्या भांड्यांत घेऊन त्यांत रंगविलेलें कापड बुडवितात.

 पावशेर बाभळीचा गोंद घेऊन तो पांच शेर पाण्यात भिजवून मग त्यांत आणखी एक शेर पाणी घालितात व त्यांत कापड बुडवून साफ पिळून वाळवून त्याजवर कुंदी करितात.  अशा रितीनें मुंबईत रंगविलेलें कापड हल्लीं या देशांत विकत नाहीं. ते आरबस्थानांत व ब्रह्म देशांत जातें.

सुरंगीचे रंग.

 सुरंगीचा तांबडा.-सुरंगीस गुजराथेंत 'आल ' असें ह्मणतात. सुरंगीचा रंग पक्का होतो परंतु तो मंजिष्टेच्या रंगापेक्षां फिका आहे, व तो चढविण्यास कपडा शिजवावा लागत नाहीं, थंड पाण्यांत चढतो.
 एरंडीचे तेल व पापडखाराचें पाणी एकत्र करून त्यांत एकरात्र कपडा भिजत ठेवावा. दुसरे दिवशीं काढून न पिळतां किंवा न धुतां सात तास उन्हांत टाकावा. नंतर त्यावर पाणी शिंपडून लांकडाच्या दांडूनें ठोकावा. नंतर एकरात्र तसाच ठेऊन दुसरे दिवशीं पुनः उन्हांत ओपवावा. हीच कृति आठ दिवसर्यंत करावी. नवव्या दिवशीं कापड धुवून सुकवावें ह्मणजे ते रेशमासारखें मऊ होतें.
 सुरंगीची पूड करावी.-व ती मातीच्या कुंडींत टाकून तिजवर पाणी ओतावें. सिंधी तुरटी घेऊन पाण्यांत उकलावी व तें पाणीं कुंडीत असलेल्या सुरंगीच्या पाण्यांत ओतावें, आणि त्यांत कापड घालून पुष्कळसें कालवून चोवीस तास तसेंच असूं द्यावें. हीच कृति चार दिवस करावी ह्मणजे कापडावर रंग चढतो. अखेरीस तें धुऊन सुकवावें.
 पावशेर पापडखार व दोनशेर पाणी एकत्र करून त्यांत कपडा बुडवून सुकवावा.
 सुरंगीचा तांबडा रंग दीव, खंबायत, सुरत, अमदाबाद आणि मुंबई या गांवीं करितात.
 याप्रमाणें रंगविलेले तांबडें कापड मंजिष्टेच्या सदराखालीं सांगितलेल्या काळ्या रंगांत बुडविलें ह्मणजे जांबळें होतें.
 सुरंगीचा रंग मुंबई शहरांत तयार करण्याची कृति वेगळी आहे ती खालीं लिहिल्याप्रमाणें.
 वर लिहिल्याप्रमाणें हरड्याच्या पाण्यांत तयार केलेलें दोन रत्तल कापड घ्यावें.
 तीन शेर पाण्यांत अर्धा रत्तल शेळीच्या लेंड्या कालवून तें पाणी गाळावें व त्यांत तें कापड तीन तास भिजवून ठेवावें. नंतर स्वच्छ पाण्यानें धुऊन सुकवावें.
 नवटांक फडकी, एक तोळा हळद, व चार शेर पाणी, एकत्र करून त्यांत तें कापड दोन तास भिजत ठेऊन मग पिळून धुतल्याशिवाय सुकवावें. कुणकाआल या नांवानें प्रसिद्ध असलेली एक सुरंगी मुंबईत मिळते. तिची पूड एक रत्तल व पाणी चार शेर हीं एकत्र करून त्यांत कापड घालून तें तीन तासपर्यंत उकळवावें. मग तें पाणी निघालें ह्मणजे तें कापड धुवून सुकवावें.

 नंतर दुसऱ्या दिवशीं अर्धा रत्तल बाभळीचा गोंद व चार शेर पाणी एकत्र करून त्यांत तें कापड बुडवून सुकवावें व त्याजवर कुंदी करावी. हें कापड बहुतकरून ब्रह्मदेशांत जातें.

काळारंग.

 सिंध, कच्छ, आणि काठ्यावाड या प्रांतीं खनिज पदार्थापासून काळारंग होतो त्याचें वर्णन करणें अवश्य आहे.
 कायोनो काळोरंग-कावेचा काळा रंग, या रंगांत गेरू सारखा तांबूसपणा मारतो, त्याची कच्छ देशांतील बायकांना फार आवड आहे; त्या या रंगाचें पातळ नेहमीं वापरतात; व लग्न कार्य आणि सुतकांतसुद्धां त्याचाच उपयोग करितात. रेशमी अथवा सुती या दोन्ही जातीच्या कपड्यांवर हा रंग चढवितां येतो. कायो (ह्मणजे काव) या नांवाची एका प्रकारची माती कच्छ प्रांतीं फटकीच्या खाणी आहेत त्यांत सांपडते, तिचा रंग पिवळट असतो परंतु ती भाजली ह्मणजे तोच तांबडा होतो; ह्या मातींतच सुवर्णमुखी सांपडतो, तिच्यामुळें तीं कच्या हिराकसाची ( Sesquisulphate of Iron ), भेळ असतें. मागें सांगितलेले हर्डा चढविलेलें कापड घेऊन जाळळेल्या कावीच्या पाण्यांत बुडविलें ह्मणजे ते लागलेच काळें होतें. या प्रमाणें रंग दिल्यावर कापड धुवून वाळवितात. कच्छी बायकांच्या अशा प्रकारें रंगविलेल्या पातळांस कच्छी भाषेंत 'साडला' किंवा 'चोरासा' ह्मणतात.
 मस्यो काळो रंग--ह्मणजे मसी सारखा काळा रंग, हा रंग लोखंडासारखा दिसतो. हाही कच्छ प्रांतीं होतो. हा तयार करण्याची रीती अशी आहे, लोखंडाच्या कढईत खिळे व पाणी घालून उकळवितात; व तें पाणी तीन दिवस तसेंच ठेवून नंतर गाळून त्यांत फटकी व मोरचूत घालतात. या तयार केलेल्या पाण्यांत हर्डा चढविलेलें कापड बुडविलें ह्मणजे तें काळेंभोर होतें.

गुळीचे रंग.

 मुंबई जवळ दादरास गुळीचा रंग पुष्कळ होतो. रंगारी लोक रंग पिंपांत तयार करितात. त्यांजवळ पिंपें दोन प्रकारचीं असतात. एक 'खारापिंप' आणि एक 'मिठापिंप'. खाऱ्या पिंपामध्ये सुती कापड रंगवितात, व मिठा (गोड्या) पिंपामध्यें रेशमी कपडे रंगवितात.

