देवीला दंडवत

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> दंडवत सांग माझा दंडवत सांग दंडवत सांग माझा दंडवत सांग ॥धृ॥

कोल्हापुरच्या अंबाबा‌ईला तुळजापूरच्या भवानीला माहूरच्या रेणूकेला दंडवत सांग ॥१॥

सप्तशृंगी जगदंबेला म्हैसुरच्या चामूंडेला काशीच्या अन्नपूर्णेला दंडवत सांग ॥२॥

शिवनेरीच्या शिवा‌ईला प्रतापगडच्या भवानीला पुण्याच्या पर्वतीला दंडवत सांग ॥३॥

कांचीपूरच्या कामाक्षीला मदुरा‌ईच्या मिनाक्षीला देवी कन्याकुमारीला दंडवत सांग ॥४॥

अष्टभूजा पद्मावतीला चतु:शृंगीच्या जोगेश्वरीला देवी अंबेजोगा‌ईला दंडवत सांग ॥५॥

कलकत्तेच्या कालिकेला कार्ल्याच्या एकविरेला गोव्याच्या शांतादुर्गेला दंडवत सांग ॥६॥

वज्रेश्वरी शारदादेवीला सरस्वती शाकंबरीला सर्वशक्ति गायत्रीला दंडवत सांग ॥७॥

सप्तशृंगी व्याघ्रांबरीला संतोषी शितळादेवीला पतिव्रता सीतादेवीला दंडवत सांग ॥८॥

आशागडच्या संतोषीला डहाणूच्या महालक्ष्मीला विरारच्या जिवदानीला दंडवत सांग ॥९॥

<poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg