जोगेश्वरीची आरती
Jump to navigation
Jump to search
जय देवी जय देवी जय जोगेश्वरी जननी
आरती ओवाळितो तुझीया पावन चरणी ॥धृ॥
तूच निर्मिलेस विश्व सारे
आकाश, प्रकाश, कोटी कोटी तारे
तुझ्या हाती जन्म मरणाचे फेरे
रंग रसानी नटविलीस सारी ही अवनी ॥१॥
शिवशक्ति आई, तू योगिनी
मुक्त केलीस सारी धरणी
आदि जननी तूच, जीवन संजीवनी
करुणा कर, शरण शरण तव चरणी ॥२॥
सहस्त्र सूर्यांचे तेज तव शरिरात
शीतलता शत चंद्रांची नयनात
ग्रह नक्षत्रांच्या माळा तव कंठात
सर्व तीर्थांचे मांगल्य तुझीया चरणी ॥३॥
कर आई विघ्नांचे निरसन
दूर्धर रोगांचे निर्मूलन
दुःख दारिद्रयाचे दहन
फळा फुलांनी, धन धान्यांनी बहरु दे धरणी ॥४॥
![]() |
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. | ![]() |