 'खारापिंप'--पन्नास हंडे पाणी माईल इतकें एक पिंप घेऊन त्यांत पंधरा हंडे पाणी, चारशेर साजीखार, व दोनशेर चुना टाकितात. नंतर हे दोन्ही पदार्थ ढवळून ढवळून खूप कालवितात. संध्याकाळीं अडीच शेर गुळी घेऊन पाण्यांत भिजत ठेवतात. दुसऱ्या दिवशीं सकाळीं ही भिजलेली गुळी घेऊन, चारफूट चौरस व चार इंच खोल अशी एक दगडाची टांकी असते तींत घालून, हातानें खूप मळतात. पाण्यांत मळून तयार केलेली गुळी वर सांगितलेल्या पिंपांत मग नेऊन ओततात. आणि आंत पुन्हां ढवळतात. पिंपांतील पाणी या पुढें दिवसांतून दोन तीन वेळ ढवळावें लागतें, आणि दर खेपेस तें सुमारे एक एक तास ढवळीत बसावें लागतें. दुसऱ्या दिवशीं संध्याकाळीं पाण्यांत भिजवून दगडी टांकींत कालवून तयार केलेली आणखी अडीच शेर गुळी त्यामध्यें ओतितात. आणि पिंपांतील पाणी पुनः सपाटून ढवळतात. तिसऱ्या दिवशीं त्या पिंपांत एखाद्या जुन्या पिंपांतील एक हंडाभर गाळ ओतितात. या गाळास' भत्ता' असें नांव आहे, पूर्वीचा गाळ शिल्लक नसेल तर खालीं लिहिल्या प्रमाणें कृति करावी लागते. एक शेर चुना, एक शेर खजूर, आणि पांच शेर पाणी, हीं एकत्र करून पाण्याचा रंग पिंवळा होईपर्यंत उकळवावीं. इकडे पूर्वी पिंपांत घातलेला रंग पुष्कळसा ढवळावा, आणि त्यांत खजूराचें पाणी उकळत आहे तोंच ओतावें, व पिंप बंद करून टाकावें. शेवटीं पिंपावर झांकण टाकून तें बंद करून ठेवावें. दुसऱ्या दिवशी सकाळी पिंप* उघडून पाहावें तों आंतील पाणी अंब्याच्या रसाप्रमाणें पिंवळें दिसूं लागतें. अशा रीतीनें पिंपांतलें पाणी आंबलें ह्मणजे तें ढवळलें असतां त्याला दरदरून फेंस येतो. नवीनच पिंप तयार करावयास लागल्यापासून असा रंग सिद्ध होण्यास चार दिवस लागतात. पिंपांवर आलेला फेंस एकत्र करून त्याच्या गोळ्या करून सुकवून ठेवितात. कापड रंगवितांना त्याजवर कोठें एखाद्या ठिकाणी रंग न वठला, तर तेथें चोळण्यास हा फेंस उपयोगी पडतो.


* उत्तर हिंदुस्थनांत उष्णतेचें मान कमी आहे, त्यामुळें मुख्यत्वें थंडीच्या दिवसांत पिंपांतील रंग लवकर आंबावा ह्मणून त्याच्याजवळ त्यास शेक लागेल अशा बेतानें अग्नि पेटवावा लागतो, व रंग तयार झाल्यावरही त्यास ऊन करावा लागतो. रंगाची भट्टी बरोबर उतरली कीं नाहीं, हें पिंपावर आलेल्या फेंसावरून रंगारी लोकांस सांगतां येतें. फेंसाचा रंग तांबूस असला ह्मणजे तो चांगला उतरला असें समजावें. फेंस पांढरा दिसूं लागला ह्मणजे त्यांत आणखी दीड शेर साजीखार टाकावा लागतो. रंग हातानें कालवितांना हाताला झोबूं लागला, किंवा तो रक्ताप्रमाणें थिजूं लागला, अथवा तेला सारखा बुळबुळीत लागूं लागला, तर त्यांत सुमारें दोन शेर वजन चांगला खजूर टाकावा लागतो, याप्रमाणें पांचव्या दिवशीं गुळीचा रंग तयार होतो. पिंपांतील रंग संपू लागला ह्मणजे त्यांत पुनः चुना, साजीखार, व गुळी, घालतात; परंतु हे पदार्थ प्रथमारंभी ज्या मानानें घातले असतील त्याच्या निमेनेच घालावे लागतात.

 निळाभोर रंग करणें असेल तर सुती कापड एकरात्र पाण्यांत भिजत ठेवावें, व दुसऱ्या दिवशीं पिंपांत बुडवून अर्धा तासपर्यंत खालवर खूप कालवावें, आणि पिळून सुकत टाकावें, याप्रमाणें तीन दिवस हीच कृति करावी ह्मणजे चांगला रंग सिद्ध होतो.

 रंग फिकाच ठेवणें असेल तर कापड एकदां भिजवून सुकवावें ह्मणजे झाले.
 गुळींत रंगविलेले कपडे बहुतकरून मुसलमान लोक वापरतात, व ते अरबस्तान, इराण, व अफ्रिका या तीन ठिकाणीं पुष्कळ निर्गत होतात.

रेशमी कापड रंगवण्याकरितां "मिठापीप" करण्याची रीति.

 पिपांत बारा हांडे स्वच्छ पाणी ओतावें, त्यांत दोनशेर साजिखार टाकावा, व तें तीन दिवस तसेंच ठेवावे. चवथ्या दिवशीं त्यांत अडीचशेर बंगाली किंवा मद्रासी नीळ टाकावी. नंतर दोनशेर साजीखार व एकशेर चुना आंत टाकून पिपांतल्या सर्व जिनसा एकत्र कालवाव्या; चवथ्या दिवशीं दीडशेर पाणी घेऊन त्यांत दोनशेर चुना व दोनशेर गूळ कालवून तें पिंपांत ओतून ढवळावें. नंतर तीन दिवस पिंप मधून मधून ढवळीत असावें. ह्मणजे चवथ्या दिवशीं तें पाणी आंबतें त्यांतून 'फट' 'फट' असा आवाज निघूं लागतो, व त्याजवर फेंस येतो. फेंस पांढरा असला तर दीडशेर साजीखार व दीडशेर चुना त्यांत टाकावा आणि तो कालवून एक दिवस पिंप झांकून ठेवावें. फेंस तांबूस दिंसू लागला ह्मणजे त्यांत आणखी कांहीं टाकूं नये.  या पिंपांत चुना व गूळ हे दोन पदार्थ टाकतांना त्यांचें बसस्तान बरोबर बसण्याविषयीं पुष्कळ काळजी घेतली पाहिजे. या गोष्टीकडे दुर्लक्ष झालें कीं पिंपांतील रंग कुजून त्यास सडलेल्या मासळीसारखी घाण येऊं लागते, व तो फेंकून द्यावा लागतो,

रंग वैचित्र्य.

 एकाच कापडावर अनेक प्रकारचे रंग चढविण्याच्या दोन रीति आहेत. एक ठशानें छापावयाची व दुसरी बांधणीची.

 ' छापणी '--याचे तीन प्रकार आहेत.

( अ ) अनेक तऱ्हेचे रंग घेऊन ते ठशांच्या योगानें कापडावर उठवावयाचे.
( ब ) कापडावर चिकट पदार्थानें नक्षीचे ठसे उमटवून त्यांच्यावर सोनेरी किंवा रुपेरी वर्ख चिकटावयाचा.
( क ) खडी नामक एका प्रकारचें चिकट रंगारंगाचे लुकण करून त्याची नक्षी कापडावर वठवावयाची, किंवा नुसत्या पांढऱ्या खडीनें नक्षी छापवून त्याजवर अभ्रकाची पूड बसवावयाची. खडीच्या रंगाची कलमानें कापडावर नक्षी काढावयाची.

 बांधणी--नखानें कापडाचा बारीक भाग चिमटीनें धरून त्याजवर सूत गुंडाळून दशअवतारी गंजिफ्यांतील कृष्णाच्या असलेल्या वाटोळ्या वलयाकार बिंदूप्रमाणें, एक आकृति तयार करावयाची अशा वलयाकार बिंदूच्या मालिकांनी फुलें, वेल, वगैरे सोडवून कापड रंगांत बुडवावयाचें. अशा रीतीनें तयार केलेलें कापड रंगांत बुडविलें ह्मणजे त्यास जेथें जेथें दोरा बांधलेला असतो तेथें तेथें रंग चढत नाहीं इतर ठिकाणीं मात्र चढतो. त्यामुळें रंगविलेला कपडा सुकवून त्यास बांधलेले दोटे तोडून टाकिले ह्मणजे मोक्तिक मालाकृति नक्षी दिसूं लागते. अशा प्रकारानें होत असलेल्या कामास 'बांधणीचें' काम असें नांव आहे.

 छापणी--कापडावर रंगारंगाची नक्षी छापण्याकरितां सागाच्या लांकडाचे कोरून ठसे तयार करावे लागतात. लांकडाच्या एका चौकोनी उथळ कुंडींत धाबळीचे तीन चार तुकडे टाकून ते तयार केलेल्या रंगात चपचपीत भिजवितात. आपल्या पुढें एक पाट किंवा घडवंची ठेवून तिजवर सुती कापडाचे तीन चार तुकडे एकावर एक पसरितात आणि त्यांच्यावर आणखी एक धाबळी पसरितात, आणि मग रंगारी लोक आसनमांडी घालून घडवंची पुढ्यांत घेऊन सकाळपासून संध्याकाळपयेत एक सारखे कापड छापीत असतात.

 तांबडा रंग छापणें असेल तर मंजिष्टाच्या रंगाचे वर्णन करतांना मागें वर्णन केलेलें फटकें व लोध्रें यांचें पाणी घेऊन, त्यांत बाभळीचा गोंद घालून, घट्ट काला तयार करितात. यास गुजराथेंत 'रस' असें नांव आहे. हा 'रस' लाकडाच्या उथळ कुंडींत टाकून त्याजवर धाबळीचे तुकडे ठेवून ते भिजले ह्मणजे त्याजवर नक्षीचा ठोकळा एकदोन वेळ चेपलासें करून, त्यानें पूर्वी हारडा चढविलेलें कापड घडवंचीवर ठेवून छापतात. अशा रीतीनें छापलेलें कापड सुकलें ह्मणजे तें धुवून, मागें वर्णन केलेल्या मंजिष्टाच्या रंगांत घालून उकळवितात. ज्या ज्या ठिकाणीं तुरटी व लोध्र यांचे पाणी लागलेलें असतें त्या त्या ठिकाणीं मात्र पांढरा रंग चढतो, व कापडाचा इतर भाग पांढरा रहातो, या प्रमाणें तीन चार रंगांची नक्षी छापून कापड सुशोभीत करितां येतें, परंतु ही नक्षी अगदीं ओबड धोबड असल्यामुळें तिचें विलायती छिटांपुढें तेज पडेनासें झालें आहे व उंच प्रतीच्या लोकांत गांवठी पासोडे, जाजम, रजया, वगैरे पदार्थ अगदीं नापसंत होत चालले आहेत. गुजराथेंतील कुणबी वगैरे गरीब लोकांच्या बायका असलीं स्वदेशी रंगी बेरंगी पातळें वापरतात. यांतील तांबडा व काळा हे रंग मात्र अगदीं पक्के असतात. हिरवा, पिंवळा, केशरी, इत्यादि रंग टिकत नाहींत.

 पश्चिम हिंदुस्थानांत असलें काम सिंध प्रांतीं फार चांगलें होतें. पलंगपोस, साड्या, रजयांचे पासोडे, इत्यादि पदार्थ गुजराथेंतही तयार होतात. मुंबईतील पाताणे प्रभु, पांचकळशी, सुतार, पारशी, व वाणी याच्यांत अझून सुद्धां ठशानें छापलेली पागोटीं कोठें कोठें वापरितात. परंतु तें पागोटें मुंबई इलाख्यांत होत नाहीं, ही गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे. ती मच्छलीपट्टणाहून येतात व त्यांस मुंबईत 'बंदरी पागोटीं ' असें नांव आहे.

 मुंबई शहरांत चिटें छापण्याची ठिकाणें आहेत त्यांत मिळविलेली माहिती खालीं दिली आहे.  पिंवळ्या जमिनीवर तांबडी चौकट--कोरें कापड एक रात्र पाण्यांत भिजत ठेवून दुसऱ्या दिवशीं सकाळीं धुवून टाकावें. नंतर हरडया पूड घेऊन ती थंड पाण्यांत कालवून, त्यांत कापड बुडवून, पिळून, सुकवावें. या प्रमाणें हरडी चढविलेल्या कापडावर फटकीच्या पाण्यात भिजविलेल्या गोंदाच्या घट्ट पाण्यानें छाप उठवावे. व कापड सुखवून थंड पाण्यानें धुवून पुनः सुखवावें.

 अडतीस वार लांबीचा एक तागा छापण्यास पांच शेर मंजिष्टाची पूड व तीन शेर धायटीच्या फुलाची पूड, एक हंडाभर पाण्यांत टाकून पाणी पुष्कळ उकळवावें. त्यास कढ येत असतांना त्यांत छापलेलें कापड टाकून उकळवावें ह्मणजे छापलेल्या ठिकाणीं फिक्का ताबूस रंग वठतो. (हा रंग पुढें जास्ती तांबड़ा होणार आहे) कापड भट्टींतून काढून धुवून सुखवावें. यापुढें त्याजवर पिंवळी भुई करावयाची असते त्या करितां दोन शेर "कोचा* हळदीची " पूड, पाणी एकशें वीसशेर, व चुना बारा तोळें हीं एकत्र करून त्यांत तें कापड बुडवून पुष्कळ कालवावें. नंतर पिळून पुन्हां बुडवावें, व तें आंतल्या आंत पायानें मळून पुष्कळ तुडवावें. नंतर पिळून त्यास लागलेली हळद बिळद झटकून टाकावी. आणि दाहा तोंडळे फटकी व ऐंशी शेर पाणी घेऊन त्यांत तें कापड बुडवावें. ह्मणजे पूर्वी छापलेल्या फिकट दिसत असलेल्या तांबूस नक्षी लाल भडक होतें. अखेरीस कापड धुवून त्यास खळ देऊन त्याजवर कुंदी करावी. अशा रीतीनें पिंवळ्या जमिनीवर तांबडया रंगाचे छाप उठविलेल्या कापडास गुजराथेंत "पीलातास" ह्मणतात.

 हिरव्या जमिनीवर पिंवळी आणि तांबडी नक्षी--हरडा चढविलेलें कापड फटकीच्या पाण्यांत घातलेल्या गोंदानें छापून धुवावें; व सुरंगीच्या रंगांत नेहमीं प्रमाणें उकळून काढावें आणि पिळून टाकून धुतल्या शिवाय तसेंच वाळवावें. नंतर उठलेल्या तांबड्या नक्षीवर व इतर कांहीं जाग्यावर चुना गोद आणि पाणी ह्याच्या *मिश्रणानें पुनः छापावें. लवकर सुखण्याकरितां त्याजवर लाकडाचा भुसा टाकावा. म्हणजे तांबड्या रंगाचे रक्षण होतें. व पिंवळ्या रंगास जागा राहते. कापड सुखलें ह्मणजे गुळीच्या पिंपांत बुडवू-


 * 'कोचा' हळद या नांवानें गुजराथी लोकांत प्रसिद्ध असलेला हळदीचाच एक प्रकार आहे. तिचा रंग साध्या हळदीच्या रंगापेक्षां जास्ति टिकाऊ आहे, व तो साध्या हळदीच्या रंगाप्रमाणें लवकर बिघडतहीं नाहीं. ह्मणून कोचा हळद थोडी माहाग आहे तरी गुजराथी लोक रंगांत तीच वापरतात. न त्यास फिक्का निळा रंग द्यावा. यानंतर तेंच कापड पाण्यांत दोन तास भिजत टाकून त्याजवरील लांकडाचा भुसा व गोंदाचें पाणी धुवून टाकावें. नंतर तें पुनः पुनः धुवून साफ करावें. दुसरीकडे 'कोचा' हळद अडीचशेर व चुना तीनशेर, घेऊन १२० ग्यालन थंडपाण्यांत ' मिसळावा' व त्यांत सदरील कापडाचा पिळा बुडवून हातानें कालवावा. कापड बाहेर काढून तसें दुसरें पिंवळें पाणी तयार करून त्यांत भिजत ठेवावें. ह्मणजे कापडावरील निळा रंग हिरवा होतो. गोंदाने छापून धुवून काढलेल्या पांढऱ्या जाग्यावर पिवळा रंग वठतो. अखेरीस कापड फटकीच्या पाण्यात बुडवावें. ह्मणजे त्यांतील पिवळा व तांबडा रंग जास्ती खुलूं लागतो, व पक्का होतो.

 अखेरीस कापड धुवून पिळून ओलें आहे तोंच त्याजवर गोंदाचें पाणी चढवून सुखवून त्याजवर कुंदी करावी. असल्या कापडास गुजराथेंत 'बंगाला ' म्हणतात.

 'कायो' रंगावर तांबडी नक्षी--कच्छी लोकांच्या बायकांची बहुतकरून लुगडीं अशीच असतात. सुरंगीचा रंग देतांना हरडा चढविण्यास पहिल्यापासून जी कृति करावी लागते त्याच कृतीनें कापडावर हरडा चढवून एक भाग मेण, व दोन भाग खिखणेल एकत्र वितळववून त्यानें कापड छापतात व त्याजवर मागें वर्णन केल्याप्रमाणें काळा रंग देऊन मेण व खिखणेल काढून टाकण्याकरितां पाण्यात उकळवावें; आणि मग तेंच कापड खटकीं व लोध्र यांच्या पाण्यात बुडवून सुखवून मंजिष्टाच्या किंवा सुरंगीं रंगाच्या भट्टींत उकळवून काढावें.

बांधणी काम.

 हें काम दुरून छापाच्या कामासारखें दिसतें. गुजराथ, कच्छ, सिंध, काठ्यावाड, आणि मुंबई इतक्या ठिकाणीं असलें काम करितात. बांधणीनें रंगविलेलें कपडे गुजराथी व पारशी स्त्रिया वापरतात. सुती व रेशमी या दोन्ही प्रकारच्या कापडांत बांधणीकाम करण्याची वहिवाट आहे. बांधणीकामांत मागें सांगितल्याप्रमाणें कधीं बारीक वलयाकार ठिपक्याच्याओळीनें काढलेली नक्षी असते व कधी मोहरी पासून तों अधेलीपर्यत आकाराचे नुसते ठिपके असतात. मो-


* बाभळीचा गोंद एक भार, चुना एकमण आणि पाणी अडीच मण, एवढ्याचें मिश्रण " लांग क्लाथच्या " वीस ताग्यांस पुरतें. ठाल्या ठिपक्यांस कधीं कधीं थोडा रंग मधून मधून लागलेला असतो. आणि त्यांच्या मध्यभागीं एक काळा बिंदु असतो. बांधणीनें रंगविलेल्या कापडासारखें विलायती यंत्रावर छापलेलें कापड बाजारांत पुष्कळ मिळतें.

 कापडास रंगविण्यापूर्वी गांठी मारणारांस 'बंधारा' ह्मणतात. व तें रंगवणारास गुजराथेंत 'रंगरेज' झणतात.

 यावरून बांधणीच्या कामाचे दोन भाग आहेत, हें वाचकांच्या लक्षात आलेंच असेल.

  १ गांठी मारणें ह्मणजे बांधणी.  २ रंगविणें

 बांधणी--गांठी पांढऱ्या किंवा पूर्वी रंगविलेल्या कापडास मारितात. कपड्यावर पहिल्यानें गेरुवे पाणी एकत्र करून त्यानें आडव्या उभ्या रेघा छापून लहान मोठ्या चौकटी वठवतात. गाठी मारणारास उजव्या हाताच्या आंगठ्याची व तर्जनीचीं नखें वाढवावीं लागतात; व डाव्या हाताचा आंगठा, तर्जनी, व मध्यमा या तीन बोटाची नखें वाढवावी लागतात. नक्षी बारीक किंवा मोठी काढणें असेल त्या मानानें बारीक किंवा जाड्या सुताची त्यास गरज लागते. ज्याठिकाणीं ठिपका काढणें असेल त्याठिकाणीं कापडास डाव्या हाताच्या मधल्या बोटाच्या वाढविलेल्या नखानें खोबळी करून ती त्याच हाताच्या आंगठ्याच्या व तर्जनीच्या नखानें पकडून तिजवर उजव्या हाताच्या आंगठ्याच्या नखांत पकडलेल्या धाग्यानें एकावर एक पुष्कळ वेढे घेऊन बांधावे. याप्रमाणें तीन फूट चौरस कपड्यास साधारण गांठी मारणें आहे तर बारा तास लागतात. त्याच बारीक गाठी मारणें आहे तर बारा तासांत फक्त एक फूट चौरस काम होते. एका 'बंधारास ' एका दिवसांत सुमारें चार आणे मजुरी पडते. मोठ्या कपड्यावर काम करणे असेल तर तो दुमडून ह्मणजे दुहेरी करून त्यास गांठी मारतो. त्यामुळें निमे मेहेनत वांचते. सहा वार लांब व सवावार रुंद बांधणीचें काम केलेल्या रेशमी सडीस १०० रुपये किंमत पडते.

 रंगविणे--गांठी मारून कापड तयार झालें ह्मणजे रंगाऱ्याकडे जातें. तें काळें करणें असेल तर रेशमी कापडास पहिल्यानें किरमिज दाण्याचा तांबडा रंग द्यावा लागतो. सुतानें बांधलेली जागा पांढरीच राहून पांढरे ठिपके दिसावे अशी असेल तर तें एकदाच रंगविलें तरी चालते. परंतु ठिपक्यांवर तांबूस रंगाचा छटा मारावा अशी इच्छा असेल तर बांधणीचें सूत भिजवून, त्यांतून रंग आंत शिरून, थोड थोडा कापडास लागावा या हेतूनें ते तीन वेळ बांधावें लागतें. ह्या पांढऱ्या किंवा तांबूस ठिपक्यांत गुजराथेत ' कांडा ' ह्मणतात. कापडास तांबडा रंग चढला ह्मणजे तें गुळीचे ' मिठापीप ' म्हणून मागें वर्णन केलें आहे त्यांत बुडवितात. त्यांतून काढल्यावर हर्ड्याच्या पाण्यांत बुडवितात, व अखेरीस गुळीचा काळा रंग करण्याची कृति सांगितली आहे त्यांत वर्णन केलेल्या हिराकसाच्या पाण्यात बुडवितात. आणि मग धुवून सुखवितात.

 गुळीच्या पाण्यात बुडविणें , हरड्याच्या पाण्यात बुडविणें व हिराकसाच्या पाण्यांत कापड बुडविणे हीं तिन्हीं कामें चार पांच तासाच्या आंत लवकर लवकर आटपावीं लागतात. नाहींतर सूत भिजवून त्यांतून काळा रंग आंत शिरूम कांड्यांचा ह्मणजे ठिपक्यांचा रंग बिघडवून टाकील अशी भीति असते. कापडावर काळा रंग चढला ह्मणजे गांठीचें सूत तोडून टाकितात.

 हेंच कापड प्रथमतः एकटाच तांबडा रंग दिल्यावर मुखवून त्याच्या गांठी तोडल्या तर त्याजवर तांबडया रंगाच्या जमिनीवर पांढऱ्या ठिपक्यांची नक्षी दिसते, परंतु त्याजवरच तीन वेळ तांबडा रंग चढवून नंतर काळा चढविला ह्मणजे काळ्या जमिनीवर तांबूस रंगाची नक्षी दिसूं लागते.

खडीची छापणी.

 पंढरपूर, पुणें, नाशिक व मुंबई या ठिकाणीं खडीचे खण छापतात. खडीच्या खणाप्रमाणें 'टेबल क्लाथ' व पडदे छापवून साहेब लोकांत विकण्याची सुरुवात झाली होती, परंतु आलीकडे याही धंद्यांत कांहीं अर्थ राहिला नाहीं. हल्लीं घाटावरील गरीब लोकांच्या बायकांकरितां खडीचे खण छापून तयार होत असतात.

 खडी ह्मणून एका प्रकारची माती बेदर शहराजवळ मिळते. तिचा हें काम करण्यांत उपयोग होतो असा लोकांचा खोटा समज पडल्यामुळें त्यास 'खडीची' छापणी असें नांव पडलें आहे. परंतु पट्टी खडीशिवाय तयार होते. हे खालीं दिलेल्या माहितीवरून लक्षात येईल.

 पट्टी तयार करण्यास जवसाचें तेल व राळ एका ठिकाणीं शिजवून तयार केलेल्या रोगणांत सफेता कालवावा लागतो. हें रोगण तयार करूनच ठेविलेलें असतें. पुढें जसें जसें काम लागेल तशी तशी सफेत्याची पूड घेऊन त्यांत कालवितात व पांच दिवस झाकून ठेवितात. सहावे दिवशीं पट्टी उपयोगास लावतात, छापतांना पितळेचा ठसा घेऊन त्यांत तीं धालून कापडावर तिची नक्षी उठवितात. हा ठसा सुमारें एक इंच लांब व अर्धा इंच घेराचा असतो. त्याच्या खालच्या बाजूस पत्रा बसवून त्यांत नक्षी आरपार खोदलेली असते. ठशांत पट्टी (खडी ) घालून पिचकारीच्या दांडी प्रमाणें लांकडाच्या दांडीनें चेपली ह्मणजे, ती कापडावर पडून तिचा छाप वठतो. डाव्या हातांत कापड घेऊन, जेथें छाप मारावयाचा त्या जागेच्या खालीं मधलें बोट धरून, त्याच्या शेवटल्या पेराच्या आतल्या मऊ भागावर कपडा धरून, त्याजवर ठसा ठेवून, त्यातील दांडी चेपून, व फूल वठविणें इतकी क्रिया हे कारागीर लोक जलद व इतक्या चपळाईनें करतात कीं, त्यांजकडे पाहिलें असतां,

 " भात्यांतून बाण काढतो केव्हां, धनुष्यावर ठेवतो केव्हां, गुणाशी जोडतो केव्हां, ओढतो केव्हां, आणि सोडतो केव्हां, हें कोणाच्याही समजुतींत येऊं दिलें नाहीं."

 या वाक्याचें स्मरण होते.

 खडीची नक्षी कापडावर छापली म्हणजे ओली आहे तोंच त्याजवर अभ्रकाची वस्त्रगाळ पूड टाकून, ती कमजास्त लागली असेल तर झटकून कपडा सुखत टाकितात. अभ्रकाच्या बदला कधीं कधीं सोनेरी वर्ख चिकटवितात.

 खडीचें काम करण्यास लागणारी अभ्रकाची पूड तयार करण्याची कृति खालीं लिहिली आहे:--

 अभ्रकाचे पहिल्यानें बारीक बारीक तुकडे करितात, व ते कापडाच्या पिशवींत घालून त्यांत भात [साळी ] मिसळतात, आणि पिशवी हातांत गच्च धरून एका भांडयांत पाणी घेऊन त्यांत बुडवून डाव्या हाताच्या तळव्यावर धरून खूप कुसकरतात. साळीच्या कठीण कवचाचें व अभ्रकाच्या तुकड्यांचें घर्षण झालें ह्मणजे अभ्रकाचा चुराडा होतो, आणि तो पाण्यांत मिसळून कपडयांतून गळून भांड्यांत पडतो. मग त्यास पुनः पुनः धुवून स्वच्छ करून सुखवून ठेवितात.

 मोरवी, व अमदाबाद या गांवीं कलमानें खडीची नक्षी कापडावर काढण्याची चाल आहे. त्यांत ठशाची जरूर लागत नाहीं.
सोनेरी किंवा रूपेरी वर्खाचें छाप.

 कापडावर 'सरस, साखर, व सफेता' हीं एकत्र करून तयार केलेल्या लुकणानें ठसे छापून त्याजवर तें ओलें आहे तोंच वर्ख चिकटवितात. असलें काम अमदाबादेस होतें.

रेशमी कापडावर रंग देणें.

 रेशमावर सिंधी लोक फार चांगला रंग देतात, तसाच कांहीं हिंदु लोक व ठाणें येथील किरिस्तांव लोकही उत्तम रंग देतात. कांहीं मुसलमान 'रंगरेज' रेशीम रंगविण्याचें काम करितात परंतु तें त्यांस चांगले साधत नाहीं.

 रेशमावर मुख्यत्वें खालीं लिहिलेले रंग चांगलें चढवितां येतात.

 १ पांढरा सफेत.

 २ किरमिजी तांबडा व तांबड्याचे दुसरे प्रकार.

 ३ हिरवा (अ) कच्चा.(ब) पक्का.

 ४ पिंवळा (अ) नुसता पिंवळा.(ब) नारिंगी किंवा केशरी.

 ५ काळा (अ) 'मसीयो' काळा ( काळा भोर.) (ब) गळालीनो काळो (गुळीचा काळा रंग )

 पांढरा रंगपापडखाराचें व गांवठी साबूचें पाणी उकळवून त्यांत रेशमी कपडा बुडवून उकळवितात. त्यास आंच किती लावावयाची हें अनुभविक रंगाऱ्यांस समजतें. परंतु ती जास्ती झाली तर रेशीम खराब होते. रेशीम उकळवून तयार झालें म्हणजे धुवून सुकवितात. व त्यास गंधकाची धुरी देतात.

 तांबडा रंगसाजीखार व कळीचा चुना हीं एकत्र करून पाण्यात घालून उकळवावीं व तें पाणी घेऊन त्यांत रेशीम घालून उकळवावें. नंतर धुऊन फटकी घालून उकळविलेल्या निवालेल्या पाण्यांत तें एक रात्र बुडवून ठेवावें. दुसऱ्या दिवशीं सकाळीं 'किरमिजदाणा' व 'बूजगंज' ह्या दोन पदार्थांची पूड पाण्यांत घालून उकळवावीं, व त्यांतच फटकीच्या पाण्यांतून काढलेलें रेशीम ओलें असतांनाच बुडवून उकळवावें. रंग चांगला तयार होण्याकरितां खालवर कालकावें. पाहिजे तितका रंग चढला ह्मणजे भांडें खालीं उतरून निवत ठेवावे. पाणी निवाल्यावर त्यांतील रेशीम काढून पुष्कळ वेळ धुऊन सुकवावें, व त्या
   २५ जवरील रंग काळसर दिसूं लागला, तर लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करून त्यांत बुडवून धुऊन पुनः सुकवावें.
 नारिंगी अथवा केशरीहा रंग तांबड्या रंगाप्रमाणेंच करावयाचा परंतु त्यांत हळदीची पूड टाकावी लागते. तीच 'कोचा' हळद घेतली तर रंग विशेष चांगला वठतो. हळदीच्या किंवा 'कोचा' हळदीच्या पाण्यांत रेशीम बुडविलें ह्मणजे पिवळें होतें परंतु तो रंग टिकत नाहीं.
 हिरवातांबडा रंग देण्याकरितां पापडखाराचें व साबूचें पाणी तयार करितात. तसेंच तयार करून त्यांत रेशीम उकलवून निळीच्या 'मिठा' पिंपांत बुडवावें. व नंतर हळदीच्या काढ्यांत बुडवून पुष्कळ कालवावें. आणि अखेरीस लिंबाचा रस घातलेल्या पाण्यात भिजवून धुऊन सुकवावें.
 पिंवळापक्का पिंवळा रंग 'इस्पारक' नावाच्या एका झाडाच्या काड्यांपासून होतो. कच्चें रेशीम पापडखाराच्या व साबूच्या पाण्यात उकळवून, फटकीच्या पाण्यांत एक रात्र भिजत ठेवून, धुऊन काढावें. 'इस्पारका' च्या काड्यांचा काढा करून त्यांत थोडा पापडखार टाकून, तें पाणी कढत आहे तोच गाळावें. या पाण्यांत फटकीचें पाणी चढविलेलें रेशीम बुडवावें व खालवर कालवावें ह्मणजे त्याजवर पिंवळा भडक लिंबासारखा रंग चढतो. हा रंग विटत नाहीं. पक्का हिरवा रंग करणें असल्यास हेंच पिवळें कापड गुळीच्या 'मिठा ' पिंपांत बुडवून काढावें व धुतल्याशिवाय वाळवावें.
 नारिंगी अथवा केशरी रंगहा रंग कपिल्याचा होतो. अर्धा शेर साजीखार व पावशेर कळीचा चुना हीं पाण्यात उकळवून त्यांत रेशीम शिजवावें, नंतर पिळून धुतल्याशिवाय ठेवावें. दुसरीकडे चवदा तोळे कपिल्याची पूड व तीन तोळे फटकी, एकत्र करून एका भांडयांत ठेवावी. तिसरीकडे पाण्यांत पापडखार टाकून उकळवावा, व तो कढत आहे तोच त्या पुडीवर ओतून पुष्कळ कालवावें ह्मणजे त्यास दरदरून फेंस येतो. बराच फेंस आल्यावर, वर पिळून ठेवलेलें ओलें रेशीम त्यांत चार तास भिजत ठेवावें नंतर काढून धुवावें.
 'मसीयो' काळारेशमावर काळा भोर रंग देणें असेल तर तें पहिल्यानें गुळीच्या 'मिठा ' पिंपांत बुडवून काढावें. नंतर हरड्याच्या काढ्याचीं त्याजवर तीन चार पुटें द्यावीं. दुसरीकडे बाजरीची आंबील अथवा मेथ्या उकळवून तयार केलेलें पेजेचें पाणी एका भांडयांत घालून आंबत ठेवावें. व ते कुजून त्यास घाण येऊं लागली ह्मणजे त्यांत बीड टाकावा. हें बिडाचें पाणी तयार करून ठेवलेलेंच असतें त्यांत हरड्याच्या पाण्याची पुटें दिलेलें रेशीम बुडविलें ह्मणजे लागलेंच काळेंभोर होतें. मग तें धुवून सुकवावें.

 भुरकट काळापापडखाराच्या व साबूच्या पाण्यांत शिजविलेलें रेशीम हरड्याच्या काढयांत बुडवून हिराकसाच्या पाण्यांत एक रात्र ठेवावें. दूसऱ्या दिवशीं सकाळीं पिळून त्याजवर खोबरेल तेल शिंपडून खुप चोळावें. नंतर हिराकसाच्या पाण्यात घालून पुनः उकळवावें व त्याच पाण्यांत निवूं द्यावें. नंतर काढून धुवावें.

 'गलीमो 'काळोवर किरमिज दाण्यांचा व तांबडा रंग सांगितला आहे, तसा रंग देऊन रेशीम तयार झालें म्हणजे ओलें आहे तोंच गळीच्या पिंपांत बुडवावें ह्मणजे जांभळें होतें. या जांभळ्या रंगाचा काळा रंग करणें असेल तर तें धुवून त्यास हरड्याच्या पाण्याचें एक पूट द्यावें. व हिराकसाच्या पाण्यांत बुडवून काढावें. आणि धुतल्यावर फटकीच्या पाण्यात बुडवून धुवून सुखवावें.

 निळा रंगपापडखाराच्या व साबूच्या पाण्यांत शिजवलेलें व फटकीच्या पाण्यात भिजविलेलें रेशमी कापड गुळीच्या पिंपांत बुडवावें व धुतल्या शिवाय सुखवावें.

 लाखेचा तांबडा रंगसुमारें साठ सत्तर वर्षांपूर्वी रेशमावर तांबडा रंग देण्याकडे लाखेचा पुष्कळ उपयोग होत असे. कारण त्यावेळीं एक रत्तल किरमिज दाण्यांची किंमत चाळीस रुपये होती, हल्लीं तो रुपया दीडरुपया रत्तल मिळतो, किरमिज दाणा असा स्वस्ता मिळूं लागल्यामुळें, व त्याजपासून रंगही चांगला तयार होत असल्यामुळें, लोकांस 'लाक्षारसाचा' विसर पडला. व हल्लीं तर लाखेचा रंग देण्याची कृति सुद्धां बहुतेक रंगाऱ्यांस माहीत नाहीं; कारण त्यांचे आजे पणजे हा रंग टाकून देऊन किरमिज (Cochineal ) कीटकाचा रंगांत उपयोग करूं लागले, व त्यांनीं आपल्या मुलांबाळांस लाखेच्या रंगाची कृति शिकविली नाहीं.

 लाक्षारस तयार करण्यास पावणे दोन रत्तल कच्ची लाख व पांच तोळे 'फुलियोखार' एकत्र करून ती भिजे इतकें पाणी तिजवर ओतून झांकून ठेवावी. दुसऱ्या दिवशीं सकाळीं आंतील लाख पाण्यानें खूप कुसकरावी. ह्मणजे तिचा रंग पाण्यांत निघून येतो. हें पाणी फडक्यानें गाळून घेऊन त्यांत लोध्राची पुड टाकून उकळवावें. उकळवितांना वरती फेंस येतो तो काढून टाकावा, व त्यांत आंबोशीचा काढा टाकावा, व नंतर रेशीम आंत टाकून उकळवावें. जितका रंग लालीवर आणणें असेल तितकें आंबोशीचे पाणी आंत टाकावें. हवा तितका रंग चढल्यावर रेशमासुद्धां भांडें खालीं उतरून निवूं द्यावें, व नंतर काढून धुवून सुखवावें.

 पतंगाचा तांबडा रंगहिंदुस्थानीभाषेंत एका दोहोऱ्यांत ह्मटलें आहे "रंग तो पतंग रंग कलही उडजावेगा आणि अशीच ह्या रंगाची स्थिति आहे, तथापि तो तयार करणें असेल तर पापडखाराच्या, साबूच्या, व फटकीच्या पाण्यांत मागें सांगितल्याप्रमाणें बुडविलेलें रेशीम पतंगांच्या लाकडाच्या गाळलेल्या काढ्यांत उकळवून पिळून धुवून सुखवावें.

लोंकरी वरील रंग.

 मुंबईत कांहीं रफुगार लोक लोंकरीवर रंग देतात. परंतु लोंकरीचीं वस्त्रें मुंबई इलाख्यांत फारशी होत नसल्यामुळें लोकरीवर रंग देणारे स्वतंत्र रंगारी लोक पश्चिम हिंदुस्थानांत नाहींत.

 किरमिजी दाण्याचा तांबडा रंगसाबू, पापडखार व चुना या तिहींच्या पाण्यांत लोंकरीचा कपडा भिजत ठेवितात. चुना आणि पापडखार एकत्र करून तो पाण्यांत पुष्कळ वेळ उकळवून त्याजवरील निवळी काढून घेतात, व तींत साबू कालवितात. या पाण्यांत एक रात्र भिजल्यावर लोंकर धुवून सुखवितात. नंतर एक रात्र फटकाीच्या पाण्यांत भिजत ठेवितात. दुसरीकडे नवसागर, फटकी, व सोमल, हीं एका काचेच्या वक यंत्रांत (रिटार्ट) घालून त्यास आंच देऊन त्याच्या वाफेपासून निघणारें दारू प्रमाणें पाणी पुन्हा तयार करून ठेवितात. त्या पाण्यांस तेजाब असें नांव आहे. व त्यांत हैड्रोक्लोरिक आसिड व सोमल यांचें मिश्रण असतें. एका भांड्यांत पाणी घालून त्यांत थोडें तेजाब ओतून त्यांत किरमिजी दाण्याची पूड टाकून तें उकळवितात; व त्यास कढ येत आहे तोंच फटकीच्या पाण्यात बुडावलेला कपडा आंत टाकून लवकर लवकर उलटा सुलटा करून तीन मिनिटांच्या आंत काढून घेतात, व धुवून सुखवितात. हा तांबडा रंग पक्का होतो.

 बैंगणी रंगसाबू, पापडखार व चुना यांच्या वर सांगितलेल्या पाण्यांत कपडा भिजत ठेवून धुवून सुखवून पुन: फटकीच्या पाण्यात भिजत ठेवून त्याजवर पहिल्यानें गुळीचा रंग देतात. मग वर लिहिल्याप्रमाणें तांबडा रंग देतात. हाही रंग पक्काच होतो.

 गुलाबीवर प्रमाणें फटकीचें पाणी चढविल्यावर किरमिज दाण्याचा रंग देतात, परंतु त्यांत किरमिज दाणा फार थोडा असतो.

 गुल-इ-अनार( गुलानार ) यांत तांबड्या रंगाप्रमाणेंच सर्व व्यवस्था करावी लागते, मात्र थोडी हळदीची पूड टाकिली ह्मणजे झालें.

 बसंती रंग फटकीचें पाणी देऊन तयार केलेलें कापड इस्पारक, हळद, व डाळिंबाची साल हीं पाण्यांत एकत्र उकळवून त्यांत कपडा बुडवून खालवर पुष्कळ कालवितात.

 पोपटी रंगकापड नुसत्या पाण्यांत भिजवून फटकीच्या पाण्यांत बुडवितात. नंतर इस्पारक आणि हळद या दोहींच्या गरम काढयांत बुडवितात व अखेरीस 'मुरब्बा ' नांवाचा एक पदार्थ अयता बाजारांत विकत मिळतोच तो पाण्यांत टाकून त्यास आंच देऊन कढ आला ह्मणजे त्यांत कापड बुडवून काढितात.

 गुळी, 'सलफ्युरिक' आसिडांत टाकली ह्मणजे त्यापासून 'मुरब्बा ' होतो. हा मुंबईस तयार करितात. तरी काश्मिर देशांतून तयार होऊन आला ह्मणजे त्यास मोल जास्त येतें.

 गहेरा हारा (हिरवा)हा रंग वरच्या रंगाप्रमाणेंच देतात, पाण्यांत 'मुरब्बा' जास्ती घातला ह्मणजे झालें.

 खाकीकपडा पाण्यांत भिजवून हरड्याच्या उकळत काढयांत बुडवून काढितात,नंतर हिराकसाच्या कढत पाण्यांत बुडवून काढून धुऊन सुकवितात.

 गहेरा खाकीहा रंग वरच्या रंगाप्रमाणेंच द्यावा लागतो. फरक इतकाच कीं हरड्याच्या व हिराकसाच्या पाण्यांत कापड जास्ती वेळ ठेवावें लागतें.

हस्तिदंत रंगविणें.

 सुरत व मुंबई या दोन गांवीं हस्तिदंतावर पारशी व हिंदुलोक रंग देतात.  तांबडालिंबाच्या रसांत थोडें मीठ टाकून, व त्यांत पाणी मिसळून त्यांत हस्तिदंत एक तासपर्यंत भिजत ठेवावा. नंतर आळीत्याचे पाणी तयार करुन तें कढत असतांना त्यांत लिंबाच्यारसांतील हस्तिदंत काढून बुडवावा, व जरा आंच द्यावी, मग हस्तिदंत बाहेर काढून धुऊन सुकवावा. जितका लिंबाचा रस हस्तिदंतांत जास्ती मुरला असेल तितका रंग लवकर चढतो.

 सुरंगीचा तांबडा रंगसुरंगीची पूड पावशेर, पावशेर दुधांत घालून खूप कुसकरावी व एकरात्र तशीच भिजत ठेवावी. दुसऱ्याच दिवशीं सकाळीं त्यांत एकशेर पाणी, व दोन तोळे बाळहर्तकीची पूड टाकून उकळवावी. व त्यांत लिंबाच्या रसांत व मिठांत भिजविलेला हस्तिदंत बुडवून अर्धा तास आंच द्यावी. या रंगांत थोडी किरमिजी दाण्याची पूड टाकिली व लिंबाच्या पाण्यांतून काढल्यावर "पालिश' कागदानें हस्तिदंत घासला तर हा रंग जास्ती खुलतो.

 हिरवा रंगलिंबाचा रस व पाणी यांत हस्तिदंत दोन दिवस भिजत ठेवावा. नंतर तो काढून घेऊन त्याच पाण्यांत मोरचुत व जंगाले घालून पुष्कळ घोटावे. व त्यांत पुनः हस्दिदंत टाकून तीन चार दिवस ठेवावा आणि मधून मधुन ढवळीत जावें.

 पोपटी रंगहा हिरव्या रंगाप्रमाणेंच तयार करावयाचा. फरक इतकाच कीं त्यांत मोरचुत घालावयास नको.

 पिंवळा रंगलिंबाच्या रसांत पाणी घालून त्यांत हस्तिदंत तासभरपर्यंत भिजत ठेवावा, नंतर हळदीचा काढा करून तो निववावा, व त्यांत तो हस्तिदंत टाकून २४ तासपर्यंत आंतच राहूं द्यावा. हळदीच्या पाण्यांत केशर घातला तर ज्यास्ती खुलतो.

 काळा रंग